Home Blog Page 50

Success Story : दोन वेळच्या खाण्याची चिंता; प्रसंगी टॉयलेटमध्ये राहिले; तरीही ‘असे’ बनले 600 कोटींचे मालक

Success Story of Christopher Gardner

करिअरनामा ऑनलाईन । जीवन जगत असताना माणसाच्या (Success Story) आयुष्यात अनेक चढ उतार येत असतात. काहीजण नैराश्यात जातात आणि एकाकी पडतात तर काहीजण राखेतून उठून फिनिक्स पक्षाप्रमाणे गगन भरारी घेतात. आज आपण अशाच एका उद्योगपतीची यशोगाथा पाहणार आहोत. जे कधीकाळी इतक्या गरिबीत जीवन जगत होते की तुम्ही विचारच करु शकणार नाही. या कठीण परिस्थितीत त्यांच्या बायकोने देखील त्यांची साथ सोडली होती. अशावेळी त्यांनी आपल्या चार वर्षांच्या मुलासोबत चक्क टॉयलेटमध्ये राहून जीवन व्यतीत केले. तरीही ते खचले नाहीत. त्यांना यशस्वी होण्याच्या ध्येयाने पछाडले होते; त्यामुळेच ते आज तब्बल 600 कोटींचे मालक होवू शकले आहेत. कोण आहे ही व्यक्ती; जाणून घेवूया…

ख्रिस्तोफर गार्डनर
आयुष्यात आलेल्या संकटांना धैर्याने तोंड दिल्यास, यश नक्कीच आपल्या गळ्यात माळ घालते; हे सिद्ध करून दाखवले आहे उद्योगपती ख्रिस्तोफर गार्डनर (Christopher Gardner) यांनी. एकेकाळी ज्यांना दोन वेळचे खायला मिळत नव्हते ते आज 600 कोटी रुपयांचे मालक झाले आहेत.

प्रसंगी धुणी-भांडीही केली
ख्रिस्तोफर गार्डनर यांचा जन्म फेब्रुवारी 1954 मध्ये अमेरिकेत झाला. त्यांचे बालपण अत्यंत हलाखीत गेले. त्यानंतर आयुष्याच्या मध्यावधीमध्ये संकटांनी त्यांना घेरले. त्यांच्या आईला खोट्या आरोपात तुरुंगात जावे लागले. बहीण पालन-पोषणगृहात होती. त्यांनी काही काळ धुणी-भांडी करत उदरनिर्वाह करून (Success Story) थोडेफार पैसे जमवून हायस्कूलपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी लग्न केले. त्यानंतर देखील संकटे त्यांची पाठ सोडत नव्हती. लग्नानंतर काही वर्षातच बायकोने देखील त्यांची साथ सोडली. ज्यामुळे ते आपल्या पाच वर्षाच्या मुलासोबत राहू लागले; त्याचे पालन पोषण करु लागले.

आयुष्याला अशी मिळाली कलाटणी
मुलाचे पालनपोषण करण्यासाठी त्यांनी काही काळ नोकरी देखील केली. पण यामधून त्यांच्या स्वतःच्या आणि मुलाच्या गरजा पूर्ण होत नव्हत्या. तब्बल 4 वर्षांनी त्यांनी नोकरी सोडली आणि (Success Story) उत्पन्न वाढवण्यासाठी सेल्समन म्हणून वैद्यकीय उपकरणे विकण्यास सुरुवात केली आणि इथूनच ख्रिस्तोफर गार्डनर यांच्या आयुष्याच्या कलाटणी मिळाली. एकदा त्यांना वैद्यकीय उपकरणे एका क्लायंटला दाखवायचे होते. बॉब ब्रिजेस असं या व्यक्तिचं नाव; तो स्टॉक ब्रोकर होता जो महिन्याला लाखोंची कमाई करत होता. ज्याच्याशी बोलणे झाल्यानंतर ख्रिस्तोफरने देखील स्टॉक ब्रोकर होण्याचा निश्चय केला.

ब्रोकरेज फर्ममध्ये नोकरी
ख्रिस्तोफर यांनी मध्यंतरीच्या काळात खूप मेहनत घेतली आणि आज ते अमेरिकन स्टॉक ब्रोकरेज फर्म ‘डीन विटर रेनॉल्ड्स’चे उच्च कर्मचारी झाले आहेत. दररोज 200 ग्राहकांशी बोलण्याचे त्यांचे ध्येय असायचे. 1982 मध्ये जेव्हा ख्रिस्तोफर यांनी त्यांच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्या तेव्हा ते बेअर स्टर्न्स अँड कंपनीमध्ये फूट टाइम कर्मचारी बनले. या काळात त्यांनी मोठा अनुभव गाठी बांधला. याच अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्वतःचे फर्म उभारण्याचा निर्णय घेतला.

600 कोटींचे मालक आहेत ख्रिस्तोफर (Success Story)
ख्रिस्तोफर यांनी 1987 मध्ये ‘गार्डनर रिच अँड कंपनी’ नावाची फर्म स्थापन केली. 2006 मध्ये त्यांनी या कंपनीतील एक छोटासा हिस्सा विकला आणि ती एक कोटी डॉलरची कंपनी बनली. आज ख्रिस्तोफर हे जवळपास 600 कोटी रुपयांचे मालक आहेत. 2006 मध्ये ख्रिस्तोफर यांच्या संघर्षावर एक हॉलिवूड चित्रपट आला आहे. ‘द पर्स्युट ऑफ हॅप्पीनेस’ या चित्रपटात विल स्मिथने ख्रिस्तोफर गार्डनरची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पाहायला मिळेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IT Jobs : नोकऱ्यांचा पाऊस!! तब्बल 90 हजार फ्रेशर्सना मिळणार नोकरी; ‘या’ टॉप IT कंपन्यांचा समावेश

IT Jobs

करिअरनामा ऑनलाईन । आयटी क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या आणि IT क्षेत्रात (IT Jobs) नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील टॉप आयटी कंपन्या चालू आर्थिक वर्षात जवळपास 90,000 फ्रेशर्सना नोकरीत नियुक्त करण्याचा विचार करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस(Infosys), HCLTech(HCL), विप्रो (Wipro) अशा बड्या कंपन्यांचा समावेश आहे.

90,000 फ्रेशर्सना संधी
एप्रिल-जून या तिमाहीत आयटी क्षेत्र मजबूत कमाई करताना दिसून आलं आहे. मागील 3 महिन्यात देशातील टॉप कंपन्यांची स्थिती मजबूत राहिली आहे. परिणामी, आता देशातील टॉप आयटी कंपन्या चालू आर्थिक वर्षात जवळपास 90,000 फ्रेशर्सना नियुक्त करण्याचा विचार करत आहेत.

कोणत्या कंपनीत किती उमेदवारांना संधी मिळणार
IT सेवा क्षेत्रातील प्रमुख टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने एफआय 25 मध्ये जवळपास 40,000 फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे. तर इन्फोसिसने या आर्थिक (IT Jobs) वर्षात सुमारे 15,000 ते 20,000 फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. टीसीएसने एफआय 25 च्या पहिल्या तिमाहीत 5,452 कर्मचाऱ्यांना कामावर घेतले, ज्यामुळे तीन चतुर्थांश हेडकाउंट कमी झाले. कंपनीत आता 6,06,998 लोकांना रोजगार आहे. शिवाय तत्परतेचा दर देखील पहिल्या तिमाहीत 12.1 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

Infosys 20,000 फ्रेशर्स नियुक्त करणार (IT Jobs)
इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 11,900 फ्रेशर्सची नियुक्ती केली. त्यांचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) जयेश संघराजका यांनी Q1 कमाई बाबत सांगितले की, ते वाढीच्या आधारावर यावर्षी 20,000 पर्यंत फ्रेशर्स नियुक्त करण्याचा विचार करत आहेत. HCLTech ची आर्थिक वर्ष 25 मध्ये कॅम्पसमधून 10,000 हून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची योजना आहे.

विप्रो 10,000 ते 12,000 कर्मचारी नियुक्त करणार
विप्रोचे मुख्य मानव संसाधन अधिकारी सौरभ गोविल यांच्या मते , कंपनी आर्थिक वर्ष 25 मध्ये नवीन ऑन-बोर्डिंगचा बॅकलॉग पूर्ण करेल. आयटी सेवा प्रमुख चालू आर्थिक वर्षात सुमारे 10,000 ते 12,000 कर्मचारी नियुक्त करतात. टेक महिंद्राने यापूर्वी सांगितले होते की चालू आर्थिक वर्षात 6,000 फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची त्यांची योजना आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : सांगू शकाल? जगातील सगळ्यात जास्त शिकलेले देश कोणते? पहा यादी…

GK Updates 25 Jul

करिअरनामा ऑनलाईन । जर एखाद्या देशाची, राज्याची प्रगती बघायची (GK Updates) असेल तर त्या देशाचं, राज्याचं साक्षरतेचं प्रमाण बघितलं जातं. आपल्याला भारतातील राज्यांच्या साक्षरतेचं प्रमाण तर माहिती आहेच. आज आपण जगातील देशांच्या साक्षरतेचं प्रमाण बघणार आहोत. हे देश खऱ्या अर्थाने शक्तिशाली देश आहेत कारण इथले नागरिक मोठ्या प्रमाणावर शिकलेले आहेत. जगात एकूण 197 देश आहेत. पण तुम्हाला माहित आहे का संपूर्ण जगात कोणता देश सर्वाधिक शिक्षित आहे? चला तर मग जाणून घेवूया…
ऑर्गनायझेशन फॉर (GK Updates) इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) तर्फे दरवर्षी एक अहवाल प्रसिद्ध केला जातो, ज्यामध्ये विविध निकषांनुसार कोणता देश सर्वाधिक शिक्षित आहे हे सांगितले जाते. OECD ने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या रँकिंगनुसार जगातील टॉप 10 सुशिक्षित देशांची यादी पाहूया…

1. कॅनडा : ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटच्या अहवालानुसार कॅनडा हा जगातील सर्वाधिक शिक्षित देश आहे. 2022 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार या अहवालात कॅनडाला 60 टक्के गुण देण्यात आले होते.
2. रशिया : रशियाने दुसरा क्रमांक (GK Updates) पटकावला आहे. OECD च्या अहवालात रशियाला 56.7 टक्के गुण मिळाले आहेत. (GK Updates)
3. जपान: या यादीत जपानला तिसरे स्थान मिळाले आहे. OECD च्या अहवालात जपानचा स्कोअर 52.7 टक्के आहे.

4. लक्झेंबर्ग :
या यादीत चौथ्या क्रमांकावर कोणत्या देशाने आपले स्थान निर्माण केले आहे, याबद्दल बोलायचे झाले तर लक्झेंबर्गने या यादीत चौथ्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण करण्यात यश मिळवले आहे. त्याला 51.3 टक्के गुण देण्यात आले आहेत.
5. दक्षिण कोरिया : OECD च्या 2022 च्या अहवालात दक्षिण कोरिया पाचव्या स्थानावर आहे. दक्षिण कोरियाने 50.7 टक्के गुण मिळवले आहेत.
6. इस्रायल आणि अमेरिका : (GK Updates) हे दोन देश या यादीत सहाव्या स्थानावर आहेत. OECD च्या अहवालात इस्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांनी सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. दोन्ही देशांना 50.1 टक्के गुण मिळाले.
7. आयर्लंड : हा जगातील सातवा सर्वाधिक शिक्षित देश आहे. OECD च्या अहवालात आयर्लंडला 49.9 टक्के गुण देण्यात आले आहेत.

8. युनायटेड किंग्डम : या देशाने या यादीत आठव्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण करण्यात यश मिळवले आहे. त्याला 49.4 टक्के गुण मिळाले आहेत.
9. ऑस्ट्रेलिया : 9 व्या स्थानावर असलेल्या देशाबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाने 49.3 टक्के गुणांसह या यादीत 9 वे स्थान मिळवले आहे. (GK Updates)
10 फिनलँड : या यादीत दहाव्या क्रमांकावर असलेला देश म्हणजे फिनलँड. फिनलँडने 47.9 टक्के गुणांसह या यादीत दहावे स्थान पटकावले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PGCIL Recruitment 2024 : दरमहा 1 लाख 60 हजार पगाराची नोकरी मिळवण्यासाठी ‘इथे’ करा अर्ज

PGCIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (PGCIL Recruitment 2024) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नवीन भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिकारी प्रशिक्षणार्थी (Officer Trainee) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – अधिकारी प्रशिक्षणार्थी / Officer Trainee
पद संख्या – 43 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑगस्ट 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Company Secretary, CA or ICWA, CMA
मिळणारे वेतन – 40,000/- रुपये ते 1,60,000/- रुपये दरमहा
परीक्षा फी – (PGCIL Recruitment 2024)
1. जनरल/ओबीसी/: 500/- रुपये.
2. SC/ST/PwBD/ExSM – शुल्क नाही

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.powergridindia.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CRPF Recruitment 2024 : CRPF अंतर्गत ‘या’ उमेदवारांना मिळणार सरकारी नोकरी; परीक्षा न देता थेट द्या मुलाखत

CRPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत भरती (CRPF Recruitment 2024) होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF )
भरले जाणारे पद – विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 32 पदे
वय मर्यादा – 70 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीची तारीख – 05 ऑगस्ट 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (CRPF Recruitment 2024)
Post Graduate Degree / Diploma in concerned specialty + experience.
मिळणारे वेतन – Rs. 85,000/- दरमहा
अशी होणार निवड –
1. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे.
3. उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. सदर पदांकरिता (CRPF Recruitment 2024) मुलाखत 05 ऑगस्ट 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे. (PDF पहा)
5. मुलाखतीला हजर राहण्यासाठी TA/DA दिला जाणार नाही.
6. भरती आणि मुलाखतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF नोटिफिकेशन वाचा.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://crpf.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Board Exam : राज्यात कोसळधार… 10 वी, 12 वीचे पेपर पुढे ढकलले; पहा परीक्षेच्या नव्या तारखा

Board Exam

करिअरनामा ऑनलाईन । सध्या राज्याच्या अनेक जिल्ह्यांना (Board Exam) पावसाने झोडपून काढले आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली,सातारा या शहरांमध्ये पावसानं पूरस्थिती निर्माण झालेली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तर पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा शाळांसह कार्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्याने दहावी आणि बारावीच्या उद्या होणाऱ्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या पुरवणी परीक्षा ह्या उद्या दिनांक 26 जुलै रोजी होणार होत्या. मात्र सध्या राज्यातल्या बहुतांश शहरांमध्ये पावसाचा जोर वाढला असून काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल (Board Exam)
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सुरू असून या पार्श्वभूमीवर 26 जुलै रोजी होणाऱ्या 10 वी आणि 12 वीच्या बोर्डाच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता इयत्ता 10 वीची पुरवणी परीक्षा 31 जुलै रोजी होणार आहे. तर इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.

परीक्षेच्या बदललेल्या तारखा
उद्या दिनांक 26 जुलै रोजी दहावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयांचा पेपर सकाळी 11 ते दुपारी 1 या दरम्यान आयोजित करण्यात आला होता. मात्र आता हा पेपर दिनांक 31 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या दरम्यान होणार आहे. तर बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा (Board Exam) वाणिज्य आणि संघटक व्यवस्थापन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान एमसीव्हीसी पेपर दोन हे तीन पेपर होते हे बारावी बोर्ड पुरवणी परीक्षेचे तीनही पेपर आता 9 ऑगस्ट रोजी होणार आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Job : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक/शिपाई पदावर मोठी भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Banking Job

करिअरनामा ऑनलाईन । भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Banking Job) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिपिक, शिपाई पदाच्या एकूण 118 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भंडारा
भरले जाणारे पद –
1. लिपिक – 99 पदे
2. शिपाई – 19 पदे
पद संख्या – 118 पदे (Banking Job)
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 23 जुलै 2024 रोजी 18 ते 40 वर्षे असावे.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 ऑगस्ट 2024 (5:00 PM)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. लिपिक – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच MS-CIT किंवा समतुल्य शिक्षण घेतले असावे.
2. शिपाई – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
परीक्षा फी – (Banking Job)
1. खुला प्रवर्ग – ₹850/-
2. राखीव प्रवर्ग – ₹767/-

मिळणारे वेतन –
1. लिपिक-२७५०-२२५-३८७५-२७५-५२५०-३२५-६८७५-४००-८८७५-४५०-१११२५-५००-१३६२५
2. शिपाई- २३१०-१६५-३१३५-२००-४१३५-२५०-५३८५-३००-६८८५-३५०-८६३५
नोकरी करण्याचे ठिकाण – भंडारा

काही महत्वाच्या लिंक्स – (Banking Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://bhandaradccb.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

LIC HFL Recruitment 2024 : महिना 35,200 पगार!! LIC हाऊसिंग फायनान्स लि. अंतर्गत पदवीधर उमेदवारांना मिळणार नोकरी

LIC HFL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) पदाच्या एकूण 200 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड
भरले जाणारे पद – कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant)
पद संख्या – 200 पदे (LIC HFL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2024
नोकरीचे करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

आवश्यक शैक्षणीक पात्रता –
1. उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जुलै 2024 रोजी 21 ते 28 वर्षे असावे.
परीक्षा फी – 800/- +18% GST
मिळणारे वेतन – 32,000/- ते 35,200/- रुपये दरमहा
अशी होणार निवड (LIC HFL Recruitment 2024) –
1. ऑनलाइन परीक्षा
2. मुलाखत

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.lichousing.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : डॉक्टर आई-वडिलांची टॉपर मुलगी; पॅनीक हल्ल्यांला दिली टक्कर; पहिल्या झटक्यात UPSC पास

UPSC Success Story of IAS Fabi Rasheed

करिअरनामा ऑनलाईन । फॅबी रशीद (IAS Fabi Rasheed) ही केरळची रहिवासी आहे. केरळला (UPSC Success Story) देवांचा देश समजला जातो. फॅबी यांचा जन्म 23 जून 1999 रोजी झाला. आज 25 वर्षांची फॅबी लाखो तरुणांसाठी आदर्श बनली आहे. त्यांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यानंतर देशातील एका सर्वोच्च संस्थेत प्रवेश घेतला. त्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण करताच UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली आणि स्वप्नांना पंख दिले. हे त्यांच्या नशिबाचे आणि परिश्रमाचे फळ होते की ज्यामुळे त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास केली. सर्वांसाठी फॅबी रशीदची संपूर्ण कथा वाचा…

डॉक्टर आई-वडिलांची टॉपर मुलगी
फॅबी रशीदचा जन्म केरळमधील अलाप्पुझा येथे झाला आहे. त्यांचे आई-वडील डॉक्टर आहेत. फॅबीची आई बालरोगतज्ञ आहे. ती नुकतीच सरकारी नोकरीतून निवृत्त झाली आहे. फॅबीचे वडील आयुर्वेद तज्ज्ञ असून तेही सरकारी नोकरीतून निवृत्त झाले आहेत. फॅबीने ICSE बोर्ड, त्रिवेंद्रमशी संलग्न सर्वोदय स्कूलमधून (UPSC Success Story) बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांना 10वी मध्ये 96.7% आणि 12वी मध्ये 97.6% गुण मिळाले होते. ती 12वीत राज्यातील तिसरी टॉपर होती. यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्चमधून बायोलॉजिकल सायन्सच्या एकात्मिक अभ्यासक्रमात बी. एस. एम. एस. केले.

शासनाने दिली ‘INSPIRE फेलोशिप’
2017 ते 2022 पर्यंत IISER मध्ये शिकत असताना Fabi Rashid यांना भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून INSPIRE फेलोशिप मिळाली आहे. फॅबी यांनी 2022 मध्ये (UPSC Success Story) ग्रॅज्युएशन पूर्ण करताच UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी संपूर्ण वर्ष मेहनत घेतली. संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेची चांगली तयारी करण्यासाठी, फॅबी रशीद यांनी तिरुवनंतपुरममधील एका संस्थेतून प्रशिक्षण घेतले. यामुळे त्याला यूपीएससी अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती इत्यादी मूलभूत गोष्टी समजून घेण्यास मदत झाली.

‘मी स्वतःला भाग्यवान समजते..’
फॅबी रशीदच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले आहे. त्या 2023 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास झाल्या. फॅबी रशीदने UPSC CSE 2023 मध्ये 71 वा क्रमांक मिळवला होता. त्यांनी एका मुलाखतीत त्यांनी केलेल्या अभ्यासाच्या तयारीविषयी अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या; ” मी स्वतःला भाग्यवान समजते की मला आर्थिक किंवा इतर कोणत्याही संघर्षातून जावे लागले नाही ज्याचा सामना बहुतेक लोकांना करावा लागतो. यूपीएससी परीक्षेची तयारी करताना मला किंवा माझ्या पालकांना आरोग्याच्या कोणत्याही समस्येचा सामना करावा लागला नाही.”

झोपेशीही केली तडजोड (UPSC Success Story)
UPSC परीक्षा देत असताना फॅबी यांना काही अडचणींचा सामना करावा लागला होता. UPSC परीक्षेची तयारी करत असताना, फॅबी रशीद यांना अस्वस्थता आणि चिंतेच्या काळातून जावे लागले. या परीक्षेत तणाव येणं सामान्य आहे, परंतु त्यांच्यावर हा अतिरिक्त दबाव होता, जो त्यांनी स्वतःच निर्माण केला होता. त्यांना पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास करायची होती. अभ्यासाच्या तणावामुळे त्यांना पॅनिक अटॅक येऊ लागला. यावेळी त्यांनी झोपेशीही तडजोड केली होती. अभ्यास करताना त्यांनी लॅपटॉपचा भरपूर वापर केला; त्यामुळे त्यांचे डोळ्यांचे आरोग्य बिघडले.

लहानपणीच ठरवलं होतं सिव्हिल सर्व्हंट व्हायचं
फॅबी रशीद यांच्या कुटुंबातील एका सदस्याची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. याद्वारे त्यांना वयाच्या १४ व्या वर्षी नागरी सेवांची माहिती मिळाली. त्यानंतर शाळा-कॉलेजमध्ये काही नेतृत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यामुळे काम पूर्ण करण्याची त्यांची समज विकसित झाली आणि काही गोष्टी सुधारण्याची संधीही त्यांना मिळाली. परिणामी नागरी सेवांकडे त्यांचे आकर्षण वाढले. या कोवळ्या वयात त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला सिव्हिल सर्व्हंट व्हायचं आहे.

मुलाखतीत विचारले ‘हे’ प्रश्न
फाबी रशीदने यूपीएससी परीक्षेत समाजशास्त्र हा पर्यायी (UPSC Success Story) विषय म्हणून निवडला होता. UPSC मुलाखतीची तयारी करत असताना, Rouse IAS स्टडी सर्कलचे CEO अभिषेक गुप्ता यांनी त्यांना मार्गदर्शन केले. UPSC मुलाखतीत त्यांना 3 मुख्य प्रश्न विचारले गेले – 1. भारतात ग्रामीण-शहरी आरोग्य समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? 2. IISER तिरुवनंतपुरम येथे केलेल्या संशोधनाची गुणवत्ता कशी सुनिश्चित करते? 3. भारतात अजूनही लोकसंख्या वाढ ही समस्या आहे का? जर होय तर मग यावर उपाय काय?
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC : UPSC पूर्व परीक्षा पास झाल्यास मिळणार 1 लाख; समजून घ्या ‘ही’ योजना

UPSC

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता यूपीएससी पूर्व परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारांना 1 लाख रुपये मिळणार आहेत. त्यासाठी उमेदवाराने विहित अटी पूर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे. तेलंगण सरकारने ही योजना सुरू केली आहे. यूपीएससी प्रिलिम परीक्षेत पास होणाऱ्या तरुणांना एक लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल; अशी घोषणा तिथल्या सरकारने केली आहे.

‘राजीव गांधी नागरी अभयहस्तम’ योजना
तेलंगणचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी नुकतीच राज्यात ‘राजीव गांधी नागरी अभयहस्तम’ नावाची योजना सुरू केली आहे. ज्या तरुणांनी यूपीएससी प्रिलिम परीक्षा उत्तीर्ण केली आहे (UPSC) आणि ते यूपीएससी मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना प्रोत्साहन देणे हा, या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत अशा उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची प्रिलिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही आर्थिक मदत निर्माण कार्यक्रमाचा भाग असेल.

कोण आहेत लाभार्थी (UPSC)
तेलंगण सरकारच्या राजीव गांधी नागरी अभयहस्तम योजनेचा लाभ राज्यातील मूळ रहिवाशांनाच मिळू शकेल. यासाठी उमेदवार हा राज्यातला स्थानिक रहिवासी असणं बंधनकारक आहे. तेलंगणमधल्या सर्व प्रवर्गातल्या उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

पात्र होण्यासाठी अटी
1. या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी उमेदवाराने यूपीएससी पूर्व परीक्षा पास केलेली असावी.
2. उमेदवाराचं कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावं.
3. केंद्र किंवा राज्य सरकारमधल्या कोणत्याही (UPSC) स्थायी पदावर काम करणाऱ्या उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
4. कोणत्याही उमेदवाराला नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होताना एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.

यूपीएससीकडून घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा (CSE) ही देशातच नव्हे तर जगभरातल्या कठीण परीक्षांपैकी एक परीक्षा आहे. ही परीक्षा पास होण्यासाठी उमेदवारांना कठोर मेहनत घ्यावी लागते. देशभरातून दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात पण मोजकेच लोक या परीक्षेत पास होतात. पूर्व परीक्षेत यश मिळाल्यानंतर उमेदवार मुख्य परीक्षेची तयारी करतात; त्यांना अर्थसाह्य देण्यासाठी तेलंगण सरकारने ही नवीन योजना सुरू केली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com