SBI Recruitment 2024 : SBI ची जम्बो भरती!! लवकरच 7000 पेक्षा जास्त जागांवर होणार भरती

करिअरनामा ऑनलाईन । ज्या उमेदवारांना बँकेत नोकरी (SBI Recruitment 2024) करायची आहे; अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेत मेगाभरती होणार आहे. भारतीय स्टेट बँकेत तब्बल 7000 हून अधिक पदांवर बंपर भरती करण्यात येणार आहे. या भरतीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली नाही; मात्र लवकरच ही भरती जाहीर होण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या भरतीची अधिकृत अधिसूचना एप्रिल महिन्यात जारी होण्याची शक्यता आहे. तर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख मे महिन्यापर्यंत असेल; अशी शक्यता आहे.

बँकेतील नोकरी ही सुरक्षित नोकरी समजली जाते. बँकेत नोकरी लागल्यानंतर मिळणारा भरघोस पगार, आठवड्याच्या सुट्टीसह मिळणारे इतर बँक हॉली डे तसेच इतर भत्ते आणि सुविधा (SBI Recruitment 2024) यामुळे अनेक तरुण-तरुणी बँकेत नोकरी मिळवण्यासाठी धडपडत असतात. अशा उमेदवारांसाठी SBI मध्ये होणारी ही भरती महत्वाची ठरणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही sbi.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट देवून माहिती घेवू शकता. जाणून घ्या या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर….

भरली जाणारी पदे –
1. विशेष अधिकारी
2. लिपिक
3. इतर पदे
पद संख्या – 7000 हून अधिक
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख एप्रिल महिन्यात अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.
आवश्यक वय मर्यादा – (SBI Recruitment 2024)
या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे असणे आवश्यक आहे आणि कमाल वय 28 वर्षे असणे आवश्यक आहे. विविध पदांसाठीची वयोमर्यादा वेगवेगळी असू शकते.

इतका मिळेल पगार –
लिपिक पदावर निवड झालेल्या उमेदवाराला मूळ वेतन 19,900 रुपये आहे, तर महिन्याच्या शेवटी भत्ते मिळून त्याला 29,000 ते 30,000 रुपये पगार मिळतो.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक होण्यासाठी पात्र उमेदवाराकडे हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये टायपिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (SBI Recruitment 2024)
2. तसेच उमेदवाराने भारतातील कोणत्याही विद्यापीठातून बॅचलर पदवी घेतली असणे आवश्यक आहे.

अशी होणार निवड –
1. भारतीय स्टेट बँकेत भरती होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची प्राथमिक परीक्षा घेतली जाईल.
2. ही परीक्षा स्थानिक भाषा आणि इंग्रजी भाषेत होईल.
3. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल.
4. पूर्व परीक्षा एकूण 100 गुणांसाठी असेल ज्यामध्ये 3 विभाग असतील.
(टीप- भरतीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर (SBI Recruitment 2024) अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होण्याची तारीख, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि परीक्षेची तारीख जाहीर होईल.)
अर्ज फी –
1. जनरल/ओबीसी (GEN/OBC) – 750 रुपये
2. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ असेल
अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com