Home Blog Page 413

Unique Career Options : नव्या वर्षात ‘या’ सेक्टरमध्ये नोकरीच्या लाखो संधी; जाणून घ्या सविस्तर

Unique Career Options

करिअरनामा ऑनलाईन। इंटरनेट हे आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक न वगळता (Unique Career Options) येणारा घटक बनला आहे. सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन आणि डेटा कनेक्टिव्हिटी अतिशय उपयुक्त ठरत आहे. या दोन्ही गोष्टींशिवाय आपण आपल्या फास्ट फॉरवर्ड डेली लाईफची कल्पनाही करू शकत नाही. काहीजण तर दिवसातील कितीतरी तास स्मार्टफोन बघण्यात आणि गेम खेळण्यात घालवतात. विद्यार्थी आणि बेरोजगार व्यक्ती तर आजकाल गेमिंगमध्ये जास्त व्यस्त असतात.

2023 मध्ये लाखो नोकऱ्या मिळणार 

भारतामध्ये गेमिंग करणाऱ्या लोकांचं प्रमाण लक्षणीय आहे. याच गेमिंगचा उपयोग करून भविष्यात अनेकजण नोकरी मिळवू शकतात. 2023 या आर्थिक वर्षामध्ये देशातील गेमिंग इंडस्ट्रीमध्ये एक लाख नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. गुरुवारी एका अहवालात याबद्दल माहिती देण्यात आली. या माहितीनुसार, प्रोग्रॅमिंग, टेस्टिंग अॅनिमेशन आणि डिझाइनसह सर्व डोमेनसाठी गेमिंग इंडस्ट्रीमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

गेमिंग सेक्टरमध्ये 20 ते 30 टक्के वाढ (Unique Career Options)

टीमलीज डिजिटल या टेक कंपनीनं ‘Gaming: Tomorrow’s Blockbuster’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, गेमिंग सेक्टरमध्ये 20 ते 30 टक्के वाढ नोंदवली जाईल. याच क्षेत्रात पुढील आर्थिक वर्षात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरुपातील सुमारे एक लाख नोकऱ्या निर्माण होतील.

भारताचा जगात 6 वा क्रमांक

गेमिंग कम्युनिटीच्या बाबतीत, चीननंतर भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतात 48 कोटी गेमिंग कम्युनिटी आहे. त्यामुळे या क्षेत्रातील मागणीत वाढ झाली आहे. परिणामी (Unique Career Options) रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. गेमिंगच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या बाबतीत भारताचा जगात 6वा क्रमांक लागतो. जागतिक बाजारपेठेला गेमिंगच्या माध्यमातून सुमारे 17.24 लाख कोटी रुपये महसूल मिळतो. 2023 च्या आर्थिक वर्षापर्यंत या क्षेत्रात 780 कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक (FDI) अपेक्षित आहे.

इतका मिळतो पगार 

अहवालानुसार, सध्या या क्षेत्रातून 50 हजार लोकांना थेट रोजगार मिळाला आहे. यामध्ये प्रोग्रॅमर आणि डेव्हलपर्सची संख्या 30 टक्के आहे. पुढील वर्षापर्यंत, गेम डेव्हलपर, युनिटी डेव्हलपर, टेस्टिंग, अॅनिमेशन, डिझाइन, आर्टिस्ट आणि इतर भूमिकांसाठी नवीन नोकऱ्या उपलब्ध होतील. पगाराचा (Unique Career Options) विचार केला तर, गेमिंग सेक्टरमध्ये सर्वांत जास्त पगार गेम प्रोड्युसरला मिळतो. गेम प्रोड्युसरला वर्षाला 10 लाख रुपये पगार मिळू शकतो. त्यानंतर, गेम डिझायनरला वर्षाला सहा लाख रुपये, सॉफ्टवेअर इंजिनीअर्सना 5.5 लाख रुपये पगार मिळू शकतो.

वापरकर्त्यांच्या संख्येत होणारी वाढ आणि इतर संधी यांमुळं गेमिंग सेक्टरची भरभराट होत आहे. त्यामुळेच या सेक्टरमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IBPS PO Exam : 6432 पदांसाठी IBPS परीक्षा ‘या’ तारखेला; Admit Card असं करा Download 

IBPS PO Exam

करिअरनामा ऑनलाईन | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS PO Exam) PO च्या मुख्य परीक्षेबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे. या परीक्षेसाठी लवकरच प्रवेशपत्र जारी केले जातील अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळाली  आहे. प्रवेशपत्र जारी केल्यानंतर, उमेदवार या परीक्षेसाठी त्यांचे प्रवेशपत्र ibps.in वर IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन डाउनलोड करू शकतात.

ही आहे परीक्षेची तारीख

IBPS PO Mains परीक्षेच्या तारखेबद्दल बोलायचे तर, ती 26 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. याची पूर्वपरीक्षा 15 आणि 16 ऑक्टोबरला झाली होती. या परीक्षेचा निकाल 2 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या भरतीद्वारे प्रोबेशनरी ऑफिसरच्या 8432 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

कोणत्या बँकेत किती जागा? (IBPS PO Exam)

कॅनरा बँक – 2500

युनियन बँक ऑफ इंडिया – 2094

बँक ऑफ इंडिया – 535

पंजाब नॅशनल बँक – 500

UCO बँक – 550 (IBPS PO Exam)

पंजाब आणि सिंध बँक – 253

एकूण पदे – 6432

Admit Card असं करा Download

  1. सर्वप्रथम IBPS च्या अधिकृत वेबसाइटला ibps.in वर भेट द्या.
  2. यानंतर तुम्हाला होम पेजवर IBPS PO Mains Exam 2022 Admit Card लिंकवर क्लिक करावे लागेल.
  3. त्यावर क्लिक करताच तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. (IBPS PO Exam)
  4. तुम्हाला येथे नोंदणी क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉग इन करावे लागेल.
  5. लॉग इन करताच, उमेदवार IBPS PO मुख्य परीक्षा प्रवेशपत्र 2022 लिंक दिसेल .
  6. इथून तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि त्याची प्रिंट काढू शकतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIPS Recruitment 2022 : पदवीधरांसाठी ‘या’ संस्थेत नोकरीची संधी; काय आहे पात्रता?

IIPS Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस (IIPS Recruitment 2022) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्पर डिव्हिजन क्लर्क आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क कम कॅशियर पदांसाठी 02 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस

भरली जाणारी पदे –

अप्पर डिव्हिजन क्लर्क – 01 पद

अप्पर डिव्हिजन क्लर्क-कम-कॅशियर – 01 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

अप्पर डिव्हिजन क्लर्क – कोणत्याही शाखेतील पदवी.

अप्पर डिव्हिजन क्लर्क – कम-कॅशियर: वाणिज्य शाखेतील पदवी + 02 वर्षे अनुभव.

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2022

वय मर्यादा –

अप्पर डिव्हिजन क्लर्क – 18 ते 27 वर्षे

अप्पर डिव्हिजन क्लर्क-कम-कॅशियर – 18 ते 30 वर्षे

अर्ज फी – (IIPS Recruitment 2022)

फी नाही

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज पाठवण्याचा पत्ता – The CAO-cum-Registrar International Institute for Population Sciences Govandi Station Road, Deonar, Mumbai # 400088. (IIPS Recruitment 2022)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अर्ज येथे Download करा – Application Form 

अधिकृत वेबसाईट – https://www.iipsindia.ac.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : गवंडयाच्या मुलाची गगन भरारी!! मिळाला Para Commandoचा बहुमान!

Success Story jaydeep jadhav

करिअरनामा ऑनलाईन। प्रामाणिकपणे केलेले कष्ट यशाला गवसणी घालण्यासाठी (Success Story) पुरेसे असतात असं म्हंटलं जातं. याचा प्रत्यय आलाय नाशिकमध्ये. संपूर्ण भारतातून 30 उत्तम सैनिकांमधून जे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून विविध परीक्षांचे स्तर पूर्ण करतील अशा 12 सैनिकांची पॅरा कमांडो म्हणून निवड करण्यात येणार होती, त्यामध्ये नाशिकच्या जयदीप जाधवचा सहभाग झाला आहे.

कष्टाचं चीज झालं 

नुकतीच देशातील भारतीय सैन्य दलातील पॅरा कमांडोची यादी तयार करण्यात आली आहे. विविध बटालियन मधील फक्त बारा जणांची यामध्ये निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिकच्या ग्रामीण भागातील एका गवंडयाचा मुलगा मराठा बटालियनच्या माध्यमातून खडतर प्रशिक्षण पूर्ण करून पॅरा कमांडोच्या टीममध्ये सहभागी झाला आहे. पोरानं कष्टाचे चीज केल्याने आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदश्रु आले होते. जयदीप जाधव असं त्याचे नाव असून चांदवड तालुक्यातील वाकी खुर्द या गावचा तो रहिवासी आहेत. या निवडीनंतर गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार करत कौतुक केले आहे.

Success Story jaydeep jadhav

वडील गवंडी तर आई अंगणवाडी मदतनीस (Success Story)

चांदवड तालुक्यातील वाकी खुर्दचे जयदीप जाधव हे भूमिपुत्र आहेत. भारतीय सैन्यदलातील अतिशय खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करत पॅरा कमांडो होण्याचा जयदीप यांनी बहुमान पटकावला आहे.

जयदीप जाधवचे वडील हे लासलगाव पंचक्रोशीत गवंडी काम करतात, आई अंगणवाडीमध्ये मदतनीस आहे, घरची परिस्थिती तशी बेताचीच असून त्यावर मात करत जयदीपने हे यश खेचून आणले आहे. त्याने मिळवलेल्या यशामुळे त्यांच्या आई वडिलांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

असं होतं प्रशिक्षण

जयदीप जाधव यांची 2021 मध्ये भारतीय सैन्य दलाच्या मराठा बटालियनमध्ये निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी बेळगाव येथे नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची सिक्कीम येथे पोस्टिंग झाली होती.

दरम्यानच्या काळातच भारतातून 30 उत्तम फौजदारांमध्ये त्यांना पॅरा कमांडोच्या प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले. तेव्हापासून गेली चार महिने बेळगाव व आग्रा येथे अतिशय (Success Story) खडतर व अवघड समजल्या जाणाऱ्या पॅरा कमांडोचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. प्रत्येक टेस्ट व परीक्षा पार करत सदरचे संपूर्ण प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यामुळे 30 फौजदारांपैकी अंतिम 12 फौजदारांमध्ये पॅरा कमांडो म्हणून त्यांची निवड झाली.

 

Success Story jaydeep jadhav

कुटुंबाला मिळाला सैन्य दलाचा वारसा

त्यांच्या निवडीमुळे वाकी खुर्द, लासलगाव व जिल्ह्यातून कौतुक होत आहे. जयदीप यांचे वडील गंगाधर जाधव गवंडी काम करतात. तर आई कावेरी जाधव अंगणवाडीत (Success Story) मदतनीस आहे. बंधू ऋषिकेश इंडियन आर्मीत सेना पोलिस (CMP) या पदावर कार्यरत आहेत. चुलते युवराज व शिवनाथ जाधव हे देखील भारतीय सैन्य दलात हवालदार पदावर कार्यरत आहेत. सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव यांचे जयदीप पुतणे आहेत. जयदीप यांनी त्यांच्या कर्तृत्वाने युवा पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Vacancy : Mormugao Port Authority अंतर्गत नोकरीची उत्तम संधी; असा करा अर्ज

Mormugao Port Authority

करिअरनामा ऑनलाईन। मुरगाव पोर्ट प्राधिकरण अंतर्गत भरतीसाठी (Job Vacancy) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी-वित्त पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2022आहे.

संस्था – मुरगाव पोर्ट प्राधिकरण (Mormugao Port Authority)

भरले जाणारे पद – कार्यकारी-वित्त

पद संख्या – 03 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा

वय मर्यादा – 45 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 डिसेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग, मुरगाव बंदर प्राधिकरण, तिसरा मजला, प्रशासकीय कार्यालय इमारत, हेडलँड सडा, गोवा – 403 804 (Job Vacancy)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Vacancy)

कार्यकारी-वित्त (i) Member of Institute of Chartered Accountants of India OR Institute of Cost & Management Accountant of India.
(ii) Minimum 06 months of post qualification experience in Companies (Government / Private) / Self Practising CA or CMA / CA or CMA employed with a firm / Audit firm.

मिळणारे वेतन –

कार्यकारी-वित्त – Rs. 70,000/- दरमहा (Job Vacancy)

आवश्यक कागदपत्रे –

  1. Education Qualification (All year/semester Mark sheets & Certificates, from 10th Standard onwards)
    Experience Certificate
  2. Proof of identity and age (PAN/Aadhar Card/Birth Certificate)
  3. 2 recent passport size photos etc.

असा करा अर्ज –

  1. वरील पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.
  3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर अर्ज सादर करावे. (Job Vacancy)
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2022 आहे.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघा

Mormugao Port Authority Bharti 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – mptgoa.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MahaGenco Recruitment : इंजिनियर्ससाठी मोठी संधी!! MahaGenco मध्ये ‘ही’ पदे रिक्त; लगेच करा APPLY

MahaGenco Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (MahaGenco Recruitment) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण 661 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड

भरली जाणारी पदे –

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) – 339 पदे

कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) – 322 पदे

पद संख्या – 661 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (MahaGenco Recruitment)

  • सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.E / B.Tech. in Electrical Engineering / Mechanical Engineering/ Electronics Engineering/Instrumentation Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (MahaGenco Recruitment)

  • कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार Diploma in Electrical Engineering/ Mechanical Engineering/ Electronics Engineering/ Instrumentation Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) – 49210-2165-60035-2280-119315 रुपये

कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) – . 37340-1675-45715-1740-63115-1830-103375 रुपये

आवश्यक कागदपत्रे –

Resume  (MahaGenco Recruitment)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसईट – https://www.mahagenco.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy : महिलांसाठी Indian Navy चा मोठा निर्णय; ‘या’ Schemeसाठी करता येणार अर्ज

Indian Navy

करिअरनामा ऑनलाईन। भारतातील महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर (Indian Navy) आहेत. महिलांसाठी भारतीय नौदलाने एक  महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सैन्यदलात महिलांच्या प्रवेशासाठी आणखी एक बंद दरवाजा उघडण्यात आला आहे. आतापर्यंत फक्त पुरुषांनाच या ठिकाणी प्रवेश घेता येत होता. आता नौदलाने नेव्ही युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम महिलांसाठीही सुरू केली आहे. आतापर्यंत फक्त पुरुषांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ महिलाही घेऊ शकतील आणि त्या इंडियन नेव्हीमध्ये नोकरीही मिळवू शकतील.

केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे. आता नौदलाच्या काही विभागांमध्ये नेव्ही युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमद्वारे महिलाही नोकरीसाठी अर्ज करू शकतात, असं या संदर्भातील एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान केंद्राने सांगितलं. युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमच्या माध्यमातून नेव्हीच्या एक्झिक्युटिव्ह ब्रँच जनरल सर्व्हिस (X) केडर, आयटी, इंजिनीअरिंग व इलेक्ट्रिकल शाखांमध्ये महिलांसाठी नोकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे, असं सरकारने हायकोर्टात सांगितलं.

महिलांना ‘या’ Branch मध्ये मिळणार प्रवेश (Indian Navy)

अॅटर्नी जनरल कुश कालरा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून सैन्य भरतीत महिलांबाबत भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर हायकोर्टाने सरकारला विचारलं की, सरकारने पुरुषांप्रमाणेच महिलांनाही समान संधी देण्यासाठी कोणती पावलं उचलली आहेत?

याला उत्तर देताना केंद्राची बाजू मांडणारे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा म्हणाले की, याचिकेत उपस्थित केलेला मुद्दा आधीच सोडवला गेला आहे. सरकारने इंडियन नेव्ही (Indian Navy) युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमच्या माध्यमातून महिलांना नौदलाच्या आयटी, टेक्निकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल ब्रँच, एक्झिक्युटिव्ह ब्रँच जनरल सर्व्हिस केडरमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे.

कधी होणार भरती?

अॅडिशनल सॉलिसिटर जनरल शर्मा यांनी आपल्या युक्तिवादांना बळ देण्यासाठी केंद्राने तयार केलेल्या नोटिसाही न्यायालयात दाखवल्या. एक नोटीस नेव्ही शॉर्ट सर्व्हिस कमिशन इन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीतील (एक्झिक्युटिव्ह ब्रँच) व्हेकन्सीची होती. त्याची भरती प्रक्रिया जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. दुसरी नोटीस शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या जनरल सर्व्हिससह इतर एंट्रीसाठी होती, ज्याची भरती प्रक्रिया जून 2023 मध्ये सुरू होणार आहे.

या स्कीमच्या माध्यमातून तुम्हाला Navy Job मिळवायचा (Indian Navy) असेल तर नवीन माहितीसाठी नेव्हीची वेबसाइट joinindiannavy.gov.inला भेट द्या. भरती प्रक्रिया आणि नवीन रिक्रुटमेंटबद्दल सर्व माहितीची नोटिफिकेशन्स इथंच अपलोड केली जातील. भरती प्रक्रियेला सध्या वेळ असल्याने अद्याप या संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IOCL Recruitment 2022 : 12 वी/ITI साठी इंडियन ऑइलमध्ये ‘या’ पदावर भरती; ताबडतोब अर्ज करा

IOCL Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध (IOCL Recruitment 2022) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 465 पदे भरली जाणार आहेत. अप्रेंटिस पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड

पद संख्या – 465 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार- खाजगी

भरली जाणारी पदे – (IOCL Recruitment 2022)

१ टेक्निशियन अप्रेंटिस (मॅकेनिकल)
२ टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)
३ टेक्निशियन अप्रेंटिस (टेलीकम्युनिकेशन & इन्स्ट्रुमेंटेशन)
४ टेक्निशियन अप्रेंटिस (असिस्टंट-HR)
५ ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट)
६ ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर-(Fresher)
७ ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर-(Skill)

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  30 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • टेक्निशियन अप्रेंटिस (मॅकेनिकल): ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल): ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • टेक्निशियन अप्रेंटिस (टेलीकम्युनिकेशन & इन्स्ट्रुमेंटेशन): ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • टेक्निशियन अप्रेंटिस (असिस्टंट-HR): पदवी. (IOCL Recruitment 2022)
  • ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट): पदवी.
  • ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर-(Fresher): १२ वी उतीर्ण.
  • ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर-(Skill): १२ वी उत्तीर्ण.

वय मर्यादा –

कमीत कमी: 18 वर्ष

जास्तीत जास्त: 24 वर्ष

अर्ज/ परीक्षा फी – नाही

पात्रता – (IOCL Recruitment 2022)

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.

सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
किंवा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट www.iocl.com ला भेट द्या.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ आहे. (IOCL Recruitment 2022)
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – Apply

अधिकृत वेबसाईट – www.iocl.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIT Placement : नोकरीची लागली लॉटरी!! विद्यार्थ्याला मिळालं करोडोचं पॅकेज; पहा कसं? 

IIT Placement

करिअरनामा ऑनलाईन। आयआयटी गुवाहाटीमध्ये सध्या विद्यार्थ्यांसाठी (IIT Placement) प्लेसमेंटचा हंगाम सुरु आहे. हुशार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यासाठी मोठ-मोठ्या कंपन्या, ब्रँड्स कॅम्पसमध्ये दाखल झाले आहेत. या कंपन्यांनी विद्यार्थ्यांना दिलेला पगाराचा आकडा ऐकून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.

IIT गुवाहाटीतील एका विद्यार्थ्याला तब्बल 1.20 कोटी रुपयांचं पॅकेज मिळाले आहे. हे आतापर्यंतचं सर्वात महागडे वार्षिक पॅकेज ठरले आहे. या संस्थेच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्री-प्लेसमेंट ऑफरमध्ये 21 टक्के वाढ झाली आहे.

2021-22 या शैक्षणिक वर्षात 179 नोकरी प्रस्तावांसह 218 प्री-प्लेसमेंट ऑफर लेटर यापूर्वीच प्राप्त झाले. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांना मोठी लॉटरी लागली आहे. 1 डिसेंबरपासून कॅम्पस प्लेसमेंटचा पहिला टप्पा सुरु होत आहे. तोपर्यंत प्री-प्लेसमेंट सुरु राहण्याची अपेक्षा आहे. (IIT Placement)

इंटर्नशीप प्रोग्रॅम आणि सेंटर फॉर करिअर डेव्हलपमेंट या दोन कार्यक्रमांमुळे अनेक कंपन्या कॅम्पसमध्ये दाखल होत असून विद्यार्थ्यांना ऑन स्पॉट जॉब मिळत आहे. त्यामुळेच प्री-प्लेसमेंटमध्ये आगाऊ नोकऱ्यांचे खाते उघडल्याचा दावा आयआयटी गुवाहाटीने केला आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. अभिषेक कुमार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्या अगोदरच नोकऱ्या देण्यासाठी आणि प्री-प्लेसमेंटसाठी संस्थेने तांत्रिक क्लबशी करार केला आहे.

2019-20 या काळात सर्वात जास्त 49 लाखांचं वार्षिक पॅकेज मिळालं होतं. त्यानंतर हा आकडा वाढत गेला. 2020-21 मध्ये 64 लाख, 2021-22 मध्ये सर्वाधिक 56 लाख तर यंदा आतापर्यंतच सर्व रेकॉर्ड मोडीत काढत 1.20 कोटी रुपयांचं पॅकेज मिळाले आहे.

पीपीओ एसेंचर, एडोब, अॅमेझॉन, एक्स्ट्रिया, एक्जेला, बजाज ऑटो, फ्लिपकार्ट, (IIT Placement) जीई हेल्थ केअर, जेपी मॉर्गन यासह अनेक जागतिक दिग्गज कंपन्या या कॅम्पसमध्ये आगाऊ नोकऱ्या देण्यासाठी इच्छूक असल्याचे समोर आले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharti 2022 : पोलिस भरतीसाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक; पहा लिस्ट

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात नुकतीच महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा (Police Bharti 2022) करण्यात आली आहे. राज्य सरकारनं तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातील तरुण- तरुणींना  पोलीस होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसंच 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र ही भरती प्रक्रिया होणार तरी कशी? यासाठी कोणते डोक्यूमेंट्स असणं आवश्यक आहे?याबद्दलचे प्रश्न अनेकांना पडले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या पदभरतीसाठी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया…

पोलिस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे –

  1. शाळा सोडल्याचा दाखला / 10 वी चे प्रमाणपत्र.
  2. जन्म दाखला.
  3. 12 वी शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र गुणपत्रक.
  4. अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्र. (Police Bharti 2022)
  5. संबंधित जात प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित प्रवर्गाचे विधीग्राह्य जात प्रमाणपत्र व उन्नत व प्रगत गटात (नॉन क्रिमिलेयर) मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (अ.जा./अ.ज. वगळून).
  6. समांतर आरक्षण (पोलीस पाल्य/माजी सैनिक/अशंकालीन/भुकंपग्रस्त/होमगार्ड / खेळाडू / प्रकल्पग्रस्त / ३०% महिला आरक्षण/अनाथ इ.) मागणी केली असल्यास त्याबद्दलचे विधीग्राह्य प्रमाणपत्र.
  7. आधारकार्ड (ऐच्छीक).

‘या’ गोष्टी ठेवा लक्षात – (Police Bharti 2022)

  1. प्रमाणपत्रांच्या छाननीच्या वेळी लागू असलेल्या प्रमाणपत्रांची मूळ (Original) व सुस्पष्ट दिसतील अशा साक्षांकित केलेल्या दोन छायांकित प्रती उमेदवाराने कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.
  2. उमेदवाराने प्रमाणपत्र मिळण्याकरिता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
  3. मूळ प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
  4. जात वैधता प्रमाणपत्र वगळून इतर सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ही कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील.
  5. उमेदवाराने पोलीस भरतीकरिता येताना या कार्यालयाकडुन निर्गमीत केलेले पोलीस भरती प्रवेशपत्र सोबत आणावे
  6. उमेदवाराने पोलीस भरतीकरिता येतांना त्यांनी सादर केलेल्या आवेदन अर्जाची (रजिस्ट्रेशन आयडी नमूद असलेली) प्रत प्रवेशपत्रांच्या (Admit card) २ प्रती तसेच, अलिकडील काढलेले 2 पासपोर्ट साईज फोटो (आवेदन अर्ज भरतांना सादर केलेले) इत्यादी न चुकता आणावे.
  7. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात (Unreserved) अर्ज करु शकतात, परंतू खुल्या प्रवर्गातील (Unreserved) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करु शकणार नाहीत. (Police Bharti 2022)
  8. यास्तव आवेदन अर्ज सादर करण्यापूर्वीच (संबंधीत पोलीस घटकाच्या आस्थापनेवर त्या मागास प्रवर्गासाठी पदे रिक्त असल्याबाबत खात्री करुन) त्यांनी कोणत्या प्रवर्गातून अर्ज भरावयाचा आहे हे निश्चित करुन नंतरच आवेदन अर्जात तशी माहिती नोंद करावी व संबंधित प्रवर्गाचा निर्विवाद दावा अर्ज भरताना करावा. नंतर प्रवर्ग बदलण्याबाबत उमेदवारांकडून अभिवेदन अथवा दावा / तक्रार विचारात घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  9. कागदपत्र पडताळणीदरम्यान सादर करण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर संपूर्ण नाव, आवश्यक प्रमाणपत्राचा निर्गमित दिनांक, जात प्रमाणपत्र असल्यास जात व जातीचे वर्गीकरण [SC, ST, OBC, VJ-A (DT-A), NT-B, NT-C, NT-D, SBC & EWS] स्पष्टपणे नमूद असणे आवश्यक आहेत.
  10. जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमेलियर प्रमाणपत्र विहित नमुन्यातील असावे.
  11. आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी मागासवर्गीय उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले स्वतंत्र जात प्रमाणपत्र व स्वतंत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (अ.जा. व अ.ज. प्रवर्ग वगळून) देणे बंधनकारक आहे.
  12. सदर प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर न करणाऱ्या उमेदवारास जात प्रवर्गाचा / समांतर आरक्षणाचा लाभ मिळू शकणार नाही
  13. आवेदन अर्जात दावा केल्यानुसार कागदपत्रे पडताळणीच्या वेळी योग्य कागदपत्रे नसल्यास उमेदवारास गुणवत्तेनुसार सर्वसाधारण मध्ये समाविष्ट करण्यात येईल. सेवाप्रवेश नियमांमधील सर्व अर्टीची व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करणारे उमेदवार पुढील आवश्यक त्या चाचणीसाठी पात्र राहतील. (Police Bharti 2022)
  14. कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवाराने, त्यांनी ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या आवेदन अर्जाची (अॅप्लीकेशन आयडी नमूद असलेली) प्रत, पोलीस भरतीकरीता देण्यात आलेल्या शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेच्या प्रवेशपत्रांची प्रिंट व २ पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.

नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेटसाठी आवश्यक कागदपत्रे –

  1. वडील / आई मा. तहसीलदार कार्यालयातील मागील तीन वर्षांचा उत्पन्न दाखला
  2. जातीचा दाखला
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. रहिवासी दाखला
  5. Renewal करायचे असल्यास एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com