करिअरनामा ऑनलाईन । पोलीस भरतीच्या नियमांचे उल्लंघन (Police Bharti 2023) करून एकाच पदासाठी एकाहून अधिक जिल्ह्यातून अर्ज करणाऱ्या २ हजार ८९७ उमेदवारांना अपात्र ठरवण्याचा पोलीस प्रशासनाने घेतलेला निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. मोठ्या प्रमाणावरील बेरोजगारी आणि सार्वजनिक क्षेत्रांत नोकऱ्या मिळवण्याची तरुणांची आकांक्षा यांच्यातील संघर्ष लक्षात घेऊन, सार्वजनिक रोजगार मिळविण्यासाठी कोणताही अन्यायकारक किंवा फसवणुकीचा मार्ग अवलंबला जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
जिल्हा पोलीस चालक पदासाठी काढण्यात आलेल्या (Police Bharti 2023) जाहिरातीनंतर एक लाख १७ हजार उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केले होते. त्यापैकी २ हजार ८९७ उमेदवारांनी एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या ई-मेलवरून आणि माहिती बदलून अर्ज केले होते. मात्र, ही भरती पोलीस दलातील रिक्त पदांसाठी असून ९७.५ टक्के उमेदवारांना मोजक्या उमेदवारांच्या वर्तनाची शिक्षा दिली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार देताना स्पष्ट केले.
पोलीस भरतीच्या नियमांचे उल्लंघन करून एकाच (Police Bharti 2023) पदासाठी एकाहून अधिक जिल्ह्यातून अर्ज केल्याबद्दल निवड प्रक्रियेतून बाद करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात २०० उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर आणि न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय योग्य ठरवून त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या आहेत; त्यामुळे हे उमेदवार अपात्र ठरले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com