Home Blog Page 38

BOB Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत ‘या’ पदावर भरती; ऑनलाईन करा APPLY

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदा फायनान्शियल (BOB Recruitment 2024) सोल्यूशन लिमिटेड, मुंबई येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संपादन व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या भरती प्रक्रिया आणि अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड, मुंबई
भरले जाणारे पद – संपादन व्यवस्थापक (Editing Administrator)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024
वय मर्यादा – ४५ वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – MBA, Graduate/ Postgraduate with at least 5 years experience.
असा करा अर्ज – (BOB Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.bobfinancial.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करा.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
www.bobfinancial.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BECIL Recruitment 2024 : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सलटंट येथे विविध पदांसाठी भरती सुरू

BECIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सलटंट (BECIL Recruitment 2024) इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तंत्रज्ञ पदांच्या एकूण 68 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर..

संस्था – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सलटंट इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद –
1. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)
2. तंत्रज्ञ (Technician)
पद संख्या – 68 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री सुशील कृ. आर्य, प्रकल्प व्यवस्थापक (एचआर), ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (बीईसीआयएल), बीईसीआयएल भवन, C-56/A-17, सेक्टर-62, नोएडा-201307 (U.P)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2024

वय मर्यादा – 35 वर्षे
अर्ज फी – (BECIL Recruitment 2024)
1. सामान्य/ओबीसी/माजी सैनिक/महिला – रु.590.00
2. SC/ST/ EWS/PH – रु.295.00
भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
प्रयोगशाळा तंत्रज्ञ36 पदे
तंत्रज्ञ32 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रयोगशाळा तंत्रज्ञBachelor’s degree
तंत्रज्ञB.Sc. in OT Technology
OR
12th Class pass with science and 5 years regular service in the
grade of O.T.A. at AIIMS

मिळणारे वेतन –

पदवेतन
प्रयोगशाळा तंत्रज्ञRs.35,400/- दरमहा
तंत्रज्ञRs.35,400/- दरमहा

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत.
3. अर्जासोबत आवश्यक (BECIL Recruitment 2024) कागदपत्रे जोडा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे.
5. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट –
https://www.becil.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : पुण्यात नोकरी!! प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदावर भरती सुरु

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । इंदिरा ग्लोबल स्कूल ऑफ बिझनेस, पुणे (Job Alert) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – इंदिरा ग्लोबल स्कूल ऑफ बिझनेस, पुणे
भरली जाणारी पदे – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
पद संख्या – 20 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
26 ऑगस्ट 2024
भरतीचा तपशील – (Job Alert)

पदपद संख्या 
प्राध्यापक02
सहयोगी प्राध्यापक04
सहायक प्राध्यापक14

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या E-MAIL आयडी वरून अर्ज करायचा आहे.
3. उशिरा आलेले अर्ज विचारात (Job Alert) घेतले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 15 दिवसाच्या आत 26 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट –
https://indiraigsb.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DRDO Recruitment 2024 : डिग्री धारकांसाठी DRDO अंतर्गत सरकारी नोकरी; ‘या’ पदासाठी भरती सुरू

DRDO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (DRDO Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. DRDO वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर/डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – DRDO वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, अहमदनगर
भरली जाणारी पदे – पदवीधर/डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 52 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (DRDO Recruitment 2024)
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 12 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी32 पदे
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी20 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता (DRDO Recruitment 2024) –

पदशैक्षणिक पात्रता
पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थीDegree in Mechanical/Electrical/Automobile/Electronics/ Computer/General Stream
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थीDegree in Mechanical/Electrical/Automobile/Electronics/ Computer

मिळणारे वेतन –

पदवेतन
पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थीStipend – Rs 9,000/-
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थीStipend – Rs 8,000/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी (DRDO Recruitment 2024) अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.
5. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ITBP Recruitment 2024 : इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर भरती होण्याची मोठी संधी

ITBP Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंडो-तिबेटन सीमा पोलीस दल अंतर्गत (ITBP Recruitment 2024) भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 202 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – इंडो-तिबेट सीमा पोलीस दल
भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल
पद संख्या – 202 पदे (ITBP Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2024
वय मर्यादा – 18 ते 23 वर्षे

मिळणारे वेतन – (Level-3) Rs. 21,700/- ते 69,100/- दरमहा
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज (ITBP Recruitment 2024) –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती जोडणे आवश्यक आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे.
5. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.itbpolice.nic.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Update : ‘या’ चालू घडामोडी लक्षात ठेवा, सरकारी नोकरी मिळवण्यासाठी होईल फायदा

GK Update 12 Aug.

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 – रोहन बोपण्णाने टेनिसमधून निवृत्ती (GK Update) जाहीर केली आहे. तो कोणत्या राज्याचा आहे?
उत्तर – कर्नाटक
प्रश्न 2 – वैद्यकीय सेवा महासंचालक (सेना) म्हणून नियुक्त होणारी पहिली महिला कोण आहे?
उत्तर- साधना सक्सेना नायर

प्रश्न 3 – 2024 चा ‘व्ही व्यंकय्या एपिग्राफी’ पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
उत्तर- व्ही. वेदचलम (GK Update)
प्रश्न 4 – भारत 6 ते 14 ऑगस्ट दरम्यान बहुराष्ट्रीय हवाई सराव ‘तरंग शक्ती 2024’ च्या कोणत्या आवृत्तीचे आयोजन करत आहे?
उत्तर- प्रथम

प्रश्न 5 – पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये बॉक्सिंगमध्ये भारताचा सर्वात तरुण ऑलिम्पिक पंच बनून इतिहास कोणी रचला?
उत्तर- कर्नल कालिबन साई अशोक
प्रश्न 6 – कोणत्या मंत्रालयाने ऑगस्ट 2024 मध्ये युग युगीन भारत संग्रहालयावर राज्य परिषद आयोजित केली आहे?
उत्तर- सांस्कृतिक मंत्रालय

प्रश्न 7- राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- दि. १ ऑगस्ट (GK Update)
प्रश्न 8 – नुकतेच निधन झालेले अंशुमन गायकवाड हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर- क्रिकेट
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Cabinet Secretary : कॅबिनेट सचिव कोण असतात? काय आहेत त्यांच्या जाबाबदाऱ्या? जाणून घ्या…

Cabinet Secretary

करिअरनामा ऑनलाईन । श्री. टी. व्ही. सोमनाथन यांची पुढील (Cabinet Secretary) दोन वर्षांसाठी कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला कॅबिनेट सचिव कोण असतात आणि त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात याविषयी सांगणार आहोत.
वरिष्ठ आयएएस अधिकारी टीव्ही सोमनाथन यांची शनिवारी राजीव गौबा यांच्या जागी कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. श्री सोमनाथन, तामिळनाडू केडरचे 1987 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते केंद्रीय वित्त सचिव आणि खर्च सचिव म्हणून काम करत आहेत.

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने श्री टीव्ही सोमनाथन (Cabinet Secretary) यांची 30 ऑगस्ट 2024 पासून दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे. तथापि, कॅबिनेट सचिव कोण असतात आणि त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? जर माहीत नसेल तर आज आम्ही तुम्हाला या पदाबद्दल आणि या पदावर असलेल्या व्यक्तीच्या जबाबदाऱ्यांबद्दल सांगणार आहोत. अधिक माहिती घेण्यासाठी पुढे वाचा…

कॅबिनेट सचिव पद काय आहे? (Cabinet Secretary)
कॅबिनेट सचिव हे भारत सरकारच्या प्रशासकीय संरचनेतील सर्वोच्च पद आहे. हे पद एका वरिष्ठ IAS अधिकाऱ्यासाठी राखीव आहे आणि सामान्यतः देशातील सर्वात वरिष्ठ नागरी सेवक म्हणून हे पद ओळखले जाते. कॅबिनेट सचिवांचे कार्यालय पंतप्रधान कार्यालय (Prime Minister Office) अंतर्गत येते आणि या पदावर काम करणारी व्यक्ती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचे प्रमुख सल्लागार असतात. ते सरकारच्या प्रशासकीय कामकाजात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात.

कॅबिनेट सचिवांच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे –
1. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचे मुख्य सल्लागार – कॅबिनेट सचिव पंतप्रधान आणि इतर कॅबिनेट मंत्र्यांना प्रशासकीय बाबींवर सल्ला देतात.
2. मंत्रालये आणि विभागांचे निरीक्षण – कॅबिनेट सचिव विविध मंत्रालये आणि विभागांच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवतात आणि सरकारची धोरणे योग्यरित्या अंमलात आणली जात आहेत की नाही याची खात्री करतात.

3. आपत्ती व्यवस्थापन – राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून, कॅबिनेट सचिव आपत्तींबाबत सरकारच्या प्रतिसादात समन्वय साधतात. (Cabinet Secretary)
4. सरकारी धोरणांचा समन्वय – कॅबिनेट सचिव विविध मंत्रालये आणि विभागांमधील धोरणांचा समन्वय साधतात, जेणेकरून सरकारच्या कामकाजात एकसमानता राखली जाते.

5. कॅबिनेट बैठका आयोजित करणे – कॅबिनेट सचिव कॅबिनेट बैठकांचे आयोजन आणि नियोजन करतात. सर्व अजेंडांवर चर्चा होऊन महत्त्वाचे निर्णय घेतले जातील (Cabinet Secretary) याचीही ते खात्री देतात.
6. इतर प्रशासकीय कार्ये – कॅबिनेट सचिव हे सरकारच्या इतर प्रशासकीय कार्यांचे आणि विविध उच्च-स्तरीय समित्यांच्या कार्यांचे प्रमुख देखील असतात.

    अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

    Success Story : नोकरी न करता महिन्याला कमावते 1 लाख; फक्त 80 रुपयात केली होती व्यवसायाला सुरुवात

    Success Story

    करिअरनामा ऑनलाईन । टेक्स्टाइल इंजिनीअरची पदवी (Success Story) घेतल्यानंतरही या क्षेत्रात करिअर न करता नाज अंजुम यांनी वेगळी वाट शोधली. अंजुम नाज घरबसल्या दर महिन्याला सुमारे एक लाख रुपये कमावतात. एवढी शिकलेली तरुणी नेमकं काय करते. तिची आयडियाची कल्पना सत्यात कशी उतरली याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

    टेक्स्टाइल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर 2010 मध्ये नाज अंजुम यांनी लग्न केले. लग्नानंतर हैदराबादला आल्यानंतर अंजुम यांना त्यांच्यातील स्वयंपाकाचे कौशल्य उलगडले. त्यांनी होम फूड बिझनेस (क्लाउड किचन) सुरू केला आणि आज या माध्यमातून त्या लाखोंची कमाई करत आहेत. त्यांच्या शेजाऱ्यांना, विशेषत: त्याच्या इमारतीतील विद्यार्थ्यांना त्यांचे जेवण खूप आवडायचे.

    केवळ 80 रुपयातून केली व्यवसायाला सुरुवात (Success Story)
    शिक्षणाने टेक्स्टाइल इंजिनिअर असलेल्या नाज अंजुम यांनी हैदराबादमध्ये होम फूड बिझनेस (क्लाउड किचन) सुरू केला आणि आज त्या लाखोंची कमाई करत आहेत. विशेषत: त्यांच्या शेजाऱ्यांना आणि त्यांच्या इमारतीतील विद्यार्थ्यांना त्यांनी बनवलेले जेवण खूप आवडायचे. या सर्वांनी नाज यांना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. यानंतर अंजुम यांनी पुढे जायचं ठरवलं. त्यांनी अवघ्या 80 रुपयांपासून या व्यवसायाला सुरुवात केली. पण आता हाच व्यवसाय त्यांना दरमहा सुमारे एक लाख रुपये मिळवून देत आहे.

    असं सुरू झालं ‘अंजूम किचन’
    सुरुवातीला नाज अंजुम ज्या इमारतीत रहायच्या त्या इमारतीतील विद्यार्थी त्यांच्याकडून संध्याकाळचे मेसचे डबे घ्यायचे. अंजुम यांच्या हाताची चव सर्वांना आवउ लागली आणि हळूहळू त्यांच्या (Success Story) डब्यांची मागणी वाढत गेली. शेजाऱ्यांच्या पाठिंब्याने प्रेरित होऊन त्यांनी 2016 मध्ये घरातूनच ‘अंजूम किचन’ सुरू केले. अवघ्या 80 रुपयांच्या गुंतवणुकीत त्यांनी हा व्यवसाय सुरु केला. बिर्याणी बनवण्याच्या आवडीने त्यांना या व्यवसायात चांगला जम बसवता आला.

    मटण दम बिर्याणीची पहिली ऑर्डर
    2016 मध्ये रमजान महिन्यात शेजाऱ्यांच्या विनंतीवरून नाझ यांनी ‘डबल का मीठा’ आणि ‘लौकी हलवा’ सारखी मिठाई बनवण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांना HITEC सिटीमध्ये एका छोट्या पार्टीची पहिली ऑर्डर मिळाली. ती ऑर्डर होती मटण दम बिर्याणीची. ही बिर्याणी इतकी लोकप्रिय झाली की लवकरच त्यांना आणखी ऑर्डर येऊ लागल्या.

    ऑर्डर्समध्ये झाली वेगाने वाढ (Success Story)
    ‘अंजूम किचन’ हे कमी काळात हैदराबादमधील पहिल्या महिला क्लाउड किचनपैकी एक बनलं आहे. माऊथ पब्लिसिटी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत झाली. नाझ अंजुम यांनी टिफिन, बिर्याणी, पार्टी ऑर्डर आणि मिठाई या पदार्थांचा त्यांच्या मेनूमध्ये समावेश केला. त्यांच्यातील पाक कलेचे खूप कौतुक होवू लागले. अंजूम यांना लोकांनी सुरुवातीपासूनच प्रोत्साहन दिल्याने त्यांचे मनोबल वाढण्यास मदत झाली.

    पगारापेक्षा होते जास्त कमाई
    आज ‘अंजूम किचन’ एक यशस्वी क्लाउड किचन म्हणून नावारूपाला आले आहे. त्यांना दररोज 25 ते 50 ऑर्डर मिळतात. या माध्यमातून नाज दर महिन्याला सुमारे 1 लाख रुपये (Success Story) कमावतात. कोरोना लॉकडाऊन काळातही त्यांनी 500 हून अधिक ऑर्डर पूर्ण केल्या. त्या लोकांना घरचे बनवलेले हायजेनिक अन्न देण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब करतात. नाझ अंजुम यांचा टेक्स्टाइल इंजिनिअर ते यशस्वी क्लाउड किचनची मालक हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असा आहे.
    अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

    SSC Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! SSC अंतर्गत हिंदी ट्रान्सलेटर होण्याची संधी सोडू नका..

    SSC Recruitment 2024

    करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध (SSC Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अनुवाद अधिकारी, कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक या पदांच्या एकूण 312 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि वेतन याविषयी सविस्तर….

    संस्था – कर्मचारी निवड आयोग
    भरले जाणारे पद –
    1. कनिष्ठ अनुवादक अधिकारी
    2. कनिष्ठ हिंदी अनुवादक
    3. कनिष्ठ अनुवादक
    4. वरिष्ठ अनुवादक
    5. वरिष्ठ हिंदी अनुवादक
    अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
    अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2024
    आवश्यक शैक्षणिक पात्रता – Diploma, Degree

    मिळणारे वेतन – रु. 35,400/- ते 1,12,400/-
    वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे
    नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
    अर्ज फी (SSC Recruitment 2024) –
    1. Women/SC/ST/PWD/Ex – Nill
    2. इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-
    परीक्षेच्या तारखा –

    Dates for submission of online applications02.08.2024 to 25.08.2024
    Last date and time for receipt of online applications25.08.2024 (23:00 hours)
    Last date and time for making online fee payment26.08.2024 (23:00 hours)
    Date of”Window for Application Fonn  Correction” and online payment of Correction Charges.04.09.2024 to 05.09.2024 (23:00 hours)
    Schedule of Computer Based Examination (Paper-I)October-November, 2024

    आवश्यक शैक्षणिक पात्रता –
    1. ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)/ज्युनियर ट्रांसलेटर (JT)
    इंग्रजी विषयासह हिंदी (SSC Recruitment 2024) पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र
    2. सिनियर हिंदी ट्रांसलेटर (SHT)/सिनियर ट्रांसलेटर (ST)
    इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र

    असा करा अर्ज –
    1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
    2. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
    3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
    4. अपुर्ण अर्ज नाकारले जातील.
    5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.

    काही महत्वाच्या लिंक्स –
    अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
    ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
    अधिकृत वेबसाईट – https://ssc.gov.in/

    अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

    7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! महागाई भत्त्यात होणार ‘एवढी’ वाढ

    Job Alert

    करिअरनामा ऑनलाईन । सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने (7th Pay Commission) एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे. याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. सध्या या नोकरदार वर्गाला 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू झाली आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै 2024 पासून सुधारित होणार आहे.

    जुलैपासूनच्या महागाई भत्त्यात एवढी वाढ होणार
    एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता ठरवला जातो. जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरवला जाणार आहे. जुन 2024 पर्यंतची ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकांची आकडेवारी केंद्रीय कामगार मंत्रालयांकडून नुकतीच जाहीर (7th Pay Commission) करण्यात आली आहे. यामुळे आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता कितीने वाढणार हे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून जारी झालेल्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार जुलैपासूनचा महागाई भत्ता हा 53.44% एवढा होणार आहे. मात्र प्रत्यक्षात महागाई भत्त्यात तीन टक्क्यांचीच वाढ होणार आहे म्हणजे हा भत्ता 53% एवढा होणार आहे. असे असले तरी याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नाही. याबाबतचा निर्णय हा केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे.

    कॅबिनेटच्या बैठकीत होणार निर्णय (7th Pay Commission )
    ऑक्टोबर महिन्यात केंद्रातील मोदी सरकार कॅबिनेटची एक महत्त्वाची बैठक घेईल आणि यामध्ये महागाई भत्ता वाढीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. अर्थातच ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना ५३ टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे.

    जानेवारी ते जून महिन्याची SICPI आकडेवारी अशी आहे
    – जानेवारी महिन्यात एआयसीपीआयचे निर्देशांक 138.9 होते अन महागाई भत्ता दर 50.84% होते.
    – फेब्रुवारीमध्ये हे निर्देशांक १३९.२ अन (7th Pay Commission) महागाई भत्ता दर 51.44% होते. मार्च महिन्यात हे निर्देशांक 138.9 अन महागाई भत्ता दर 51.95% होते.
    – एप्रिल महिन्यात हे निर्देशांक 139.4 अन महागाई भत्ता दर 52.43% होते.
    – मे महिन्यात हे निर्देशांक 139.90 अन DA दर 52.91 एवढे होते.
    – जून महिन्यात निर्देशांक 141.4 अन महागाई भत्ता दर 53.44% एवढे होते.

    फरकाची रक्कमही मिळणार
    हा भत्ता जुलै महिन्यापासून लागू राहणार असल्याने ऑक्टोबर (7th Pay Commission) महिन्याच्या पगारांसोबत महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळणार आहे.
    अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com