Home Blog Page 417

Cognizant Careers : Cognizant देतंय Work from Home ची संधी!! ‘या’ उमेदवारांना होणार फायदा

Cognizant Careers

करिअरनामा ऑनलाईन | कॉग्निझंट या कंपनीत प्रोग्रॅमर अ‍ॅनालिस्ट ट्रेनी (Cognizant Careers) या पदासाठी भरती होणार आहे. या पदभरतीसाठी वर्क फ्रॉम होम करण्यास इच्छुक उमेदवारांची निवड केली जाईल. ही पदभरती शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी असेल. बीई, बीटेक, बीसीए, एमसीए, एमई, एमटेक झालेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

उमेदवारानं कामाबाबतचे प्रश्न, तक्रारी आणि स्पष्टीकरण लगेचच वरिष्ठांना सांगितलं पाहिजे. नियोजित आणि अपेक्षित वेळेत टार्गेट पूर्ण करण्यासाठी कामात सातत्य राखलं पाहिजे. सहकारी आणि वरिष्ठांसोबतचे संबंध सुधारले पाहिजेत. कामासंदर्भात सर्व गोष्टींचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे व (Cognizant Careers) आवश्यकतेनुसार त्यांचा क्रम लावला पाहिजे. एखादं काम मिळाल्यावर ते पार पाडण्याची प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. गरज असल्यास वेळोवेळी कामाबाबतचे अपडेट्स दिले पाहिजेत. वर्क फ्रॉम होम करण्यास इच्छुक उमेदवारांना यासाठी संधी दिली जाणार आहे.

उमेदवारकडे हे स्किल्स असणे आवश्यक (Cognizant Careers)

या पदावर काम करणाऱ्यास इच्छुक उमेदवारांकडे कोणती कौशल्यं असली पाहिजेत, याबद्दलही माहिती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी एखाद्या प्रोजेक्टचा दर्जा टिकवण्यासाठी विविध ठिकाणांहून माहिती मिळवली पाहिजे. क्लायंटच्या मागण्या काय आहेत, तांत्रिक उपलब्धता काय आहे, याबाबतही ज्ञान घेतलं पाहिजे. त्याकरिता क्लायंटच्या प्रोजेक्टची सर्व कागदपत्रं वाचली पाहिजेत. नॉलेज ट्रान्स्लेशन वर्कशॉपला हजेरी लावून तुमच्या प्रोजेक्टबाबत सर्व माहिती मिळवली पाहिजे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट, तांत्रिक ज्ञान आणि तुमचं शिक्षण यात वेळोवेळी आवश्यक ती भर घातली पाहिजे.

अधिकृत वेबसाईट – cognizant.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Scholarship : परदेशात शिक्षण घेण्याची चिंता सोडा; ‘ही’ मोठी युनिव्हर्सिटी देते कोट्यावधींची स्कॉलरशिप

Scholarship

करिअरनामा ऑनलाईन। परदेशात शिक्षण घेण्याचे बहुतेक तरुणांचे (Scholarship) स्वप्न असते. न्यूझीलंडमधील ऑकलंड येथील वायपापा तोमाता राऊ विद्यापीठ भारतीय विद्यार्थ्यांना हे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी देत ​​आहे. हे विद्यापीठ भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी 1.5 दशलक्ष न्यूझीलंड डॉलर्स म्हणजेच 7 कोटी 30 लाख 69 हजार 431 रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती देत ​​आहे. या शिष्यवृत्तीसाठी, उमेदवाराला अधिकृत वेबसाइट auckland.ac.nz वर अर्ज करावा लागेल. शिष्यवृत्ती मिळाल्यानंतरच तुम्ही पुढील शिक्षण घेऊ शकता.

हाय अचिव्हर्स स्कॉलरशिप

या शिष्यवृत्तीचे नाव हाय अचिव्हर्स स्कॉलरशिप असे आहे.

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. (Scholarship)

इच्छुक विद्यार्थी 21 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.

यानंतर, तुम्ही 9 मार्च 2023 ते 20 एप्रिल 2023 पर्यंत पुन्हा अर्ज करू शकाल.

एवढी मिळेल स्कॉलरशिप (Scholarship)

ऑकलंड विद्यापीठाने दिलेली ही शिष्यवृत्ती अंडरग्रेजुएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी आहे. ऑकलंड विद्यापीठाने देऊ केलेली ही शिष्यवृत्ती 2 वर्षांतून एकदा दिली जाईल. तसेच 115 शिष्यवृत्ती आहेत, ज्या वर्षातून दोनदा दिल्या जातील.

अशी मिळवा शिष्यवृत्ती

दरवर्षी 20 हजार डॉलर्सपर्यंतच्या 5 शिष्यवृत्ती उपलब्ध असतील. त्याचबरोबर 10 हजार डॉलर्स आणि 5 हजार डॉलर्सपर्यंतच्या 100 शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. (Scholarship)

शिष्यवृत्ती कशासाठी?

हाय अचिव्हर्सने देऊ केलेल्या या शिष्यवृत्ती खास भारतीय विद्यार्थ्यांसाठी आहेत. याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी 200 हून अधिक शिष्यवृत्तीची तरतूद ठेवण्यात आली आहे. या (Scholarship) विशेष शिष्यवृत्तीचा उद्देश भारतातील हुशार विद्यार्थ्यांची निवड करणे आणि त्यांना ऑकलंड विद्यापीठात एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी पूर्णवेळ अभ्यासक्रम करण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Meta Staff Reduction : मेटानं दिला कर्मचाऱ्यांना डच्चू; 11,000 जणांची केली हकालपट्टी; कारण?

Meta Staff Reduction

करिअरनामा ऑनलाईन। फेसबुकची मातृ कंपनी मेटाने 11,000 हून अधिक (Meta Staff Reduction) कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. त्यामुळे ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात सुरु आहे. एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर ट्विटरच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली होती. ट्विटरनंतर इन्स्टाग्रामनंही कर्मचाऱ्यांची कपात केली होती. कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांमध्ये आता फेसबुकची Parent Company असेलेल्या मेटाचाही समावेश होणार आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मेटानं हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची तयारी केली आहे.

मेटानं 11,000हून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ 

मेटाने 11,000हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. कंपनीच्या महसुलात घट झाल्यानंतर सोशल मीडिया कंपनीनं ही कारवाई केली आहे. मेटाचे (Meta Staff Reduction) सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी आज एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं की मी मेटाच्या इतिहासातील काही सर्वात कठीण बदल शेअर करत आहे. मी माझ्या टीमचा आकार सुमारे 13 टक्क्यांनी कमी करण्याचा आणि आमच्या 11,000 हून अधिक प्रतिभावान कर्मचाऱ्यांना कंपनीमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

काय म्हणतात मार्क झुकरबर्ग (Meta Staff Reduction)

मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग म्हणाले की, “आम्ही खर्चात कपात करून आणि Q1 च्या माध्यमातून अधिक कार्यक्षम कंपनी बनण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलत आहोत.” त्यामुळं मोठ्या प्रमाणात बजेट कपातीची तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे डिजिटल जाहिरातींच्या कमाईत तीव्र मंदीमुळे कंपनीला हे पाऊल उचलावे लागले आहे.

नेमकं कारण काय?

कंपनीच्या 18 वर्षांच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी कर्माचारी कपात असेल. ट्विटरमध्ये जितकी कर्मचारी कपात झाली किंवा होणार आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त कर्मचारी (Meta Staff Reduction) मेटामधून कमी केले जातील. मेटाच्या कर्मचारी कपातीमागे पाच मोठी कारणं असल्याचं सांगितलं जात आहे.

झुकरबर्गच्या वैयक्तिक संपत्तीत घसरण

गेल्या तिमाहीत मेटाची व्हर्च्युअल रिअॅलिटी कंपनी असलेल्या ‘रिअॅलिटी लॅब’ला 3.7 बिलियन डॉलर्सचं नुकसान सोसावं लागलं आहे. कर्मचारी कपातीचं हे सर्वात मोठं कारण समजलं जात आहे. मेटाचे CEO मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत झालेली प्रचंड घसरणसुद्धा कर्मचारी कपातीस कारणीभूत ठरली आहे. 2022च्या सुरुवातीपासून झुकरबर्गच्या वैयक्तिक संपत्तीत सातत्यानं घट होत आहे.

झुकेरबर्गचा मेटामध्ये 13% हिस्सा आहे. जाहिरातींमधून मेटाला मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. मेटानं लावलेल्या अंदाजानुसार, 2022 मध्ये जाहिरात महसुलात कंपनीला (Meta Staff Reduction) 10 बिलियन डॉलर्सचं नुकसान होऊ शकतं. कंपनीनं प्रायव्हसी नियमांमध्ये बदल केल्यामुळे ही घसरण पाहायला मिळत आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : भारती विद्यापीठ पुणे येथे ‘या’ पदावर भरती; थेट मुलाखतीने होणार निवड

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन। भारती विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (Job Notification) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून PGT, TGT, PRT पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – भारती विद्यापीठ, पुणे

भरली जाणारी पदे –

PGT 03 – पदे
TGT 07 – पदे
PRT 08 – पदे

पद संख्या – 18 जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे, नवीन मुंबई, सातारा विभाग

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – भारती विद्यापीठ, भारती विद्यापीठ भवन, अलका थिएटरजवळ, 8 वा मजला, एलबीएस रोड, पुणे – 411030

मुलाखतीची तारीख – 12 नोव्हेंबर 2022 (Job Notification)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • PGT – MA, B.Ed

MCA, MCM

M.Sc, B.Ed

  • TGT – BA, B.Ed
    B.Sc, B.Ed

MCA, BE, Com.

  • PRT – BA, B.Ed
    Sangeet Visharad

Any Graduate with D.Ed

निवड प्रक्रिया –

  1. या भरतीकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2022 आहे. (Job Notification)
  4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Bharati Vidyapeeth Pune Bharti 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट- bvp.bharatividyapeeth.edu

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Extra Income : महागाईवर मात करायचीय? घरबसल्या ‘या’ मार्गाने कमवा जादा पैसे

Extra Income

करिअरनामा ऑनलाईन। महागाईचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. पगाराच्या (Extra Income) तुलनेत आपला खर्चही वाढत जातो त्यामुळे तुटपुंज्या पगारात घर कसं चालवायचं हा प्रश्न प्रत्येकाला सतावतो. आज आम्ही तुम्हाला घरबसल्या दर महिन्याला जास्तीची कमाई कशी करावी, याविषयी सांगणार आहोत.

जर तुम्ही या पाच आयडीयापैकी एखादी गोष्ट फॉलो केली तरी तुम्ही घरी बसून जादा कमाई करू शकता. चला जाणून घेऊया त्या 5 आयडिया कोणत्या?

1. ड्रॉपशिपिंग

ड्रॉपशिपिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला अनुभवाची आवश्यकता नाही. प्रोडक्ड किंवा सेवा आपल्या स्टोअर हाऊस मध्ये न ठेवता ग्राहकाकडून आलेली ऑर्डर ही आपल्या (Extra Income) सप्लायर्स कडे दिली जाते व सप्लायर्स पुढे पॅकिंग आणि शिपिंग तसेच डिलीवरीची जबाबदारी घेवून ग्राहकांना ऑर्डर नुसार प्रोडक्ड पुरवतात, यालाच ड्रॉपशिपिंग म्हणतात.

2. कला – कौशल्य (Extra Income)

प्रत्येकांमध्ये काही ना काही कला किंवा कौशल्य असतात. या मदतीनेही तुम्ही जादा कमाई करू शकता. मग डान्स शिकवणे, चित्रकला, मेहंदी किंवा रांगोळी क्लासेस इत्यादी. यामुळे तुमच्या कला गुणांना वाव मिळेल आणि आवडीचं काम करत असल्याचं समाधानही मिळेल.

3. एफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing)

जेव्हा तुम्ही एखाद्या ऑनलाईन कंपनीचे प्रॉडक्ट्स तुमच्या वेबसाईट किंवा सोशल मीडिया अकाऊंट च्या माध्यमातून ऑनलाईन विकता. तेव्हा त्या प्रॉडक्ट्स च्या विक्रीमधून जे (Extra Income) काही टक्के कमिशन मिळते. त्याला एफिलिएट मार्केटिंग म्हणतात. यात तुम्हाला घरबसल्या काम करून बराच नफा मिळू शकतो.

4. खासगी ट्युशन

तुम्ही एखाद्या विषयात निपूण असाल तर तुम्ही टयुशन घेत घरबसल्या जादा कमाई करू शकता. तुम्ही विविध विषयाचे ट्युशन तसेच इंग्लिश स्पिकींग क्लास किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसारखा कोर्स तुम्ही शिकवू शकता. यातून तुम्हाला भरघोस नफा मिळू शकतो.

5. डेटा एन्ट्री

डेटा एन्ट्री खूप प्रकारचे असतात. या माध्यमातून (Extra Income) तुम्ही खूप चांगली कमाई करू शकता. अनेक वेबसाइट्स घरबसल्या डेटा एन्ट्रीचे काम देतात. हा पर्याय तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC GD Constable Exam : असं आहे SSC GD परीक्षेचं पॅटर्न; 80 प्रश्नांसाठी 60 मिनिटांची वेळ 

SSC GD Constable Exam

करिअरनामा ऑनलाईन। विविध केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये GD कॉन्स्टेबल पदांच्या (SSC GD Constable Exam) भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. एसएससीद्वारे आयोजित जीडी कॉन्स्टेबल भरती ही तरुणांमधील सर्वात लोकप्रिय भरती आहे. ज्यासाठी दरवर्षी लाखो उमेदवार तयारी करत असतात. याद्वारे विविध केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये जीडी कॉन्स्टेबलची पदे भरली जातात.

या वर्षीही या पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 27 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.

उमेदवार ssc.nic.in येथे SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन GD कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करू शकतात.  उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षा, पीईटी, पीएसटी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.

असं आहे परीक्षेचं पॅटर्न (SSC GD Constable Exam)

  1. SSC GD कॉन्स्टेबल परीक्षा 2022 मध्ये एकूण 80 प्रश्न विचारले जातील. जे एकूण 160 गुणांचे असतील.
  2. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण दिले जातील.
  3. परीक्षा सोडवण्यासाठी उमेदवारांना 60 मिनिटे दिली जातील.
  4. परीक्षा संगणकावर आधारित म्हणजेच CBT मोडमध्ये असेल.
  5. यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस, एलिमेंटरी मॅथेमॅटिक्स आणि इंग्रजी/हिंदीमधून 20 प्रश्न विचारले जातील. (SSC GD Constable Exam)
  6. प्रत्येक विषयाला जास्तीत जास्त 40 गुणांचे प्रश्न असतील.
  7. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील.
  8. परीक्षा फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेत असेल. तसेच, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.50 गुणांचे नकारात्मक गुण असतील.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC Rules for PHD : हे माहित आहे का? आता रिसर्च पेपर्स शिवाय PHD करता येणार; ‘ही’ आहे नवी नियमावली

UGC Rules for PHD

करिअरनामा ऑनलाईन। तुम्ही PHD करत असाल किंवा PHD करण्याचा (UGC Rules for PHD) विचार करत असाल तर ही बातमी तुम्हालाही दिलासा देणारी ठरू शकते. विद्यापीठ अनुदान आयोगाने PHDच्या नियमांमध्ये बदल करून रिसर्च पेपर ची आवश्यकता रद्द केली आहे. UGC ने ugc.ac.in या संकेतस्थळावर या संदर्भातील अधिसूचना देखील जारी केली आहे. PHDचा प्रबंध सादर करण्यापूर्वी जर्नल्समध्ये Show Research Paper प्रकाशित करणे आता बंधनकारक नाही, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. PHDमध्ये रिसर्च पेपर ची अट दूर करण्यात आली आहे.

आतापर्यंत PHDसाठी UGC चा नियम असा होता की, M.Phil विद्वानांना एका शो रिसर्च पेपर परिषदेत किमान एक रिसर्च पेपर सादर करणे बंधनकारक होते. तर पीएचडी विद्वानांना प्रबंध सादर करण्यापूर्वी किमान 2 रिसर्च पेपर कॉन्फरन्स किंवा सेमिनारमध्ये सादर करावे लागतील. याशिवाय, संदर्भित जर्नलमध्ये एक रिसर्च पेपर प्रकाशित करणे देखील आवश्यक होते.

Reserch Paper  नियम का बदलला? (UGC Rules for PHD)

यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, पीएचडी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करून, आम्ही ‘वन साइज फिट्स ऑल’ हा दृष्टिकोन आवश्यक नाही यावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व विद्याशाखा/विषयांकडे एकाच दृष्टिकोनातून पाहणे आणि त्यांचा (UGC Rules for PHD) दृष्टिकोन समान असणे आवश्यक नाही. ते म्हणाले की, संगणकशास्त्रात पीएचडी करणारे अनेक विद्वान त्यांचे शोरिसर्च पेपर जर्नल्समध्ये प्रकाशित करण्याऐवजी कॉन्फरन्समध्ये सादर करण्यास प्राधान्य देतात.

…परंतु प्रोफाइलमध्ये मूल्य वाढेल

यूजीसी चेअरमन म्हणाले की रिसर्च पेपर प्रकाशित करणे आता बंधनकारक नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की पीएचडी विद्वानांनी पीअर रिव्ह्यूड जर्नल्समध्ये रिसर्च (UGC Rules for PHD) पेपर प्रकाशित करणे थांबवावे. ते म्हणाले की, जेव्हा तुम्ही डॉक्टरेट पदवीनंतर तुमच्या करिअरमध्ये पुढे जाल, तेव्हा जर्नलमध्ये प्रकाशित झालेले रिसर्च पेपर तुमच्या प्रोफाइलमध्ये मोलाची भर घालतील.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Vacancy : 10 वी उत्तीर्णांसाठी खुशखबर!! महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी येथे ‘या’ पदावर भरती सुरु 

Job Vacancy

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, उस्मानाबाद (Job Vacancy) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिस वीजतंत्री, तारतंत्री, कोपा या पदांसाठी 150 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, उस्मानाबाद

पद संख्या – 150 पदे

भरली जाणारी पदे – (Job Vacancy)

अप्रेंटिस

वीजतंत्री – 65 पदे
तारतंत्री – 65 पदे
कोपा – 20 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

10 वी उत्तीर्ण + 60% गुणांसह संबंधित विषयात ITI – NCVT.

अर्ज फी –

फी नाही (Job Vacancy)

नोकरी करण्याचे ठिकाण – उस्मानाबाद

कागदपत्रक सादर करण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, उस्मानाबाद

कागदपत्रक सादर करण्याचा कालावधी –

कागदपत्रक सादर करण्याची सुरवात – 15 नोव्हेंबर 2022

कागदपत्रक सादर करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2022 (Job Vacancy)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : लिपिक पदांसाठी ‘या’ बँकेत भरती सुरु; त्वरित करा Apply

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Job Alert) येथे लिपिक पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 10 पदे भली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2022 आहे.

बँक – दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, दापोली

भरले जाणारे पद – लिपिक

पद संख्या – 10 पदे (Job Alert)

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT कोर्स पूर्ण असावा.

वय मर्यादा – 33 वर्षे

नोकरी करण्याचे ठिकाण – दापोली

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.dapoliurbanbank.com/

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharti 2022 : मोठी बातमी!! पोलीस भरती प्रक्रिया उद्यापासून; पहा संपूर्ण माहिती

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी (Police Bharti 2022) आहे. राज्य सरकारतर्फे महाराष्ट्र पोलीस भरती 2021-22 बाबत महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव ती स्थगित झाली होती. आता ही प्रक्रिया सुरु होणार आहे. राज्यातील अनेक वृत्तपत्रांतून यासंबंधीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सुमारे 18 हजार 331 पदांवरील पोलीस भरती सुरू होणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आली आहे. 9 नोव्हेंबरपासूनच पोलीस भरतीसाठी उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यानंतर आधी शारीरीक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा (Police Bharti 2022) घेतली जाणार आहे.

कोरोना काळात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा अर्ज भरला, अशा उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का? असा प्रश्न होता. गृहविभागाने या उमेदवारांकरिता मोठा निर्णय घेतला आहे. या उमेदवारांना पोलीस भरतीची संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. म्हणजेच कोरोना काळात अर्ज केलेल्या आणि ज्यांची वयोमर्यादा समाप्त झाली आहे, अशा उमेदवारांना पोलीस भरतीत संधी मिळणार आहे.

भरतीचा तपशील – 

पदाचे नाव – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक

पद संख्या – 18, 331 पदे

शैक्षणिक पात्रता – 12th Pass

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

वय मर्यादा –

खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे

मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे

अर्ज फी – (Police Bharti 2022)

खुला प्रवर्ग: रु. 450 /-

मागास प्रवर्ग: रु. 350 /-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in

  • राज्य सरकारतर्फे महाराष्ट्र पोलीस भरती 2021-22 बाबत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अ- उमेदवार अर्ज भरतेवेळी फक्त एकाच पदासाठी एकच अर्ज करू शकतात.

1- संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस शिपाई चालक या पदासाठी एकच अर्ज करावा.

2 – संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस शिपाई या पदासाठी एकच अर्ज करावा.

3 – संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील कोणत्याही ‘रा. रा पोलीस शिपाई’ या पदासाठी एकच अर्ज करावा.

4 – संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस शिपाई लोहमार्ग या पदासाठी एकच अर्ज करावा.

 ब- वरील क्र-1/क्र-2/क्र-3/क्र-4 असे चार अर्ज एक उमेदवार करू शकतो. (Police Bharti 2022)

क –  वरील-क्र-1 एका पेक्षा जास्त अर्ज केल्यास, क्र-2 एका पेक्षा जास्त अर्ज केल्यास , क्र-३ एका पेक्षा जास्त अर्ज केल्यास क्र-4 एका पेक्षा जास्त अर्ज केल्यास, त्या उमेदवाराला भरती प्रक्रियेतून कोणत्याही क्षणी बाद करण्यात येईल.

(टीप- प्राथमिक माहितीनुसार, उपलब्ध बातमी देण्यात आली आहे. सविस्तर आणि अधिकृत माहिती राज्य सरकारच्या अधिकृत पोर्टलवरून www.mahapolice.gov.in घ्यावी)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com