एसटी कंडक्टरचा मुलगा बनला डेप्युटी कलेक्टर, MPSC परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनाव ऑनलाईन । महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या (MPSC) मुख्य परीक्षा 2019 चा निकाल जाहीर झाला आहे. सातारा जिल्ह्यातला प्रसाद चौगुले याने परीक्षेत बाजी मारत राज्यात पहिला तर उस्मानाबाद जिल्ह्यातील रवींद्र अप्पादेव शेळके याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. पर्वणी पाटील मुलींमध्ये पहिली आली आहे. ही राज्यसेवेची सर्वात मोठी बॅच होती. या बॅचमध्ये 420 अधिकारी झाले आहेत. विद्यार्थ्यांना गेली अनेक दिवस या निकालांची प्रतिक्षा होती. 15 जुलै 2019 रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.

कंडक्टरचा मुलगा बनला डेप्युटी कलेक्टर

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील रवींद्र अप्पदेव शेळके तरुणाने परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे. रवीद्र शेळके याने एकूण 582 गुण प्राप्त केले आहेत. रवींद्र हा राज्यात दुसरा आला आहे. रवींद्र शेळके हा कळंब तालुक्यातील बोर्डा गावचा रहिवासी असून त्याचे वडील अप्पादेव शेळके हे राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीमध्ये कंडक्टर या पदावर नोकरीला होते. ते सध्या सेवानिवृत्त झाले आहेत. एका कंडक्टरचा मुलगा डेप्युटी कलेक्टर (उपजिल्हाधिकारी) झाल्याने बोर्डा गावसह पंचक्रोशीत आनंदाला उधाण आलं आहे.

डाॅक्टर असलेल्या रवींद्र अप्पादेव शेळके याने लोकमान्य टिळक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सायन मुंबई येथून वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. रवींद्र यानं बारावीपर्यंतचं शिक्षण लातुर येथील सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय येथून पूर्ण केले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर ते वैद्यकीय क्षेत्रात न जाता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता.

2018 मधील राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीपर्यंत त्यांनी धडक मारली होती. परंतु अंतिम निवड यादीत स्थान न मिळाल्याने निराश न होता पुन्हा जोमाने अभ्यास सुरू केला होता. आता रवींद्र याने उपजिल्हाधिकारी या पदाला गवसणी घातली आहे.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com

हे पण वाचा –

MPSC | राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर

घरी बसून हाताला काम नसेल तर ६ हजारात सुरु करा ‘हा’ व्यवसाय; महिन्याला कमवा ४० हजार

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत १५६४ जागांसाठी मेगा भरती

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय; राज्यमंत्री तनपुरे यांचा ATKT विद्यार्थ्यांनाही दिलासा

अखेर MPSC च्या परीक्षांच्या तारखा जाहीर; ह्या दिवशी होणार परीक्षा