Home Blog Page 45

Job Alert : प्राध्यापकांनो तयार रहा… ‘या’ शासकीय महाविद्यालयात नोकरीची संधी उपलब्ध

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना (Job Alert) अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना
भरले जाणारे पद –
1. प्राध्यापक (Job Alert)
2. सहयोगी प्राध्यापक
पद संख्या – 44 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना जिल्हा सामान्य रुग्णालय आवार, बायपास रोड, समर्थनगर जालना, पिन ४३१२१३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑगस्ट 2024

नोकरी करण्याचे ठिकाण – जालना
भरतीचा तपशील – (Job Alert)

पदपद संख्या 
प्राध्यापक१७
सहयोगी प्राध्यापक२७

असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी (Job Alert) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://jalna.gov.in/en/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Big News : राज्यातील BAMS च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!! राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

Big News

करिअरनामा ऑनलाईन । बी. ए. एम. एस. चं शिक्षण घेणाऱ्या मराठी (Big News) विद्यार्थ्यांचा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता. या प्रश्नाची मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ दखल घेऊन महाराष्ट्रातील बी. ए. एम. एस.च्या (BAMS) विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बी. ए. एम. एस. केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी आता राज्यातून प्रवेश मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश (Big News)
महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बी. ए. एम. एस. केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळत नव्हता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासमवेत आज वर्षा निवासस्थानी झालेल्या एका बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना आयुर्वेद विद्यार्थ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी योग्य पावले उचलण्याच्या सूचना केल्या. यासाठी पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी लगेच सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

85% कोटा(शासकीय व खाजगी अनुदानित) तसेच 70% कोटा (खाजगी विना अनुदानित)
राज्याच्या 85% कोटा(शासकीय व खाजगी अनुदानित) तसेच 70% कोटा (खाजगी विना अनुदानित) या कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी अन्य राज्यातून बी. ए. एम. एस. केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता संधी मिळणार आहे. त्यामुळे, गेल्या अनेक वर्षांपासूनची बी. ए. एम. एस. विद्यार्थ्यांची मागणीच आज राज ठाकरे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या (Big News) शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, प्रवक्ते संदीप देशपांडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीमध्ये मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Job : 10 वी पास ते ग्रॅज्यूएट्ससाठी नोकरीची मोठी संधी!! अर्जासाठी त्वरा करा

Banking Job

करिअरनामा ऑनलाईन । श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन (Banking Job) क्रेडिट सोसा. लि., अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क, ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर, ट्रेनी हार्डवेअर इंजिनिअर, शिपाई पदांच्या एकूण 115 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि., अहमदनगर
भरली जाणारी पदे – शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क, ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर, ट्रेनी हार्डवेअर इंजिनिअर, शिपाई
पद संख्या – 115 पदे (Banking Job)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑगस्ट 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
शाखा व्यवस्थापक05
सहायक शाखा व्यवस्थापक10
पासिंग ऑफिसर 15
कॅशिअर20
क्लार्क20
ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर10
ट्रेनी हार्डवेअर इंजिनिअर10
शिपाई25

आवश्यक शैक्षणिक पात्रता (Banking Job) –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापकM.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance
सहायक शाखा व्यवस्थापकM.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance
पासिंग ऑफिसर M.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance
कॅशिअरB.Com / B.A./B.Sc
क्लार्कB.Com / B.A./B.Sc
ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअरB.E. / M.C.A. / M.C.S. / B.C.S
ट्रेनी हार्डवेअर इंजिनिअरHardware Diploma
शिपाई10th pass

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्ज शेवटच्या तारखे (Banking Job) अगोदर सादर करायचा आहे.
4. अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – http://www.renukamatamultistate.com/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SFIO Recruitment 2024 : सिरिअस फ्रॉड इन्वेस्टीगेशन ऑफिस येथे विविध पदांवर भरती सुरू; लगेच करा APPLY

SFIO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । गंभीर फसवणूक तपास कार्यालय अंतर्गत (SFIO Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक, वरिष्ठ सहाय्यक संचालक, वरिष्ठ अभियोक्ता, सहाय्यक संचालक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून एकूण 43 पदे भरली जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत म्हणजेच 29 सप्टेंबर 2024 पर्यंत करता येईल.

संस्था – गंभीर फसवणूक तपास कार्यालय (Serious Fraud Investigation Office)
भरली जाणारी पदे –
1. अतिरिक्त संचालक
2. सहसंचालक
3. उपसंचालक
4. वरिष्ठ सहाय्यक संचालक
5. वरिष्ठ अभियोक्ता
6. सहाय्यक संचालक
पद संख्या – 43 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 60 दिवसांच्या (29 सप्टेंबर 2024)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, गंभीर फसवणूक तपास कार्यालय, पं. दीनदयाल अंत्योदय भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली ११०००३

भरतीचा तपशील (SFIO Recruitment 2024) –

पदपद संख्या 
अतिरिक्त संचालक 01
सहसंचालक03
उपसंचालक13
वरिष्ठ सहाय्यक संचालक02
वरिष्ठ अभियोक्ता 01
सहाय्यक संचालक23

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे.
3. उमेदवारांनी अर्जासोबत (SFIO Recruitment 2024) आवश्यक कागदपत्रे जोडावी.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
4. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत (29 सप्टेंबर 2024 पर्यंत) करू शकतात.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://sfio.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Machine Tool Prototype Factory Recruitment 2024 : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड येथे नवीन भरती सुरू; त्वरा करा

Machine Tool Prototype Factory Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । आर्मर्ड व्हेइकल्स निगम (Machine Tool Prototype Factory Recruitment 2024) लिमिटेड अंतर्गत सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ कार्यकारी, कार्यकारी, सल्लागार, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 दिवस (23 ऑगस्ट 2024) आहे.

संस्था – आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड
भरली जाणारी पदे –
1. वरिष्ठ कार्यकारी
2. कार्यकारी
3. सल्लागार
4. वरिष्ठ व्यवस्थापक
5. व्यवस्थापक
पद संख्या – 17 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 दिवस (23 ऑगस्ट 2024)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक/CO आणि HR, आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, HVF रोड, आवडी, चेन्नई – 600054

भरतीचा तपशील (Machine Tool Prototype Factory Recruitment 2024) –

पदपद संख्या 
वरिष्ठ कार्यकारी05
कार्यकारी06
सल्लागार01
वरिष्ठ व्यवस्थापक03
व्यवस्थापक02

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 दिवस (23 ऑगस्ट 2024) आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण (Machine Tool Prototype Factory Recruitment 2024) असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://avnl.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Hotel Management Admission 2024 : महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू; 5 ऑगस्टपर्यंत करा अर्ज

Hotel Management Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र पर्यटन संचालनालय (Hotel Management Admission 2024) संचलित सोलापूर येथील स्वामी समर्थ महाराष्ट्र इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरींग टेक्नॉलॉजी येथे 3 वर्षाच्या बी.एस.सी. पदवी तसेच पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना दि. 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.

बी. एससी. हॉस्पिटलिटी अँड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन कोर्स
बी. एससी. हॉस्पिटलिटी अँड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन हा ३ वर्षे कालावधी तसेच फूड प्रॉडक्शनमध्ये पदविका, बेकरी व कन्फेक्शनरीमध्ये पदविका, फूड अँड बेवरेज सर्व्हिसमध्ये (Hotel Management Admission 2024) पदविका या दीड वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त १०+२ प्रणालीमध्ये कोणत्याही विद्याशाखेमध्ये ४० टक्के गुण मिळवून १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अंतिम पदवी प्रदान करण्याकरिता अभ्यासक्रमाला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची मान्यता राहील.

प्राधान्य तत्त्वावर प्रवेश (Hotel Management Admission 2024)
पदवी आणि पदविका अभ्यासक्रमासाठी वयोमर्यादेची अट नसून पदविका अभ्यासक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ए-१६०, कंबर तलाव जवळ, धर्मवीर संभाजी महाराज उद्यान, विजापूर रोड, सोलापूर या पत्त्यावर अथवा ९८९०५६६९९८, ९७६७२५७०२१ किंवा ९३७३०५०७०७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Online Interview Tips : ऑनलाइन मुलाखत देताना ‘या’ टिप्स करा फॉलो 

Online Interview Tips

करिअरनामा ऑनलाईन । HR अधिकारी किंवा नियोक्त्यासमोर (Online Interview Tips) प्रेझेंटेबल दिसण्यासाठी ऑनलाइन मुलाखतीदरम्यान उमेदवारांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ऑनलाइन मुलाखतीसाठी पारंपारिक मुलाखतीपेक्षा काही विशेष तयारीही आवश्यक असते. ऑनलाइन मुलाखत ही उमेदवारांसाठी आव्हानात्मक ठरु शकते. यामुळे मुलाखतीपुर्वी तयारी करणे आवश्यक असते. ऑनलाइन मुलाखतीची तयारी कशी करायची, मुलाखत देताना कोणती काळजी घ्यायची; याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

  1. मुलाखत देण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची खात्री करा (Online Interview Tips)

ऑनलाइन मुलाखत देण्यापूर्वी मुलाखतकाराकडून ऑनलाइन मुलाखत ऑडिओ-व्हिडिओ की चॅटद्वारे होणार आहे? याची संपूर्ण माहिती घ्या. ऑनलाइन मुलाखतीचे स्वरूप विचारा. तसेच प्रश्न पूर्व-रेकॉर्ड केले आहेत का ते तपासा. मुलाखतीदरम्यान तांत्रिक त्रास टाळण्यासाठी (Online Interview Tips) आधीच बॅकअप तयार ठेवा.

  1. कंपनीविषयी माहिती गोळा करा

तुम्ही ज्या कंपनीत ऑनलाइन मुलाखत देणार आहात त्या कंपनीच्या कामकाजाविषयी माहिती गोळा करा. यासाठी कंपनीच्या वेबसाइटची मदत घ्या. तेथे काम करणाऱ्या (Online Interview Tips) कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळवा आणि मीडिया कव्हरेज पाहा. अशा प्रकारे तुम्हाला कंपनीबद्दल प्राथमिक माहिती मिळू शकते. कंपनी किंवा संस्थेचा वार्षिक अहवाल पाहा, तिथे कंपनीच्या जोखीमेबद्दल माहिती मिळेल.

  1. मुलाखतीसाठी योग्य जागा निवडा

ऑनलाइन मुलाखत देताना प्रकाश योजना, कॅमेरा अँगल आणि तुम्ही बसणार आहात त्या जागेची मागील पार्श्वभूमी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे योग्य जागा निवडा. व्यावसायिक (Online Interview Tips) दिसणारा पोशाख परिधान करा. जेणेकरून मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला तुमच्यातला आत्मविश्वास दिसेल.

  1. उपकरणे तपासा

ऑनलाइन मुलाखतीदरम्यान तांत्रिक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे तांत्रिक उपकरणे नीट तपासा. Wi Fi किंवा मोबाइल नेटवर्क तपासून घ्या. लॅपटॉप (Online Interview Tips) आणि मोबाईल फोन पूर्णपणे चार्ज करा. मुलाखत सुरु असताना तुमचा मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा.

  1. संभाव्य प्रश्नांसाठी आधीच तयार राहा

ऑनलाइन मुलाखतीसाठी काही प्रश्नांची उत्तरे आधीच तयार करा. तुम्हाला किती अनुभव आहे? आधीची नोकरी सोडण्याचे कारण काय? तुम्हाला किती पगाराची (Online Interview Tips) अपेक्षा आहे? ऑनलाइन मुलाखतीदरम्यान आवश्यक असेल तिथे ‘होय’ आणि ‘ठीक आहे’; असं म्हणायला विसरू नका.

  1. नेहमी प्रेझेंटेबल राहा

ऑनलाइन मुलाखती दरम्यान चेहरा हसरा ठेवा. पारंपारिक मुलाखतीप्रमाणेच आत्मविश्वासाने मुलाखत द्या.  खुर्चीच्या काठावर बसा जेणेकरून समोरच्या व्यक्तीला तुमचे शरीर सरळ दिसेल.

  1. वेब कॅमेऱ्याकडे पाहा

मुलाखत देताना स्क्रीनवरील व्यक्तीकडे पाहण्याऐवजी, वेब (Online Interview Tips) कॅमेऱ्याकडे पाहा. प्रशांची उत्तरे देत असताना तुम्ही जर आजूबाजूला बघितले तर तुम्ही मुलाखत गांभीर्याने घेत नाही असे मुलाखत घेणाऱ्याला वाटू शकते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : भेटा पवनी खंडेलवाल आणि तिच्या ‘आत्मनिर्भर’ महिला रायडर्सना

Success Story of Pavani Khandelwal

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या अनेक वर्षापासून महिला (Success Story) फक्त घर कामापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. महिला आता प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंवा त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. महिला आता स्वावलंबी झाल्या आहेत. धैर्याने, हुशारीने, कौशल्याने महिलांनी सर्व क्षेत्रे काबीज केली आहेत. यापैकीच एक महिला आहे पवनी खंडेलवाल (Pavani Khandelwal). 2017 मध्ये सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज शेकडो महिलांसाठी आधारवड ठरला आहे. त्यांच्यामुळे अनेक महिला आज दरमहा हजारोंची कमाई करत आहेत.

‘आत्मनिर्भर’ स्टार्टअप
ड्रायव्हिंग शिकू इच्छिणाऱ्या मध्यमवर्गीय महिलांची संख्या मोठी आहे. परंतु, प्रशिक्षकाअभावी महिलांना शिकता येत नाही. अशाच एका विभागासाठी मथुरेच्या पवनी खंडेलवाल काम करत आहेत. पवनी महिलांना प्रशिक्षण आणि रोजगार देत आहे. पवनीच्या ‘आत्मनिर्भर’ या स्टार्टअपमधील सर्व प्रशिक्षक या महिला आहेत. पवनी यांनी आईकडून प्रेरणा घेतली आणि काम सुरू केले. पवनी यांना या कामातून जीवनाचे ध्येय मिळाले आणि त्यांना महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्याचे साधन उपलब्ध करून देता आले आहे.

पवनीने सांगितले आपल्या प्रवासाविषयी
आपल्या कामविषयी बोलताना पवनी सांगतात; “महिलांना (Success Story) गाडी कशी चालवायची हे माहीत होते, पण त्यांच्याकडे स्वत:ची गाडी नव्हती. या महिलांना मी स्कूटर उपलब्ध करून दिली आणि नंतर व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवले. आत्तापर्यंत स्वावलंबनाच्या मदतीने 150 महिलांना रोजगार मिळाला आहे. त्या प्रत्येक महिन्याला 15 ते 20 जणांना प्रशिक्षण देऊन दरमहा 20 हजार रुपये कमावतात.”

200 महिलांना दिला रोजगार (Success Story)
मला वाटायचं की मलाही स्कूटर चालवायला शिकता आलं असतं. मग माझ्या मुलीने मला निराश झाल्याचे पाहिले आणि मला प्रोत्साहन दिले. आज ते धाडस इतके वाढले आहे की आम्ही अनेक शहरांमध्ये आमचे स्टार्टअप सुरू केले आहेत. महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे; हा या स्टार्टअपचा मुख्य हेतू आहे. मथुरा व्यतिरिक्त जयपूर, दिल्ली, नोएडा, जयपूर, जोधपूर अशा सुमारे 14 शहरांमध्ये हा स्टार्टअप विस्तारला आहे. त्यांनी सांगितले की त्यांनी सुमारे 20 हजार महिलांना स्कूटर चालवायला शिकवले आहे. येथे सध्या 200 हून अधिक मुली काम करत आहेत.

स्टार्टअपची कल्पना कशी सुचली?
तीन वर्षांपूर्वी पवनीच्या आईने टू व्हीलर ड्रायव्हिंग शिकण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा शहरात एकही व्यावसायिक महिला ड्रायव्हिंग ट्रेनर नव्हती. बऱ्याच अडचणींनंतर पवनीला एक महिला ड्रायव्हिंग ट्रेनर सापडली. जेव्हा तिची आई ड्रायव्हिंग शिकली तेव्हा इतर अनेक महिला पुढे आल्या ज्यांना फक्त महिलांकडून प्रशिक्षण घेऊन शिकायचे होते. टू व्हीलर शिकल्यानंतर पवनीची आई सांगते की, जेव्हा ती गाडी चालवते तेव्हा तिला पंख असल्याचा भास होतो. केवळ गाडी चालवायला शिकून स्त्रिया त्यांच्या दैनंदिन जीवनात किती फरक पडू शकतो याची जाणीव पवनीला या घटनेमुळे झाली. हा तो काळ होता जेव्हा 25 वर्षांच्या पवनी खंडेलवालने 2017 मध्ये ‘आत्मनिर्भर’ स्टार्टअप सुरू केले होते.

‘आत्मनिर्भर’ स्टार्टअप फक्त महिलांसाठीच का?
पवनी सांगतात, पुरुषांच्या तुलनेत महिला ड्रायव्हिंगमध्ये मागे असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. ज्या पुरुषांना गाडी कशी चालवायची ते माहित नाही ते सामान्य ड्रायव्हिंग स्कूलमध्ये (Success Story) प्रशिक्षण घेऊ शकतात. महिला प्रशिक्षकांच्या कमतरतेमुळे पुरुषांकडून दुचाकी चालवताना महिलांना संकोच वाटतो. त्यामुळे केवळ महिलांनाच प्रशिक्षण देण्यासाठी हे स्टार्टअप सुरू करण्यात आले आहे.

देशातील प्रत्येक शहरात ‘आत्मनिर्भर’ स्टार्टअप सुरू करण्याचं ध्येय
आग्रा, अहमदाबाद, अलीगढ, लखनौ, जोधपूर आणि भरतपूरमध्ये आता ‘आत्मनिर्भर’ स्टार्टअप सुरू झाल्याचे पवनी यांनी सांगितले. आता 2021 पर्यंत त्याची व्याप्ती संपूर्ण देशात (Success Story) वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. ज्या महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे; अशा महिलांना ‘आत्मनिर्भर’ स्टार्टअपची फ्रेंचाइजी दिली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ICSSR Fellowship 2024 : PhD च्या विद्यार्थ्यांसाठी ICSSR फेलोशिप जाहीर; इथे करा अर्ज

ICSSR Fellowship 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन कौन्सिल ऑफ (ICSSR Fellowship 2024) सोशल सायन्स रिसर्च (ICSSR) संस्थेतर्फे डॉक्टरल फेलोशिप 2024 साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पीएचडीचे विद्यार्थी या फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात. फेलोशिपच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थी https://icssr.org/doctoral-fellowship या संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती घेऊ शकतात.

ICSSR डॉक्टर फेलोशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधन करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण व समाज व मानवाच्या उन्नतीच्या दृष्टीने संशोधन करावे, हा या फेलोशिपचा मुख्य उद्देश आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून तसेच देशाच्या विकासाला आणि धोरण ठरवण्यासाठी आवश्यक असणारे संशोधन व्हावे; असा या मागचा हेतू आहे.

या तारखेपर्यंत करा अर्ज (ICSSR Fellowship 2024) –
1. या फेलोशिपसाठी अर्ज करण्यासाठी 2 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
2. ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्यासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.
3. यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये, अभिमत विद्यापीठांमध्ये किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्थांमध्ये पीएचडीसाठी नोंदणी झालेल्या वय वर्ष 40 च्या आतील विद्यार्थ्यांना या फेलोशिपसाठी अर्ज करता येईल.
4. अर्जाविषयी तसेच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://icssr.org/doctoral-fellowship या लिंकवर CLICK करा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MES Pune Recruitment 2024 : प्राध्यापकांसाठी मोठी बातमी!! मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे येथे होणार नवीन भरती

MES Pune Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुमच्यासाठी पुण्यामध्ये नोकरी (MES Pune Recruitment 2024) करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित न्यू लॉ कॉलेज, मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित न्यू लॉ कॉलेज, मुंबई
भरले जाणारे पद – सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या – 16 पदे (MES Pune Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 ऑगस्ट 2024
नोकरीचे ठिकाण – पुणे

असा करा अर्ज –
1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (MES Pune Recruitment 2024) उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
3. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://mespune.org/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com