मुंबई । राज्यात कोरोना विषाणूची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या पार्श्वभूमीवर जून महिन्यात मुलांच्या शाळा सुरु होणार का? त्यांचे वर्ग कसे भरणार? असे बरेच प्रश्न विद्यार्थी, पालक, शिक्षक याना पडले होते. या विषयावर सातत्याने चर्चा सुरु होत्या. आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून जून महिन्यात शाळा सुरु केल्या जाणार नाहीत. १ जुलैपासून राज्यातील शाळा सुरु करण्याचा विचार करी आहोत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
शाळा कधी सुरु होणार? या संदर्भात नगरसेविका अश्विनी कदम यांनी अजित पवार यांना संपर्क केला असता त्यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील कोरोना स्थिती पाहून जून महिन्यात शाळा सुरु केल्या जाणार नाहीत अशी चर्चा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत झाली असल्याचे त्यांनी सांगितले. १ जुलैपासून शाळा सूर करण्याचा विचार आहे मात्र अद्याप निर्णय झाला नाही. जरी १ जुलै ला शाळा सुरु झाल्या तरी पहिले काही दिवस बुडण्याची शक्यता आहे. म्हणून मुलांच्या ख्रिसमस, दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या कमी करून दिवस भरून काढण्याची चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान शाळा सुरु करण्यावर चर्चा झाल्या आहेत. अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. विविध पातळ्यांवर त्यांचे काम सुरु आहे. मात्र जूनमध्ये शाळा सुरु झाल्यातर आम्ही मुलांना शाळेत कसे पाठवायचे हा प्रश्न पालकापुढे होता. त्याचे निराकरण झाले असून १५ जुलैपर्यंतही शाळा सुरु होतील अशी शक्यता नाकारता येणार नाही.
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com