Shikshak Bharti 2024 : राज्यात ऑगस्टमध्ये होणार 10 हजार शिक्षकांची भरती; उमेदवारांना मोठा दिलासा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील शिक्षक भरती संदर्भात महत्वाची (Shikshak Bharti 2024) अपडेट हाती आली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 30 टक्के रिक्त जागांपैकी 10 टक्के पद भरतीची जाहिरात आता पवित्र पोर्टलवर निघाली आहे. खाजगी अनुदानीत संस्थांना देखील या भरतीमध्ये सहभागी होता येणार आहे. जिल्हा परिषदांमधील 3,500 तर खाजगी संस्थांमधील 6,500 पदे यावेळी भरली जाणार आहेत. या भरतीमुळे शिक्षक होवू पाहणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

10 वर्षातील सगळ्यात मोठी शिक्षक भरती
राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी याबाबतची (Shikshak Bharti 2024) अधिसूचना जाहीर केलेली आहे. या जाहिरातीनुसार 30 हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून ही मागील 10 वर्षातील सगळ्यात मोठी शिक्षक भरती होणार आहे. यामध्ये जिल्हा परिषदांमधील 22 हजार पदांचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या नियमानुसार 30% पदे रिक्तच राहतील. ही रिक्त पदे ऑगस्ट महिन्यात भरली जाणार आहेत. याआधी खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांसाठी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात अपलोड करता आली नव्हती; त्यांनाही यावेळी रिक्त पदावर शिक्षक मिळणार आहेत.

या महिन्यात होणार TET परीक्षा (Shikshak Bharti 2024)
डी. एड., बी. एड. उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना शिक्षक होण्यासाठी TET परीक्षा देखील उत्तीर्ण करावी लागते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून टीईटी घेण्याचे नियोजन सुरू आहे. आणि आता त्यासंबंधीच्या निविदा काढण्याची कार्यवाही देखील अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे आता ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये TET परीक्षा घेतली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com