Home Blog Page 51

Railway Recruitment 2024 : रेल्वे विभागात 32 हजार पदे भरली जाणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Recruitment 2024) यांनी तरुणांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. लोकसभेत बोलताना त्यांनी रेल्वे मंत्रालय रेल्वे संरक्षण दलात (RPF) 32,000 पदे भरणार असल्याची घोषणा केली आहे. आपल्या सरकारने रेल्वे विभागात 2014 ते 2024 पर्यंत 5.02 लाख नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या असून, 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात 4.11 लाख नोकऱ्याच देण्यात आल्या होत्या. म्हणजेच UPA सरकारच्या तुलनेत रेल्वे भरतीत 25 टक्के वाढ झाल्याचा दावा अश्विनी वैष्णव यांनी केला.

लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना अश्वीनी वैष्णव (Railway Recruitment 2024) म्हणाले, 28 डिसेंबर 2020 ते 31 जुलै 2021 या कालावधीत सात टप्प्यांत 726 केंद्रांवर 211 शहरांमधील 1.26 कोटी उमेदवारांसाठी CBT आयोजित करण्यात (Railway Recruitment 2024) आली होती. त्याचप्रमाणे, 17 ऑगस्ट 2022 ते 11 ऑक्टोबर 2022 पर्यंत – एका महिन्यापेक्षा जास्त कालावधीच्या पाच टप्प्यांमध्ये – 191 शहरे आणि 551 केंद्रांमध्ये 1.1 कोटींहून अधिक उमेदवारांचे CBT द्वारे मूल्यांकन केले गेले. रेल्वे मंत्रालयाने या वर्षी विविध गट ‘क’ पदांसाठी वार्षिक कॅलेंडर सादर करून भरतीचे व्यवस्थापन कसे केले आहे त्यात सुधारणा केली आहे. अश्विनी वैष्णव यांनी लोको पायलट कर्मचाऱ्यांसाठी कामाची परिस्थिती सुधारण्याच्या उद्देशाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत, तसेच ट्रेनच्या ऑपरेशनची सुरक्षा सुधारण्यावरही भर दिल्याचे सांगितलं.

32,603 ​​रिक्त पदे भरली जाणार (Railway Recruitment 2024)
जानेवारी ते मार्च 2024 पर्यंत एकूण 32,603 ​​रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आल्या. यामध्ये RPF मध्ये असिस्टंट लोको पायलट, टेक्निशियन, सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल या पदांचा समावेश आहे. RPF कॉन्स्टेबलची भरती प्रक्रिया ही रेल्वे संरक्षण दलात सामील होण्यास उत्सुक असलेल्यांसाठी एक मोठी संधी आहे. सातव्या केंद्रीय वेतन आयोगानुसार (CPC), RPF कॉन्स्टेबलचे मूळ वेतन 21,700 रुपयांपासून सुरू होते. तर त्यांचे एकूण वेतन 37,420 रुपये ते 44,460 रुपये असते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : सरकारी नोकरीची मोठी संधी; राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडेमीत ‘ऑडिटर’ पदावर भरती सुरू

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Government Job) तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडेमी, नागपूर अंतर्गत ऑडिटर पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडेमी, नागपूर
भरले जाणारे पद – ऑडिटर
पद संख्या – 15 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2024
असा करा अर्ज – (Government Job)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 आहे.
3. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4. अर्ज करताना आवश्यक असलेली संपूर्ण माहिती भरा. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.ddpdoo.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : डोकं चक्रावेल.. सांगू शकाल का… पाण्याचं वजन किती असतं?

GK Updates 23 Jul

करिअरनामा ऑनलाईन । पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय (GK Updates) जीवसृष्टीचं जगणं अशक्य आहे. आपण दैनंदिन जीवनात आपल्या सोयीनुसार गरम पाणी आणि थंड पाण्याचा वापर करत असतो. परंतु रोजच्या वापरातल्या पाण्याबद्दल तुम्ही कधी असा विचार केला आहे का की, गरम आणि थंड पाण्याच्या वजनामध्ये काही फरक असू शकतो का?
हे खरं आहे की गरम पाणी आणि थंड पाण्याचे वजन वेगळे आहे. पण मग आता या दोघांमध्ये जड पाणी कोणते असेल?
कोणाचे वजन जास्त आहे? हे पाहूया…

संशोधन काय सांगते? (GK Updates)
जर आपण लिटरच्या प्रमाणात वजनाची तुलना केली तर गरम पाणी आणि थंड पाण्याचे वजन वेगळे आहे. थंड पाणी गरम पाण्यापेक्षा जड असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे.
जर 4 डिग्री सेल्सियस पर्यंत थंड पाणी आणि खूप गरम पाण्याची तुलना केली तर वजनात चार पट फरक आहे. जेव्हा पाणी गरम होते तेव्हा थंड पाणी खाली सरकते आणि गरम पाणी थंड पाण्याच्या वर येते. ज्यावरुन हे समजते की गरम पाणी हलके आहे.
गरम पाणी हलके असण्याचे कारण म्हणजे त्याची घनता. खरेतर पाणी गरम केल्यावर, त्याची घनता वाढते आणि जसजसे पाणी थंड होते आणि त्याची घनता (GK Updates) लक्षणीयरीत्या कमी होते. अशीच कथा बर्फाची आहे. बर्फाची घनता सर्वात कमी असते, म्हणूनच ते इतके जड असते.
त्यामुळे हे देखील समजुन घ्या की कोणतीही सामग्री गरम केल्याने त्याचा विस्तार होतो. म्हणजेच, त्याची घनता कमी होते. यामुळे त्याचे वजन कमी होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित; अतिवृष्टीमुळे पेपर पुढे ढकलले

Shivaji University

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठाने परीक्षेसंदर्भात एक (Shivaji University) महत्वाची अपडेट जारी केली आहे. अतिवृष्टीमुळे याआधी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सोमवारी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती. परंतु पावसाचा जोर कायम राहिल्याने आज, मंगळवार व उद्या, बुधवार या दोन दिवसांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. अतिवृष्टीमुळे वाहतुकीस अडथळा येत असल्याने (Shivaji University) विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यास त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थीहित लक्षात घेता शिवाजी विद्यापीठाने आज, मंगळवार आणि उद्या, बुधवारी होणाऱ्या सर्व विषयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

पेपर कधी होणार? (Shivaji University)
पुढे ढकललेले पेपर कधी होणार या संदर्भातील माहिती शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. तरी महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी पेपर पुढे ढकलले आहेत, याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा विभागाकडून करण्यात आले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IHMCL Recruitment 2024 : इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनीत भरती सुरू; दरमहा 1 लाख 40 हजार पगार; इंजिनियर्स/CA यांच्यासाठी मोठी संधी

IHMCL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (IHMCL Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियंता (ITS), अधिकारी (वित्त) पदांच्या एकूण 31 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या भरती विषयी सविस्तर…

संस्था – इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड
भरले जाणारे पद –
1. अभियंता (ITS)
2. अधिकारी (वित्त)
पद संख्या – 31 पदे
वय मर्यादा – 21 ते 30 वर्षे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2024
भरतीचा तपशील – (IHMCL Recruitment 2024)

पदपद संख्या 
अभियंता (ITS)30
अधिकारी (वित्त)01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
अभियंता (ITS)Bachelor’s Degree of Engineering
अधिकारी (वित्त)Chartered Accountants (CA)

मिळणारे वेतन –

पदवेतन (दरमहा)
अभियंता (ITS)Rs. 40,000-1,40,000/-
अधिकारी (वित्त)Rs. 40,000-1,40,000/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची (IHMCL Recruitment 2024) तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://ihmcl.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2024 : 10 वी/12 वी पास उमेदवारांची रेल्वेत होणार मेगाभरती!! पटापट करा अर्ज

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा (Railway Recruitment 2024) असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण रेल्वे अंतर्गत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. ‘अप्रेंटिस’ पदांच्या तब्बल 2438 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024आहे. जाणून घ्या पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – दक्षिण रेल्वे, भारत सरकार
भरले जाणारे पद – अप्रेंटिस
पद संख्या – 2438 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2024
अर्ज फी – रु.100
वय मर्यादा – 15 ते 24 वर्ष

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
अप्रेंटिस 12th, 10th Class pass with ITI course in relevant trade and National/State Certificate
असा करा अर्ज – (Railway Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे.
5. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.rrcmas.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HBCSE Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्ससाठी मुंबईत सरकारी नोकरी!! होमी भाभा विज्ञान केंद्रात ‘या’ पदांसाठी थेट मुलाखत

HBCSE Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई (HBCSE Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी, प्रकल्प सहाय्यक, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी, लिपिक प्रशिक्षणार्थी, व्यापारी प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि प्राप्त उमेदवारांनी प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच इतर उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05, 07, 08, 09 आणि 12 ऑगस्ट 2024 निश्चित करण्यात आली आहे.

संस्था – होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई
भरली जाणारी पदे –
1. प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी
2. प्रकल्प सहाय्यक
3. ग्रंथालय प्रशिक्षणार्थी
4. लिपिक प्रशिक्षणार्थी
5. व्यापारी प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 07 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.)

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – (HBCSE Recruitment 2024)
1. प्रप्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी – 28 वर्षे
2. प्रकल्प सहाय्यक – 28 वर्षे
3. ग्रंथालय प्रशिक्षणार्थी – 28 वर्षे
4. लिपिक प्रशिक्षणार्थी – 28 वर्षे
5. व्यापारी प्रशिक्षणार्थी – 28 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 05, 07, 08, 09 आणि 12 ऑगस्ट 2024

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी01
प्रकल्प सहाय्यक01
ग्रंथालय प्रशिक्षणार्थी02
लिपिक प्रशिक्षणार्थी02
व्यापारी प्रशिक्षणार्थी01

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (HBCSE Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बीB.Sc./ B.Sc. (Honors)/ B.S.
प्रकल्प सहाय्यकGraduate
ग्रंथालय प्रशिक्षणार्थी M.Lib. (Master degree in Library & Information Science) from recognized University/ Institute. Knowledge of KOHA and DSpace
लिपिक प्रशिक्षणार्थीGraduate from a recognized University/Institute Knowledge of typing and use of personal computers and its applications.
व्यापारी प्रशिक्षणार्थीGraduate from a recognized University/Institute Knowledge of typing and use of personal computers and its applications.

मिळणारे वेतन –

पदवेतन (दरमहा)
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बीRs. 58,400/- p.m
प्रकल्प सहाय्यकRs. 37,700/- p.m.
ग्रंथालय प्रशिक्षणार्थीRs. 22,000/- p.m.
लिपिक प्रशिक्षणार्थीRs. 22,000/- p.m.
व्यापारी प्रशिक्षणार्थीRs. 18,500/- p.m

निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. उमेदवार संबंधित तारखेला (HBCSE Recruitment 2024) मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्यावर उपस्थित राहतील.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे.
4. मुलाखत 05, 07, 08, 09 आणि 12 ऑगस्ट 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://hbcse.tifr.res.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : पदरात 3 मुली; 21 व्या वर्षी पतीचं निधन; शिक्षण अपुरं तरी जिद्द सोडली नाही; वन विभागात मिळवली सरकारी नोकरी

Success Story of Santosh Bhati

करिअरनामा ऑनलाईन । ही प्रेरणादायी कहाणी एका महिलेची (Success Story) आहे जिने बुरख्याचे बंधन तोडून बंदूक हाती घेतली आणि जंगल माफियांपासून जंगलांचे रक्षण केले. ही धाडसी महिला उदयपूरची (राजस्थान) आहे. तिचं नाव आहे संतोष भाटी. त्यांचे जीवन खडतर संघर्ष आणि असंख्य चढ-उतारांनी भरलेले होते, आयुष्यात प्रत्येक पायरीवर काटेच होते. पण संतोष यांनी हार मानली नाही. अपयशाने हिंमत हारणाऱ्या सर्वांसाठी त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी ठरणार आहे. संतोष यांच्या विषयी जाणून घेण्यासाठी पुढे वाचा….

पदरात तीन मुली आणि पतीचं निधन
संतोष भाटी ही ती निरागस मुलगी जिचे बालपणीच लग्न झाले होते. लग्नानंतर तिला तीन मुली झाल्या आणि अवघ्या 21 व्या वर्षी पतीचे निधन झाले. आयुष्याच्या खडतर प्रवासाला सुरवात झाली होती आणि पदरात तीन निष्पाप मुली होत्या. पण संतोष यांच्या हिंमतीला दाद द्यायला हवी. त्यांनी न खचता आपल्या मुलींसह आयुष्याच्या वाटेवर पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

मुलींना सांभाळत केला अभ्यास (Success Story)
संतोष सांगतात; “मी 14 वर्षांची असताना माझे लग्न झाले. मला तीन मुली झाल्या. तीन मुलींचा सांभाळ करत संसार पती सोबत सुखी संसार सुरू असतानाच अचानक एक वादळ आलं. माझ्या पतीचे अचानक निधन झाले. ते हे जग सोडून गेले. यानंतर मुलींची सर्व जबाबदारी माझ्या एकटीवर आली. ती स्वतःसाठी आणि मुलींच्या उदरनिर्वाहासाठी उदयपूरला आले. मात्र शिक्षणाअभावी काम मिळणे कठीण झाले होते. मग मी लोकांची घरे झाडून साफसफाईची कामे करायला सुरूवात केली. त्यादरम्यान मी योगायोगाने एका एनजीओच्या संपर्कात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी अभ्यास सुरू केला. मी इतर विद्यार्थ्यांपेक्षा वयाने मोठी दिसत असल्याने आठवीच्या (Success Story) परीक्षेला गेले तेव्हा मुलांनी माझी चेष्टा केली. संकोचामुळे मी परीक्षेच्या गेटवरूनच परत आले. मात्र काही लोकांनी माझी समजूत घातली आणि मी पुन्हा परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा दिली. अशापद्धतीने मी 8 वी पास झाले. यानंतर माझ्यामध्ये उत्साह आला आणि मी मुलींचा सांभाळ करत 10वी आणि 12वीची परीक्षा दिली.”

बी.ए. पूर्ण केल्यानंतर पास केली वनरक्षक भरती परीक्षा
नोकरी मिळवण्यासाठी मी शिक्षण घेतलं. पण 12 वी पर्यंतचे शिक्षण पुरेसं नव्हतं. मी पुढे जावून पदवी शिक्षण घेतलं. जेव्हा मी बी. ए. ची अंतिम परीक्षा देत होते, त्यावेळी वन रक्षक भरतीची (Success Story) जागा निघाली होती. मी या परीक्षेचा फॉर्म भरला आणि परीक्षा पास झाले. जेव्हा मी 2016 मध्ये पदावर रुजू झाले तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता की मला तीच सरकारी नोकरी मिळाली आहे, ज्याचा मी स्वप्नातही कधी विचार केला नाही.”
पतीच्या मृत्यूनंतर 3 मुलींचा सांभाळ करत संतोष यांनी सरकारी परीक्षा देवून कायमची नोकरी मिळवली आहे. त्यांच्यातील जिद्द नवीन पिढी, आणि महिलांसाठी निश्चितच प्रेरणा देणारी आहे. संतोष या सध्या वन रक्षक विभागात त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Union Budget 2024 : बेरोजगरांसाठी अर्थ संकल्पात 2 लाख कोटी रुपयांची तरतूद; अर्थ मंत्र्यांची मोठी घोषणा!!

Union Budget 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Budget 2024) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी रोजगार वाढवण्यावर सरकारचे लक्ष असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पात गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या घटकांवर भर देण्यात आला आहे. केंद्र सरकार ‘सबका साथ, सबका विकासा’साठी कटिबद्ध आहे. यावेळी अर्थसंकल्पात युवकांसाठी 2 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केली.

अर्थमंत्र्यांनी रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने 2 लाख कोटी रुपयांच्या वाटपासह पाच योजनांचे पंतप्रधान पॅकेज जाहीर केले. त्या म्हणाल्या; यावर्षी शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रोजगाराच्या घोषणेने होणारे फायदे –
अर्थमंत्र्यांनी सांगितले, की प्रथमच नोकरी शोधणाऱ्यांना (सर्व औपचारिक क्षेत्रात नवीन प्रवेश मिळालेला) एक महिन्याचा पगार दिला जाईल. दुसरे म्हणजे, उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी EPFO ​​मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रोत्साहन दिले जाईल. यासोबतच कर्मचाऱ्यांना सर्व क्षेत्रातील अतिरिक्त रोजगार, ५० लाख लोकांना अतिरिक्त रोजगार देण्यासाठी प्रोत्साहन योजना आखण्यात आली आहे.

पहिल्यांदा नोकरी शोधणारे (Union Budget 2024)
प्रथमच EPFO ​​मध्ये नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना 15,000 रुपयांपर्यंतच्या तीन हप्त्यांमध्ये एका महिन्याच्या पगाराचे थेट लाभ हस्तांतरण केले जाणार आहेत.

उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मिती
नोकरीच्या पहिल्या चार वर्षांत कर्मचारी आणि नियोक्ता दोघांनाही त्यांच्या EPFO ​​योगदानानुसार थेट प्रोत्साहन दिले जाईल.

नियोक्त्यांना समर्थन
दोन वर्षांसाठी प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी नियोक्त्यांना त्यांच्या EPFO ​​योगदानाची प्रति महिना 3,000 रुपये प्रतिपूर्ती केली जाईल.

10 लाखांपर्यंत आर्थिक मदत
अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी उच्च शिक्षणासाठी 10 लाख (Union Budget 2024) रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली आहे. कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे याला प्राधान्य असेल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. वसतिगृहे बांधण्यासाठी आणि महिलांसाठी विशेष कौशल्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भागीदारी करून हे सुलभ केले जाईल; असेही त्या म्हणाल्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy Recruitment 2024 : ‘या’ उमेदवारांना इंडियन नेव्हीमध्ये भरती होण्याची मोठी संधी; ऑनलाईन करा अर्ज

Indian Navy Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात (Indian Navy Recruitment 2024) असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. भारतीय नौदल अकादमी अंतर्गत नागरी (Gropu B&C) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 741 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या भरतीविषयी सविस्तर….

संस्था – भारतीय नौदल अकादमी
भरले जाणारे पद – नागरी (गट – बी आणि सी)
पद संख्या – 741 पदे (Indian Navy Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 ऑगस्ट 2024

अर्ज फी –
1. जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु. 295/-
2. SC/ST/PWD/ESM/स्त्री – फी नाही
वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्यासाठी (Indian Navy Recruitment 2024) खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
5. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com