Home Blog Page 414

MPSC Engineering Services : MPSC अंतर्गत इंजिनियर्ससाठी भरती सुरु; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

MPSC Engineering Services

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांच्या (MPSC Engineering Services) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उप अभियंता (यांत्रिकी) पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर 2022 आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग

भरले जाणारे पद – उप अभियंता (यांत्रिकी) (Deputy Engineer,Mechanical)

पद संख्या – 10 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज फी –

मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ / दिव्यांग – रु. 449/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 18 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 डिसेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MPSC Engineering Services)

  • उप अभियंता (यांत्रिकी) –

Possess a degree in mechanical engineering of a statutory University or any recognized Institution or any other qualification equivalent
Salary Details For MPSC Engineering Services Examination 2022

मिळणारे वेतन –

उप अभियंता (यांत्रिकी) Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/- दरमहा

असा करा अर्ज –

  1. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
  2. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  3. आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  4. खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील.
  5. अर्ज 18 नोव्हेंबर पासून सुरु होतील. (MPSC Engineering Services)
  6. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  7. अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
  8. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर 2022 आहे.
  9. विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.

निवड प्रक्रिया –

  • प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून, किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलाविण्याकरिता पात्र असणार नाही.
  • जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि/अथवा नुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता/अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. (MPSC Engineering Services)
  • चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास, अर्हता आणि / अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही.
  • चाळणी परिक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी (लागू असल्यास) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.
  • चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल.
  • मुलाखतीमध्ये किमान ४१% व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SAMEER Recruitment 2022 : 12 वी/ ग्रॅज्युएटना SAMEER मुंबई येथे ‘या’ पदावर भरती सुरु; त्वरित करा APPLY

SAMEER Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह (SAMEER Recruitment 2022) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई येथे विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लोअर डिव्हिजन क्लर्क, चालक, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2022 आहे. तर अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च, मुंबई

भरली जाणारी पदे –

लोअर डिव्हिजन क्लर्क

चालक

मल्टी टास्किंग स्टाफ

पद संख्या – 07 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 डिसेंबर 2022

अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2022

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा – 25 वर्षे

अर्ज फी – (SAMEER Recruitment 2022)

SC/ST, अपंग व्यक्ती आणि माजी सैनिक – Rs. 25/-
इतर उमेदवार – Rs. 100/-

अर्ज पाठवण्याचा पत्ता –

रजिस्ट्रार, सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (समीर), आयआयटी कॅम्पस, पवई, मुंबई 400076,

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • लोअर डिव्हिजन क्लर्क Essential Qualifications:

i. 12th pass from a recognized Board/ University (SAMEER Recruitment 2022)
ii. Typing speed of 35 wpm in English or 30 wpm in Hindi, on Computer
iii. Proficiency in Computer Operation

  • Desirable Qualifications:

i. Degree from a recognized university
ii. 6 months’ Certificate Course on Computer Operation
iii. Experience in establishment/ accounts/ purchase/ stores of a reputed commercial organization/ industry

  • चालक Essential Qualifications:

i. Matriculation or equivalent from a recognized Board/ University
ii. Must hold a valid light duty vehicle driving license
iii. Having accident free record and ability to carry out minor repairs to the vehicle

Experience:
Minimum five years’ experience in driving light duty vehicles

  • मल्टी टास्किंग स्टाफ Essential Qualifications:

Matriculation or equivalent from a recognized Board/ University

मिळणारे वेतन –

लोअर डिव्हिजन क्लर्क Level 2 in the pay matrix. Starting salary will be Rs. 19,900/-, plus usual allowances as per Central Government Rules (SAMEER Recruitment 2022)

चालक Level 2 in the pay matrix. Starting salary will be Rs. 19,900/-, plus usual allowances as per Central Government Rules

मल्टी टास्किंग स्टाफ Level 1 in the pay matrix. Starting salary will be Rs. 18,000/-, plus usual allowances as per Central Government Rules

असा करा अर्ज –

  1. या पदांकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. (SAMEER Recruitment 2022)
  4. अर्ज ऑनलाइन सबमिट केल्यानंतर, अर्जदारांनी त्याची प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे, हेतूसाठी प्रदान केलेल्या जागेत त्यांची स्वाक्षरी जोडणे आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
  5. उमेदवारांनी अर्जाची प्रत वरील संबंधित पत्त्यावर स्पीड पोस्टद्वारे पाठविणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2022 आहे.
  7. तसेच अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2022 आहे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.sameer.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Secure Career : हातची नोकरी गेली तर काय करणार? फॉलो करा ‘या’ टिप्स

Secure Career

करिअरनामा ऑनलाईन। जागतिक मंदीचे परिणाम हळुहळू दिसू लागले आहेत. ट्विटर, मेटा (Secure Career) सारख्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. पुढील काही महिन्यांत अनेक कंपन्यांमध्ये असे चित्र दिसू शकते. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात करिअर केल्यानंतर अचानक कामावरुन काढून टाकले जाणे हे पचविणे फार कठीण असते. अशावेळी येणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्यासाठी करिअर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याची आपण माहिती घेऊया.

1. आपत्कालीन निधीची तरतूद करा

सहा महिने ते एक वर्षाचे उत्पन्न आपत्कालीन निधी म्हणून बाजूला ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्हाला नोकरीत कपातीचा सामना करावा लागला तर, तुम्हाला दुसरी नोकरी मिळेपर्यंत पुढील काही महिने टिकून राहण्यासाठी तुम्ही किमान या पैशावर अवलंबून राहू शकता.
तुमच्या पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी असावी. लिक्विड फंड किंवा बचत खात्यात पैसे असल्यास गरजेवेळी उपयोगी येतील.

2. वैयक्तिक आरोग्य विमा घ्या (Secure Career)

कंपनीच्या आरोग्य विम्यावर पूर्णपणे विसंबून राहू नये आणि याचे एक प्रमुख कारण म्हणजे कामावरून काढून टाकले गेल्यास तुम्ही योजनेचे लाभार्थी नसता. त्यामुळे तुम्ही कामाच्या बाहेर असताना एमर्जन्सी उद्भवल्यास खिशातून बिल भरावे लागेल, ज्यामुळे तुमचा आर्थिक ताण वाढेल. म्हणून, स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी वैयक्तिक आरोग्य विमा घेणे नेहमीच उचित आहे.

3. बजेट तयार करा 

आर्थिक संसाधने आधीच कमी असतात. त्यामुळे स्वत:च्या (Secure Career) खर्चावर बारकाईने लक्ष देणे आणि मासिक बजेटमध्ये सुधारणा करणे अत्यावश्यक आहे. अन्न, वीज बिले, ईएमआय इ. या गोष्टी टाळता येत नाहीत. त्यामुळे त्यानुसार तुमचे मासिक खर्च ठरवा.

4. अनावश्यक खर्च कमी करा

मर्यादित उत्पन्न असताना तुम्ही नेहमी बचत करणे आवश्यक आहे. बाहेर खाणे, चित्रपट पाहणे, मासिकांची वर्गणी अशा मनोरंजनात्मक, ऐच्छिक खर्चांमध्ये कपात करता येऊ शकते. सध्या तुम्ही असे खर्च पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अचानक नोकरी गेल्यास बचत आणि गुंतवणूक कमी करता येऊ शकते.

5. कर्ज घेणे टाळा

वैयक्तिक कर्ज घेणे किंवा क्रेडिट कार्डवर कर्ज घेणे ही गोष्ट (Secure Career) टाळली पाहीजे. ही कर्जे अल्पावधीत पैशाच्या त्रासातून बाहेर पडण्याच्या  तुलनेने सोपा मार्ग वाटू शकतात, परंतु त्यांचे व्याजदर खूप जास्त असतात. याचा पुढच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Amazon News Layoffs : फेसबुकनंतर आता Amazon ने तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांना बसवले घरी; कारण काय?

Amazon News Layoffs

करिअरनामा ऑनलाईन। बेरोजगरीचा प्रश्न सतत ऐरणीवर असताना (Amazon News Layoffs) जगभरातील मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा धडाकाच लावला आहे. मेटा फेसबुक, ट्वीटरनंतर आता ई-कॉमर्स क्षेत्रात जगभरात नावारुपास असलेली कंपनी Amazon ने सुमारे आपल्या 10,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या सूत्रांच्या हवाल्याने एका अहवालात सांगितले आहे की कंपनी या आठवड्यापासून काही विभागातील कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अलेक्सा आणि रिटेल युनिट आणि एचआर विभागातील कर्मचाऱ्यांची कपात केली जाण्याची शक्यता आहे.

Amazon कडून 10 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या निर्णयात काही अंशी बदलही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, Amazon कंपनीमध्ये पूर्णवेळ आणि अर्धवेळ असे एकूण 16 लाख कर्मचारी काम करतात. अलीकडेच, कंपनीने (Amazon News Layoffs) सांगितले होते की ते पुढील काही महिन्यांसाठी कंपनीत नवीन नियुक्ती थांबवत आहेत. याचबरोबर amazon कंपनीने काही दिवसांपूर्वी भीती व्यक्त केली होती की यावेळेस सुट्ट्यांच्या काळ दरवर्षीपेक्षा कमी असू शकतो.

मागच्या काही दिवसांपासून ट्वीटर, फेसबुककडून कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता या दोन मोठ्या कंपन्यांच्या यादीत amazon चाही समावेश आहे. Facebook, twitter पाठोपाठ amazon लाही आर्थीक मंदीचा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. फेसबुकच्या मूळ (Amazon News Layoffs) कंपनी मेटाने सुमारे 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकेरबर्ग यांनी बुधवारी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, उत्पन्नात झालेली घसरण आणि तंत्रज्ञान उद्योगात सुरू असलेल्या संकटामुळे हा निर्णय घ्यावा लागला.

अॅमेझॉनच्या आधी, फेसबुकची मूळ कंपनी मेटाने गेल्या आठवड्यात कंपनीच्या 11,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. याशिवाय, इलॉन मस्कच्या मालकीच्या ट्विटर, मायक्रोसॉफ्ट आणि स्नॅपने देखील अलीकडेच कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला होता.

अॅमेझॉनचे शेअर्स यावर्षी 42% घसरले

दरम्यान, Amazon चे शेअर्स सोमवारी न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर $99 च्या किमतीत सुमारे 1.75 टक्क्यांनी घसरले. जगभरातील टेक कंपन्यांमध्ये झालेल्या विक्रीमुळे यावर्षी अॅमेझॉनच्या शेअर्सचे मूल्य सुमारे 42 टक्क्यांनी घसरले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Jobs Near Me : NHM अंतर्गत ‘या’ महापालिकेत भरती सुरु; इथे पाठवा अर्ज

Jobs Near Me

करिअरनामा ऑनलाईन। सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका (Jobs Near Me) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेषतज्ञ भूलतज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका

भरली जाणारी पदे – (Jobs Near Me)

  1. विशेषतज्ञ भूलतज्ञ (Specialist Anaesthetist – 01 post)
  2. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer – 01 post)
  3. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer – 03 posts)
  4. स्टाफ नर्स (Staff Nurse- 10 posts)

पद संख्या – 10 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाइन (Jobs Near Me)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • विशेषतज्ञ भूलतज्ञ (Specialist Anaesthetist – 01 post) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MD Anesthesia / DA / DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

  • पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer – 01 post) –

संबंधित पदांनुसार M.B.B.S MCI/MMC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. (Jobs Near Me)

  • अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer – 03 posts) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार M.B.B.S MCI/MMC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

  • स्टाफ नर्स (Staff Nurse- 10 posts) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार GNM/ B.Sc Nursing, MNC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (Jobs Near Me)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता –

उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत एस.पी.ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर 416003

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाइट – https://smkc.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : कोल्हापूर महापालिकेत ‘या’ पदावर भरती सुरु; काय आहे पात्रता?

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन। कोल्हापूर महानगरपालिका येथे लवकरच काही (Job Notification) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून विशेषतज्ञ स्त्रीरोगतज्ञ, विशेषतज्ञ भूलतज्ञ, विशेषतज्ञ बालरोगतज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोगतज्ञ/ बालरोगतज्ञ) या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर

भरली जाणारी पदे –

  1. विशेषतज्ञ स्त्रीरोगतज्ञ
  2. विशेषतज्ञ भूलतज्ञ
  3. विशेषतज्ञ बालरोगतज्ञ
  4. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
  5. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 19 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Notification)

  • विशेषतज्ञ स्त्रीरोगतज्ञ –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार MD/ MS Gyn / DGO / DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आहे

  • विशेषतज्ञ भूलतज्ञ –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार MD/ MS Gyn / DGO / DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आहे

  • विशेषतज्ञ बालरोगतज्ञ –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार MD Paed / DCH / DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आहे

  • पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार M.B.B.S MCI/MMC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. (Job Notification)

  • अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार MD/ MS Gyn / DGO /DNB MD Paed / DCH / DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आहे

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (Job Notification)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता –

उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत एस.पी.ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर 416003.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे बिगुल वाजले; ‘येथे’ करा मतदान नोंदणी

Senate Election

educationकरिअरनामा ऑनलाईन। विद्यापीठातील अधिविभाग आणि (Senate Election) विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातून पदवी घेतलेले पदवीधर सिनेट निवडणुकीदरम्यान मतदानाचा हक्क बजावतात. तसेच प्राचार्य, प्राध्यापक आणि संस्थाचालक यांनाही अधिसभेमध्ये निवडून येण्याची संधी असते. याशिवाय राज्यपाल नियुक्त जागाही असतात. मुंबई विद्यापीठाच्या भवितव्यासाठी सिनेट निवडणूक महत्वाची आहे. तसेच या निवडणूकीमध्ये आपले मतदान करण्यासाठी आपली मतदार म्हणून नोंदणी होणे गरजेचे आहे.

मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणूक 2022 मतदार नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे. विद्यापीठातील जाहीर केलेल्या कालावधीत ज्या पदवीधरांनी निवडणुकीसाठी (Senate Election) नोंदणी केलेली आहे, त्यांनाच सिनेट निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार असतो. त्यामुळे विविध विद्यार्थी संघटना, राजकीय पक्षांकडून नोंदणीसाठी आग्रह धरला जात आहे.

विद्यापीठाचे संचालन अधिसभा व व्यवस्थापन परिषदेच्या माध्यमातून होत असते. विद्यापीठातील अधिविभाग आणि विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातून पदवी घेतलेले पदवीधर सिनेट निवडणुकीदरम्यान मतदानाचा हक्क बजावतात. तसेच प्राचार्य, प्राध्यापक आणि संस्थाचालक यांनाही अधिसभेमध्ये निवडून येण्याची संधी असते. याशिवाय राज्यपाल नियुक्त जागाही असतात.

मुंबई विद्यापीठाच्या भवितव्यासाठी सिनेट निवडणूक (Senate Election) महत्वाची आहे. तसेच या निवडणूकीमध्ये आपले मतदान करण्यासाठी आपली मतदार म्हणून नोंदणी होणे गरजेचे आहे. यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन पदवीधरांना नोंदणी करता येणार आहे.

Senate Election साठी अशी करा मतदान नोंदणी (Senate Election)

स्टेप 1. ऑनलाईन मतदार नोंदणी आधी फोटो, सही, आधार कार्ड (Front & Back) आणि निवासाचा पुरावा हे जेपीजी फॉर्मेटमध्ये असावेत तसेच पदवी प्रमाणपत्र कन्व्हॉकेशन सर्टिफिकेट (Convocation Certificate) विवाह नोंदणी प्रमाणपत्र (महिलांसाठी ) पीडीएफ फॉर्मेटमध्ये असावेत. यावेळी पदवीधरांनी मार्कशीट अपलोड करू नये.

स्टेप 2. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट https://muelection.eduapp.co.in ला भेट द्या.

स्टेप 3.
यानंतर Login/Registration हा पर्याय उपलब्ध होईल. त्यामध्ये रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडून यूझर आयडी आणि पासवर्ड तयार करा. (Senate Election)

स्टेप 4.
यूझर आयडी आणि पासवर्ड तयार झाल्यावर लॉगिन करून फार्म पूर्ण भरावा व सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करा.

स्टेप 5.
आपण भरलेली माहिती व कागदपत्रे ही अचूक असल्याची खात्री झाल्या नंतर आपण Proceed for Payment option वर क्लिक करावे. (Senate Election)

पदवीधरांना नोंदणी करताना 20 रुपये शुल्क भरावे लागेल.

ऑनलाइन मतदार नोंदणीसाठी येथे क्लिक करा – Registration

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Agniveer Air Force Recruitment : IAF अग्निवीरांना ‘या’ सुविधा मिळणार; इथे मिळेल सर्व माहिती

Agniveer Air Force Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय हवाई दलात भरती होऊन (Agniveer Air Force Recruitment) देशसेवा करण्याचे आणि सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न असेल तर ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे. भारतीय वायुसेनेने अग्निपथ योजनेंतर्गत 12वी पाससाठी अग्निवीर वायु भरती 2023 साठी अर्ज आमंत्रित केले आहेत. अग्निवीर वायु भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज 23 नोव्हेंबरपर्यंत हवाई दलाच्या वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर भेट देऊन करता येतील. भारतीय हवाई दलात अग्निवीर वायूची भरती चार वर्षांसाठी असेल. चार वर्षांनी सेवानिवृत्ती देऊन काहींना दिलासा मिळणार आहे.

अग्निवीर वायु यांना पदमुक्त झाल्यानंतर केंद्रीय सशस्त्र दल, राज्य पोलिसांसह इतर नोकऱ्यांमध्ये सूट मिळेल. आज आम्ही तुम्हाला अग्निवीर वायुचा पगार, सुट्या यासह सर्व सुविधांबद्दल सांगणार आहोत.

अग्निवीर वायुची नोकरी किती वर्षांची? (Agniveer Air Force Recruitment)

वायुसेना कायदा 1950 अंतर्गत, भारतीय हवाई दलात अग्निवीर वायुची भरती 4 वर्षांसाठी असेल.

4 वर्षानंतर 25 टक्के अग्निवीरांची हवाई दलाच्या नियमित केडरमध्ये भरती केली जाईल.

अग्निवीर वायुला किती सुट्या मिळणार?

  • वार्षिक रजा – अग्निवीर वायुला दरवर्षी 30 सुट्या मिळतील.
  • वैद्यकीय रजा- वैद्यकीय सल्ल्यानुसार मिळतील. (Agniveer Air Force Recruitment)

वैद्यकीय आणि CSD सुविधा मिळतील का?

अग्निवीरवायूच्या सेवेदरम्यान, हवाई दल सेवा रुग्णालयात वैद्यकीय सुविधा आणि CSD सुविधा प्रदान करेल.

किती मिळणार पगार?

अग्निवीरवायूला पहिल्या वर्षी 30 हजार पगार मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी 33000 रुपये, तिसऱ्या वर्षी 36500 रुपये आणि चौथ्या वर्षी 40 हजार रुपये मिळतील.

अशी मिळणार विमा सुविधा?

अग्निवीर वायुचा 48 लाखांचा जीवन विमा असेल. (Agniveer Air Force Recruitment)

4 वर्षांनंतर अग्निवीर वायुला कोणते प्रमाणपत्र मिळणार?

अग्निवीर वायुला 4 वर्षांनंतर कौशल्य प्रमाणपत्र मिळणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Tips : जिवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ‘हे’ 8 मार्ग नक्की ठरतील फायद्याचे

Success Tips

करिअरनामा ऑनलाईन। आजच्या लेखात आम्ही तुम्हाला जीवनात (Success Tips) यशस्वी होण्यासाठी 8 यशस्वी मार्ग सांगणार आहोत. ज्यांचा वापर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात करून जीवनात नक्की यशस्वी होऊ शकता.

जीवनात अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. त्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही. फक्त स्वप्न बघून चालत नाही. तर त्या स्वप्नासाठी मेहनत करणे देखील महत्वाचे आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मोटिवेट राहणे अत्यंत गरजेचे आहे.

जीवनात मेहनतीला पर्याय नाही. म्हणून रोज मेहनत घेऊन आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत ह्या यशस्वी मार्गांचा वापर नक्की करा.

चला तर मग त्या यशस्वी 8 मार्गांबद्दल जाणून घेऊया…

1 . Discipline (शिस्त)

शिस्त असलेला माणूस कोणाच्याही मनात आपले घर निर्माण करू शकतो. तसेच दुसऱ्याशी बोलताना किंवा कोणतेही काम करत असताना शिस्त राखून काम करणे सर्वात (Success Tips) उत्तम असते. तसेच कोणतेही काम करत असताना त्या कामाबद्दल शिस्त असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण त्या कामात यशस्वी होऊ शकतो. तसेच समोरील व्यक्तीवर चांगले इम्प्रेशन पाडू शकतो. तसेच रोजच्या दिवसाचा दिनक्रम बनवून त्याचे नियमित पालन केल्याने आपण आपल्या शिस्तीत भर घालू शकतो.

2. Quick Decision (Success Tips)

प्रत्येक वेळी तत्पर असणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक वेळी योग्य तो निर्णय घेणे सुद्धा गरजेचे आहे. कधी कधी आपल्या जीवनात अशी वेळ येते. तेव्हा आपल्याला Quick Decision घेणे गरजेचे असते. त्यामुळे योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे.

3. Take Risk (जोखीम घ्या)

आयुष्यात जोखीम घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट पूर्ण होत नाही. जोखीम घेऊन जो काम करतो तो नक्कीच यशस्वी होतो. आपण आपल्या कम्फर्ट झोन च्या बाहेर पडून जर जोखीम घेतले नाही तर आपण जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. जर तुम्ही रिस्क घेऊन जर तुमचे काम (Success Tips) यशस्वी होत असेल.

तर पुढे तुम्ही कोणतीही रिस्क घेताना घाबरणार नाही. त्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास वाढण्यास मदत होऊ शकतो. जर इतिहास निर्माण करायचा असेल, तर मैदानात उतरावे लागते. कारण जर इतिहास बनवायचा असेल तर जोखीम ही घ्यावीच लागते.

4. Attitude (वृत्ती)

जीवनात Attitude ने वागणे सुद्धा महत्वाचे आहे. जगात अनेक लोकं आहेत, जे फक्त दुसऱ्यांचा विचार करत राहतात. त्यामुळे Attitude उपयोगी पडतो. आपण जर दरवेळी दुसऱ्याचं ऐकत राहिलो किंवा त्याच्या म्हणण्यानुसार करत राहिलो तर आपल्याला जीवनात कोणीही भाव देणार नाही. तेच जर तुम्ही Attitude ने वागलात तर लोकं तुम्हाला विचारतील, भाव देतील. स्वतःला नेहमी (Success Tips) म्हणत राहायचं की, “तुझ्यापेक्षा बेस्ट कुणीही नाहीय.” हा attitude मनात घेऊन जगलात तर जीवनात नक्की यशस्वी व्हाल.

5. Never Stop Learning

जीवनात जर तुम्हाला काही मिळवायचे असेल, तर त्यासाठी शिक्षण असणे गरजेचे आहे. शिक्षण हे वयाच्या कोणत्याही वर्षी घेता येते. तसेच फक्त शाळा किंवा कॉलेज शिकून काही फायदा नाही. जीवनात दर दिवशी काही नवीन शिकत राहणे गरजेचे आहे. एखादा कोर्स, डिग्री करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला जगातील शिक्षणाचा तसेच तुमच्या नॉलेज मध्ये भर पडतो.

कोणत्याही क्षेत्रात अपडेटेड राहणे खूप महत्त्वाचे आहे. यशस्वी व्यक्ती ही नेहमी काहीतरी नवीन शिकत असते. वयाच्या कितव्याही वर्षी शिकण्याची तयारी असणे गरजेचे आहे. जस जसे आपण काही नवीन शिकतो, तेव्हा आपल्यात ग्रोथ होते. आपल्या स्वभावात बदल होतो. (Success Tips)

6. Invest (गुंतवणूक)

इन्व्हेस्ट करणे देखील गरजेचे आहे. जेव्हा आपण एखादा जॉब किंवा बिझनेस करतो. तेव्हा आपण खूप पैसे कमवतो, तर ते पैसे योग्य जागी इन्व्हेस्ट करणे देखील महत्वाचे आहे. कारण जेव्हा आपल्याला पैशांची गरज लागेल तेव्हा आपण ते पैसे खर्च करू शकतो. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करणे गरजेचे आहे.

हे झाले पैसे इन्व्हेस्ट करण्या बाबत, जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही रोज नवीन काहीतरी शिकण्यात वेळ इन्व्हेस्ट करा. त्यामुळे तुमचा वेळ योग्य जागी इन्व्हेस्ट होईल आणि तुम्हाला त्याचा जीवनात उपयोग सुद्धा होईल.

7. Time is money

वेळेचा सदुपयोग करणे खूप महत्त्वाचा आहे. वेळ ही कोणासाठीही थांबत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वेळेची किंमत समजून घेतली पाहिजे. आजचे उद्या, उद्याचे परवा करता करता आयुष्य असेच निघून जाते. त्यामुळे वेळेचा योग्य आणि चांगला वापर केला पाहिजे.

जर तुम्ही उद्योजक असाल किंवा नोकरी करत असाल, तर तुम्हाला वेळेबाबत महत्व असले पाहिजे. तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन केले पाहिजे. त्यानुसार वेळेवर काम केल्यावर तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकता. तसेच तुमचे नाव ह्या जगात बनवू शकाल.

8. Smart Work (Work Hard)

कोणतेही काम करताना मेहनत ही लागतेच. हार्ड वर्क केल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. पण हार्ड वर्क सोबत स्मार्ट वर्क सुद्धा महत्वाचे आहे. जर तुम्ही (Success Tips) कोणतेही काम स्मार्ट वर्क चा वापर करून काम केले तर ते वेळेच्या अगोदर आणि कमी मेहनत घेता होऊ शकते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2022 : म्युझिक प्रेमींसाठी रेल्वेत ‘या’ पदावर नोकरीची संधी; आजच करा Apply

Railway Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। पश्चिम रेल्वे मध्ये सांस्कृतिक कोट्या अंतर्गत विविध रिक्त (Railway Recruitment 2022) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ऑक्टोपॅड इन्स्ट्रुमेंट प्लेअर, पुरुष गायक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 17 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – पश्चिम रेल्वे, सांस्कृतिक कोटा (Western Railway, Cultural Quota )

भरले जाणारे पद –

ऑक्टोपॅड इन्स्ट्रुमेंट प्लेअर

पुरुष गायक

पद संख्या – 02 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे

परीक्षा फी – (Railway Recruitment 2022)

For all Candidates except mentioned in Sub Para – Rs. 500/-

For Candidates belonging to SC / ST / Ex- Servicemen/Women, Minorities* and Economic Backward

Class** – Rs.250/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 17 नोव्हेंबर 2022 (Railway Recruitment 2022)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 डिसेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • ऑक्टोपॅड इन्स्ट्रुमेंट प्लेअर –

(i) NTPC श्रेणींसाठी 12वी (+2 टप्पा) किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा 50% पेक्षा कमी गुणांसह उत्तीर्ण.SC/ST/ex च्या बाबतीत 50% गुणांचा आग्रह धरला जात नाही. सेवा कर्मचारी / अपंग व्यक्ती (PWD) उमेदवार आणि आवश्यक किमान विहित पात्रतेपेक्षा जास्त पात्रता असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत .
(ii) तांत्रिक श्रेणींसाठी NCVT/SCVT ने मंजूर केलेला मॅट्रिक प्लस कोर्स पूर्ण केलेला कायदा शिकाऊ उमेदवारी.
(iii) तांत्रिक श्रेणींसाठी NCVT/SCVT द्वारे मॅट्रिक प्लस ITI मंजूर.

  • पुरुष गायक – (Railway Recruitment 2022)

(i) NTPC श्रेणींसाठी 12वी (+2 टप्पा) किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा 50% पेक्षा कमी गुणांसह उत्तीर्ण.SC/ST/ex च्या बाबतीत 50% गुणांचा आग्रह धरला जात नाही. सेवा कर्मचारी / अपंग व्यक्ती (PWD) उमेदवार आणि आवश्यक किमान विहित पात्रतेपेक्षा जास्त पात्रता असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत (Railway Recruitment 2022
(ii) तांत्रिक श्रेणींसाठी NCVT/SCVT ने मंजूर केलेला मॅट्रिक प्लस कोर्स पूर्ण केलेला कायदा शिकाऊ उमेदवारी.
(iii) तांत्रिक श्रेणींसाठी NCVT/SCVT द्वारे मॅट्रिक प्लस ITI मंजूर.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – www.wr.indianrailways.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com