Home Blog Page 53

KVK Recruitment 2024 : कृषि विज्ञान पदवीधारकांसाठी नोकरीची संधी; त्वरा करा

KVK Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण (KVK Recruitment 2024) उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. कृषि विज्ञान केंद्र, अकोला, अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तरुण व्यावसायिक- I पदाच्या एकूण 7 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर….

संस्था – कृषि विज्ञान केंद्र, अकोला
भरले जाणारे पद – तरुण व्यावसायिक- I
पद संख्या – 07 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Secretary, Rural Development & Research Foundation’s Krishi Vigyan Kendra At: Sisa (Udegaon) Post: Dongargaon Tq & Dist: Akola 444104 (Maharashtra)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – B.Sc. in Agriculture.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 45 वर्षे
परीक्षा फी – फी नाही (KVK Recruitment 2024)
मिळणारे वेतन – 30,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – अकोला

काही महत्वाच्या लिंक्स – (KVK Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.kvkbaramati.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RBI Recruitment 2024 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘ग्रेड बी’ पदावर भरती सुरू; ताबडतोब करा अर्ज

RBI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी (RBI Recruitment 2024) करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ‘ग्रेड बी’ उमेदवारांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार या वर्षी एकूण 94 पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, मुंबई अंतर्गत ‘अधिकारी ग्रेड बी’ पदांच्या एकूण 94 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 25 जुलै 2024 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, मुंबई
भरले जाणारे पद – अधिकारी ग्रेड बी
पद संख्या – 94 पदे (RBI Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 25 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई


असा करा अर्ज – (RBI Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
3. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
4. भरतीविषयी सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. अर्ज प्रक्रिया 25 जुलै 2024 पासून सुरु होणार आहे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Job : पदवीधर उमेदवारांना बँकेत नोकरीची उत्तम संधी; ‘इथे’ करा अर्ज

Banking Job

करिअरनामा ऑनलाईन । दि पुसद अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, पुसद (Banking Job) अंतर्गत भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कंत्राटी सेवक पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे.

संस्था – दि पुसद अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, पुसद
भरले जाणारे पद – कंत्राटी सेवक (Banking Job)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दि पुसद अर्बन को- ऑप बँक लि. पुसद मुख्य कार्यालय, तलाव ले-आउट पुसद जि. यवतमाळ पी. नं. 445204

नोकरी करण्याचे ठिकाण – पुसद, जि. यवतमाळ
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज – (Banking Job)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://pusadurbanbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसरसह विविध पदांवर नोकरीची संधी; राज्यातील ‘या’ नामांकित विद्यापीठात भरती सुरू

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, औरंगाबाद (Job Notification) अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून असोसिएट डीन, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 आहे.

संस्था – महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, औरंगाबाद
भरली जाणारी पदे –
1. असोसिएट डीन
2. प्रोफेसर
3. असोसिएट प्रोफेसर
4. असिस्टंट प्रोफेसर
पद संख्या – 55 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – औरंगाबाद
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन (E-MAIL)
अर्ज करण्यासाठी E-MAIL ID – [email protected]
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
एमजीएम, एचआर ऑफिस जेएनईसी कॉलेज एन-6. सिडको, छ. संभाजीनगर (औरंगाबाद)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2024

भरली जाणारी पदे – (Job Notification)

पदपद संख्या 
असोसिएट डीन02
प्रोफेसर12
असोसिएट प्रोफेसर 11
असिस्टंट प्रोफेसर30

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
3. अर्ज शेवटच्या (Job Notification) तारखेपूर्वी सादर करायचे आहेत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://mgmu.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Free Education : राज्य सरकारचा मोठा निर्णय!! ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक फी माफी

Free Education

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकार हे राज्यातील प्रत्येक (Free Education) घटकाचा विचार करून वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण योजना राबवत असते. अशातच आता मागास आणि आर्थिक दृष्ट्या प्रबल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार ईबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी या वर्गात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील प्रवेशाचे शैक्षणिक शुल्क आता माफ करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून शिक्षण संस्थांनी देखील कोणत्याही प्रकारची फी घेऊ नये; असे देखील आदेश देण्यात आले आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून या संदर्भात एक परिपत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे.

शुल्क आकारल्यास शिक्षण संस्थांवर होणार कठोर कारवाई
सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता यावर्षी शैक्षणिक वर्षांमध्ये अती मागासवर्ग प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक सामाजिक आणि आर्थिक मागास घटक आणि ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. कारण त्यांना कोणत्याही प्रकारची शैक्षणिक फी भरावी लागणार नाही. उच्च आणि तंत्रशिक्षण (Free Education) विभागांतर्गत मान्यताप्राप्त व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. शिक्षण संस्थांनी प्रवेश घेताना जर या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले, तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई देखील करण्यात येईल; असे देखील सांगण्यात आले आहे.

मुलींना परीक्षा शुल्क 100% माफ (Free Education)
या आधीच राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक आणि मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये देखील 100% सवलत देण्यात आली होती. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर देखील शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे आता संबंधित प्रवर्गातील मुलींना परीक्षा शुल्क 100% माफ असणार आहे. त्याचप्रमाणे या नवीन निर्णयानुसार त्यांना शैक्षणिक शुल्क देखील आकारण्यात येणार नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Wipro Careers : नोकऱ्यांचा पडणार पाऊस!! Wipro देणार 12 हजार नोकऱ्या

Wipro Careers

करिअरनामा ऑनलाईन । एकीकडे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत (Wipro Careers) असताना दुसरीकडे प्रसिद्ध IT कंपनी Wipro ने 2025 या आर्थिक वर्षासाठी मेगा प्लॅन आखला आहे. या प्लॅननुसार कंपनी 10,000 ते 12,000 नवीन लोकांची नियुक्ती करणार आहे. यामध्ये कॅम्पसच्या माध्यमातून नियुक्ती आणि कॅम्पस शिवाय नियुक्त्या होणार आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षांत Wipro कंपनीने कर्मचाऱ्यांच्या संख्येत सातत्याने कपात केली होती. मात्र आता अचानक 2025 च्या आर्थिक वर्षात Wipro 10 ते 12 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. त्यामुळे IT सेक्टर मध्ये काम करणाऱ्या तरुणांसाठी हि मोठी आनंदाची बाब समजली जात आहे.

10,000 ते 12,000 नोकर भरतीची कंपनीची योजना
30 जून 2024 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत, विप्रोने 3,000 हून अधिक नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. हेडकाउंटमध्ये सलग सहा तिमाहीत घट झाल्यानंतर या तिमाहीत 337 कर्मचाऱ्यांची वाढ नोंदवली गेली. कंपनीने पुढील आर्थिक वर्षासाठी सुद्धा अशाच प्रकारे तब्बल 10,000 ते 12,000 नोकर (Wipro Careers) भरतीची योजना आखली आहे. आम्ही पुन्हा एकदा नोकरभरती करणार आहोत असं मुख्य मानव संसाधन अधिकारी सौरभ गोविल यांनी 19 जुलै रोजी कंपनीच्या Q1 कमाई परिषदेदरम्यान सांगितले.

ते पुढे म्हणाले, विप्रो आर्थिक वर्ष 2025 मध्ये दिलेल्या सर्व जॉब ऑफर पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आहे. आम्ही काही संस्थांसोबत आमचे संबंध आणि भागीदारी मजबूत केली आहे. त्यामुळे आम्ही (Wipro Careers) या वर्षी कॅम्पसमध्ये आणि कॅम्पसबाहेर भरती करू. पुढच्या वर्षीही तितक्याच लोकांना नोकरी देण्याची आमची योजना आहे. आमचा युटिलायझेशन रेशो सर्वोच्च शिखरावर असून त्यामुळे आमच्या पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित करण्याची ही योग्य वेळ आहे.; असे गोविल यांनी सांगितलं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : 33 सरकारी परीक्षा नापास झालेला तरुण जिद्दीने बनला IPS; चकित करणारी आहे कहाणी….

UPSC Success Story of IPS Aaditya Kumar

करिअरनामा ऑनलाईन । प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार (UPSC Success Story) येत असतात, पण जर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या विचारांवर कटिबद्ध राहिला तर टप्प्याटप्प्याने का होईना पण यश मिळतेच. आज आपण अशाच एका व्यक्तीची कथा वाचणार आहोत ज्या व्यक्तीने आयुष्यात हार न मानता IPS अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली आहे. 12 वी पास झाल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीत रुजू होण्याचे ध्येय ठेवले होते. त्यांचे मुख्य लक्ष यूपीएससी (UPSC) परीक्षा पास करण्यावर होते. त्यांनी ठरल्याप्रमाणे सरकारी नोकरीच्या परीक्षांची तयारी आणि फॉर्म भरण्यास सुरुवात केली. सुरवातीला त्यांना यश मिळाले नाही. त्यांनी दोन-चार नाही तर तब्बल 30 वेगवेगळ्या सरकारी परीक्षा दिल्या पण प्रत्येक वेळी त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे आदित्य कुमार…

तब्बल 33 वेळा झाले नापास (UPSC Success Story)
आदित्य राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील अजितपुरा या छोट्याशा गावचा रहिवासी आहे. एवढ्यावेळा आलेल्या अपयशाने कोणीही निराश होवू शकतं. पण आदित्य त्यापैकी नव्हते. ते आपल्या संकल्पापासून मागे हटले नाहीत. वारंवार अपयशी येवूनही त्यांनी हार मानली नाही. या सर्व परीक्षेत नापास झाल्यावर पराभव स्वीकारण्याऐवजी त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्याचा आणखी एक मोठा संकल्प केला.

गाव सोडून दिल्लीत आले
2013 मध्ये ते गाव सोडून दिल्लीत आले आणि UPSC ची तयारी सुरू केली. सरकारी परीक्षांमध्ये सतत अपयश येत असल्याने लोक त्यांना टोमणे मारायचे. “जो सामान्य परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही तो यूपीएससीसारखी कठीण परीक्षा कशी उत्तीर्ण होऊ शकतो?” असं बोलून लोक हिणवायचे. कदाचित त्याच्या (UPSC Success Story) जिद्दीची कल्पना कुणालाच आली नसेल. सर्वसाधारण परीक्षांमध्ये 30 वेळा आणि UPSC परीक्षेत 3 वेळा नापास होऊनही, 2017 मध्ये UPSC च्या चौथ्या प्रयत्नात परीक्षा पास करून त्यांनी संपूर्ण कथाच बदलून टाकली.

आयपीएस आदित्य कुमार यांनी केवळ यूपीएससी परीक्षा उत्तीर्णच केली नाही तर त्यांच्या रँकच्या आधारे त्यांना आयपीएस कॅडर देखील मिळाले. 2018 च्या UPSC निकालात त्यांना 630 वा क्रमांक मिळाला आहे. जे लोक कालपर्यंत त्यांच्या अपयशावर टोमणे मारत होते, ते आता त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन करत आहेत. आदित्य आज पंजाबमध्ये आयपीएस अधिकारी आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, त्यांनी स्वत: त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितले. त्यांनी दिलेल्या विविध परीक्षांमध्ये अखिल भारतीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा, केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) आणि बँकिंग सारख्या परीक्षांचा समावेश होता.

मुलाखतीत अती आत्मविश्वास नडला
2014 मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा UPSC परीक्षेला बसले तेव्हा त्यांना पूर्व परिक्षाही पास करता आली नाही. नंतर 2015 मध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा पास झाल्यावर स्वतःमधील अती (UPSC Success Story) आत्मविश्वासामुळे ते मुलाखत फेरीत नापास झाले. यानंतर 2016 च्या परीक्षेतही त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. मात्र 2017 मध्ये आदित्य यांनी यश खेचून आणले. आदित्य कुमार सध्या पंजाबच्या संगरूर जिल्ह्यात ASP म्हणून तैनात आहेत. आदित्य यांचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. काही साध्य करायचे असेल तर मेहनत हाच एकमेव मार्ग आहे, अशी शिकवण त्यांना त्यांच्या पालकांनी लहानपणापासूनच दिली होती.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ICAI CA Exam 2024 : नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या CA परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; पहा महत्वाची अपडेट

ICAI CA Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । चार्टर्ड अकाउंटंट मुख्य परीक्षेचा अभ्यास (ICAI CA Exam 2024) करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी हाती आली आहे . द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने चार्टर्ड अकाउंटंट (CA) अंतिम अभ्यासक्रमाच्या घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये ही परीक्षा होणार आहे. संस्थेने प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेनुसार, सीए फायनलच्या गट 1 च्या परीक्षा 1, 3 आणि 5 नोव्हेंबर रोजी आणि गट 2 च्या परीक्षा 7, 9 आणि 11 नोव्हेंबर रोजी घेतल्या जातील.

नोंदणीसाठी महत्वाच्या तारखा
CA नोव्हेंबर 2024 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याबरोबरच ICAI ने या परीक्षेसाठी आवश्यक नोंदणी तारखा देखील जाहीर केल्या आहेत. संस्थेच्या अधिसूचनेनुसार उमेदवार 7 ऑगस्टपासून सीए फायनल नोव्हेंबर 2024 च्या परीक्षेस बसण्यासाठी त्यांचा परीक्षा फॉर्म भरू शकतील. ज्यासाठी अंतिम तारीख 20 ऑगस्ट ही विलंब शुल्काशिवाय निश्चित करण्यात आली आहे. यानंतर 23 ऑगस्ट रोजी 600 रुपये विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरता येईल.

परीक्षा फी (ICAI CA Exam 2024) –
ICAI ने CA नोव्हेंबर 2024 च्या परीक्षांसाठी एका गटासाठी 1,800 रुपये शुल्क निश्चित केले आहे. एखाद्या विद्यार्थ्याला गट 1 आणि गट 2 अशा दोन्ही परीक्षांसाठी नोंदणी कराची असेल त्यांना 3,300 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

परीक्षा फॉर्ममधील दुरुस्ती विषयी –
कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा फॉर्ममध्ये दुरुस्तीची आवश्यकता असल्यास यासाठी ICAI द्वारे 24 ते 26 ऑगस्ट या कालावधीत अर्ज दुरुस्ती विंडो उघडली जाईल. या कालावधीत, उमेदवार त्यांच्या परीक्षेचे शहर आणि परीक्षेचे माध्यम बदलू शकतील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Anganwadi Sevika Bharti 2024 : महिलांसाठी खुषखबर!! अंगणवाडी मदतनीस पदावर भरती सुरू; त्वरा करा

Anganwadi Sevika Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी (Anganwadi Sevika Bharti 2024) आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्ग अंगणवाडी अंतर्गत ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे.

संस्था – महिला व बाल विकास विभाग, (रत्नागिरी) सिंधुदुर्ग, महाराष्ट्र शासन
भरले जाणारे पद – अंगणवाडी मदतनीस
पद संख्या – 04 पदे (Anganwadi Sevika Bharti 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग, कुलकर्णी कम्पांऊड, जेल रोड रत्नागिरी, जि. रत्नागिरी दुरध्वनी क्रमांक -०२३५२-२७००६५.
नोकरी करण्याचे ठिकाण – सिंधुदुर्ग

वय मर्यादा – 18 ते 35 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
अंगणवाडी मदतनीस 12 वी, पदवी, पदव्युत्तर, B.Ed, D.Ed, MSCIT
मिळणारे वेतन – अंगणवाडी मदतनीस – Rs.5,500/- दरमहा

असा करा अर्ज – (Anganwadi Sevika Bharti 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक महिला उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदावर भरती; इंडियन लॉ सोसायटी, पुणे येथे नोकरीची संधी

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन लॉ सोसायटी, पुणे अंतर्गत नवीन पदावर (Job Notification) भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदांच्या एकूण 44 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 जुलै 2024 आहे.

संस्था – इंडियन लॉ सोसायटी, पुणे
भरले जाणारे पद –
1. सहाय्यक प्राध्यापक
2. ग्रंथपाल
पद संख्या – 44 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 21 जुलै 2024
मुलाखतीचा पत्ता – तिसरा मजला, ILSCA ऑफिस, ILS लॉ कॉलेज कॅम्पस, लॉ कॉलेज रोड, पुणे 4.

भरतीचा तपशील – (Job Notification)

पदपद संख्या 
सहायक प्राध्यापक43
ग्रंथपाल01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
सहायक प्राध्यापक LLM, Post Graduate with B+ and NET/SET Post Graduate with B+ and NET/SET.
ग्रंथपालM.Lib with B+ and NET/SET

अशी होणार निवड –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
2. उमेदवारांनी संबंधित तारखेला (Job Notification) मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर रहावे.
4. वरील पदांसाठी मुलाखत 21 जुलै 2024 या तारखेला घेण्यात येणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://ilslaw.edu/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com