सिनीअर हॉर्टिकल्चर ऑफिसर, चिफ ऑपरेटिंग ऑफिसर पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड कडून  नोकरीसाठी जागा काढण्यात आल्या आहेत. कृषी आणि फलोत्पादन (हॉर्टिकल्चर) संलग्न क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्यांना ही संधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाने वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या दोन पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील पदांसाठीची शैक्षणिक अर्हता पहावी आणि अर्ज करावेत.

वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी, हे पूर्णवेळासाठीचे पद असून एकूण ७ जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रता व शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याच्या अधिक माहितीसाठी नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाच्या www.nhb.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. ९३०० पासून ३४८०० पर्यंत दिला जाणार आहे. तसेच ग्रेड पे ४२०० रु दिला जाणार आहे.  या पदासाठीची वयोमर्यादा ५६  वर्षे इतकी आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ ऑक्टोबर २०२० आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ), हे पूर्णवेळासाठीचे पद असून हे एकच पद आहे. या पदासाठी  हार्वेस्ट मॅनेजमेंट/ कृषी व्यवसाय व्यवस्थापन/ अॅग्री लॉजिस्टिक वा इंजिनीअरिंग/व्यवस्थापन या विषयातील शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा आयआयएम, आयआयटी, आयआयएफएम, आयआरएमए अशा संस्थांतील पदवी असणे आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवाराचे वय  १६ मे २०२० या अर्हता दिनांकापर्यंत  ५० वर्षांपेक्षा कमी असावे.

वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी पदासाठी जाहीरात प्रसिद्ध झाल्पासून ४५ दिवसांमध्ये अर्ज नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाच्या कार्यकारी संचालकांकडे पोहोचणे आवश्यक आहे. पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अर्जाचा नमुना बोर्डाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवारांना अधिक पतशीलासाठी एम्प्लॉयमेंच न्यूज दि. १२ – १८ सप्टेंबर येथेही माहिती मिळेल. मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी पदासाठी इच्छुक उमेदवारांनी  “Application-NCCD” अशा उल्लेखासह आपले पूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता याच्या माहितीसह परिपूर्ण अर्ज सिलबंद लिफाफ्यातून पाठवावे.  अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत १६ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे.

The Managing Director, National Horticulture Board, 85, Institutional Area, Sector-18, Gurugram – 122015, Haryana या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com