करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सर्वत्र पोलीस भरतीची प्रक्रिया (Police Bharti 2024) ही सुरू आहे; तर सध्या राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने पोलीस भरतीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक मैदानांवर चिखल साचला असल्यामुळे मैदानी चाचणीत अडचणी येत आहेत. त्यामुळेच आता जिथे पाऊस आहे तेथे भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. यात नांदेड आणि अमरावती विभागाचा समावेश आहे.
याठिकाणची पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलली
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका यंदाच्या पोलीस भरतीला बसत असताना दिसून येत आहे. याच पावसामुळे पोलीस भरती प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ नये म्हणून राज्यातील नांदेड आणि अमरावती ग्रामीण पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, राज्यात जिथे पाऊस असेल तिथे पोलीस भरती पुढे ढकलली आहे, अशी माहिती नुकतीच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Police Bharti 2024)
आज माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्यात ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे. तिथे मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. पाऊस पुढे वाढणार आहे, त्यानंतर (Police Bharti 2024) आचारसंहिता लागेल. त्यामुळे चाचणी पुढे गेली आहे.” दरम्यान, मुसळधार पावसाच्या कारणामुळे पोलीस भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी तरुणांकडून करण्यात आली होती. आता हीच मागणी मान्य झाल्यामुळे तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तर दुसरीकडे, ज्या विभागात पाऊस नाही तिथे चाचण्या होत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच पोलीस भरतीच्या चाचणीसाठी उमेदवार दूरवरुन येतात. त्यांना राहण्याची जागा नसल्याने या मुलांची गैरसोय होताना दिसत आहे. त्यांच्यासाठी जवळच कुठे मंगल कार्यालय किंवा शाळा अशा ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन आम्ही भरती प्रक्रिया राबवणाऱ्या युनिट्सना केले असल्याचे ते म्हणाले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com