Police Patil Bharti 2023 : ‘या’ जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी होणार नवीन उमेदवारांची निवड; त्वरित Apply करा

करिअरनामा ऑनलाईन । भंडारा जिल्हयातील तुमसर उपविभागाचे (Police Patil Bharti 2023) उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील तुमसर व मोहाडी तालुका गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अधिसूचना जरी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे.
विभाग – तुमसर उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी कार्यक्षेत्र, भंडारा जिल्हा
भरले जाणारे पद – पोलीस पाटील
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 एप्रिल 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – तुमसर उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी कार्यक्षेत्र
परिक्षा फी – (Police Patil Bharti 2023)
1. खुला प्रवर्ग – 500/- रुपये
2. आरक्षीत/आर्थीक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – रुपये 300/-
(राष्ट्रीयकृत बँकेचे डिमांड ड्राफ्ट व्दारे भरणे)
वय मर्यादा – 25 ते 45 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 एप्रिल 2023
निवड प्रक्रिया –
लेखी परीक्षा
मुलाखत (Police Patil Bharti 2023)
आवश्यक पात्रता –
1. उमेदवार 10वी पास असणे आवश्यक आहे.
2. अर्जदाराचे वय दिनांक 06/04/2023 रोजी 25 पेक्षा कमी नसावे व 45 पेक्षा जास्त नसावे.
3. पोलिस पाटील पदाकरीता वयोमर्यादा शिथीलक्षम नाही.
4. अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा (Police Patil Bharti 2023) व त्याच्याकडे ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला असावा.
5. अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे.
6. महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.)
7. मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक.
8. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील अर्जदार यांना सन
कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक राहील. (Police Patil Bharti 2023)
9. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील महिला पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार यांना सन 20२२-२३ कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक

असा करा अर्ज –
उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्जाचा अन्य कोणताही मार्ग/पद्धत स्वीकारला जाणार नाही.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे. (Police Patil Bharti 2023)
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 27 एप्रिल 2023 आहे.
देय तारखेनांतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (Police Patil Bharti 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – bhandara.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com