अखेर MPSC च्या परीक्षांच्या तारखा जाहीर; ह्या दिवशी होणार परीक्षा

करीअरनामा । अनेक दिवसांपासून स्पर्धा परीक्षार्थी हे परीक्षा कधी होणार ह्या चिंतेमध्ये होते. मात्र आज अखेर आयोगाने परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ह्या परीक्षांमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व व अभियांत्रिकी परीक्षा असणार आहे.

आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 ही परीक्षा 13  सप्टेंबर 2020 रोजी घेण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ही परीक्षा 11 ऑक्टोबर 2020  रोजी होणार आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा  2020 देखील 1 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहे.

कोरोना महामारी व त्यामुळे झालेले लोकडाउन यांमुळे ह्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक हे विचलित झाले होते. मात्र आता आयोगाने परीक्षा वेळापत्रक देऊन विध्यार्थी यांना दिलासा दिला आहे.

img_20200617_132822_7452060303357377269580.jpg

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com