Postal Life Insurance Recruitment 2023 : कोणतीही परीक्षा न देता टपाल खात्यात नोकरी मिळवा; 10 वी पास उमेदवारांसाठी आहे गोल्डन चान्स!!

करिअरनामा ऑनलाईन । टपाल खात्यात नोकरी (Postal Life Insurance Recruitment 2023) करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टपाल जीवन विमा, मुंबई अंतर्गत अभिकर्ता पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 16 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – टपाल जीवन विमा, मुंबई
भरले जाणारे पद – अभिकर्ता (Agent)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त वय मर्यादा नाही.
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई उत्तर विभाग टपाल कार्यालय, नंदा पाटकर मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई – ४०००५७
मुलाखतीची तारीख – 16 ऑक्टोबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
अशी होणार निवड – (Postal Life Insurance Recruitment 2023)
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे.
4. या पदासाठी मुलाखत दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात येईल.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com