Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे बिगुल वाजले; ‘येथे’ करा मतदान नोंदणी

educationकरिअरनामा ऑनलाईन। विद्यापीठातील अधिविभाग आणि (Senate Election) विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातून पदवी घेतलेले पदवीधर सिनेट निवडणुकीदरम्यान मतदानाचा हक्क बजावतात. तसेच प्राचार्य, प्राध्यापक आणि संस्थाचालक यांनाही अधिसभेमध्ये निवडून येण्याची संधी असते. याशिवाय राज्यपाल नियुक्त जागाही असतात. मुंबई विद्यापीठाच्या भवितव्यासाठी सिनेट निवडणूक महत्वाची आहे. तसेच या निवडणूकीमध्ये आपले मतदान करण्यासाठी आपली मतदार म्हणून नोंदणी होणे गरजेचे आहे.

मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणूक 2022 मतदार नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे. विद्यापीठातील जाहीर केलेल्या कालावधीत ज्या पदवीधरांनी निवडणुकीसाठी (Senate Election) नोंदणी केलेली आहे, त्यांनाच सिनेट निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार असतो. त्यामुळे विविध विद्यार्थी संघटना, राजकीय पक्षांकडून नोंदणीसाठी आग्रह धरला जात आहे.

विद्यापीठाचे संचालन अधिसभा व व्यवस्थापन परिषदेच्या माध्यमातून होत असते. विद्यापीठातील अधिविभाग आणि विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातून पदवी घेतलेले पदवीधर सिनेट निवडणुकीदरम्यान मतदानाचा हक्क बजावतात. तसेच प्राचार्य, प्राध्यापक आणि संस्थाचालक यांनाही अधिसभेमध्ये निवडून येण्याची संधी असते. याशिवाय राज्यपाल नियुक्त जागाही असतात.

मुंबई विद्यापीठाच्या भवितव्यासाठी सिनेट निवडणूक (Senate Election) महत्वाची आहे. तसेच या निवडणूकीमध्ये आपले मतदान करण्यासाठी आपली मतदार म्हणून नोंदणी होणे गरजेचे आहे. यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन पदवीधरांना नोंदणी करता येणार आहे.

Senate Election साठी अशी करा मतदान नोंदणी (Senate Election)

स्टेप 1. ऑनलाईन मतदार नोंदणी आधी फोटो, सही, आधार कार्ड (Front & Back) आणि निवासाचा पुरावा हे जेपीजी फॉर्मेटमध्ये असावेत तसेच पदवी प्रमाणपत्र कन्व्हॉकेशन सर्टिफिकेट (Convocation Certificate) विवाह नोंदणी प्रमाणपत्र (महिलांसाठी ) पीडीएफ फॉर्मेटमध्ये असावेत. यावेळी पदवीधरांनी मार्कशीट अपलोड करू नये.

स्टेप 2. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट https://muelection.eduapp.co.in ला भेट द्या.

हे पण वाचा -
1 of 62

स्टेप 3.
यानंतर Login/Registration हा पर्याय उपलब्ध होईल. त्यामध्ये रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडून यूझर आयडी आणि पासवर्ड तयार करा. (Senate Election)

स्टेप 4.
यूझर आयडी आणि पासवर्ड तयार झाल्यावर लॉगिन करून फार्म पूर्ण भरावा व सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करा.

स्टेप 5.
आपण भरलेली माहिती व कागदपत्रे ही अचूक असल्याची खात्री झाल्या नंतर आपण Proceed for Payment option वर क्लिक करावे. (Senate Election)

पदवीधरांना नोंदणी करताना 20 रुपये शुल्क भरावे लागेल.

ऑनलाइन मतदार नोंदणीसाठी येथे क्लिक करा – Registration

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com