करिअरनामा ऑनलाईन । आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या (Tata Electronics Jobs) चिप असेंब्ली सेवेचा पायाभरणी समारंभ पार पडला आहे. या कार्यक्रमात टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले; टाटा इलेक्ट्रॉनिक्स चिप उत्पादक प्रकल्प वाहन, ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय यांसह विविध उद्योगांना टप्प्याटप्प्याने आवश्यक सेमीकंडक्टर चिपचा पुरवठा करून सर्व क्षेत्रांची गरज पूर्ण करतील आणि यामाध्यमातून तब्बल 72 हजार नोकऱ्या निर्माण होतील.
72 हजार नोकऱ्या निर्माण होणार
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या ९१ हजार कोटी रुपये खर्चाच्या चिप उत्पादन प्रकल्पाचे आणि २७ हजार कोटी रुपयांच्या चिप असेंब्ली सुविधेचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. “या प्रकल्पांची ही सुरुवात आहे, हळूहळू याचा विस्तार होईल. येथे ५० हजार नोकऱ्या आणि आसाममध्ये किमान २० ते २२ हजार नोकऱ्या उपलब्ध होतील;” असेही चंद्रशेखरन यांनी सांगितले.
या प्रकल्पात २८ नॅनोमीटर ते ११० नॅनोमीटरच्या चिप तयार करण्याची क्षमता आहे, असेही त्यांनी सांगितले. “२०२६च्या उत्तरार्धात चिपचे उत्पादन करणे आमचे (Tata Electronics Jobs) उद्दिष्ट आहे. आसाममध्ये २०२५ च्या उत्तरार्धात किंवा २०२६ च्या सुरुवातीस उत्पादन सुरू करू शकतो;” असेही चंद्रशेखरन यांनी स्पष्ट केले.
या क्षेत्रांच्या गरजा पूर्ण होतील (Tata Electronics Jobs)
एन. चंद्रशेखरन यांच्या मते, टाटा इलेक्ट्रॉनिक्स चिप्सचा फायदा अनेक क्षेत्रांना होईल. टाटा इलेक्ट्रॉनिक्स चिप्स ऑटोमोटिव्ह, पॉवर, इलेक्ट्रॉनिक्स, ग्राहक आणि वैद्यकीय यासह इतर अनेक क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करतील. टाटाचा चिप प्लांट 28 नॅनोमीटर (nm) ते 110 नॅनोमीटर नोड्सपर्यंत वेफर्स तयार करण्यास सक्षम आहे. स्मार्टफोन, टॅब्लेट इत्यादी उच्च-तंत्र गॅझेट्सना प्रामुख्याने 3nm, 7nm आणि 14nm सारख्या लहान नोड्समध्ये चिप्सची आवश्यकता असते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com