Success Story : स्वतःला दिलेलं वचन असं केलं पूर्ण; मोलमजुरी करणाऱ्या आई वडिलांच्या लेकीने मिळवलं तब्बल 20 लाखाचं पॅकेज

करिअरनामा ऑनलाईन । मनातील दुर्दम्य इच्छाशक्ति प्रत्येक मनुष्याला (Success Story) कोणत्याही अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते. असं ही म्हणतात की जगातील सर्व समस्या एका बाजूला आहेत आणि गरिबी दुसऱ्या बाजूला. घरातील बिकट परिस्थितीवर हिंमतीच्या जोरावर मात करणाऱ्या रितिका सुरीनची कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत.

आई करते घरकाम तर वडील आहेत शिपाई

रितिका सुरीनच्या आईचे नाव मेरी असून त्या घरकाम करतात; तर वडीलांचे नाव नवल असून ते एका कॉलेजमध्ये शिपाई आहेत. घराची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी (Success Story) त्यांनी मुलीच्या शिक्षणात कोणती कसर सोडली नाही.

कंपनीने दिले 20 लाखांचे पॅकेज (Success Story)

झारखंडची रहिवासी असलेली रितिका सुरीन ग्रेटर नोएडा येथील गलगोटिया विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. विद्यापीठात सुरू असलेल्या प्लेसमेंटमध्ये शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी रितिका हिला ऑटोडेस्क या मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीने 20 लाखांचे पॅकेज दिले आहे. विशेष म्हणजे कॅम्पस इंटरव्ह्यु च्या पहिल्याच टप्प्यात रितिकाची निवड झाली आहे. गरिबीत वाढलेल्या रितिकाच्या या यशामुळे तिचे कुटुंबीय खूप आनंदी झाले आहेत.

स्वतःला दिलेलं वचन केलं पूर्ण

रितिका म्हणाली, ‘माझी आई लोकांच्या घरात साफसफाईचे काम करते. तर वडील गलगोटिया कॉलेजमध्ये शिपाई म्हणून काम करतात. मी नेहमी दोघांना (Success Story) लोकांच्या घरी काम करताना पाहायचे. तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. माझ्या आई – वडिलांनी फक्त मला शिकता यावं म्हणून काबाड कष्ट केलं आहे.

रितिका पुढे म्हणाली, “मी स्वतःला वचन दिले होते. एक दिवस मी माझ्या वडिलांचे आणि आईचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करेन. आज मला एका मोठ्या Autodesk या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळाली आहे. या नोकरीबरोबर मला तब्बल 20 लाखांचे पॅकेज (Success Story) मिळालं आहे. या प्लेसमेंटने माझ्या आई आणि वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणला आहे; ज्याची मी वाट पाहत होते. मी मिळवलेल्या यशामुळे माझ्या आई बाबांचे सर्वत्र कौतुक होत असल्याने मला आनंद होत आहे.

विद्यार्थ्यांसाठी रितिका ठरली प्रेरणा (Success Story)

कॉलेजचे CEO ध्रुव गलगोटिया म्हणाले, ‘रितिकाचे आई आणि वडील तिने मिळवलेल्या यशामुळे प्रभावित झाले आहेत. विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांसाठीही रितिका प्रेरणा ठरली आहे. रितिकाला प्लेसमेंटमध्ये चांगले गुण मिळाले आहेत. रितिकाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन विद्यापीठाने तिला 50% शिष्यवृत्तीसह  अभ्यासक्रमाची पुस्तके मोफत दिली आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com