Home Blog Page 52

Job Alert : प्राध्यापकांनो… डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटी येथे नोकरीची संधी; त्वरा करा

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि व्याख्याता पदांच्या 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 आहे.

संस्था – डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर
भरली जाणारी पदे –
1. प्राध्यापक (Job Alert)
2. सहयोगी प्राध्यापक
3. सहायक प्राध्यापक
4. व्याख्याता (Job Alert)
पद संख्या – 12 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2024
अर्ज पाठविण्याचा E-MAIL ID – [email protected]
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर

भरतीचा तपशील – (Job Alert)

पदपद संख्या 
प्राध्यापक03
सहयोगी प्राध्यापक03
सहायक प्राध्यापक03
व्याख्याता03

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्राध्यापकM.Pharm, Ph.D.
सहयोगी प्राध्यापकM.Pharm, Ph.D.
सहायक प्राध्यापकM.Pharm
व्याख्याताM.Pharm

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या E-MAIL ID वर अर्ज करायचा आहे.
2. अर्जा मध्ये सर्व आवश्यक (Job Alert) पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://dypatilunikop.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MRSAC Recruitment 2024 : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर अंतर्गत ‘या’ पदावर भरती; तब्बल 1,77,500 एवढा पगार

MRSAC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची एक उत्तम संधी (MRSAC Recruitment 2024) निर्माण झाली आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर, नागपूर अंतर्गत ‘संसाधन शास्त्रज्ञ’ (Resource scientist) पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या भरती आणि अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर, नागपूर
भरले जाणारे पद – संसाधन शास्त्रज्ञ (Resource scientist)
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, MRSAC, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-440 010 (M.S.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2024

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा – 40 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MRSAC Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
संसाधन शास्त्रज्ञM.E./M.TechB.E./B.Tech
मिळणारे वेतन – Rs.56100/- ते Rs. 1,77,500/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. सर्व उमेदवारांनी जाहिरातीत नमूद अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे.
3. उशिरा आलेले (MRSAC Recruitment 2024) अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mrsac.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IOCL Recruitment 2024 : 10 वी, ITI पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी इंडियन ऑईलमध्ये नोकरीची संधी; 476 पदांवर भरती जाहीर

IOCL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी संदर्भात एक महत्वाची (IOCL Recruitment 2024) अपडेट हाती आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने 476 पदांवर मोठी भरती जाहीर केली आहे. या अंतर्गत नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या भरतीविषयी सविस्तर…

संस्था – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – नॉन-एक्झिक्युटिव्ह
पद संख्या – 476 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 22 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024

अर्ज फी – ३००/- रुपये
वय मर्यादा – १८ ते २६ वर्षे
भरतीचा तपशील – (IOCL Recruitment 2024)

पदएकूण पद संख्या
नॉन-एक्झिक्युटिव्ह476
Post NameNo of Posts
Junior Engineering Assistant379 Posts
Junior Quality Control Analyst21 Posts
Engineering Assistant38 Posts
Technical Attendant29 Posts

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
नॉन-एक्झिक्युटिव्ह10th Class Pass, Engineering Diploma, or ITI
Post NameQualification
Junior Engineering AssistantDiploma, B.Sc
Junior Quality Control AnalystB.Sc
Engineering Assistant (IOCL Recruitment 2024)Diploma
Technical Attendant10th, ITI

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी (IOCL Recruitment 2024) उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : सिस्टम अनॅलिस्ट, सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट पदावर सरकारी नोकरीची संधी

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत (Government Job) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रणाली विश्लेषक (System Analyst), वैज्ञानिक तांत्रिक सहाय्यक (Scientific Technical Assistant) पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

संस्था – मलबजावणी संचालनालय, भारत सरकार
भरले जाणारे पद –
1. प्रणाली विश्लेषक (System Analyst)
2. वैज्ञानिक तांत्रिक सहाय्यक (Scientific Technical Assistant)
पद संख्या – 43 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (स्थापना), अंमलबजावणी संचालनालय, ए-ब्लॉक, प्रवर्तन भवन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम रोड, नवी दिल्ली 110011
वय मर्यादा – 56 वर्षे

भरतीचा तपशील – (Government Job)

पदपद संख्या 
प्रणाली विश्लेषक07 पदे
वैज्ञानिक तांत्रिक सहाय्यक36 पदे

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (Government Job) उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना enforcementdirectorate.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
5. सर्व रिक्त पदे भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – enforcementdirectorate.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2024 : 10 वी आणि ITI पास उमेदवारांसाठी मोठी बातमी!! मध्य रेल्वे अंतर्गत 2424 पदांवर भरती सुरू

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा (Railway Recruitment 2024) असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे अंतर्गत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिस पदांच्या एकूण 2424 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – मध्य रेल्वे
भरले जाणारे पद – अप्रेंटिस
पद संख्या – 2424 पदे (Railway Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2024

वय मर्यादा – 15 ते 24 वर्ष
अर्ज फी – रु. 100/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी आणि ITI पास असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज (Railway Recruitment 2024) –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज सदर करू शकतात.
3. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Big News : विद्यार्थ्यांच्या हिताचा मोठा निर्णय!! जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 6 महिन्यांची मुदतवाढ

Big News

करिअरनामा ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Big News) विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. 2024 -25 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणीही दूर होणार आहेत.

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास अनेक अडचणी येतात. काहीवेळा प्रमाणपत्र नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची वेळ येते. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणीही दूर होतील,अशी माहिती शासनाच्या जिल्हा माहिती कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. विविध (Big News) समाज घटकातील विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी बऱ्याच महिन्यांचा कालावधी जातो.त्यामुळे प्रमाणपत्र सादर करण्यास काही दिवसांची सवलत मिळावी; अशी मागणी केली जात होती. या मागणीवर शासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitment 2024 : स्टाफ नर्ससह विविध पदांवर भरती; ‘इथे’ पाठवा अर्ज

NHM Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत (NHM Recruitment 2024) विविध रिक्त पदांवर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषधशास्त्रज्ञ पदांच्या 20 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 आहे. पहा सविस्तर…

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर
भरली जाणारी पदे –
1. स्टाफ नर्स
2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ
3. औषध शास्त्रज्ञ
पद संख्या – 20 पदे (NHM Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, पाचवा माळा छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर-४४०००१.

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा – 38 वर्ष ते 43 वर्ष
भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
स्टाफ नर्स13
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 05
औषधशास्त्रज्ञ02

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NHM Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्सGNM Course, Diploma in Nursing or B.Sc. Nursing.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 12th pass + DMLT & candidate must have Enrollment Certificate.
औषधशास्त्रज्ञDiploma in Pharmacy.

मिळणारे वेतन –

पदमिळणारे वेतन (दरमहा)
स्टाफ नर्सRs. 20,000/- per month
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Rs.  17,000/- per month
औषधशास्त्रज्ञRs.  17,000/- per month

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत (NHM Recruitment 2024) आवश्यक कागदपत्रे जोडा.
3. दिलेल्या मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024आहे.

काही महत्वाच्या लिंक्स
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.nagpurzp.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC NET 2024 : UGC NET परीक्षेचे हॉल तिकीट जारी; ‘इथे’ करा डाउनलोड

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । CSIR-UGC NET जुलै 2024 परीक्षेसाठी (UGC NET 2024) नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि विद्यापीठ अनुदान आयोगच्या संयुक्त राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) परीक्षेचे हॉल तिकीट जारी केले आहे.

असं डाउनलोड करा हॉल तिकीट
परीक्षार्थींना हॉल तिकीट डाउनलोड करता यावी यासाठी अधिकृत वेबसाइट csirnet.nta.ac.in वर लिंक सक्रिय करण्यात आली आहे. उमेदवारांनी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी प्रथम परीक्षा पोर्टलला भेट द्यायची आहे आणि नंतर मुख्यपृष्ठावर दिलेल्या लिंकवरून संबंधित डाउनलोड पृष्ठावर (UGC NET 2024) जाऊ शकता. येथे उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यांचा तपशील भरून आणि सबमिट करून हॉल तिकीट डाउनलोड करू शकतील. हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर, उमेदवारांनी त्यावर दिलेले त्यांचे वैयक्तिक तपशील (नाव, आई/वडिलांचे नाव, जन्मतारीख, फोटो इ.) तपासावेत. यामध्ये काही त्रुटी आढळल्यास, दुरूस्तीसाठी शक्य तितक्या लवकर NTA हेल्पलाइनशी संपर्क साधावा.

या तारखेला होणार परीक्षा (UGC NET 2024)
अधिकृत वेळापत्रकानुसार ही परीक्षा दि. 25 ते 27 जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे. या नियोजित तारखांना, परीक्षा दुपारी 9 ते 12 आणि नंतर दुपारी 3 ते 6 या सत्रात होईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : “ती पास होणार नाही….तिचं लग्न करून टाका…” टोमणे मारणाऱ्या नातेवाईकांना रोशनीनं दिलं सणसणीत उत्तर

Success Story of Roshni Tayde

करिअरनामा ऑनलाईन । नातेवाईक पदोपदी (Success Story) हिणवायचे.. म्हणायचे, “आता काही रोशनी पास होणार नाही…” पोलिस भरती परीक्षेत रोशनी एकदा नापास झाल्यानंतर रोशनीच्या आईला त्यांचे नातेवाईक टोमणे मारायचे. “रोशनी आता काही पास होणार नाही, तिचं लवकर लग्न करून टाका. ही शिकून कुठे जाणार आहे? शेवटी तिला भाकरीच थापायची आहे.” नातेवाईक वेळोवेळी तिच्या आईला फुकटचे सल्ले देत होते. त्यामुळे रोशनीच्या आईचं देखील मन चल विचलित होत होतं. पण जेव्हा निकाल हाती आला तेव्हा रोशनीच्या कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही. कठोर मेहनत घेवून रोशनी पोलिस भरती परीक्षेत पास झाली होती. रोशनीच्या अपयशावरुन तिला आणि कुटुंबाला हिणवणाऱ्या लोकांना तिने आपल्या यशातून सणसणीत उत्तर डायल आहे. जाणून घेवूया तिच्या यशस्वी प्रवासाविषयी…

पोलिस भरतीची परीक्षा देवून पोलिस दलात पद मिळवण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील तरुण-तरुणी पोलिस भरती होण्यासाठी जिवापाड मेहनत (Success Story) घेत असतात. यापैकीच एक आहे 21 वर्षीय तरुणी रोशनी… ती 2 वर्षांपूर्वी मुंबई पोलीस भरतीला गेली आणि अवघ्या 14 मार्काने नापास झाली. मात्र तिने हार मानली नाही. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने जळगाव पोलीस भरतीत मुलींमधून चौथ्या क्रमांक पटकावला. अवघ्या 21 व्या वर्षी रोशनी पोलीस दलात भरती झाली आहे. रोशनी आकाश तायडे (Roshni Tayade) असं तिचं संपूर्ण नाव आहे.

वडिल चालवतात चहाची टपरी तर आई करते शेतमजूरी
घरच्या बिकट परिस्थितीवर मात करत रोशनी पोलीस दरात भरती झाली आहे. आई-वडिलांना तिचा सार्थ अभिमान वाटतो. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील तायडे कुटुंब. इथे जवळ असलेल्या मधुकर सहकारी साखर कारखाना वसाहतीत ते राहतात. येथे जवळच रोशनीच्या वडिलांची चहाची टपरी आहे. मधुकर सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने टपरीचा व्यवसाय फारसा चांगला होत नाही. जेमतेम घरचा खर्च भागेल एवढाच पैसा या धंद्यातून मिळतो. तिची आई दुसऱ्यांच्या शेतात शेतमजुरी करून घरात हातभार लावते. अशा कठीण परिस्थितीत लेकीने पोलीस दलात भरती होवून आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आहे.

पहिल्या प्रयत्नात आलं अपयश (Success Story)
आकाश वामन तायडे, (वय ४२) आणि आई संगीता आकाश तायडे (वय ४०) यांची एकुलती एक मुलगी आहे रोशनी. ती २०२० मध्ये बारावीची परीक्षा पास झाली. त्यानंतर B. Sc प्रथम वर्षाला तिने प्रवेश घेतला. मात्र तिला वेगळं ध्येय गाठायचं होतं. २०२२ ला तिने पोलीस भरतीच्या तयारीला सुरुवात केली. त्यावेळी मुंबई येथे पोलीस भरतीसाठी जागा निघाल्या होत्या. मुंबईत तिचा पहिलाच पेपर होता. त्यावेळी 14 मार्काने रोशनी नापास झाली.

खचून गेलेल्या रोशनीला कुटुंबाने दिली मोलाची साथ
नापास झाल्याने रोशनी पूर्ण खचून गेली होती. मात्र आई-वडिलांनी दिलेली साथ ही तिच्यासाठी लाख मोलाची ठरली. त्यानंतर सप्टेंबर २०२३ पासून तिने पुन्हा पोलीस भरतीच्या तयारीला (Success Story) सुरुवात केली. लहान भाऊ केतन तायडे आणि काका संदीप कोळी यांचे तिला मार्गदर्शन मिळाले. आई-वडिलांचे कष्ट डोळ्यांसमोर ठेवून तिने पुन्हा पोलीस भरतीची तयारी जोमाने सुरू केली. मुंबई पोलीस भरतीच्या पेपरचा अनुभव डोळ्यासमोर ठेवून आपण कुठे कमी पडलो याचा मागोवा घेत तिने पुन्हा अभ्यास सुरू केला.

दुसऱ्याच प्रयत्नात बाजी मारली
२०२४ मध्ये जळगाव पोलीस भरतीसाठी जागा निघाल्या, त्यावेळी रोशनी तायडेने भरतीसाठी अर्ज केला. दुसऱ्या प्रयत्नातच जळगाव पोलीस दलात तिची निवड झाली. अवघ्या २१ व्या वर्षी (Success Story) पोलीस दलात भरती होणारी ती ग्रामीण भागातील पहिली तरुणी ठरली आहे. वडिलांचे कष्ट, आईने मोलमजुरी करून चालवलेलं घर; या गोष्टींची जाणीव ठेवून रोशनीने कठोर प्रयत्न केले आणि यशाचं शिखर गाठलं. पण आता या पदावर ती समाधानी नसून तिचं पीएसआय (PSI) होण्याचं स्वप्न आहे.

शासकीय नोकरीत दाखल होणारी कुटुंबातील पहिली मुलगी
2022 मध्ये रोशनी मुंबई पोलीस भरतीसाठी गेली, त्यावेळी ती 14 मार्काने नापास झाली होती. घरी आल्यानंतर रोशनी पूर्ण खचलेली होती. मात्र वडिलांनी दिलेला आधार महत्त्वाचा ठरला. १४ मार्काने नापास झाली होती, तरी वडील बाहेर सांगताना माझी मुलगी फक्त २ मार्कांनी नापास झाली आहे असं सांगायचे. वडिलांनी धीर दिला आणि पुढे दुसऱ्या प्रयत्नातच लेक पोलीस दलात भरती झाली. जेव्हा निकाल लागला तेव्हा सर्वात जास्त आनंद हा आई-वडिलांना झाला. त्यांच्या डोळ्यातील अश्रू हे थांबत नव्हते. त्यांच्या कुटुंबात शासकीय नोकरीत मुलगी पहिल्यांदा दाखल होणार असल्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

“ताई तू पास झालीस”
निकलादिवशी रात्री 11 वाजता वेबसाईटवर रोशनीचा भाऊ केतन तायडेने निकाल पाहिला. त्याने रोशनीला “ताई तू पास झालीस;” असं सांगितलं. रोशनीला भावावर विश्वास बसत नव्हता. मात्र निकाल स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर तिला विश्वास बसला आणि तिला रडू कोसळलं. आई-वडिलांनाही आनंदाश्रू अनावर झाले. आता आई-वडिलांनी तिला जे शिकायचं असेल, ते शिक्षण पूर्ण कर, त्यानंतरच तुझा लग्नाचा (Success Story) विचार केला जाईल, असं सांगितलं आहे. तसंच वडिलांनी ज्या चहा टपरीच्या धंद्यावर आम्हाला मोठं केलं, ती चहाची टपरी कायम स्मरणात राहील आणि त्या टपरीचं रुपांतर हॉटेलमध्ये केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.
पोलिस भरती परीक्षेत रोशनी पहिल्या प्रयत्नात नापास झाली तेव्हा अनेकांनी तिला आणि कुटुंबाला हिणवले. अनेकांनी तिचे लग्न लावून देण्याचा सल्ला दिला. पण रोशनीने कुणाचंही न ऐकता आपले प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवले आणि पुन्हा परीक्षा दिली. तिने तिच्या मेहनतीतून आपले कर्तुत्व सिद्ध केलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

3 Year Law CET Exam Date 2024 : LLB तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढ; 24 जुलैपर्यंत करता येणार अर्ज

3 Year Law CET Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन । एलएलबी 3 वर्ष अभ्यासक्रमास (3 Year Law CET Exam Date 2024) प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. एलएलबी 3 वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी 24 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रवेश नोंदणीसाठी मिळालेला अल्प प्रतिसाद आणि विद्यार्थी व पालकांकडून मुदत वाढवण्याबाबत करण्यात आलेली मागणी यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET Cell) कक्षाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यात सुमारे 18 हजारांपेक्षा जास्त जागा (3 Year Law CET Exam Date 2024)
एलएलबी 3 वर्ष अभ्यासक्रमांसाठी राज्यात सुमारे 18 हजारांपेक्षा जास्तीच्या जागा आहेत. १८ हजार जागांसाठी आत्तापर्यंत जवळपास ८० हजार ५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. विधी 3 वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी सुरवातीला ११ ते १८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. यावेळी केवळ ४० हजार २३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर ३४ हजार ५४८ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चिती केली. उमेदवार नोंदणी पाहाता सीईटी सेलकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. यावेळी नोंदणी केलेल्या उमेदवारांचा आकडा दुप्पट झाला. मात्र, पुन्हा एकदा विद्यार्थी आणि यांच्या मागणीनंतर मुदतवाढ देण्यात आली आहे.

पावसामुळे निर्माण होतायत तांत्रिक अडचणी
परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत निम्म्या विद्यार्थ्यांनीच प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरला आहे. राज्यात सर्वत्र होत असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात काही तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे अनेक पालक व विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढ देण्याची (3 Year Law CET Exam Date 2024) मागणी केली. नोंदणीला मिळालेला अल्प प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन सीईटी कक्षाने विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया अर्ज नोंदणीस २४ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेश अर्ज भरण्यास दिलेल्या मुदतवाढीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन अर्ज नोंदणी करावी; असे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com