करिअरनामा ऑनलाईन। भारतातील सायंटिस्ट आपल्या देशाला मोठं करून देश पुढे घेऊन जाण्याच्या (Scientist Success Story) कामात मोठा वाटा उचलत आहेत. अशाच एका भारतीय मुलीनं जगात देशाचं नाव मोठं केलं आहे. सिलीगुडीच्या श्रेयसी आचार्याचा जगातील टॉप शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश झाला आहे. तिच्या फिजिक्स संबंधीच्या रिसर्च पेपरला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. श्रेयसीचे नाव जगातील इतर चार प्रतिभावान संशोधकांसोबत जोडलं गेलं आहे. त्यामुळे जगभरातून श्रेयसीच्या या कार्याचं कौतुक होत आहे.
असं काय केलं श्रेयसीनं?
श्रेयसीला तिच्या उत्कृष्ट शोधनिबंधासाठी युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च किंवा CERN या जगातील सर्वात मोठ्या वैज्ञानिक संस्थेने ‘एलिस थीसिस पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आलं आहे. सत्येंद्रनाथ बोस यांचे नाव बिग बँग थिअरी किंवा गॉड पार्टिकलमागील शास्त्रज्ञांशी जोडले गेले होते. त्यानंतर आता श्रेयसीचं नाव जोडण्यात आलं आहे. श्रेयसीचा रिसर्च पेपर हा बिग बँग नंतर प्रोटॉन-कणांच्या टक्कर नंतरच्या क्षणी निर्माण झालेल्या कणांवर लिहिलेला होता. गेल्या वर्षाच्या शेवटी, श्रेयसीने तिचा बिग बँगवर प्रबंध लिहिला. कारण ती भारतीय CERN ची सहयोगी सदस्य आहे. त्यामुळे तिला CERN मध्ये संशोधन करण्याची संधी मिळाली.
असा होता शैक्षणिक प्रवास
सिलीगुडी शहराच्या वॉर्ड क्रमांक 24 च्या भारतनगर येथील श्रेयसी रहिवासी आहे. श्रेयसीनं तिच्या पालकांबरोबर शहराचं नाव मोठं केलं आहे.
श्रेयसीने बारावीपर्यंत सिलीगुडीमध्ये विज्ञानाचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर जाधवपूर विद्यापीठात भौतिकशास्त्राचे शिक्षण घेतले. तिथून तिने भाभा अणु संशोधन केंद्रात संशोधक म्हणून (Scientist Success Story) काम केले. तिने 2021 पासून CERN मध्ये काम करण्यास सुरुवात केली. श्रेयसी सध्या फ्रान्समधील एलिस संशोधकांसोबत संशोधन करत आहे. गेल्या आठवड्यात CERN येथे एलिस सप्ताह साजरा करण्यात आला तेव्हा ती त्यात सामील झाली होती.
याच एलिस सप्ताहमध्ये तिने आपले रिसर्च पेपर सादर केले. तिथे श्रेयसीचा रिसर्च पेपर सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखला गेला. श्रेयसी आचार्य यावेळी बोलताना म्हणाली, “मला एवढी सन्माननीय मान्यता मिळेल असे वाटले नव्हते. अर्थात, माझ्या पालकांसह माझ्या सर्व प्राध्यापकांनी आणि हितचिंतकांनी या कामात मला हातभार लावला त्यामुळे मी हे यश मिळवू शकले. या क्षेत्रात आणखी प्रबंध सादर करून मोठे यश मिळवण्याचा माझा मानस आहे.”
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com