Home Blog Page 368

Rail Coach Factory Recruitment : रेल्वेचे कोच बनवणाऱ्या फॅक्टरीत मेगाभरती!! 10 वी पास करू शकतात अर्ज

Rail Coach Factory Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । रेल कोच फॅक्टरी येथे लवकरच काही जागांसाठी (Rail Coach Factory Recruitment) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती असणार आहे.  या भरतीच्या माध्यमातून एकूण 550 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2023 आहे.

संस्था – रेल कोच फॅक्टरी

भरले जाणारे पद – (Rail Coach Factory Recruitment)

शिकाऊ उमेदवार (Apprentice)

पद संख्या – 550 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – 

  1. उमेदवारांनी संबंधित पदांनुसार 10वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तसंच उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. (Rail Coach Factory Recruitment)
  3. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  4. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया –

  1. 10वी आणि ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी
  2. दुसऱ्या टप्प्यात दस्तऐवज पडताळणी (Rail Coach Factory Recruitment)
  3. तिसऱ्या टप्प्यात वैद्यकीय चाचणी

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (Rail Coach Factory Recruitment)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://rcf.indianrailways.gov.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – https://rcf.indianrailways.gov.in/view_section.jsp?lang=0&id=0,296,640 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Mantra : ग्रॅज्युएशननंतर असं सेट करा करिअर; ‘हे’ कोर्स तुम्हाला देतील भक्कम करिअर आणि बक्कळ पैसा

Career Mantra (3)

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या डिजीटल युगात शिक्षण पद्धतीही (Career Mantra) दिवसेंदिवस बदलताना दिसत आहेत. ग्रज्युएशन झाल्यानंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावं, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. दिवसेंदिवस काही क्षेत्रात अभ्यासक्रमही बदलत असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. बदलत्या काळानुसार प्रत्येकाने करिअरमध्ये वाटचल करताना स्वत:ला अपडेट ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. ग्रॅज्युएशनचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करिअरच्या बाबतीत कोणते निर्णय घ्यावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण काळजी करण्याची आता गरज नाही. कारण ग्रॅज्युएशननंतर प्रोफेशनल कोर्स तुम्ही करु शकता. आम्ही तुम्हाला अशा कोर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांना पूर्ण केल्यावर तुमचं करिअर सेट होण्याबरोबरच भरपूर पैसा कमवण्याची संधी तुम्हाला मिळू शकते.

1. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (Artificial Intelliegence – AI)

बदलत्या काळाचा विचार करुन तुम्ही जर आर्टिफिशियल इंटेलिजेंस क्षेत्राशी संबंधित कोर्स केला, तर तुमचं करिअर सेट होऊ शकतं. तंत्रज्ञान क्षेत्रात (Career Mantra) AI तज्ज्ञांना मोठी मागणी असते. तुम्ही या क्षेत्रात डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स करु शकता. तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या हे कोर्स ऑफर करतात.

Career Mantra

2. डेटा सायन्स (Data Science)

तुम्हाला चांगली नोकरी मिळवायची असल्यास तुम्ही डेटा सायन्सचा कोर्सही करु शकता. या कोर्सच्या अभ्यासक्रमात डेटा सायन्स, मशीन लर्निंग कौशल्ये आणि तंत्रे काशी वापरायची, याबाबत शिकवलं जातं. डेटा सायन्सच्या कोर्सला मोठी मागणी आहे. कारण (Career Mantra) या कोर्सच्या माध्यमातून डेटा सायन्सच्या समस्या सोडवता येतात. या कोर्सला खूप मागणी असल्यामुळं चांगली नोकरा शोधणं अधिक सोपं होईल.

Career Mantra

3. पीएमपी सर्टिफिकेशन (PMP Certification)

पीएमपी कोर्सलाही वाढती मागणी असल्यामुळं (Career Mantra) हा कोर्स करणं करिअरबाबतीत फायदेशीर ठरू शकतं. PMP म्हणजे Project Management Professional. या सर्टिफिकेशन कोर्सचा अभ्यासक्रम खूप महत्वाचा आहे. या अभ्यासक्रमानुसारच तुम्हाला करिअरमध्ये संधी प्राप्त होतात. या प्रमाणपत्रात मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स,आयटी, हेल्थ केअर आणि अन्य काही महत्वाच्या क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात.

Career Mantra

4. डिजीटल मार्केटिंग (Digital Marketing) (Career Mantra)

मार्केटिंगमध्ये करिअर करणं काही क्षेत्रात फायदेशीर ठरू शकतं. विशेषत: डिजीटल मार्केटिंगला खूपच मागणी आहे. तुम्हाला आवड असेल तर तुम्ही या डीजीटल कोर्स करण्याला प्राधान्य देऊ शकता. हा कोर्स करिअर सेट होण्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. यामध्ये एसइओ ऑडिटिंग, पीपीसी, सोशल मीडिया स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग, मोबाईल अॅडव्हर्टायझिंग अशाप्रकारच्या गोष्टी अनेक गोष्टी शिकायला मिळतात. तसेच या व्यवसायाला प्रचंड मागणी आहे.

Career Mantra

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC HSC Exam 2023 : बोर्डाच्या विद्यार्थ्यांनो सावधान!! परीक्षेत कॉपी केली तर भोगावी लागेल ‘ही’ शिक्षा

SSC HSC Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (SSC HSC Exam 2023) मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी काही नियम जारी करण्यात आले आहेत. पेपर दिवशी विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात 10:30 आणि दुपारच्या 02:30 वाजल्यानंतर परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे परीक्षेवेळी गैरप्रकार केल्यास संबंधित विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करण्यासोबतच पुढील परीक्षेसाठी प्रतिबंधित करण्यात येईल आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; तर दहावीची परीक्षा दोन मार्चपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर, परीक्षेसंदर्भातील विद्यार्थ्यांसाठीच्या (SSC HSC Exam 2023) सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि ओळखपत्र परीक्षेच्या प्रत्येक दिवशी सोबत ठेवणे आवश्यक आहे. ओळखपत्र आणि प्रवेशपत्राची मागणी केल्यावर दाखवता आले पाहिजे, असे नमूद करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना काही सवलती दिल्या होत्या. त्यात शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातच परीक्षा केंद्र, परीक्षेसाठी पंधरा मिनिटे ते अर्धा तास अतिरिक्त वेळ आदींचा समावेश करण्यात आला होता. मात्र, यंदापासून नियमित पद्धतीने (SSC HSC Exam 2023) परीक्षा होणार असल्याने या सर्व सवलती रद्द करण्यात आल्या आहेत, असे सांगण्यात आले आहे. या सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शक्य झाल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला नियमावलीची प्रत उपलब्ध करून द्यावी. विद्यार्थ्याची स्वाक्षरी घेऊन ती प्रत दप्तरी ठेवावी, असेही ओक यांनी सांगितले आहे.

थोडक्यात महत्वाचे – (SSC HSC Exam 2023)

बारावीची परीक्षा मंगळवार २१ फेब्रुवारी २०२३ ते मंगळवार २१ मार्च २०२३ या काळात होईल, तर दहावीची परीक्षा गुरुवार २ मार्च २०२३ ते शनिवार २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडतील. यंदा परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमांवर होणार आहेत. ज्यादाचा वेळ मिळणार नाही. कोरोनापूर्वी जशा परीक्षा होत होत्या तशाच परीक्षा होणार आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BSF Recruitment 2023 : भारताच्या Border Security Force मध्ये भरती सुरु; पात्रता फक्त 10वी/ 12वी

BSF Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । सीमा सुरक्षा दलमध्ये विविध रिक्त पदांच्या (BSF Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) आणि कॉन्स्टेबल (केनेलमन) पदाच्या एकूण 26 जागा भरल्या जाणार आहेत.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था –  सीमा सुरक्षा दल (Border Security Force)

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

पद संख्या – 26 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2023

भरती प्रकार – सरकारी

भरले जाणारे पद – (BSF Recruitment 2023)

  1. हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) – 18 पदे
  2. कॉन्स्टेबल (केनेलमन) – 8 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) – उमेदवार १२ वी उत्तीर्ण आणि व्हेटनरी स्टॉक असिस्टंट कोर्स असावा.
  2. कॉन्स्टेबल (केनेलमन) – उमेदवार १० वी उत्तीर्ण आणि सरकारी पशुवैद्यकीय प्राणी हॉस्पिटल किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय कॉलेज किंवा सरकारी फार्म चा अनुभव असावा. (BSF Recruitment 2023)

मिळणारे वेतन –

हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) – ₹२५५००/- ते ₹८११००/- दरमहा

कॉन्स्टेबल (केनेलमन) – ₹२१७००/- ते ₹६९१००/- दरमहा

वय मर्यादा –

कमीत कमी – १८ वर्ष
जास्तीत जास्त – २५ वर्ष (BSF Recruitment 2023)

अर्ज/परीक्षा फी –

Open/OBC/EWS – ₹१००/-
SC/ST – फि नाही
PWD/ Female – फि नाही

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा सीमा सुरक्षा दल च्या अधिकृत वेबसाईट bsf.gov.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक २० फेब्रुवारी २०२३ आहे. (BSF Recruitment 2023)
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://bsf.gov.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : रयत शिक्षण संस्थेत ‘या’ पदावर भरती सुरु; या E-Mail ID वर करा अर्ज 

Job Notification (24)

करिअरनामा ऑनलाईन । रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत शकुंतला (Job Notification) रामशेठ ठाकूर विद्यालयात विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 54 जागा भरल्या जाणार आहेत.  भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन E-Mail पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – रयत शिक्षण संस्था, सातारा

भरली जाणारी पदे – (Job Notification)

  1. Principal
  2. Co Ordinator
  3. Teachers
  4. Sport Teacher
  5. Computer Teacher (Job Notification)
  6. ATD /Craft Teacher
  7. Music Teacher
  8. Pre – Primary Teacher

पद संख्या – 54 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – पनवेल तहसील

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन E-Mail

E-Mail ID – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2023

असा करा अर्ज –

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 Feb 2023 आहे.

निवड प्रक्रिया – मुलाखत

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. (Job Notification)
  2. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.

महत्वाचे – मुलाखतीची तारीख, वेळ, आपणास लवकरच फोन व आपल्या ई-मेल आयडीवर कळविले जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –

Rayat Shikshan Sanstha

अधिकृत वेबसाईट – rayatshikshan.edu

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त सोने वापरतात?

GK Updates 2 Feb

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सामान्य ज्ञान तुम्हाला सरकारी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देताना मदत करते.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण अचानक समोर आलेल्या प्रश्नामुळे (GK Updates) उमेदवारांचा गोंधळ उडतो. ऐनवेळी तुमचा गोंधळ उडू नये यासाठी आज आपण सामान्य ज्ञान वाढवणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत.

प्रश्न : इंद्रधुष्यात पहिला रंग कोणता असतो?
उत्तर : लाल

प्रश्न : कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त सोने वापरतात?
उत्तर : भारत (GK Updates)

प्रश्न : भारतातील कोणत्या बँकेच्या शाखा सर्व देशात आहेत?
उत्तर : स्टेट बँक ऑफ इंडिया

प्रश्न : युरोप खंडात किती देश आहेत?
उत्तर : ५१ देश आहेत

प्रश्न : भारतातील सर्वात विषारी साप कोणता आहे?
उत्तर : परोड साप

प्रश्न : कोणता पक्षी उडू शकत नाही?
उत्तर : शहामृग पक्षी (GK Updates)

प्रश्न : भारतातील कोणत्या राज्यात सोनेरी माकड आढळतात?
उत्तर : आसाम

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC News : ‘नवीन अभ्यासक्रम यंदाच्या वर्षी पासूनच लागू करा’; या मागणीसाठी उद्या पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन

MPSC News (1)

करिअरनामा ऑनलाईन |  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेळोवेळी घेतलेल्या (MPSC News) निर्णयामुळे MPSCची तयारी करणारे विद्ययार्थ, आयोग आणि राज्य सरकार यांच्यामध्ये नेहमी संघर्ष पहायला मिळतो. दोन दिवसांपूर्वी वर्णनात्मक पॅटर्न 2023 नव्हे तर 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी MPSC च्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन छेडून आपल्या मागण्या मान्य केल्या होत्या. पण आता वर्णनात्मक अभ्यासक्रमाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नवीन अभ्यासक्रम यंदाच्या वर्षी पासूनच लागू करावा या मागणीसाठी MPSC चे विद्यार्थी उद्या दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता अलका टॉकीज चौकात आंदोलन करणार आहेत.

आयोगाने जाहीर केलेल्या नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे ज्या उमेदवारांनी वर्षभर अभ्यास केला आहे; त्यांचं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आम्ही नवीन बदलानुसार (MPSC News) अभ्यास केला असून आमचे शैक्षणिक नुकसान होवू नये यसाथही नवीन अभ्यासक्रम यंदाच्या वर्षी पासूनच लागू करावा; अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी उद्या पुण्यात MPSC चे विद्यार्थी तीव्र आंदोलन छेडणार आहेत.

दरम्यान UPSC प्रमाणे आता MPSC परिक्षेत देखील वर्णनात्मक पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. हा वर्णनात्मक पॅटर्न 2023 नव्हे तर 2025 पासून लागू करावा यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. यावर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली होती. नुकत्याच (MPSC News) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतर मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या निर्णयाला तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती देण्यात आली होती. पण आता अभ्यासक्रमातील नवीन बदलांचा मुद्दा पुनः ऐरणीवर आल्यामुळे नवीन बदलाप्रमाणे अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Recruitment 2023 : संघ लोकसेवा आयोगाने केली मेगाभरतीची घोषणा!! ‘या’ पदांसाठी 1105 जागा भरणार

UPSC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोगने विविध रिक्त पदांवर (UPSC Recruitment 2023) भरतीची घोषणा केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 1105 जागा भरल्या जाणार आहेत. नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 साठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2023 आहे.

आयोग – संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Comission)

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2023

पद संख्या – 1105 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार – सरकारी

भरले जाणारे पद – (UPSC Recruitment 2023)

नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 – 1105 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

वय मर्यादा –

कमीत कमी – 21 वर्ष
जास्तीत जास्त – 32 वर्ष

अर्ज फी 

Open/OBC/EWS: ₹१००/-
SC/ST: फि नाही (UPSC Recruitment 2023)
PWD/ Female: फि नाही

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा संघ लोकसेवा आयोग च्या अधिकृत वेबसाईट www.upsc.gov.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक २१ फेब्रुवारी २०२३ आहे. (UPSC Recruitment 2023)
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स – (UPSC Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.upsc.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Sonam Wangchuk : ‘3 इडियट्स’मध्ये आमिर खानने साकारलेल्या ‘रँचो’चा लडाख वाचवण्यासाठी लढा; 2 डिग्री तापमानात केलं उपोषण 

Sonam Wangchuk

करिअरनामा ऑनलाईन । सुप्रसिद्ध ‘3 इडियट्स’ चित्रपटात आमीर खानने (Sonam Wangchuk) रँचोची भूमिका साकारली. खऱ्या आयुष्यातील अभियंता सोनम वांगचुक सध्या लडाख वाचवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून 2 डिग्री तापमानात उपोषण करत आहे. लडाखच्या लोकांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोनम वांगचुक यांनी २६ जानेवारी पासून १८,३८० फूट उंच खारदुंगला येथे उपोषणाची घोषणा केली होती. त्यांच्या मागण्यांमध्ये राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीचा विस्तार आणि अनियंत्रित औद्योगिकीकरण आणि व्यावसायिक विस्तारापासून पर्यावरणाचे रक्षण करणे यांचाही समावेश आहे. सोनम वांगचुक यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 244 च्या सहाव्या अनुसूचीनुसार मी हिमालय, ग्लेशियर, लडाख आणि तेथील लोकांना वाचवण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी उपोषण केले आहे.

दुसरीकडे सोनम वांगचुक यांनी आरोप केला आहे; की त्यांना त्यांच्या संस्थेत नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. मात्र, पोलिसांनी वांगचुक यांचा आरोप फेटाळून लावला आहे. पोलिसांनी सांगितले की, वांगचुक यांना खारदुंगला पास येथे पाच दिवसांचे उपोषण सुरू करण्यापासून (Sonam Wangchuk) रोखण्यात आले. मीडिया वृत्तानुसार, लेह आणि कारगिलमधील प्रमुख राजकीय पक्ष, सामाजिक आणि धार्मिक गट आणि विद्यार्थी संघटना सोनम वांगचुकच्या मागण्यांच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत. लेहचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक पी.डी. नित्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, वांगचुक यांना प्रशासनाने खारदुंगला पास येथे पाच दिवसांच्या उपोषणाला जाण्याची परवानगी दिली नाही कारण तेथील तापमान उणे ४० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

TET Exam Date : शिक्षकांसाठी मोठी बातमी!! TET परीक्षा 22 फेब्रुवारीपासून होणार सुरु

TET Exam (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात शिक्षक भरतीसाठी आवश्यक (TET exam date) असणारी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (TET) 22 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यान ‘IBPS’ कंपनीमार्फत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना 8 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली आहे.

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधील शिक्षणसेवकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय 2017 मध्ये घेण्यात (TET Exam) आला. त्यासाठी ‘पवित्र’ पोर्टल तयार केले त्याचवेळी सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा ही चाचणी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, डिसेंबर 2017 नंतर राज्यात पुन्हा कधीही संबंधित परीक्षा घेण्यात आली नव्हती. परंतु, आता या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसे आणणार? (TET exam date)

या परीक्षेसाठी दिलेल्या मुदतीमध्ये उमेदवारांना अर्जासोबत नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. आठ दिवसांत हे प्रमाणपत्र आणायचे कुठून, असा प्रश्न हे उमेदवार उपस्थित करीत आहेत. यामुळे अनेकजण अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

थोडक्यात महत्वाचे –

  1. राज्य परीक्षा परिषदेमार्फत घोषित केलेल्या या परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी असून, अर्ज करताना तीन जिल्हा परीक्षा केंद्रांची निवड करावी लागणार आहे. (TET Exam)
  2. अराखीव गटासाठी ९५० रुपये आणि राखीव गटासाठी ८५० रुपये शुल्क असून, परीक्षेसाठी प्रवेशपत्र १५ फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहे.
  3. मराठी, इंग्रजी, उर्दू या माध्यमात परीक्षा देता येणार असून, मराठी आणि इंग्रजीचे भाषिक क्षमतेवरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील .
  4. राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जानेवारीला (TET Exam) या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली असून, ८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com