Shri Saibaba Sansthan Recruitment 2023 : शिर्डीच्या साईबाबा संस्थानमध्ये हवेत पुजारी; इच्छुक असाल तर लगेच करा अर्ज 

करिअरनामा ऑनलाईन । देश विदेशात ख्याती (Shri Saibaba Sansthan Recruitment 2023) असलेल्या शिर्डीच्या साईबाबा मंदिरात रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डी, अहमदनगर अंतर्गत सहायक पुजारी पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी, अहमदनगर
भरले जाणारे पद – सहायक पुजारी
पद संख्या – 10 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (समक्ष किंवा टपालाने)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी, तालुका – राहता, जिल्हा -अहमदनगर
नोकरी करण्याचे ठिकाण – शिर्डी, अहमदनगर

असा करा अर्ज – (Shri Saibaba Sansthan Recruitment 2023)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही मार्गातून आलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
3. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज बाद ठरवण्यात येतील.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – sai.org.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com