करिअरनामा ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी (Rozgar Melava) आज आयोजित केलेल्या रोजगार मेळावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून 51,000 युवकांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. हा मेळावा ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडला. भारतातील विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशातील युवकांना या कार्यक्रमाद्वारे ही नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.
पोलीस दलातील नियुक्त्या
या कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातून 45 वेगवेगळ्या स्थानांवरुन हे नवीन कर्मचारी उपस्थित होते. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून प्रामुख्याने पोलीस दलातील नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF) आणि सशस्त्र सीमा बल (SSB) यासह विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFS) नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. देशभरातून निवडलेले नवीन उमेदवार, MHA अंतर्गत विविध संस्थांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी), सब-इन्स्पेक्टर (जनरल ड्यूटी) आणि नॉन-जनरल ड्यूटी कॅडर पोस्ट अशा विविध पदांवर लवकरच रुजू होतील.
पोर्टलच्या माध्यमातून दिलं जाणार ऑनलाईन प्रशिक्षण (Rozgar Melava)
नियुक्ती देण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना IGOT- कर्मयोगी पोर्टलच्या माध्यमातून ‘कर्मयोगी प्रारंभ’ च्या अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध असेल. हे कर्मचारी ह्या पोर्टलच्या माध्यमातून कुठेही बसून आपले प्रशिक्षण पुर्ण करू शकतील अशी सुविधा पोर्टलच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युवकांचे अभिनंदन केले. पोलीस दलात नियुक्ती मिळालेल्या सर्वांना आपण ‘अमृतरक्षक’ आहात असे देखील संबोधले. सरकार युवकांना (Rozgar Melava) सरकारी सेवेत दाखल करून घेण्यासाठी करत असलेल्या चांगल्या बदलांबद्दल त्यांनी माहिती दिली. रोजगार मेळाव्यामार्फत करण्यात आलेल्या नियुक्तीमुळे पोलीस दलाला अधिक बल मिळून पोलीस दल अधिक सक्षम होईल; असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com