Police Patil Bharti 2024 : 10वी पास उमेदवारांची पोलीस पाटील पदावर भरती सुरु; तब्बल 745 जागा भरणार

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Police Patil Bharti 2024) आणि 10वी पास असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नांदेड जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी 745 जागांवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.

विभाग – जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
भरले जाणारे पद – पोलीस पाटील
पद संख्या – 745 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जानेवारी 2024

कोणत्या उप विभागात किती पदे –
1) नांदेड – 88 पदे
2) भोकर – 82 पदे (Police Patil Bharti 2024)
3) कंधार – 170 पदे
4) हदगाव – 101 पदे
5) देगलूर – 143 पदे
6) धर्माबाद – 64 पदे
7) बिलोली – 97 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 25 ते 45 वर्षे असावे.
परीक्षा फी – (Police Patil Bharti 2024)
खुला प्रवर्ग – ₹800/-
मागासवर्गीय/आ.दु.घ.- ₹700/-
नोकरी करण्याचे ठिकाण – नांदेड जिल्हा
लेखी परीक्षा – 14 जानेवारी 2024

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://nanded.gov.in/en/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com