Ph.D. Entrance Exam 2024 : Ph.D. प्रवेशासाठी यावर्षी पेट परीक्षा ऑनलाईन होणार; ‘इथे’ आहेत परीक्षा केंद्रे

करिअरनामा ऑनलाईन । पीएच. डी. साठी प्रवेश घेणाऱ्या (Ph.D. Entrance Exam 2024) उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने पीएचडी प्रवेशपूर्व चाचणी म्हणजेच पेट मे महिन्याच्या अखेरीस घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी पेट परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेसाठी सोलापूरसह अकलूज, पंढरपूर व बार्शी येथे ऑनलाइन केंद्रे असणार आहेत. तसेच कोल्हापूर, सातारा, लातूर व धाराशिव येथे देखील परीक्षेची केंद्रे असणार आहेत.

७ नोव्हेंबर २०२२च्या निर्णयानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून पेट परीक्षेत बदल करण्यात आले आहेत. आता पीएचडीला प्रवेश घेतल्यानंतर संबंधित संशोधकास (Ph.D. Entrance Exam 2024) मार्गदर्शन करणारे गाइड त्या पदव्युत्तर महाविद्यालयात प्राध्यापक असणे आवश्यक आहे. आता विद्यापीठासह जिल्ह्यातील अनेक उच्च महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाची सोय झाली आहे. विद्यापीठातील विविध संकुलांप्रमाणे त्या-त्या महाविद्यालयांमध्ये देखील संशोधकांना पीएचडी पूर्ण करता यावी हा त्यामागील हेतू आहे.

तसेच पीएचडी करणाऱ्या उमेदवारांना निवडलेल्या विषयासंदर्भातील ज्ञान ज्याठिकाणी मिळेल त्याठिकाणी जाऊन संशोधन करता येईल. त्यापूर्वी सोलापूरसह विविध जिल्ह्यांमधील (Ph.D. Entrance Exam 2024) विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी मिळावी यासाठी सोलापूरशेजारील जिल्ह्यांमध्ये देखील ‘पेट’साठी केंद्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. एम. ए. , एम. कॉम., एम.एसस्सी, एम.एड्‌. अशा पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनाही पेट परीक्षा देता येणार आहे.

‘या’ उमेदवारांना ‘पेट’चे बंधन नाही (Ph.D. Entrance Exam 2024)
वरिष्ठ महाविद्यालये अथवा विद्यापीठांमधील व्याख्याता पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (UGC) घेतली जाणारी ‘नेट’ परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ‘सेट’ परीक्षेच्या बाबतीतही असेच आहे. या उमेदवारांना Ph. d. प्रवेशासाठी पेट देण्याचे बंधन नाही; असेही UGCने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना पदरमोड करण्याची गरज नाही
पीएचडीधारकांना आता बार्टी, सारथी यासह १० ते १२ फेलोशिप मिळतात. तसेच केंद्र व राज्य सरकारकडूनही अनुदान दिले जाते. याशिवाय विद्यापीठाच्या संकुलात पीएचडी (Ph.D. Entrance Exam 2024) करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना देखील विद्यापीठाकडून अनुदान दिले जाते. त्यामुळे आता पीएचडीसाठी प्रवेश घेतलेल्यांना पदरमोड करण्याची गरज पडणार नाही, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com