Extra Income : महागाईवर मात करायचीय? घरबसल्या ‘या’ मार्गाने कमवा जादा पैसे

करिअरनामा ऑनलाईन। महागाईचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. पगाराच्या (Extra Income) तुलनेत आपला खर्चही वाढत जातो त्यामुळे तुटपुंज्या पगारात घर कसं चालवायचं हा प्रश्न प्रत्येकाला सतावतो. आज आम्ही तुम्हाला घरबसल्या दर महिन्याला जास्तीची कमाई कशी करावी, याविषयी सांगणार आहोत.

जर तुम्ही या पाच आयडीयापैकी एखादी गोष्ट फॉलो केली तरी तुम्ही घरी बसून जादा कमाई करू शकता. चला जाणून घेऊया त्या 5 आयडिया कोणत्या?

1. ड्रॉपशिपिंग

ड्रॉपशिपिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला अनुभवाची आवश्यकता नाही. प्रोडक्ड किंवा सेवा आपल्या स्टोअर हाऊस मध्ये न ठेवता ग्राहकाकडून आलेली ऑर्डर ही आपल्या (Extra Income) सप्लायर्स कडे दिली जाते व सप्लायर्स पुढे पॅकिंग आणि शिपिंग तसेच डिलीवरीची जबाबदारी घेवून ग्राहकांना ऑर्डर नुसार प्रोडक्ड पुरवतात, यालाच ड्रॉपशिपिंग म्हणतात.

2. कला – कौशल्य (Extra Income)

प्रत्येकांमध्ये काही ना काही कला किंवा कौशल्य असतात. या मदतीनेही तुम्ही जादा कमाई करू शकता. मग डान्स शिकवणे, चित्रकला, मेहंदी किंवा रांगोळी क्लासेस इत्यादी. यामुळे तुमच्या कला गुणांना वाव मिळेल आणि आवडीचं काम करत असल्याचं समाधानही मिळेल.

3. एफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing)

जेव्हा तुम्ही एखाद्या ऑनलाईन कंपनीचे प्रॉडक्ट्स तुमच्या वेबसाईट किंवा सोशल मीडिया अकाऊंट च्या माध्यमातून ऑनलाईन विकता. तेव्हा त्या प्रॉडक्ट्स च्या विक्रीमधून जे (Extra Income) काही टक्के कमिशन मिळते. त्याला एफिलिएट मार्केटिंग म्हणतात. यात तुम्हाला घरबसल्या काम करून बराच नफा मिळू शकतो.

4. खासगी ट्युशन

तुम्ही एखाद्या विषयात निपूण असाल तर तुम्ही टयुशन घेत घरबसल्या जादा कमाई करू शकता. तुम्ही विविध विषयाचे ट्युशन तसेच इंग्लिश स्पिकींग क्लास किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसारखा कोर्स तुम्ही शिकवू शकता. यातून तुम्हाला भरघोस नफा मिळू शकतो.

5. डेटा एन्ट्री

डेटा एन्ट्री खूप प्रकारचे असतात. या माध्यमातून (Extra Income) तुम्ही खूप चांगली कमाई करू शकता. अनेक वेबसाइट्स घरबसल्या डेटा एन्ट्रीचे काम देतात. हा पर्याय तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com