Home Blog Page 370

GK Updates : विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते?

GK Updates 31 Jan

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सामान्य ज्ञान तुम्हाला सरकारी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देताना मदत करते.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण अचानक समोर आलेल्या प्रश्नामुळे (GK Updates) उमेदवारांचा गोंधळ उडतो. ऐनवेळी तुमचा गोंधळ उडू नये यासाठी आज आपण सामान्य ज्ञान वाढवणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत.

1. ५ हेक्टोलीटर = किती लीटर?
A. ५००० लीटर
उत्तर – B. ५०० लीटर
C. ५० लीटर
D. १००० लीटर

2. अवकाशातील तार्‍यांच्या समूहाला —– म्हणतात.
A. दीर्घिका
B. तेजोमेघ
उत्तर – (GK Updates) C. आकाशगंगा
D. तारकामंडल

3. ……. पासून अल्युमिनियम मिळवले जाते.
A. तांबे
B. लोह
उत्तर – C. बॉक्साइट
D. मँगनीज

4. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते?
उत्तर – A. टंगस्टन
B. प्लॅटेनियम
C. अल्युमिनियम
D. नायक्रॉन

5. एक अश्वशक्ती म्हणजेच ——–
A. १००० वॅट
उत्तर – B. ७४६ वॅट
C. ४१५ वॅट
D. ६०० वॅट (GK Updates)

6. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे कोणत्या बँकेने ‘आपत्कालीन कर्ज सुविधा’ सुरू केली आहे?
उत्तर – स्टेट बँक ऑफ इंडिया

7. कोरोना विषाणू 2019 चे पहिले प्रकरण कोठे समोर आले?
उत्तर – चीनमधील वुहानच्या हुआनमध्ये

8. कोरोना विषाणूच्या नवीन विषाणूला तात्पुरते नाव काय आहे?
उत्तर – 2019-nCov

9. कोरोना विषाणूला ‘आंतरराष्ट्रीय आणीबाणी’ कोणी घोषित केले आहे?
उत्तर – जागतिक आरोग्य संघटना (WHO)

10. WHO ने कोरोना विषाणूला काय नाव दिले आहे?
उत्तर – कोविड-19 (GK Updates)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BRO Recruitment 2023 : 10 वी पास उमेदवारांची सीमा रस्ते संघटनेत ‘या’ पदांवर होणार भरती; असा करा अर्ज

BRO Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध रिक्त पदांच्या (BRO Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG), वाहन मेकॅनिक, MSW ड्रिलर, MSW मेसन, MSW पेंटर, MSW मेस वेटर या पदांच्या एकूण 567 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – सीमा रस्ते संघटना

भरली जाणारी पदे – (BRO Recruitment 2023)

  1. रेडिओ मेकॅनिक – 02 पदे
  2. ऑपरेटर कम्युनिकेशन – 154 पदे
  3. ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG) – 09 पदे
  4. वाहन मेकॅनिक – 236 पदे
  5. MSW ड्रिलर – 11 पदे
  6. MSW मेसन – 149 पदे
  7. MSW पेंटर – 05 पदे
  8. MSW मेस वेटर 01 पद

पद संख्या – 567 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (BRO Recruitment 2023)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2023

वय मर्यादा –

रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG), वाहन मेकॅनिक – 18 ते 27 वर्षे

MSW ड्रिलर, MSW मेसन, MSW पेंटर, MSW मेस वेटर – 18 ते 25 वर्षे (BRO Recruitment 2023)

 अर्ज फी –
सामान्य उमेदवार आणि EWS यासह माजी-सेवा करणारे – रु. 50/-
इतर मागासवर्गीय उमेदवार – रु. 50/-
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती/ PwED – शून्य

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कमांडंट, BRO शाळा आणि केंद्र, दिघी कॅम्प, पुणे – 411 015

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. रेडिओ मेकॅनिक –

(i) Matriculation from a recognized Board or equivalent;
(ii) Possessing Radio Mechanic Certificate from Industrial Training Institute with two years experience as Radio (BRO Recruitment 2023) Mechanic in a Government, Public or Private Sector enterprises;

2. ऑपरेटर कम्युनिकेशन –

(i) Matriculation from a recognized Board or equivalent;
(ii) Possessing Wireless Operator or Radio Mechanic Certificate from Industrial Training Institute or equivalent;

3. ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG) –

i) Matriculation from a recognized Board or equivalent; and
ii) Possessing a heavy Motor vehicle driving license:

4. वाहन मेकॅनिक –

(i) Matriculation from a recognized Board or equivalent;
(ii) Possessing a certificate of Mechanic in Motor Vehicle/Diesel/
Heat Engine. (BRO Recruitment 2023)

5. MSW ड्रिलर –

(i) Matriculation from a recognized Board or equivalent; and
(ii) Should qualify in proficiency test in the trade to be conducted by Border Roads Organisation.

(iv) Should qualify for physical tests as per Border Roads Organisation guidelines.

(v) Should meet physical and medical standards as per Border
Roads Organisation guidelines.

6. MSW मेसन –

(i) Matriculation from a recognized Board or equivalent ;
(ii) Possessing a certificate of Building construction/Bricks Mason from Industrial Training Institute / Industrial Trade Certificate / National Council for Training in the Vocational Trades / State Council for Vocational Training

7. MSW पेंटर –

(i) Matriculation from a recognized Board or equivalent;
(ii) Painter Certificate from Industrial Training Institute /Industrial Trade Certificate / National Council for Training in the Vocational Trades / State Council for Vocational Training. (BRO Recruitment 2023)

8. MSW मेस वेटर –

(i) Matriculation from a recognized Board or equivalent;
(ii) Should qualify in proficiency test in the trade to be conducted by Border Roads Organisation.

(iii) Should qualify physical tests as per Border Roads Organisation guidelines.

(iv) Should meet physical and medical standards as per Border Roads Organisation guidelines.

मिळणारे वेतन –

  1. रेडिओ मेकॅनिक Pay Level 4 (Rs 25,500-81,100) दरमहा
  2. ऑपरेटर कम्युनिकेशन Pay Level 2 (Rs. 19,900-63,200) दरमहा
  3. ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG) Pay Level 2 (Rs. 19,900-63,200) दरमहा
  4. वाहन मेकॅनिक Pay Level 2 (Rs. 19,900-63,200) दरमहा
  5. MSW ड्रिलर Pay Level 1 (Rs 18,000-56,900) दरमहा
  6. MSW मेसन Pay Level 1 (Rs 18,000-56,900) दरमहा (BRO Recruitment 2023)
  7. MSW पेंटर Pay Level 1 (Rs 18,000-56,900) दरमहा
  8. MSW मेस वेटर Pay Level 1 (Rs 18,000-56,900) दरमहा

असा करा अर्ज –

  1. या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज फक्त इंग्रजी/हिंदीमध्ये भरला जाईल.
  3. कोणताही उमेदवार एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज पाठवणार नाही.
  4. फक्त पुरुष उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे. महिला उमेदवारांनी अर्ज करण्याची गरज नाही.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. (BRO Recruitment 2023)
  6. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  7. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलला असावा.
  8. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  1. निवड प्रक्रिया – 1. Written Exam
  2. Physical Efficiency Test
  3. Practical / Trade Test
  4. Medical Standards
  5. Document Verification
  6. BRO Vacancy details 2023

BRO Vacancy details 2023

BRO Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (BRO Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.bro.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC NEWS : MPSC विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!! MPSCचे नवीन नियम 2025 पासून लागू होणार

MPSC NEWS

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी (MPSC NEWS) करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. MPSC च्या परीक्षांसंदर्भातील नवे नियम 2025 पासून लागू होणार आहेत. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीला यश मिळाले आहे.

UPSC प्रमाणे आता MPSC परिक्षेत देखील वर्णनात्मक पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. हा पॅटर्न 2023 नव्हे तर 2025 पासून लागू करावा यासाठी हे विद्यार्थी (MPSC NEWS) आंदोलन करत आहेत. तोडगा निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिला होता. दरम्यान यावर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (MPSC NEWS) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतर मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून (MPSC NEWS) या निर्णयाला तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे.
MPSCला राज्य सरकारतर्फे विनंती करण्यात येणार आहे. तसेच यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MahaVitaran Recruitment : 10 वी/ITI साठी औरंगाबादच्या महावितरणमध्ये भरती सुरु; ऑनलाईन करा अर्ज

MahaVitaran Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद (MahaVitaran Recruitment) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिस वीजतंत्री, तारतंत्री कोपा  प्रशिक्षणार्थी पदांच्या 74 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद

भरले जाणारे पद – 

  1. अप्रेंटिस वीजतंत्री
  2. तारतंत्री
  3. कोपा

पद संख्या – 74 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – (MahaVitaran Recruitment) 07 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

10 वी उत्तीर्ण + संबंधित विषयात ITI – NCVT.

वय मर्यादा –

खुला 18 ते 30 वर्षे

मागासवर्गीय 05 वर्षे सूट

नोकरी करण्याचे ठिकाण – औरंगाबाद

कागदपत्रक सादर करण्याची सुरवात – 31 जानेवारी 2023

कागदपत्रक सादर करण्याची शेवटची तारीख – 07 फेब्रुवारी 2023

कागदपत्रक सादर करण्याचा पत्ता – (MahaVitaran Recruitment)

अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ औरंगाबाद विद्युत भवन, जुने पॉवर हाऊस कंपाऊंड, ज्युब्लि पार्क, औरंगाबाद.

काही महत्वाच्या लिंक्स – (MahaVitaran Recruitment)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

ऑनलाईन नोंदणीसाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Budget 2023-24 : सर्वात मोठी बातमी!! देशावरचं नोकर कपातीचं टेन्शन झालं दूर; बजेटच्या आधी आली गुड न्यूज

Budget 2023-24

करिअरनामा ऑनलाईन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Budget 2023-24) उद्या 1 फेब्रुवारी रोजी 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर करतील. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्याने मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर होणार आहे. मात्र त्याआधी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund ) अर्थात IMFने भारतासाठी मोठी गुड न्यूज दिली आहे. IMF च्या मते आर्थिक वर्ष 2023 आणि 2024 मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल. IMF ने असे देखील म्हटले आहे की, याकाळात (Budget 2023-24) भारताच्या विकासाचा वेग 6.1 इतका असेल, तर 2024 मध्ये 6.8 इतका विकास दर असेल. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असताना दुसऱ्या बाजूला जगाची अर्थव्यवस्था मात्र 2023 मध्ये घसरण्याची शक्यता असल्याचे IMFने म्हटले आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर 2022 मध्ये 3.4 टक्के असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. 2023 मध्ये तो 2.9 इतका असू शकतो आणि 2024 मधील ग्रोथ ही 3.1 टक्के असू शकते.

IMFचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि संचालक Pierre-Olivier Gourinchas यांनी सांगितले की, भारतासाठी आमच्या अंदाजात कोणताही बदल नाही झाला. या वर्षी भारताच्या विकासाचा वेग 6.8 टक्के असू शकतो. पुढील वर्षी यात थोडी घट होऊ शकते आणि (Budget 2023-24) विकास दर 6.1 इतका राहिल. या अंतर्गत गोष्टींची भूमिका महत्त्वाची असेल. मात्र जागतिक अर्थव्यवस्थेसाठी भारतीय अर्थव्यवस्थेची भूमिका महत्त्वाची असेल. भारताची अर्थव्यवस्था एक ब्राइट स्पॉटचे काम करेल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIASL Recruitment 2023 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लि.मध्ये ‘या’ पदांवर भरती सुरु; पात्रता फक्त 10 वी, 12 वी पास

AIASL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लि. मध्ये रिक्त (AIASL Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या 166 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. 7 फेब्रुवारी 2023 ते 13 फेब्रुवारी 2023 दरम्यान मुलाखती घेतल्या जातील.

संस्था – एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लि.

पद संख्या – 166 पदे

भरली जाणारी पदे – (AIASL Recruitment 2023)

1) ग्राहक सेवा कार्यकारी – 11 पदे
2) कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी – 25 पदे
३) युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर – 7 पदे
4) हस्तक – 45 पदे
5) हस्तक – 36 पदे
6) हॅंडीमॅन (क्लीनर) – 20 पदे
7) कर्तव्य अधिकारी – 6 पदे
8) कनिष्ठ अधिकारी तांत्रिक – 4 पदे
9) कनिष्ठ अधिकारी प्रवासी – 12 पदे (AIASL Recruitment 2023)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी, 12, पदवी उत्तीर्ण असावा.

वय मर्यादा –

सर्वसाधारण साठी कमाल वय – 28 वर्षे
OBC साठी कमाल वय – 31 वर्षे
SC/ST साठी कमाल वय – 33 वर्षे

अर्ज फी –

इतरांसाठी – 500/-
SC/ST, माजी सैनिकांसाठी – फी नाही
पेमेंट मोड – डिमांड ड्राफ्ट (AIASL Recruitment 2023)

मिळणारे वेतन – रु. 17,520/- ते 32,200/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदाबाद, गुजरात

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 07-02-2023 ते 13-02-2023

मुलाखतीचा पत्ता – हॉटेल प्रिस्टाइन रेसिडेन्सी. विमानतळ रोड, S.V.P च्या पुढे इंटरनॅशनल, सरदारनगर, हंसोल, अहमदाबाद, गुजरात-382475

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.aiasl.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : भारतातील सर्वात उंच इमारत कोणती आणि कुठे आहे?

GK Updates 30 Jan

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सामान्य ज्ञान तुम्हाला सरकारी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देताना मदत करते.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण अचानक समोर आलेल्या प्रश्नामुळे (GK Updates) उमेदवारांचा गोंधळ उडतो. ऐनवेळी तुमचा गोंधळ उडू नये यासाठी आज आपण सामान्य ज्ञान वाढवणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत.

1. भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे?
A. आहुजा टॉवर्स
उत्तर – B. वर्ल्ड वन
C. इम्पीरियल
D. अँटिलिया

मुंबई मध्ये स्तिथ असलेले आणि २०२० मध्ये सुरु झालेले वर्ल्ड वन ही भारतातील सर्वात उंच इमारत आहे, या इमारतीची उंची 285 m म्हणजे 935 ft एवढी आहे.

2. सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात होतात?
A. चीन
B. नॉर्थ कोरिया
C. इराण
उत्तर – (GK Updates) D. जपान

जपान या देशामध्ये एका वर्षात सुमारे ५००० भूकंप होतात. पण जपान कडे असलेल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आजकाल जास्त जीवितहानी होत नाही.

3. एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात?
A. श्वसनसंस्था
B. चेतापेशी
उत्तर – C. श्वेतपेशी
D. अस्थिमज्जा

4. चांदी(Silver) या धातूचा अनुक्रमांक ४७ असून त्याचे रेणुसूत्र काय हे आहे?
उत्तर – A. Ag
B. AgNO3
C. AgCI (GK Updates)
D. PbO

5. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे?
A. मुंबई
उत्तर – B. वर्धा
C. नाशिक
D. नागपूर

6. प्रौढ माणसाच्या शरीरात किती रक्त असते?
A. २ ते ३ लिटर
B. ३ ते ४ लिटर
उत्तर – C. ५ ते ६ लिटर
D. ६ ते ७ लिटर
तर नवजात मुलाच्या अंगामध्ये फक्त १ वाटीभर म्हणजे २०० ग्राम भरेल एवढेच रक्त असते.

7. रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?
उत्तर – A. मलेरिया
B. क्षयरोग
C. मोतीबिंदू
D. नारू

8. अमावस्या व पोर्णिमेला येणार्‍या भरतीस —– म्हणतात.
A. भागाची भरती
B. ध्रुवीय भरती
उत्तर – C. उधाणाची भरती
D. विषुववृत्तीय भरती (GK Updates)
चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित चढ म्हणजे भरती व उतार म्हणजे ओहोटी. पौर्णिमेच्या आणि अमावास्येच्या रात्री समुद्राला सगळ्यात जास्त भरती येते. भरतीची वेळ व प्रमाण हे ऋतूनुसार कमी जास्त होत असते

9. कोणत्या देशामध्ये मध्ये फक्त ८२५ लोकच राहतात?
A. मकाऊ
B. मोनाको
उत्तर – C. वेटिकन सिटी
D. सैन मैरीनो
वेटिकन सिटी हे जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले देश आहे. ज्यामध्ये केवळ ८२५ लोकच राहतात.

10. तंबाखूमध्ये असणारा विषारी द्रव्य कोणता ?
A. निकोटस
B. निकोट
C. निकोलस (GK Updates)
उत्तर – D. निकोटीन

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : स्वतःला दिलेलं वचन असं केलं पूर्ण; मोलमजुरी करणाऱ्या आई वडिलांच्या लेकीने मिळवलं तब्बल 20 लाखाचं पॅकेज

Success Story of Ritika Surin

करिअरनामा ऑनलाईन । मनातील दुर्दम्य इच्छाशक्ति प्रत्येक मनुष्याला (Success Story) कोणत्याही अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते. असं ही म्हणतात की जगातील सर्व समस्या एका बाजूला आहेत आणि गरिबी दुसऱ्या बाजूला. घरातील बिकट परिस्थितीवर हिंमतीच्या जोरावर मात करणाऱ्या रितिका सुरीनची कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत.

आई करते घरकाम तर वडील आहेत शिपाई

रितिका सुरीनच्या आईचे नाव मेरी असून त्या घरकाम करतात; तर वडीलांचे नाव नवल असून ते एका कॉलेजमध्ये शिपाई आहेत. घराची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी (Success Story) त्यांनी मुलीच्या शिक्षणात कोणती कसर सोडली नाही.

कंपनीने दिले 20 लाखांचे पॅकेज (Success Story)

झारखंडची रहिवासी असलेली रितिका सुरीन ग्रेटर नोएडा येथील गलगोटिया विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. विद्यापीठात सुरू असलेल्या प्लेसमेंटमध्ये शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी रितिका हिला ऑटोडेस्क या मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीने 20 लाखांचे पॅकेज दिले आहे. विशेष म्हणजे कॅम्पस इंटरव्ह्यु च्या पहिल्याच टप्प्यात रितिकाची निवड झाली आहे. गरिबीत वाढलेल्या रितिकाच्या या यशामुळे तिचे कुटुंबीय खूप आनंदी झाले आहेत.

स्वतःला दिलेलं वचन केलं पूर्ण

रितिका म्हणाली, ‘माझी आई लोकांच्या घरात साफसफाईचे काम करते. तर वडील गलगोटिया कॉलेजमध्ये शिपाई म्हणून काम करतात. मी नेहमी दोघांना (Success Story) लोकांच्या घरी काम करताना पाहायचे. तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. माझ्या आई – वडिलांनी फक्त मला शिकता यावं म्हणून काबाड कष्ट केलं आहे.

रितिका पुढे म्हणाली, “मी स्वतःला वचन दिले होते. एक दिवस मी माझ्या वडिलांचे आणि आईचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करेन. आज मला एका मोठ्या Autodesk या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळाली आहे. या नोकरीबरोबर मला तब्बल 20 लाखांचे पॅकेज (Success Story) मिळालं आहे. या प्लेसमेंटने माझ्या आई आणि वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणला आहे; ज्याची मी वाट पाहत होते. मी मिळवलेल्या यशामुळे माझ्या आई बाबांचे सर्वत्र कौतुक होत असल्याने मला आनंद होत आहे.

विद्यार्थ्यांसाठी रितिका ठरली प्रेरणा (Success Story)

कॉलेजचे CEO ध्रुव गलगोटिया म्हणाले, ‘रितिकाचे आई आणि वडील तिने मिळवलेल्या यशामुळे प्रभावित झाले आहेत. विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांसाठीही रितिका प्रेरणा ठरली आहे. रितिकाला प्लेसमेंटमध्ये चांगले गुण मिळाले आहेत. रितिकाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन विद्यापीठाने तिला 50% शिष्यवृत्तीसह  अभ्यासक्रमाची पुस्तके मोफत दिली आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Radhika Merchant : अंबानी घराण्याची धाकटी सून राधिका मर्चंट कुठे आणि किती शिकली? इथे मिळेल माहिती…

Radhika Merchant

करिअरनामा ऑनलाईन । मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा (Radhika Merchant) राधिका मर्चंटशी साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडला आहे. आता हे दोघे लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. राधिक मर्चंटला यापूर्वीही अनंत अंबानींसोबत अनेकदा पाहिले गेले आहे. साखरपुड्याचा सोहळा पर पडल्यापासून राधिका मर्चंट सोशल मिडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राधिका मर्चंट कोण आहे? तिने कुठे आणि किती शिक्षण घेतले? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची कन्या (Radhika Merchant)

राधिका मर्चंट ही एक भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहे. आणि ती तिच्या पालकांसह एन्कोर हेल्थकेअर या फार्मास्युटिकल कंपनीच्या संचालक मंडळाचा एक भाग आहे. ती वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ असलेले त्यांचे वडील भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांपैकी एक आहेत.

या शाळेत शिकली

मर्चंट कुटुंब हे मूळचे गुजरातमधील कच्छ येथील आहे. राधिका मर्चंटचा जन्म 18 डिसेंबर 1994 रोजी मुंबईत झाला. मुंबईतील द कॅथेड्रल आणि जॉन (Radhika Merchant) कॉनन स्कूलमधून तिने सुरुवातीचे शिक्षण घेतले. यासोबतच बीडी सोमनी इंटरनॅशनल स्कूलमधून आयबी डिप्लोमा पूर्ण केला. यानंतर राधिकाने न्यूयॉर्क विश्वविद्यालयातून राजकारण आणि अर्थशास्त्रामध्ये डिग्री पूर्ण केली आहे.

राधिका आहे भरतनाट्यम् नृत्यांगना

राधिकाने आठ वर्षे भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आहे आणि ती श्री निभा आर्ट्सच्या गुरु भावना ठाकर यांची शिष्या आहेत. तिचा पहिला ऑन-स्टेज डान्स (Radhika Merchant) परफॉर्मन्स 5 जून रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरच्या ग्रँड थिएटरमध्ये पाहायला मिळाला. अंबानींची सून राधिका मर्चंट प्राण्यांच्या कल्याणासाठी देखील काम करते.

आमिर खान, सलमान खान, रणवीर सिंग, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, त्यांची दोन मुले आदित्य आणि तेजस ठाकरे (Radhika Merchant) यांच्यासह अनेक राजकीय आणि बॉलिवूडच्या दिग्गजांनी राधिका आणि अनंत यांच्या रोका सोहळ्याला हजेरी लावली होती.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ICAI CA Foundation Result : ICAI CA फाउंडेशन परीक्षेचे निकाल आज जाहीर होण्याची शक्यता; असा चेक करा निकाल

ICAI CA Foundation Result

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड (ICAI CA Foundation Result) अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) CA फाउंडेशन परीक्षेचे निकाल आज जाहीर करेल अशी शक्यता आहे. ICAI चे CCM धीरज खंडेलवाल यांच्या आधीच्या विधानानुसार, निकाल 30 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान जाहीर केला जाऊ शकतो. परीक्षा देणारे उमेदवार icai.org किंवा icai.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून निकाल तपासून डाउनलोड करू शकतात. हा निकाल चेक कसा करायचा आणि डाउनलोड कसा करायचा हे पाहूया.

ICAI CA फाउंडेशन डिसेंबर 2022 ची परीक्षा 14 ते 20 डिसेंबर दरम्यान घेण्यात आली होती. संस्थेने CA फाउंडेशन परीक्षेसाठी चार सत्रे आणि चार पेपर आयोजित केले होते. ICAI परीक्षेच्या निकालांसह CA फाउंडेशनसाठी टॉपर्सची यादी आणि उत्तीर्णांची टक्केवारी सुध्दा प्रसिद्ध करेल.

निकाल पाहण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा – (ICAI CA Foundation Result)

  1. प्रथम ICAI अधिकृत वेबसाइट icai.org किंवा icai.nic.in ला भेट द्या.
  2. CA फाउंडेशन निकाल डिसेंबर 2022 डाउनलोड लिंकवर क्लिक करा.
  3. रोल नंबर आणि पिन नंबर किंवा नोंदणी क्रमांक वापरून लॉग इन करा. (ICAI CA Foundation Result)
  4. ICAI CA फाउंडेशन डिसेंबर 2022 स्क्रीनवर दिसेल.
  5. निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी सेव्ह करा.

उमेदवारांना त्यांचे सीए निकाल नोंदणीकृत E-Mail आयडीद्वारे देखील प्राप्त होतील. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच गुणपत्रिका विद्यार्थ्यांसोबत शेअर केल्या जातील. CA इच्छूकांना 7 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाइन परीक्षा अर्ज विलंब शुल्काशिवाय सबमिट करण्याची (ICAI CA Foundation Result) परवानगी देण्यात आली होती आणि ऑनलाइन परीक्षा अर्ज विलंब शुल्कासह सबमिट करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2022 होती. संस्थेने सीए फाउंडेशनसाठी परीक्षा देखील पूर्ण केल्या आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com