करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण राज्यासह पुणे शहरात होणाऱ्या (Police Bharti 2024) जोरदार पावसामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात आयोजित करण्यात आलेली मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान आता या मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून दि. २९ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत मैदानी चाचणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मैदानी चाचणीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल.
पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदाच्या ४४८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यापूर्वी मैदानी चाचणी दि. ९ ते २७ जुलै या (Police Bharti 2024) कालावधीत घेण्यात येणार होती. मात्र, संततधार पावसामुळे मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली. ग्रामीण पोलिसांनी मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. ते पुढीलप्रमाणे..
1. पूर्वीची तारीख – 9 आणि 10 जुलै : नवीन तारीख – 29 जुलै
2. पूर्वीची तारीख – 11 जुलै : नवीन तारीख – 30 जुलै
3. पूर्वीची तारीख – 12 जुलै : नवीन तारीख – 31 जुलै
4. पूर्वीची तारीख – 13 जुलै : नवीन तारीख – 1 ऑगस्ट
5. पूर्वीची तारीख – 15 जुलै : नवीन तारीख – 2 ऑगस्ट
6. पूर्वीची तारीख – 25 जुलै : नवीन तारीख – 5 ऑगस्ट
सुधारित वेळापत्रकानूसार उमेदवरांनी महाआयटी विभाग, मुंबई यांचेकडून देण्यात आलेले पूर्वीच्या तारखेचे प्रवेशपत्र घेऊन मैदानी चाचणीसाठी नव्याने देण्यात आलेल्या तारखेस सकाळी पाच वाजता हजर रहायचे आहे; असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com