Home Blog Page 37

Job Alert : राजगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट येथे प्राध्यापकांसाठी नोकरीची संधी

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । प्राध्यापकांसाठी नोकरीची उत्तम संधी (Job Alert) निर्माण झाली आहे. राजगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट, धनकवडी, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – राजगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट, धनकवडी, पुणे
भरली जाणारी पदे –
1. प्राध्यापक
2. सहयोगी प्राध्यापक
3. सहायक प्राध्यापक
पद संख्या – 07 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑगस्ट 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

भरतीचा तपशील – (Job Alert)

पदपद संख्या 
प्राध्यापक01
सहयोगी प्राध्यापक02
सहायक प्राध्यापक04

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज करण्याची शेवटची (Job Alert) तारीख 27 ऑगस्ट 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
5. उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर अर्ज सादर करावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.rimrd.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UMED MSRLM Recruitment 2024 : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अंतर्गत ‘या’ पदावर मेगाभरती जाहीर; अर्ज सुरु

UMED MSRLM Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (UMED MSRLM Recruitment 2024) उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून राज्य संसाधन व्यक्तींचे (एसआरपी) वर्गीकरण पदांच्या एकूण 394 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका
भरले जाणारे पद – राज्य संसाधन व्यक्तींचे (एसआरपी) वर्गीकरण
पद संख्या – 394 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. पदवीधर/MSW/MBA (UMED MSRLM Recruitment 2024)
2. मराठी आणि MS ऑफिसचे ज्ञान आवश्यक
वय मर्यादा – 65 वर्षे

असा करा अर्ज (UMED MSRLM Recruitment 2024) –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.umed.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Update : तुम्हाला तुमच्या देशाची किती माहिती आहे? स्वातंत्र्य दिनी ‘या’ 10 प्रश्नांसह स्वतःची परीक्षा घ्या…

GK Update 14 Aug.

करिअरनामा ऑनलाईन । 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा (GK Update) स्वातंत्र्य दिवस. ही ती तारीख आहे जी समस्त भारतीयांसाठी सर्वात महत्त्वाची समजली जाते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यामागे मोठा इतिहास आहे. 15 ऑगस्टशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत ज्या प्रत्येक भारतीयाने जाणून घेतल्या पाहिजेत. तुम्हाला तुमच्या भारत देशाबद्दल किती माहिती आहे? हे तुम्ही ही प्रश्न मंजूषा वाचून जाणून घेऊ शकता. यंदाच्या स्वातंत्र्य दिनी 10 प्रश्नांसह स्वतःची चाचणी घ्या..

प्रश्न 1. 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण कोठे केले जाते?
1. इंडिया गेट
2. गेटवे ऑफ इंडिया
3. लाल किल्ला
उत्तर – लाल किल्ला (लाल किल्ला)
प्रश्न 2. भारताच्या ध्वजावर असणारे अशोक चक्र कशाचे प्रतीक आहे?
1. रवि
2. धर्मचक्र
3. शौर्य
उत्तर- धर्मचक्र (कायद्याचे चक्र)

प्रश्न 3. भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?
1. वंदे मातरम
2. जन गण मन
3. माँ तुझे सलाम (GK Update)
उत्तर- जन गण मन
प्रश्न 4. भारताचे राष्ट्रगीत जन गण मन कोणी लिहिले?
1. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय
2. रवींद्रनाथ टागोर
3. सरोजिनी नायडू
उत्तर- रवींद्रनाथ टागोर
प्रश्न 5. भारताच्या ध्वजाची रचना कोणी केली?
1. सुभाषचंद्र बोस
2. महात्मा गांधी (GK Update)
3. पिंगली व्यंकय्या
उत्तर – पिंगली व्यंकय्या

प्रश्न 6. अशोक चक्रात किती प्रवक्ते आहेत?
1. 20
2. 24 (GK Update)
3. 26
उत्तर – 24
प्रश्न 7. वंदे मातरम हे गाणे कोणी लिहिले?
1. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय
2. रवींद्रनाथ टागोर
3. सरोजिनी नायडू
उत्तर – बंकिमचंद्र चट्टोपाध्याय
प्रश्न 8. कोणत्या ब्रिटीश संसद कायद्यानुसार भारताला स्वातंत्र्य मिळाले?
1. भारत सरकार कायदा १९१९
2. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1935
3. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947
उत्तर- भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947

प्रश्न 9. भारत 2024 मध्ये कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे?
1. 78 वा
2. 77 वा
3. 76 वा
उत्तर – 2024 मध्ये आपण 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत.
प्रश्न 10. खालीलपैकी कोणती योजना भारताची फाळणी योजना म्हणून ओळखली जाते?
1. मॅकॉले योजना
2. माउंटबॅटन (GK Update) योजना
3. मॉन्टेगु-चेम्सफोर्ड सुधारणा
उत्तर – माउंटबॅटन योजना
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Recruitment : सरकारी सेवेतील ग्रुप्स A, B, C, D म्हणजे नक्की काय? सविस्तर माहिती घ्या…

Government Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी विभागातील भरती जाहीर (Government Recruitment) झाली की आपण पाहतो की अमुक विभागात ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C किंवा ग्रुप D पदाच्या भरतीविषयी. मग असा प्रश्न पडणं साहजिक आहे की या श्रेणीमध्ये नक्की कोणत्या पदांचा समावेश होतो? आज आपण या लेखातून सरकारी भरतीच्या विविध स्तराविषयी जाणून घेणार आहोत.

प्रथम ही लक्षात घ्यायला हवं की सरकारी क्षेत्रातील नोकऱ्या विविध ग्रूप्समध्ये विभागलेल्या असतात. यामध्ये ग्रुप्स A, ग्रुप्स B, ग्रुप्स C, ग्रुप्स D या विभागांचा समावेश आहे. भारतातील (Government Recruitment) सरकारी क्षेत्रातील नोकऱ्यांचे वर्गीकरण या चार श्रेणीमध्ये केले जाते. वेगवेगळ्या स्तराप्रमाणे वेगवेगळी पदे तसेच वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. या जबाबदाऱ्या आणि पदांनुसार या श्रेणी विभागल्या गेल्या आहेत. जर तुम्हीही सरकारी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असाल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

1. ग्रुप A (Government Recruitment)
सरकारी क्षेत्रातील ग्रुप A मध्ये विविध उच्च स्तरीय प्रशासनिक आणि व्यवस्थापनाची पदे असतात. जसं की, भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलिस सेवा (IPS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) तसेच इतर केंद्रीय सेवा आणि राज्य या सेवांचा समावेश आहे. धोरण आखणे, कार्यक्रम राबवणे तसेच प्रशासकीय निर्णय घेण्यासारखी महत्वपूर्ण कामे या श्रेणीतील अधिकारी करतात. या पदांवर बसण्यासाठी ती व्यक्ती उच्च शिक्षित असणे गरजेचे आहे. UPSC तसेच विविध राज्य स्तरीय परीक्षांच्या आधारे या पदांवर नियुक्ती केली जाते.

2. ग्रुप B
ग्रुप B पदांवर निरीक्षक, वरिष्ठ अधिकारी, व्यवस्थापक आणि (Government Recruitment) इतर पदांचा समावेश असतो. या श्रेणीतील पदाधिकारी देखरेख आणि प्रशासकीय कामांमध्ये तसेच व्यवस्थापनेमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. या क्षेत्रात पदाधिकाऱ्यांची निवड UPSC तसेच विविध राज्यस्तरीय परीक्षांच्या आधारे केली जाते. ग्रुप B पदावर स्थान मिळवण्यासाठी ग्रुप A च्या तुलनेत उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कमी असते.

3. ग्रुप C आणि ग्रुप D
सरकारी क्षेत्रातील ग्रुप C आणि ग्रूप D एकाच लेव्हलच्या (Government Recruitment) श्रेण्या असून, यातील पदाधिकाऱ्यांना ग्राउंड लेव्हलची आणि दैनंदिन कामकाज पहावे लागते. ग्रुप C आणि ग्रूप D या श्रेणीत लिपिक, टंकलेखक, स्टेनोग्राफर, कार्यालय सहाय्यक तसेच यांत्रिक अशा पदांचा समावेश असतो. या पदांच्या निवड प्रक्रियेत उमेदवारास कर्मचारी निवड आयोग (SSC) ची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. दरवर्षी या प्रत्येक श्रेणीतील पदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येते आणि उमेदवाराचे शिक्षण आणि कौशल्याआधारे निवड केली जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Business Success Story : दोन IIT पास तरुण… 2 BHK फ्लॅटमध्ये सुरु केली कंपनी; रंजक आहे Flipkart ची यशोगाथा..

Business Success Story of Flipkart

करिअरनामा ऑनलाईन । सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल (Business Success Story) हे दोघे फ्लिपकार्ट समुहाचे संस्थापक आहेत. त्यांची संपत्ती आता अब्जावधींच्या घरात आहे. दोघांनीही प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली (IIT Delhi) येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. हे दोघेही आयआयटी दिल्लीच्या 2005 च्या बॅचचे विद्यार्थी आहेत. फ्लिपकार्ट हे देशातील सर्वात मोठे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून पासून कपड्यांपर्यंत सर्व वस्तू एका क्लिकवर येथे उपलब्ध होतात आणि या वस्तु आपल्याला अगदी घरपोच मिळतात. फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी ही कंपनी कक्ष उभारली? त्यांना या व्यवसायात यश कसं मिळवता आलं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. पाहूया त्यांच्या रोमांचक आणि खडतर प्रवासाविषयी… वाचत रहा फ्लिपकार्टची यशोगाथा……

दोघेही आहेत उच्च शिक्षित.. IIT मधून घेतली डिग्री
सचिन आणि बिन्नी बन्सल हे IIT दिल्लीचे विद्यार्थी आहेत. हे दोघे जेव्हा आयआयटी दिल्लीतून उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांनी ऑनलाइन स्टोअर सुरू करण्याचा विचार केला. अनेकांना (Business Success Story) सचिन आणि बिन्नी भाऊ वाटतात; पण तसे नाही… योगायोगाने या दोघांचे आडनाव एकच आहे; पण हे दोघे भाऊ नसून मित्र आहेत.

फ्लिपकार्टची स्थापना अशी झाली (Business Success Story)
IIT ची डिग्री असूनही गुगलने बिन्नी बन्सल यांना दोनदा नोकरी नाकारली. यानंतर त्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट आला आणि त्यांनी मित्रासह व्यवसायात उडी घेतली. सचिन आणि बिन्नी दोघेही ऑनलाईन स्टोअर सुरू करण्याचा विचार करत होते. त्यांच्या कल्पनेला मूर्त स्वरूप आले आणि फ्लिपकार्टची सुरुवात ऑनलाइन बुकस्टोअर म्हणून झाली. बिन्नी आणि सचिन यांनी एकूण 2,71,000 रुपये जमा करून भांडवल उभे केलं आणि फ्लिपकार्टची स्थापना झाली.

अॅमेझॉनशी स्पर्धा
विशेष म्हणजे अॅमेझॉनचीही अशीच सुरुवात झाली आणि नंतर सर्व वस्तू ऑनलाईन विकायला सुरुवात केली. फ्लिपकार्टने ऑनलाईन बुकस्टोअर म्हणूनही सुरुवात केली आणि ही कंपनी भारतातील अॅमेझॉनची स्पर्धक कंपनी बनली.

2BHK फ्लॅटमधून सुरु केलं काम
2007 मध्ये फ्लिपकार्ट पहिल्यांदा बंगळुरूमध्ये एका छोट्या 2BHK फ्लॅटमध्ये सुरू करण्यात आली होती. सचिन बन्सल याने फ्लिपकार्टचे सीईओ म्हणून काम सुरू केले. तर बिन्नीने वेगाने वाढणाऱ्या ई-कॉमर्स वेबसाइटचे सीओओ पद स्वीकारले.
फ्लिपकार्ट भारतातील दुसरी युनिकॉर्न कंपनी आहे.

फ्लिपकार्टची यशस्वी घोडदौड
2012 मध्ये 150 दशलक्ष डॉलर उभारल्यानंतर, फ्लिपकार्ट लवकरच भारतातील दुसरी युनिकॉर्न कंपनी बनली. वॉलमार्टने कंपनीचे 77 टक्क्यांहून अधिक शेअर्स ताब्यात घेतल्यानंतर बिन्नी आणि सचिन या दोघांनीही कंपनी सोडली.

सचिन आणि बिन्नी बन्सल आहेत अब्जाधीश (Business Success Story)
वॉलमार्टने 16 अब्ज डॉलरच्या ऐतिहासिक करारात फ्लिपकार्टचे 77 टक्के शेअर्स खरेदी केले. इंटरनेट फर्मशी संबंधित हा सर्वात मोठा करार झाला. कॅश आऊट करून कंपनी सोडली तरीही सचिन आणि बिन्नी बन्सल अजूनही अब्जाधीश आहेत. सचिन बन्सल यांची एकूण मालमत्ता 1.3 अब्ज डॉलर आहे, जी भारतीय चलनात 10,648 कोटी रुपये आहे आणि बिन्नी बन्सल यांची एकूण संपत्ती 11,467 कोटी रुपये आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Machine Tool Prototype Factory Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड येथे नवीन भरती सुरू

Machine Tool Prototype Factory Recruitment 2024


करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या (Machine Tool Prototype Factory Recruitment 2024) शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड अंतर्गत सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ कार्यकारी, कार्यकारी, सल्लागार, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 21 दिवस (23 ऑगस्ट 2024) आहे.

संस्था – आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड
भरली जाणारी पदे –
1. वरिष्ठ कार्यकारी
2. कार्यकारी
3. सल्लागार
4. वरिष्ठ व्यवस्थापक
5. व्यवस्थापक
पद संख्या – 17 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 दिवस (23 ऑगस्ट 2024)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक/CO आणि HR, आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, HVF रोड, आवडी, चेन्नई – 600054

भरतीचा तपशील (Machine Tool Prototype Factory Recruitment 2024) –

पदपद संख्या 
वरिष्ठ कार्यकारी05
कार्यकारी06
सल्लागार01
वरिष्ठ व्यवस्थापक03
व्यवस्थापक02

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 दिवस (23 ऑगस्ट 2024) आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण (Machine Tool Prototype Factory Recruitment 2024) असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://avnl.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ITBP Recruitment 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल किचन सर्व्हिस पदाच्या 819 जागांवर भरती जाहीर

ITBP Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत (ITBP Recruitment 2024) रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) पदांच्या एकूण 819 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 02 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे.

संस्था – इंडो-तिबेट सीमा पोलीस दल
भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) (ITBP Constable Kitchen Service)
पद संख्या – 819 पदे (ITBP Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 02 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑक्टोबर 2024
वय मर्यादा – 18 ते 25 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10th passed and NSQF Level – 1 Course in Food Production / Kitchen.
मिळणारे वेतन – Rs. 21,700/– Rs. 69,100/- दरमहा
असा करा अर्ज (ITBP Recruitment 2024) –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
4. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.itbpolice.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC HSC Exam Date 2025 : सर्वात मोठी बातमी!! 10 वी, 12 वी च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर!! यावर्षी 8 ते 10 दिवस आधीच होणार पेपर

SSC HSC Exam Date 2025

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रातील इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या (SSC HSC Exam Date 2025) विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार महाराष्ट्रातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा यावर्षी 8 ते 10 दिवस आधीच होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे (SSC HSC Exam Date 2025) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे. तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी करत माहिती दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय (SSC HSC Exam Date 2025) मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात आयोजित केली जाते. या परीक्षांचा ऑनलाईन निकाल अनुक्रमे मे अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येतो. त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवडयापासून घेतली जाते.

नेहमीपेक्षा ८ ते १० दिवस आधी परीक्षा घेण्यास कारण…
विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने या परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचा सारासार विचार करून येत्या २०२५ ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी इ.१२वी आणि इ.१०वीची परीक्षा नेहमीपेक्षा ८ ते १० दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस आहे. या अनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षा ठरलेल्या तारखांना घेणार असल्याचे मंडळाने म्हटलं आहे.

लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा पुढीलप्रमाणे (SSC HSC Exam Date 2025) –
1. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी, २०२५ ते मंगळवार, दि १८ मार्च २०२५
2. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन – शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२५ ते सोमवार, १० फेब्रुवारी २०२५
3. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा – शुक्रवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२५ ते सोमवार दि. १७ मार्च, २०२५
4. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन – सोमवार, ०३ फेब्रुवारी २०२५ ते गुरूवार, २० फेब्रुवारी २०२५

शाळा / कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे (SSC HSC Exam Date 2025) नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेच्या वरीलप्रमाणे नियोजित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल. या तारखांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या शुक्रवार दि. २३.०८.२०२४ पर्यंत [email protected] येथे पाठवाव्यात; असं आवाहन मंडळाकडून करण्यात आलं आहे. या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही; असंही मंडळानं स्पष्ट केलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ISRO Free Course : शिका अगदी मोफत!! ISRO ने लाँच केला AI तसेच मशीन लर्निंग कोर्स; रजिस्ट्रेशन सुरू..

ISRO Free Course

करिअरनामा ऑनलाईन । ISRO ने AI तसेच मशीन लर्निंग कोर्स (ISRO Free Course) तयार केले आहेत. विशेष म्हणजे हे कोर्स पूर्णपणे मोफत असणार आहेत. AI तसेच मशीन लर्निंगविषयी जाणून घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. ज्यांना AI तसेच मशीन लर्निंग शिकायचे आहे अशा इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित रजिस्टर करायचं आहे कारण सीट्स मर्यादित आहेत.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने भारताचे नाव जगभरात पोहचवले आहे. भारताचा झेंडा चंद्रावर तसेच मंगळावर डौलाने फडकत आहे; याचे सर्व श्रेय ISRO ला आणि तेथील (ISRO Free Course) वैज्ञानिकांना जाते. दिवसेंदिवस तंत्रज्ञानात विकसीत हॉट असताना रोज नवनवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. आर्टीफिशीअल इंटेलिजन्सच्या (AI) या जगामध्ये गोष्टी अगदी सोप्या बनून गेल्या आहेत. अद्याप अनेक जणांना AI बद्दल फारशी माहिती नाही, पण जे AI बद्दल सगळंकाही जाणून आहेत, त्यांच्यासाठी अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत.

ISRO ने लाँच केले मोफत कोर्स (ISRO Free Course)
जर तुम्ही AI तसेच मशीन लर्निंगबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असाल तर ISRO ने तुमच्यासाठी मोठी संधी घेवून येत आहे. ISRO ने दि. १९ ऑगस्ट २०२४ ते २३ ऑगस्ट २०२४ दरम्यान कोर्स लाँच केले आहे, जे पूर्णपणे मोफत शिकता येणार आहेत. या कोर्समध्ये ISRO ची तज्ज्ञ मंडळी AI आणि मशीन लर्निंगबद्दल माहिती देणार आहेत. ISRO सारख्या संशोधन संस्थेतील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन लाभणे ही फार मोठी गोष्ट आहे.

कोर्ससाठी इथे करा रजिस्टर
5 दिवसांचा AI तसेच मशीन लर्निंग कोर्स पूर्णपणे मोफत असणार आहे. जर तुम्हाला या कोर्ससाठी रजिस्टर करायचे असल्यास प्रथम https //elearning.iirs.gov.in/edusatregistration या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. रजिस्ट्रेशन विंडो सुरु झाली असून कोर्ससाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत; त्यामुळे इच्छुक लोकांनी लवकरात लवकर रजिस्टर करायचे आहे. ज्या उमेदवाराची एकूण हजेरी ७०% असेल, त्याला ISRO मार्फत प्रमाणपत्रही देण्यात येईल. हे प्रमाणपत्र लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (LMS) येथे उपलब्ध असेल; येथूनच उमेदवार आपले प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : शिक्षण 12 वी.. कॉलेजला गेलेच नाहीत.. घर गहाण ठेवलं.. उभारली देशातील नंबर वन कंपनी

Career Success Story of Sanjiv Jain and Sandip Jain

करिअरनामा ऑनलाईन । घरची बेताची परिस्थिती, अपुऱ्या सोई सुविधा (Career Success Story) यामुळे अनेकांना प्रबळ इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही. अनेक जण शिक्षण अर्ध्यावर सोडून कमाईचा काहीतरी मार्ग निवडतात आणि संसाराचा गाडा ओढतात. संसाराच्या मागे धावता धावता अनेकांना आपल्या स्वप्नांना तिलांजली द्यावी लागते. पण अशातही काही जण गप्प बसत नाहीत. समाजात असेही अनेक लोक आहेत जे आहे त्या परिस्थितीशी सामना करून मोठी झेप घेतात आणि सर्वांसाठी आदर्श ठरतात. आज आपण अशाच एका व्यक्ती विषयी जाणून घेणार आहोत जे कधीही कॉलेजला गेले नाहीत. शिक्षण त्यांच्या प्रगतीच्या आड आले नाही. तरीही त्यांनी आज आपल्या कंपनीच्या माध्यमातून तब्बल 16 हजार जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

‘अकुम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स’ या देशातील आघाडीच्या औषधनिर्माण कंपनीच्या स्थापनेमागे मोठा इतिहास आहे. या कंपनीचे संस्थापक मालक संजीव जैन आणि संदीप जैन (Career Success Story) या दोन भावांनी छोट्या औषधाच्या दुकानापासून सुरुवात करत आज मोठी कंपनी उभारली आहे. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या औषधनिर्माण कंपनीच्या माध्यमातून १६ हजार जणांना रोजगार देखील मिळवून दिला आहे.

उभारली देशातील सर्वात मोठी औषधनिर्माण कंपनी
संजीव जैन आणि संदीप जैन असं या दोघा भावंडांचं नाव आहे. ते देशातील आघाडीची औषधनिर्माण कंपनी ‘अकुम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स’ या कंपनीचे मालक आहेत. तीन दशकांपूर्वी संजीव जैन आणि संदीप जैन हे भावंड आपल्या कुटुंबियांसोबत दिल्ली येथे भाड्याच्या घरात राहत होते. मात्र, आजच्या घडीला त्यांची कंपनी ‘अकुम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स’ ही देशातील सर्वात मोठी औषधनिर्माण कंपनी बनली आहे.

अशी झाली व्यवसायाला सुरुवात (Career Success Story)
संजीव जैन आणि संदीप जैन यांचे वडील 1961 साली रोहतक येथून दिल्लीला राहण्यासाठी आले होते. दोघा भावांनी 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला त्यांनी छोटे औषधांचे दुकान सुरू केले. विशेष म्हणजे दोघाही भावांना या व्यवसायात मोठे यश मिळाले. याच दुकानाच्या जोरावर 1991 मध्ये दोघा भावांनी दिल्लीत स्वतःचे घर घेतले. व्यवसायात प्रगती होत होती. त्यांच्या मनात आता दुकानाऐवजी औषधनिर्माण कंपनी सुरु करण्याचा विचार मनात आला. त्यांनी व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने अभ्यास केला आणि 2004 मध्ये पहिली कंपनी सुरू केली.

गुंतवणुकीसाठी घर गहाण ठेवलं
संजीव जैन आणि संदीप जैन यांनी हरिद्वार येथे आपली पहिली औषधनिर्माण कंपनी सुरु केली. विशेष म्हणजे त्याकाळी हरिद्वार परिसरात विशेष सोई सुविधा देखील नव्हत्या. या दोन भवांनी (Career Success Story) हिम्मत दाखवत केवळ 1.17 लाख रुपये गुंतवणुकीतून कंपनी उभी केली. हे पैसे जमवताना त्यांना आपले घर बँकेकडे गहाण ठेवावे लागले होते. या दोघांनी कधी मागे वळून पाहिले नाही. आज त्यांच्या एकूण १५ कंपन्या आहेत. ज्यामध्ये १२ कंपन्या या औषध निर्मिती करतात तर तीन कंपन्या या सक्रिय फार्मा घटक अर्थात एपीआयमध्ये कार्यरत आहेत.

16 हजार लोकांना दिली नोकरी (Career Success Story)
संदीप जैन आपल्या व्यवसायाविषयी सांगतात, की सध्याच्या घडीला ‘अकुम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स’ ही देशातील सर्वात मोठी फार्मास्युटिकल्स कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग संस्था आहे. इतकेच नाही तर स्वित्झर्लंडचा लोन्झा ग्रुपची एकच कंपनी या क्षेत्रात जगात अधिराज्य गाजवत आहे. त्यानंतर ‘अकुम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स’ कंपनी जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आजमितीला जैन यांच्या कंपनीमध्ये एकूण 16,000 लोक काम करत आहे. त्यापैकी 7,000 पर्मनंट कर्मचारी आहेत तर 9,000 कर्मचारी आउट सोर्स आहेत.

कंपनी करते 18 हजार प्रकारच्या औषधांवर काम
संजीव जैन आणि संदीप जैन यांच्या सर्व कारखान्यात गोळ्या, कॅप्सूलपासून (Career Success Story) इंजेक्शन, कुपी, ट्यूब मलम इत्यादी सर्व काही वस्तु तयार होतात. जैन बंधू सांगतात, सध्या त्यांचे कारखाने 18,000 प्रकारच्या औषधांवर काम करत आहेत. याशिवाय त्यांच्या ग्राहकांची संख्या 1500 इतकी आहे. याशिवाय देशातील टॉप 30 फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी 26 कंपन्या या ‘अकुम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स’ कंपनीच्या ग्राहक आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com