पुणे विद्यापीठाच्या परीक्षा महिनाभर लांबणीवर; 11 एप्रिलपासून होणार सुरुवात 

करिअरनामा ऑनलाईन | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षेवरुन चांगलाच निर्माण झाला होता. याआधी विद्यापीठाची पहिल्या सत्रातील परीक्षा ही १५ मार्चपासून सुरु होणार होती. मात्र परीक्षेच्या कामासाठी एजन्सी निवडण्याच्या कारणावरून मतभेद झाल्याने या परीक्षांसंदर्भात ठोस निर्णय झाला नव्हता. परिणामी ठरलेले वेळापत्रक पूर्णतः बिघडले होते. आता यासंदर्भात काल मंगळवार दिनांक ९ मार्च रोजी पुन्हा बैठक झाली असून आता या परीक्षा ११ एप्रिलपासून सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक २५ मार्च रोजी जाहीर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीत विद्यापीठाच्या परीक्षा महिनाभर पुढे ढकलण्याचे ठरविण्यात आले आहे. या बैठकीत कोरोनाचे संकट पुन्हा वाढत असल्याची बाब लक्षात घेऊन परीक्षा ऑनलाईन घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आता परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीनेच घेतली जाणार आहे. तसेच परीक्षेत ५० गुणांचे बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार आहेत.  या परीक्षा विद्यापीठाच्याच एसएसपीयू एज्युटेक फाउंडेशन या कंपनीकडून घेतल्या जाणार आहेत.

यापूर्वीच्या निर्णयानुसार २० गुणांचे लेखी स्वरूपातील प्रश्न विचारले जाणार होते. तसेच या प्रश्नांची उत्तरे एका कागदावर लिहून त्या कागदाचा फोटो विद्यापीठाने दिलेल्या संकेत स्थळावर अपलोड करावा लागणार होता. पण, विद्यापीठाने २० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द केला असून, विद्यार्थ्यांना केवळ ५० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या या माहितीमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमधील परीक्षांच्या बाबतीत असणाऱ्या शंकांचे बहुतांशी निवारण झाले आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com