Home Blog Page 775

MSEB Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.अमरावती अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या ११ जागांसाठी भरती

MSEB Chandrapur Recruitment 2021

 

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अमरावती अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या ११ जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. या भारतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. न खाली दिलेल्या आस्थापना क्रमांकावर ऑनलाईन अर्ज करायचा असून, अर्ज सुरु होण्याची तारीख 10 मार्च 2021 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2021आहे.अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

एकूण जागा – ११

पदाचे नाव – कोपा (COPA)

शैक्षणिक पात्रता –
01. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
02. राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही.

नोकरीचे ठिकाण – अमरावती (महाराष्ट्र).MSEB Recruitment 2021 |

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

आस्थापना क्र. – E10162701428/ E10162703381

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ordnance factory recruitment 2021 | आयुध निर्माणी कारखाना खडकी, पुणे अंतर्गत वैद्यकीय व्यावसायिका पदांच्या 02 जागांसाठी भरती

IMD Bharti 2021

 

करिअरनामा ऑनलाईन – आयुध निर्माणी कारखाना खडकी, पुणे अंतर्गत वैद्यकीय व्यावसायिका पदांच्या 02 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 18 मार्च 2021 आहे.

एकूण जागा – 02

पदांचे नाव – वैद्यकीय व्यावसायिका

शैक्षणिक पात्रता – 01. एमबीबीएस पदवी 02. भारतीय वैद्यकीय परिषदेसह नोंदणी.

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही.

वेतन – 75000-/

नोकरीचे ठिकाण – खडकी, पुणे (महाराष्ट्र)

मुलाखत देण्याचे ठिकाण – मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, I / c ऑर्डन फॅक्टरी हॉस्पिटल, खडकी पुणे – 411003

अधिकृत वेबसाईट – www.ofbindia.gov.in

मूळ जाहिरात –
PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GIC Recruitment 2021 | जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 44 जागांसाठी भरती

 

करिअरनामा ऑनलाईन – जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 44 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.gicofindia.com

एकूण जागा – 44

पदाचे नाव – ऑफिसर (स्केल-I)

पदाचे नाव & जागा –
1.फायनांस – 15 जागा
2. जनरल – 15 जागा
3.लीगल – 04 जागा
4.इन्शुरन्स – 10 जागा

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/LLB/CA/ पदवी किंवा डिप्लोमा (जनरल इन्शुरन्स/ रीस्क मॅनेजमेंट/लाइफ इन्शुरन्स/ FIII/ FCII) [SC/ST – 55% गुण]

वयाची अट – 21 to 30 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – जनरल/ओबीसी 850/-[SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

वेतन – 32795/- to 65000/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई / संपूर्ण भारत. GIC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मार्च 2021

ऑनलाईन परीक्षा दिनांक – 9 मे 2021 

अधिकृत वेबसाईट – www.gicofindia.com

मूळ जाहिरात –PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

उद्या होणार राज्यसेवेच्या परीक्षेची तारीख जाहीर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

Udhhav Thackeray

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. मात्र राज्यातील वाढत्या कोरोना घटनांमुळे राज्य सरकारने ही परीक्षा पुन्हा पुढे ढकलली आहे. गेले काही महिने सातत्याने पुढे ढकलल्या जाणाऱ्या परीक्षेच्या तारखांमुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तारीख पुढे गेल्यामुळे राज्यातील ठिकठिकाणचे विद्यार्थी आक्रमक झाले आणि आंदोलनाला बसले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह करत परीक्षा फार पुढे ढकलण्यात आल्या नसून उद्याच पुढची तारीख जाहीर करण्यात येईल असे ते म्हणाले. याबरोबरच परीक्षा पुढच्या आठवड्यातच होतील असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याचे स्पष्टीकरण देत असताना त्यांनी सांगितले, “या परीक्षांकरिता शासकीय अधिकारी यांची देखील भूमिका असते. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे बरेचसे शासकीय अधिकारी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये व्यस्त आहेत. त्याचबरोबर वाढत्या रुग्णसंख्या लक्षात घेता परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे म्हणूनच या सर्वांचे योग्य नियोजन करून १४ तारखेनंतरच्या पुढच्या आठवड्यातच परीक्षा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने घेतल्या जातील” राज्यातील विद्यार्थ्यांची काळजी मी समजू शकतो, आणि आम्ही त्यांचा पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेत आहोत असेही ते म्हणाले.

परीक्षांच्या तारखांवरून राज्यातील विदयार्थ्यांना भडकवले जात आहे. अशा अफवांना बळी पडू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. दिवसभरात राज्यात प्रचंड असांतोष पसरविण्याचा प्रयत्न केला गेला आहे असेही ते म्हणाले. दरम्यान राज्यातील बिघडलेले वातावरण लक्षात घेऊन दर रविवारी होणारा हा संवाद असा आठवड्याच्या मधल्या दिवशी घेतो आहे असेही ते म्हणाले. सरकार नेहमीच विद्यार्थ्यांच्या बाजूने असणार आहे तसेच परीक्षेसाठी असणाऱ्या वयोमर्यादेचा देखील विचार करून आम्ही कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.

UPSC Recruitment 2021| संघ लोक सेवा आयोगा अंतर्गत विविध पदांच्या 89 जागांसाठी भरती

UPSC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – UPSC संघ लोक सेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 89 जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/   UPSC Recruitment 2021 For 89 Posts

एकूण जागा – 89

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –

1. आर्थिक अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता – अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी

2. सहायक कार्यकारी अभियंता – 10
शैक्षणिक पात्रता – सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये बी.ई. / बी.टेक पदवी

3. प्रोग्रामर – 01
शैक्षणिक पात्रता – सांख्यिकी / गणित मध्ये पदव्युत्तर पदव

4.लोक अभियोजक – 43
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायदा पदवी

5.सहायक लोक अभियोजक – 26
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायदा पदवी

6.वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी – 08
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी

वयाची अट – 30 to 38 वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट, PWD – १० वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – २५/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.  UPSC Recruitment 2021 For 89 Posts.

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

EPFO Recruitment 2021। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत विविध पदांच्या 44 जागांसाठी भरती

EPFO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था अंतर्गत विविध पदांच्या 44 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.epfindia.gov.in EPFO Recruitment 2021

एकूण जागा – 44

पदाचे नाव आणि जागा –
1.मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी – 01

2. मुख्य तंत्रज्ञान अधिकारी – 01

3. सहसंचालक – 06

4. उपसंचालक – 12

5.सहाय्यक संचालक – 24

शैक्षणिक पात्रता – 01. पदवी / पदव्युत्तर पदवी 02. अनुभव.

वयाची अट – 56 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही

वेतन-
1. मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी – 123100 to 215900

2.मुख्य तंत्रज्ञान अधिकारी -123900, to 215900

3. सहसंचालक – 78800 to 209200

4. उपसंचालक – 67700 to 208700

5. सहाय्यक संचालक – 56100 to 177500

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली.  EPFO Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –15 एप्रिल 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Sh. Brijesh Kumar Mishra, Regional Provident Fund Commissioner-I (HRM), Bhavishya Nidhi Bhawan 14 Bhikaji Cama Place, New Delhi – 110066.

अधिकृत वेबसाईट – www.epfindia.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CBI Consultant Recruitment 2021।तुम्ही पदवीधारक आहात!तर तुम्हाला केंद्रीय अन्वेषण ब्यूरो(CBI) मध्ये सल्लागार पदांसाठी काम करण्याची संधी

Central Bureau of Investigation (CBI)

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय अन्वेषण ब्यूरो [Central Bureau Of Investigation] मध्ये सल्लागार पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.cbi.gov.in  CBI Consultant Recruitment 2021

पदाचे नाव – सल्लागार (Consultant)

शैक्षणिक पात्रता – 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी 2. 10 वर्षे अनुभव.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – नियमानुसार.

नोकरीचे ठिकाण – मुंबई.  CBI Consultant Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Head of Zone, CBI, Mumbai Zone, Plot No. C-35A G Block, CBI Building, 13th Floor, Bandra Kurla Complex (BKC), Bandra East Mumbai- 400098.

ई-मेल – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – www.cbi.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC पूर्वपरीक्षा पुन्हा लांबणीवर; १४ मार्च रोजीला होणारी परीक्षा रद्द

MPSC Exam Date 2021

मुंबई । राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सदर निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे १४ मार्च रोजी पूर्वनियोजित असलेली राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात यावी असे शासनाकडून आयोगाला कळवण्यात आले आहे.

शासनाकडून घेण्यात आलेल्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने विषयांकित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० हि पुढे ढकलण्यात येत आहे असे आयोगाने पत्रक काढून सांगितले आहे. प्रस्तुत परीक्षेचा सुधारित दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येईल असे आयोगाने म्हटले आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DSSSB Recruitment 2021। दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ अंतर्गत 1 हजार ८०९ जागांसाठी भरती

DSSSB Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ अंतर्गत विविध पदाच्या 1809 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.dsssb.delhi.gov.in        DSSSB Recruitment 2021

एकूण जागा – 1809

पदाचे नाव – कनिष्ठ स्टेनोग्राफर, तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळेतील परिचर, सहाय्यक केमिस्ट, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, ड्राफ्ट्समन, वैयक्तिक सहाय्यक, फार्मासिस्ट, सहाय्यक संचालक, सहाय्यक, कनिष्ठ स्टेनोग्राफर, कनिष्ठ अभियंता, वैज्ञानिक सहाय्यक, सुरक्षा पर्यवेक्षक, सहाय्यक फोरमॅन, सुतार दुसरा वर्ग, सहाय्यक फिल्टर पर्यवेक्षक, प्रोग्रामर, टीजीटी, विशेष शिक्षक प्राथमिक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

परीक्षा शुल्क – 100/-

वयाची अट – 18 to 30 वर्षेपर्यंत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.  DSSSB Recruitment 2021

अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 मार्च 2021 आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –14 एप्रिल 2021 आहे.

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.dsssb.delhi.gov.in

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा महिनाभर लांबणीवर; 11 एप्रिलपासून होणार सुरुवात 

करिअरनामा ऑनलाईन | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षेवरुन चांगलाच निर्माण झाला होता. याआधी विद्यापीठाची पहिल्या सत्रातील परीक्षा ही १५ मार्चपासून सुरु होणार होती. मात्र परीक्षेच्या कामासाठी एजन्सी निवडण्याच्या कारणावरून मतभेद झाल्याने या परीक्षांसंदर्भात ठोस निर्णय झाला नव्हता. परिणामी ठरलेले वेळापत्रक पूर्णतः बिघडले होते. आता यासंदर्भात काल मंगळवार दिनांक ९ मार्च रोजी पुन्हा बैठक झाली असून आता या परीक्षा ११ एप्रिलपासून सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक २५ मार्च रोजी जाहीर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीत विद्यापीठाच्या परीक्षा महिनाभर पुढे ढकलण्याचे ठरविण्यात आले आहे. या बैठकीत कोरोनाचे संकट पुन्हा वाढत असल्याची बाब लक्षात घेऊन परीक्षा ऑनलाईन घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आता परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीनेच घेतली जाणार आहे. तसेच परीक्षेत ५० गुणांचे बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार आहेत.  या परीक्षा विद्यापीठाच्याच एसएसपीयू एज्युटेक फाउंडेशन या कंपनीकडून घेतल्या जाणार आहेत.

यापूर्वीच्या निर्णयानुसार २० गुणांचे लेखी स्वरूपातील प्रश्न विचारले जाणार होते. तसेच या प्रश्नांची उत्तरे एका कागदावर लिहून त्या कागदाचा फोटो विद्यापीठाने दिलेल्या संकेत स्थळावर अपलोड करावा लागणार होता. पण, विद्यापीठाने २० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द केला असून, विद्यार्थ्यांना केवळ ५० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या या माहितीमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमधील परीक्षांच्या बाबतीत असणाऱ्या शंकांचे बहुतांशी निवारण झाले आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com