ICAI CA Foundation Result : ICAI CA फाउंडेशन परीक्षेचे निकाल आज जाहीर होण्याची शक्यता; असा चेक करा निकाल

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड (ICAI CA Foundation Result) अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) CA फाउंडेशन परीक्षेचे निकाल आज जाहीर करेल अशी शक्यता आहे. ICAI चे CCM धीरज खंडेलवाल यांच्या आधीच्या विधानानुसार, निकाल 30 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान जाहीर केला जाऊ शकतो. परीक्षा देणारे उमेदवार icai.org किंवा icai.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून निकाल तपासून डाउनलोड करू शकतात. हा निकाल चेक कसा करायचा आणि डाउनलोड कसा करायचा हे पाहूया.

ICAI CA फाउंडेशन डिसेंबर 2022 ची परीक्षा 14 ते 20 डिसेंबर दरम्यान घेण्यात आली होती. संस्थेने CA फाउंडेशन परीक्षेसाठी चार सत्रे आणि चार पेपर आयोजित केले होते. ICAI परीक्षेच्या निकालांसह CA फाउंडेशनसाठी टॉपर्सची यादी आणि उत्तीर्णांची टक्केवारी सुध्दा प्रसिद्ध करेल.

निकाल पाहण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा – (ICAI CA Foundation Result)

  1. प्रथम ICAI अधिकृत वेबसाइट icai.org किंवा icai.nic.in ला भेट द्या.
  2. CA फाउंडेशन निकाल डिसेंबर 2022 डाउनलोड लिंकवर क्लिक करा.
  3. रोल नंबर आणि पिन नंबर किंवा नोंदणी क्रमांक वापरून लॉग इन करा. (ICAI CA Foundation Result)
  4. ICAI CA फाउंडेशन डिसेंबर 2022 स्क्रीनवर दिसेल.
  5. निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी सेव्ह करा.

उमेदवारांना त्यांचे सीए निकाल नोंदणीकृत E-Mail आयडीद्वारे देखील प्राप्त होतील. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच गुणपत्रिका विद्यार्थ्यांसोबत शेअर केल्या जातील. CA इच्छूकांना 7 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाइन परीक्षा अर्ज विलंब शुल्काशिवाय सबमिट करण्याची (ICAI CA Foundation Result) परवानगी देण्यात आली होती आणि ऑनलाइन परीक्षा अर्ज विलंब शुल्कासह सबमिट करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2022 होती. संस्थेने सीए फाउंडेशनसाठी परीक्षा देखील पूर्ण केल्या आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com