MPSC पूर्वपरीक्षा पुन्हा लांबणीवर; १४ मार्च रोजीला होणारी परीक्षा रद्द

Get real time updates directly on you device, subscribe now.

मुंबई । राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सदर निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे १४ मार्च रोजी पूर्वनियोजित असलेली राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात यावी असे शासनाकडून आयोगाला कळवण्यात आले आहे.

हे पण वाचा -
1 of 39

शासनाकडून घेण्यात आलेल्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने विषयांकित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० हि पुढे ढकलण्यात येत आहे असे आयोगाने पत्रक काढून सांगितले आहे. प्रस्तुत परीक्षेचा सुधारित दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येईल असे आयोगाने म्हटले आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.