Resume Tips : जॉब Interview ला जाऊन Resume घरीच विसरलात? गोंधळून जावू नका; तिथेच थांबा आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये असा बनवा CV

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असणारा (Resume Tips) प्रत्येकजण कंपन्यांमध्ये नोकरीसाठी Resume देत असतात. अनेक तरुण चांगली नोकरी मिळावी म्हणून मुलाखतीची तयारी करत आहेत. पण कोणतीही नोकरी मिळवायची असेल तर यासाठी Resume महत्त्वाचा असतो. एकदा तुमचा Resume पुढील कंपनीला आवडला की नोकरी पक्की होते. पण विचार करा जर तुम्ही एखाद्या मुलाखतीला गेलात आणि Resume घरी विसरलात तर? समजा असं झालंच तर अजिबात टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही Resume टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही अवघ्या 10 मिनिटांमध्ये Resume तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया. पुढील स्टेप्स फॉलो करा आणि अवघ्या 10 मिनिटात Resume तयार करा.

1. तुमच्या स्मार्टफोनमधील Application चा वापर करा (Resume Tips)
अवघ्या 10 मिनिटांमध्ये Resume बनवण्यासाठी तुमच्या फोनमधील नोटपॅड किंवा MS-office ही अप्लिकेशन असेल तर ते ओपन करा. यानंतर तुमचा Resume म्हणजेच तुमच्याबद्दलची माहिती यात लिहिण्यास सुरुवात करा. सुरुवातीला तुमचं नाव बोल्डमध्ये लिहा. यानंतर खाली पॉईंटनुसार पुढील गोष्टी लिहिण्यास सुरुवात करा.

2. कमी शब्दात Objective लिहा
लक्षात ठेवा तुमच्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळे कोणत्याही गोष्टी लिहिताना अगदी मोजक्या शब्दांमध्ये आणि सुटसुटीत लिहा. Objective लिहिताना सात ते आठ शब्दांमध्ये (Resume Tips) तुमचं म्हणणं मांडा.

3. अनुभवाविषयी लिहणं विसरू नका
या नोटपॅडमध्ये सुरुवातीला तुम्हाला असलेल्या अनुभवाविषयी लिहा. तुमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे तुम्ही काम करत असलेल्या मागील कंपनीबद्दल आणि तिथल्या कामाच्या कालावधीबद्दल लिहा. जर तुम्हाला कुठल्या इंटर्नशिपचा अनुभव असेल तर तिथे नक्की काय काम केलत ते मोजक्या शब्दात (Resume Tips) लिहा. अनुभव लिहिताना मागील कंपनीतील पोस्ट लिहिण्यास विसरू नका.

4. तुमच्यातील Skills बद्दल माहिती द्या
कमीत कमी वेळेत Resume बनवताना तुम्ही सर्वच गोष्टी लिहू शकत नाही. त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टी लिहा. यामध्ये तुमच्यातील स्किल्सबद्दल लिहा. काही विशेष कोर्सेस केले असतील तर त्यांची माहिती द्या. तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची असते.

5. तुमच्या कॉन्टॅक्टची माहिती अचूक लिहा
Resume बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा फोन नंबर आणि ई-मेल आयडी. ही माहिती तुमच्या Resumeमध्ये नसेल तर तुम्हाला नोकरी मिळणं कठीण (Resume Tips) होईल. म्हणूनच सर्वात आधी तुमचा ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर अचूक लिहा. ज्यामुळे तुमच्याशी संवाद साधण्यात कंपनी यशस्वी होईल.

6. ‘हे’ विसरू नका (Resume Tips)
तुमचा Resume पूर्ण टाईप करून झाला की तो पुन्हा एकदा चेक करायला विसरू नका. Resume च्या शेवटी सेल्फ डिक्लरेशन लिहिण्यास विसरू नका. यानंतर Resume जर हार्डकॉपीमध्ये द्यायचा असेल तर Resume ची प्रिंट घ्या किंवा ई-मेल आयडीवर सेंड करा. लक्षात ठेवा नेहमी Resume बनवण्यासाठी एक चांगला इन्स्टंट फॉरमॅट रेडी ठेवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com