करिअरनामा । अधिकाऱ्यांच्या खेळामुळेच राज्यात खाजगी एजन्सीद्वारे नोकरभरती केली जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. केरळसारख्या राज्याला राज्य लोकसेवा आयोगामार्फत नोकर भरती करता येते तर महाराष्टात का होऊ शकत नाही ? असाही प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान राज्यातील शासकीय विभागांतील रिक्त पदांची संख्या आता दोन लाखांवर पोहचली आहे. थेट जनतेशी संबंधित गृह, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, जलसंपदा, कृषी व पशुसंवर्धन,महसूल व वने, महिला व बालविकास या विभागांत सर्वाधिक रिक्त पदे आहेत.
या पार्श्वभूमीवर शासकीय मेगाभरतीची तारीख निश्चित झाली असून १५ एप्रिलपर्यंत खासगी एजन्सी नियुक्त करून २० एप्रिलपासून मेगाभरतीला सुरवात होणार आहे.या होणाऱ्या नोकर भरतीवर रोहित पवार यांनी आपलं मत व्यक्त केले आहे.
नोकरी शोधताय ? नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”