करिअरनामा ऑनलाईन । जून महिना म्हटलं की उन्हाळी सुट्ट्या (School Holiday in July) संपून मुलांची शाळेत जाण्याची लगबग सुरू होते. पुस्तके, वह्या, कंपास, स्टेशनरी साहित्य खरेदी करण्यासाठी मुलांसह त्यांच्या पालकांची बाजारपेठेत एकच झुंबड उडालेली दिसते. दरवर्षीप्रमाणे यंदा ही जून महिन्याच्या मध्यावर शाळा सुरू झाल्या आहेत तरीही विद्यार्थ्यांना ओढ आहे ती शाळेला सुट्टी कधी लागते याची. अशा विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची अपडेट आहे.
उद्यापासून जुलै महिना सुरु होतोय. या महिन्यात किती सुट्ट्या आहत हे तुम्हाला पाहायचे असेल तर इथे तुमच्यासाठी यादी देण्यात आली आहे. यामध्ये साप्ताहिक सुट्या व्यतिरिक्त येत्या जुलै महिन्यात शाळा आणि महाविद्यालयांना काही दिवस सुट्या असतील; याची माहिती दिली आहे.
तसं पहायला गेलं तर जूनचा अर्धा महिना उन्हाळी (School Holiday in July) सुट्ट्यांमध्येच जातो. शाळा सुरु होते तोपर्यंत पावसाच्या जोरामुळे विद्यार्थ्यांना आयती सुट्टी मिळते. जुलै महिना किती सुट्ट्या घेऊन येत आहे तसेच जुलै महिन्यात शाळा आणि महाविद्यालये कधी बंद राहणार याबाबत जाणून घेऊया.
जुलैमध्ये शाळा किती दिवस बंद राहणार (School Holiday in July)
1. नेहमीप्रमाणे जुलैमध्येही शाळांना चार दिवसांची आठवड्याची सुट्टी असेल. काही ठिकाणी रविवारसोबतच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेल. अधिकृतपणे पाहिले तर चार रविवारसह आणखी एक दिवस सुट्टी असेल.
2. मोहरम निमित्त बुधवारी 17 जुलै रोजी संपूर्ण भारतभर शाळा बंद राहणार आहेत. अनेक ठिकाणी महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी मुलांना सुट्टी असते.
सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे….
1. दि. 7 जुलैला पहिल्या रविवारी शाळा बंद असतील.
2. दि. 13 जुलैला पहिला शनिवार आणि 14 जुलैला दुसरा रविवार म्हणून शाळा बंद राहतील.
3. दि. 21 जुलैला तिसरा रविवार म्हणून मुलांना सुट्टी असेल.
4. दि. 27 जुलै आणि 28 जुलै रोजी चौथा शनिवार आणि चौथा रविवार म्हणून शाळांना सुट्टी असेल.
लॉंग विकेंड मिळणार नाही
विद्यार्थ्यांमध्ये पालक दर महिन्यात लॉंग विकेंडच्या (School Holiday in July) शोधात असतात. पण जुलैमध्ये तुम्हाला ही संधी मिळणार नाही. जुलै महिन्यात शनिवार-रविवारला लागून जास्त सरकारी सुट्ट्या आल्या नाहीत; त्यामुळे या कालावधीत तुम्हाला कोणताही लॉंग वीकेंड मिळणार नाही.
असं करा सुट्टीचे नियोजन
जुलैमध्ये लॉंग विकेंड नसला तरी तुम्ही 15 आणि 16 जुलैला सुट्टी घेतली तर तुम्हाला 13 जुलै ते 17 जुलै अशी पाच दिवसांची मोठी रजा मिळू शकते. या काळात तुम्ही कुटुंबासह पावसाळी ट्रीप काढू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com