Police Bharti : पोलीस भरतीसाठी एकाच जिल्ह्यातून सहभागी होण्याचे हमीपत्र द्या… अन्यथा प्रक्रियेतून बाहेर फेकले जाल

Police Bharti
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । दीर्घकाळ रखडलेली पोलीस भरतीची (Police Bharti) प्रक्रिया मागील दोन महिन्यापासून सुरू आहे. या भरती प्रक्रियेत पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी काही सुचना देण्यात येत असतात त्यापैकी एक महत्वाची सूचना म्हणजे आता पोलीस भरतीतील उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून सहभागी होता येणार आहे. एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणताही एक जिल्हा निवडून पोलीस अधीक्षक कार्यालयात त्याबाबत हमीपत्र द्यावे अशी सूचना गृह खात्याने दिली आहे. उमेदवारांसाठी हमीपत्र भरण्याची अंतिम मुदत 17 मे पर्यंत देण्यात आली आहे.

अर्ज पडताळणीवेळी गृह विभागाच्या निदर्शनास आले आहे की, उमेदवारांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून अर्ज भरले आहेत, असे उमेदवारांनी एकाच पदासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केल्याने भरती (Police Bharti) प्रक्रियेनंतर काही जागा रिक्त राहतात. यातून प्रतीक्षा यादीतील काही विद्यार्थ्यांचे नुकसान होते. असा धोका टाळण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही एकाच जिल्ह्यातून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडून तसे हमीपत्र घेण्यात येणार आहे. राज्यात सुमारे १७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया पार पडत आहे.

…अन्यथा अर्ज बाद होणार (Police Bharti)
यासाठी एका जिल्ह्याची निवड करून तसे हमीपत्र उमेदवाराने तो राहत असलेल्या जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात द्यावे, अशी सूचना प्रशिक्षण व खास पथके विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. १७ मे पर्यंत हमीपत्र जमा करा, अन्यथा त्यानंतर येणारे अर्ज बाद होतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com