Police Bharati : ऑक्टोबरमध्ये सुरु होणार पोलीस भरती; दोन टप्प्यात 20 हजार पोलिसांच्या भरतीची शक्यता

करिअरनामा ऑनलाईन। राज्याच्या पोलिस दलात रिक्तपदे वाढली असून सततचा बंदोबस्त आणि वाढलेल्या (Police Bharati ) गुन्हेगारी खटल्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर आता २०२० आणि २०२१ मधील तब्बल १९ हजार ७५८ रिक्तपदांची दोन टप्प्यात भरती होईल. ऑक्टोबर २०२२ पासून भरतीचा पहिला टप्पा सुरु होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

राज्यातील जवळपास तीन ते पाच लाख तरूणांना पोलिस भरतीची प्रतीक्षा आहे. २०१९ मध्ये जवळपास सव्वापाच हजार रिक्तपदांची पोलिस भरती झाली. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील यांनी सातत्याने सात हजार पोलिस भरतीची घोषणा केली. पण, त्याला मुहूर्त लागलाच नाही. आता शिंदे-फडणवीस सरकारने तशी घोषणा केली आहे. त्यानुसार आता भरतीच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. २०२० मधील सात हजार २३१ तर २०२१ मधील १२ हजार ५२७ पदांची भरती दोन टप्प्यात केली जाणार आहे.

राज्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात सध्या पोलिस शिपायांचे प्रशिक्षण (Police Bharati ) सुरु आहे. तत्पूर्वी, नवीन पोलिस भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम ‘महाआयटी’कडून सुरु आहे. काही दिवसांत ही कार्यवाही पूर्ण होईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये भरती प्रक्रियेला सुरवात होईल, असेही सांगण्यात आले. २०२१ मधील रिक्त झालेल्या पदांची भरती करण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव शासनाला सादर झाला असून त्याला लवकरच मान्यता मिळेल, अशीही शक्यता आहे.

असे असेल भरतीचे संभाव्य नियोजन – (Police Bharati)

७२३१ पदभरतीला शासनाची मान्यता (नक्षलग्रस्त गडचिरोली भागात २८९ व एसआरपीएफ बल क्र. १३मधील ५४ पदांचा समावेश)

पहिल्या टप्प्यातील पोलिस शिपाई भरती ऑक्टोबर २०२२ मध्ये होणार

हे पण वाचा -
1 of 794

२०२१ मध्ये पोलिस शिपाई १० हजार ४०४ तर चालक एक हजार ४०१ आणि सशस्त्र पेलिस शिपायांची ७२२ पदे रिक्त झाली असून त्याची दुसऱ्या टप्प्यात भरतीची शक्यता

२०१९ मध्ये भरती झालेल्यांचे प्रशिक्षण डिसेंबर (Police Bharati ) २०२२ मध्ये पूर्ण होईल; पहिल्यांदा २०२० मधील रिक्त पदांची भरती

ऑक्टोबरमधील भरती झालेल्यांचे प्रशिक्षण ऑक्टोबर २०२३ मध्ये पूर्ण होईल, त्यावेळी २०२१ मधील रिक्तपदांची भरती होईल

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com