Home Blog Page 367

Banking Jobs : पदवीधर असाल तर आजच अर्ज करा; साउथ इंडियन बँकेत ‘या’ पदावर भरती सुरु

Banking Jobs (8)

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी (Banking Jobs) आनंदाची बातमी आहे. साउथ इंडियन बँकेत ‘प्रोबेशनरी लिपिक’ पदासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2023 आहे.

बँक – साउथ इंडियन बँक

भरले जाणारे पद – प्रोबशनरी लिपिक

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Jobs)

60% गुणांसह कला/विज्ञान/वाणिज्य/इंजिनिअरिंग पदवी (X/SSLC, XII/ HSC/डिप्लोमा/पदवी किमान 60% गुण)

वय मर्यादा – 31 जानेवारी 2023 रोजी 26 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी – जनरल 800/- [SC/ST: ₹200/-]

मिळणारे वेतन – 17900 – 1000/3 – 20900 – 1230/3 – 24590 – 1490/4 – 30550 -1730/7 – 42660 – 3270/1 – 45930 – 1990/1 – 47920

नोकरी करण्याचे ठिकाण –

गुजरात, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान & दिल्ली NCR (Banking Jobs)

निवड प्रक्रिया –

  1. परीक्षा (online)
  2. ऑनलाइन चाचणी आणि मुलाखत
  3. ऑनलाइन चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रारंभिक शॉर्टलिस्टिंग केले जाईल.
  4. अंतिम निवड ऑनलाइन चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी मिळालेल्या एकत्रित गुणांवर आधारित असेल. (Banking Jobs)

परीक्षेची तारीख – 18 फेब्रुवारी 2023

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.southindianbank.com/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy Recruitment : 10 वी उत्तीर्णांसाठी खुशखबर!! Indian Navy मध्ये ‘या’ पदावर भरती सुरु; इथे करा APPLY

Indian Navy Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय नौदलात रिक्त पदांच्या भरतीसाठी (Indian Navy Recruitment) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रेड्समन स्किल्ड पदाच्या एकूण 248 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 7 फेब्रुवारी पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2023 आहे.

संस्था – भारतीय नौदल (Indian Navy)

भरले जाणारे पद – ट्रेड्समन स्किल्ड

पद संख्या – 248 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 7 फेब्रुवारी 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Indian Navy Recruitment)

10वी उत्तीर्ण+संबंधित ट्रेड मध्ये ITI (इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इलेक्ट्रोप्लेटर/फिटर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मशीनिस्ट/मेकॅनिक/संप्रेषण उपकरणे देखभाल) किंवा 10वी उत्तीर्ण+अप्रेंटिस ट्रेनिंग
वयाची अट: 06 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी – जनरल/ओबीसी 250/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत (Indian Navy Recruitment)

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Tips : करिअरमध्ये उंची गाठण्यासाठी टॅलेंटच नाही तर ‘या’ गोष्टीही ठरतात फायद्याच्या; आजपासून फॉलो करा टिप्स

Success Tips (6)

करिअरनामा ऑनलाईन । कोणत्याही क्षेत्रात करिअर घडवायचं असेल (Success Tips) तर त्या क्षेत्राबद्दलची संपूर्ण माहिती असणं आवश्यक असतं. यानंतर एकदा नोकरी लागल्यानंतर त्या क्षेत्रात टिकून राहण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची स्पर्धा सुरु होते. मात्र यामध्ये अनेकजण चुकीचे ठरतात. कित्येकांना हे जमत नाही. जर तुम्हाला करिअरमध्ये सतत समोर जात राहायचं असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या केल्यानंतर तुम्ही करिअरमध्ये कधीच मागे वळून पाहणार नाही; तर तुम्ही सतत प्रगती करत रहाल.

1. टेक्नो फ्रेंडली व्हा (Success Tips)

उत्तम करिअरसाठी तुम्हाला टेक्नो फ्रेंडली असण्याची गरज आहे. आज स्पर्धा इतकी वाढली आहे की नवीन तंत्रज्ञान आपण नाकारू शकत नाही. तुमच्या क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञानाचे चांगले ज्ञान तुमच्याकडे असायलाच हवे. यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शिकत राहणे गरजेचे आहे.

2. इतरांशी सन्मानाने वागा

तुमची इतरांशी वागणूक हा तुमचा आरसा आहे, त्यामुळे इतरांशी चांगले वागायला शिका. तुम्ही लोकांशी चांगले वागलात तर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतात. याशिवाय (Success Tips) तुमची चांगली वागणूक तुमच्यासाठी प्रगतीचा मार्ग उघडते, त्यामुळे इतरांशी चांगले वागायला शिका.

3. स्वतःला नेहमी अपडेट करा

आजकाल मोबाईल अॅप्स देखील स्वतःला अपडेट करण्यासाठी सांगत असतात. त्यामुळे तुम्हीही वेळेनुसार स्वतःला बदलत राहणं गरजेचं आहे. करिअरच्या बाजारपेठेत (Success Tips) आपले मूल्य टिकवून ठेवण्यासाठी, स्वतःला अपडेट करत राहणे खूप महत्वाचे आहे.

4. प्लॅन B तयार ठेवा

असे अनेकवेळा घडते जेव्हा तुमचे करिअरमध्ये घेतलेले निर्णय चुकीचे सिद्ध होऊ लागतात, अशा वेळी प्लॅन ‘बी’ तुमच्यासोबत ठेवा जेणेकरून तुमचा प्लॅन ‘बी’ वेळ (Success Tips) आल्यावर कामी येईल. दोन-तीन करिअर प्लॅन्स तुमच्यासोबत ठेवल्याने तुमच्या अपयशाची शक्यता कमी होते.

5. स्वतःमधील प्रतिभा ओळखा

पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर उत्तम करिअर किंवा नोकरीची अपेक्षा करता येईल अशी आजची वेळ नाही. आता काळ बदलला आहे, आता पुस्तकी किडा बनून किंवा (Success Tips) ढीगभर पदव्या घेवून करिअर घडवता येत नाही. जर तुम्हाला उत्तम करिअर घडवायचे असेल तर तुम्हाला स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची आणि तुमच्यातील प्रतिभा शोधण्याची गरज आहे. एकदा का तुमच्यात लपलेले टॅलेंट सापडले की मग तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्या क्षेत्रात इतर लोकांपेक्षा चांगले स्थान मिळवू शकता.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : अवकाशातील तार्‍यांच्या समूहाला काय म्हणतात?

GK Updates (18)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सामान्य ज्ञान तुम्हाला सरकारी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देताना मदत करते.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण अचानक समोर आलेल्या प्रश्नामुळे (GK Updates) उमेदवारांचा गोंधळ उडतो. ऐनवेळी तुमचा गोंधळ उडू नये यासाठी आज आपण सामान्य ज्ञान वाढवणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत.

1. ५ हेक्टोलीटर = किती लीटर?
A. ५००० लीटर
उत्तर – B. ५०० लीटर
C. ५० लीटर
D. १००० लीटर

2. अवकाशातील तार्‍यांच्या समूहाला —– म्हणतात.
A. दीर्घिका
B. तेजोमेघ
उत्तर – (GK Updates) C. आकाशगंगा
D. तारकामंडल

3. ……. पासून अल्युमिनियम मिळवले जाते.
A. तांबे
B. लोह
उत्तर – C. बॉक्साइट
D. मँगनीज

4. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते ?
उत्तर – A. टंगस्टन
B. प्लॅटेनियम
C. अल्युमिनियम
D. नायक्रॉन

5. एक अश्वशक्ती म्हणजेच ——–
A. १००० वॅट
उत्तर – B. ७४६ वॅट
C. ४१५ वॅट
D. ६०० वॅट (GK Updates)

Covid 19 GK Questions and Answers in Marathi | Coronavirus GK in Marathi

6. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे कोणत्या बँकेने ‘आपत्कालीन कर्ज सुविधा’ सुरू केली आहे?
उत्तर: स्टेट बँक ऑफ इंडिया

7. कोरोना विषाणू 2019 चे पहिले प्रकरण कोठे समोर आले?
उत्तरः चीनमधील वुहानच्या हुआनमध्ये

8. कोरोना विषाणूच्या नवीन विषाणूला तात्पुरते नाव काय आहे?
उत्तर: 2019-nCov

9. कोरोना विषाणूला ‘आंतरराष्ट्रीय आणीबाणी’ कोणी घोषित केले आहे?
उत्तर: जागतिक आरोग्य संघटना (WHO)

10. WHO ने कोरोना विषाणूला काय नाव दिले आहे?
उत्तर: कोविड-19 (GK Updates)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Agniveer Recruitment : मोठी अपडेट!! अग्निवीर भरती प्रक्रियेत झाले ‘हे’ बदल; जाणून घ्या नवीन नियम

Agniveer Recruitment (1)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्य दलात भरती होण्याची इच्छा असणाऱ्या (Agniveer Recruitment) उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत भरती प्रक्रियेत आता मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे इच्छुकांना आता जुनी भरतीची प्रक्रिया अवलंबता येणार नाही. शिवाय या बदललेल्या भरती प्रक्रियेमध्ये नेमके काय बदल केले आहेत ते पाहूया…

1. सीईई-प्रवेश परीक्षा बंधनकारक

भारतीय सैन्य दलातील भरती प्रक्रियेतील नव्या बदलानुसार आता अग्निवीर भरती प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे. या नवीन प्रक्रियेची जाहीरात भारतीय सैन्य दलाने (Agniveer Recruitment) जारी केली आहे. त्यामुळे इच्छुकांना अग्निवीर होण्यासाठी पहिल्या टप्प्यात सीईई-प्रवेश परीक्षा देणं बंधनकारक असणार आहे.

2. परीक्षेचे 3 टप्पे

अग्निवीर भरती प्रक्रिया आता 3 टप्प्यांमध्ये घेतली जाणार असून यामध्ये सीईई, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी असे तीन टप्पे असतील. तर भरती प्रक्रियेचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय लष्कराने भरती प्रक्रियेत बदल केला आहे. पहिल्या टप्प्यात सीईई (CEE) प्रवेश परीक्षा होईल. त्यानंतर शारीरिक चाचणी आणि शेवटच्या टप्प्यात वैद्यकीय चाचणी (Medical Test) घेतली जाईल. याबाबतची नवीन अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे.

3. २०० केंद्रांवर होणार CEE परीक्षा

अग्निवीरच्या भरती प्रक्रियेतील नवीन बदलानुसार भरतीसाठीची सामाईक प्रवेश परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एक तासाचा वेळ (Agniveer Recruitment) देण्यात येईल. परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना परीक्षा केंद्रावर जावं लागणार आहे. एप्रिल २०२३ मध्ये होणाऱ्या सीईईसाठी २०० परीक्षा केंद्र असणार आहेत. परीक्षेनंतर गुणवत्ता यादी जारी केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची फेब्रुवारी २०२३ च्या मध्यापर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

4. अशी होईल शारीरिक चाचणी

सीईई परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार पुढे शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी देऊ शकतील. दुसऱ्या टप्प्यांत होणाऱ्या शारीरिक चाचणीसाठी महिला आणि पुरुष दोघांसाठीचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. तर शारीरिक चाचणीत यशस्वी झालेल्या महिला पुरुष दोन्ही उमेदवार तिसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी पात्र ठरतील.

5. वैद्यकीय चाचणी

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल. यामध्ये सैन्य दलाच्या नियमांनुसार, प्रकृती आणि शारीरिक (Agniveer Recruitment) तंदुरुस्ती योग्य असल्यास उमेदवारांना अग्निवीर बनण्याची संधी मिळणार आहे.

अशी होती जुनी भरती प्रक्रिया

जुन्या भरती प्रक्रियेत सीईई ऐवजी पहिल्यांदा शारीरिक चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक होते. यानंतर वैद्यकीय चाचणी घेतली जायची आणि शेवटच्या (Agniveer Recruitment) टप्प्यात CEE परीक्षा घेतली जायची.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DOT Recruitment 2023 : दूरसंचार विभागात ‘या’ पदावर भरती सुरु; काय आहे पात्रता?

DOT Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । दूरसंचार विभाग, पुणे येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी (DOT Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक संचालक आणि कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – दूरसंचार विभाग, पुणे

भरले जाणारे पद – (DOT Recruitment 2023)

  1. सहायक संचालक – 10 पदे
  2. कनिष्ठ दूरसंचार अधिकारी – 02 पदे

पद संख्या – 12 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे, नागपूर, गोवा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – दूरसंचार विभाग महाराष्ट्र एलएसए सल्लागार कार्यालय, सीटीओ कंपाऊंड, चर्च रोड, कॅम्प पुणे-411001 (DOT Recruitment 2023)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. सहायक संचालक 1. Bachelor’s degree in Engineering or Technology in Electrical or Electronics or Electrical Communication or Computer Science or Telecommunications or Information Technology or Instrumentation from a University
2.Officers from the Central or State Governments or Union Territories or Public Sector Undertakings or Universities or Recognized Research Institutions or Statutory and Autonomous bodies:

2. कनिष्ठ दूरसंचार अधिकारी 1. Bachelor’s degree in Engineering or Technology in Electrical or Electronics or Electrical Communication or Computer Science or Telecommunications or Information Technology or Instrumentation from a University (DOT Recruitment 2023)
2. Officers from the Central or State Governments or Union Territories or Public Sector Undertakings or Universities or Recognized Research Institutions or Statutory and Autonomous bodies:

मिळणारे वेतन –

  1. सहायक संचालक Level 8 (Rs 47,600-151100) in the Pay Matrix of 7th CPC
  2. कनिष्ठ दूरसंचार अधिकारी Level-7 (Rs.44900-142400)

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे
  3. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे. (DOT Recruitment 2023)
  5. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले किंवा अन्यथा अपूर्ण असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – dot.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Forest Recruitment 2023 : वन विभागात होणार तब्बल 9640 पदांवर मेगाभरती!! येथे पहा शासनाचा नवीन GR

Forest Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र वन विभाग मध्ये लवकरच मोठी (Forest Recruitment 2023) पदभरती होणार आहे. या अनुषंगाने भरतीबाबत नवीन GR प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये वन विभाग भरती गट क, गट ड संवर्गातील पदे भरण्यासंदर्भातील नवीन परिपत्रक प्रकाशित झाले आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 9640 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये विविध रिक्त पदांचा तपशील मागविण्यात आला आहे. भरतीबद्दल पूर्ण माहितीसाठी दिलेले परिपत्रक बघावे.

वन विभाग भरतीचा GR पाहण्यासाठी येथे क्लीक करा – CLICK

भरले जाणारे पद – वनरक्षक (Forest Guard)

पद संख्या – 9640 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव  – (Forest Recruitment 2023)

  1. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे पाल्यही पात्र असतील.
  3. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान (Forest Recruitment 2023)
  4. अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – (Forest Recruitment 2023)

वनरक्षक (Forest Guard) – 20,000 ते 25,000/- रुपये दरमहा

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CME Recruitment 2023 : 10वी पाससाठी मोठी संधी!! पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘या’ पदावर भरती सुरु

CME Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे विविध (CME Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात  निघाली आहे. भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2023 आहे.

संस्था – लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे

पद संख्या – 121 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मार्च 2023

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (CME Recruitment 2023)
1) अकाउंटंट – 01 पद
शैक्षणिक पात्रता : (i) B.Com (ii) 01 वर्ष अनुभव
2) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 01 पद
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) (iii) 03 वर्षे अनुभव
3) सिनियर मेकॅनिक – 02 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक (IC इंजिन) /मेकॅनिक (मोटर) किंवा फिटर (iii) 03 वर्षे अनुभव
4) मशीन माइंडर लिथो (ऑफसेट) – 01 पद
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
5) लॅब असिस्टंट – 03 पदे
शैक्षणिक पात्रता : B.Sc
6) निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 14 पदे
शैक्षणिक पात्रता : i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
7) स्टोअरकीपर (ग्रेड II) – 02 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
8) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) – 03 पदे (CME Recruitment 2023)
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव.
9) ग्रंथालय लिपिक – 02 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
10) सँड मॉडेलर – 04 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
11) कुक – 03 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
12) फिटर जनरल मेकॅनिक (स्कील्ड) – 06 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर) (iii) 01 वर्ष अनुभव
13) मोल्डर – 01 पद
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
14) कारपेंटर (स्कील्ड) – 05 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
15) इलेक्ट्रिशियन (स्कील्ड) – 02 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन) (iii) 01 वर्ष अनुभव
16) मशीनिस्ट वुड वर्किंग – 01 पद
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
17) ब्लॅकस्मिथ (स्कील्ड) – 01 पद
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ब्लॅकस्मिथ) (iii) 01 वर्ष अनुभव
18) पेंटर (स्कील्ड)-  01 पद
शैक्षणिक पात्रता :(i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

19) इंजिन आर्टिफिसर  – 01 पद
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
20) स्टोअरमन टेक्निकल – 01 पद
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
21) लॅब अटेंडंट – 02 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
22) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 49 पदे
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा ITI
23) लस्कर – 13 पदे (CME Recruitment 2023)
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

वय मर्यादा –

  1. 04 मार्च 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  2. पद क्र.8 (सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर) – 18 ते 30 वर्षे
  3. उर्वरित पदे – 18 ते 25 वर्षे

परीक्षा फी – फी नाही (CME Recruitment 2023)

मिळणारे वेतन – 19,900/- ते 81,100/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – indianarmy.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MWRRA Recruitment 2023 : सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात भरती सुरु

MWRRA Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात रिक्त (MWRRA Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. ही भरती सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी असणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 14 व 15 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण

पद संख्या – 11 पदे

भरली जाणारी पदे – (MWRRA Recruitment 2023)

1) संचालक / Director – 02 पदे
2) उपसंचालक / Deputy Director – 03 पदे
3) सहायक संचालक / Assistant Director – 03 पदे
4) अवर सचिव / Under Secretary – 01 पद
5) कक्ष अधिकारी / Section Officer – 02 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदवी / पदव्युत्तर पदवी.

परीक्षा फी – फी नाही (MWRRA Recruitment 2023)

मिळणारे वेतन – 81,540/- रुपये ते 1,35,720/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 14 व 15 फेब्रुवारी 2023

मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई. (MWRRA Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mwrra.org

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : IFS आरुषी मिश्राचा यूपीएससीत डंका!! भारतात मिळवली दुसरी रॅंक; पतीही आहेत IAS

UPSC Success Story IFS Aarushi Mishra

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या IFS आरुषी मिश्रा (UPSC Success Story) यांनी आयआयटी मधून बीटेकची पदवी मिळविली. त्यांचे पती चरचित गौर हे आयएएस अधिकारी आहेत. आरुषीने कठोर परिश्रम घेत यूपीएससीने घेतलेल्या भारतीय वन सेवा (Indian Forest Services) परिक्षेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे.

पहिल्यापासूनच आहे टॉपर

आरुषी यांनी दहावी बोर्डाच्या परीक्षेत ९५.१४ टक्के आणि बारावीला बोर्डाच्या परीक्षेत ९१.२ टक्के गुण मिळवले. त्यानंतर आयआयटी रुरकी येथून २०१४ च्या (UPSC Success Story) बॅचमधून बी.टेक केले. यानंतर आरुषीने सरकारी नोकरीसाठी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

UPSC Success Story IFS Aarushi Mishra
असा केला अभ्यास

आयएफएस आरुषी मिश्रा यांनी यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग क्लासची मदत घेतली. त्यांनी  विषयनिहाय टेस्ट सिरीज आणि अभ्यासाचे साहित्य गोळा केले होते. परीक्षेच्या चांगल्या तयारीसाठी त्यांनी अनेक मॉक टेस्ट दिल्या होत्या. यूपीएससी परीक्षेत अपयश (UPSC Success Story) मिळाल्यानंतर त्यांनी कोचिंग क्लासमध्ये शिकवायला सुरुवात केली. यासोबतच वृत्तपत्रांच्या जाहिरातीमधून त्या नोकरी शोधत असत.

प्रत्येक अपयशानंतर घेतली दुप्पट मेहनत (UPSC Success Story)

आयएफएस आरुषी मिश्रा यांनी यूपीएससीच्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (IFS) परीक्षेत २०१८ मध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता. याआधी यूपीएससी परीक्षेत त्यांना २२९ रँकसह आयआरएस पद देण्यात आले होते. दरम्यान, उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १६ वी रँक (UPSC Success Story) आणि डीएसपी पद मिळाले. आरुषी यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, पण त्यांनी हार मानली नाही. प्रत्येक अपयशानंतर त्यांनी दुप्पट मेहनत करून परीक्षेची तयारी केली.

UPSC Success Story IFS Aarushi Mishra
वडील वकील तर आई व्याख्याता

भारतीय वन सेवेतील अधिकारी आरुषी मिश्रा यांचा जन्म ३१ जानेवारी १९९१ रोजी प्रयागराज येथे झाला. त्यांचे वडील अजय मिश्रा हे ज्येष्ठ वकील आहेत आणि आई नीता मिश्रा व्याख्यात्या आहेत. आरुषीचा धाकटा भाऊ अर्णव मिश्रा उत्तर प्रदेशात उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत (UPSC Success Story) आहे. IFS आरुषी मिश्रा यांचे पती IAS चरचित गौर हे आग्रा विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आहेत. IFS आरुषी मिश्रा या आग्रा वन विभागात डेप्युटी DFO आहेत.

UPSC Success Story IFS Aarushi Mishra
दोघांनीही एकमेकांना दिली साथ

IFS आरुषी मिश्रा यांनी 2021 मध्ये IAS चरचित गौर यांच्याशी लग्न केले. IAS चरचित गौर हे 2016 च्या बॅचचे अधिकारी आहेत आणि IFS आरुषी मिश्रा 2019 च्या अधिकारी आहेत. या दोघांनी एकमेकांना खूप दिवसांपासून डेट केले होते UPSC परीक्षेच्या प्रवासात दोघांनीही एकमेकांना मित्र आणि मार्गदर्शकाप्रमाणे साथ दिली.

UPSC Success Story IFS Aarushi Mishra
सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय

आरुषी मिश्रा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. इंस्टाग्रामवर त्यांचे जवळपास 30 हजार फॉलोअर्स आहेत. UPSC इच्छुकांना मदत करण्यासाठी त्या अनेकदा (UPSC Success Story) मार्गदर्शक सत्रात भाग घेत असतात. त्यांच्या फोटोंच्या कमेंटमध्येही, फॉलोअर्स त्यांना त्यांच्या प्रवासाबद्दल आणि यशाच्या टिप्सबद्दल मत विचारतात.

UPSC Success Story IFS Aarushi Mishra
आरुषी यांनी शेअर केल्या अभ्यासाच्या टिप्स
  1. आरुषीने यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी काही खास टिप्स शेअर केल्या आहेत. या टिप्स जाणून घेवूयात…
  2. परीक्षेची रणनीती समजून घेऊन अभ्यासाचा आराखडा तयार करा.
  3. वेबसाइटवर उपलब्ध शैक्षणिक YouTube व्हिडिओ आणि अभ्यास सामग्रीवरून नोट्स तयार करा.
  4. अभ्यासावर लक्ष केंद्रित (UPSC Success Story) करण्यासाठी दररोज 30 मिनिटे ध्यान आणि व्यायाम करा.
  5. जास्तीत जास्त मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न करा.
  6. कोचिंग आणि स्टडी मटेरियलच्या अधिक पर्यायांमुळे गोंधळ होवू देवू नका.

आरुषी सांगतात सुरुवातीला इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अभ्यास साहित्याचा आधार घेवून त्यांनी अभ्यास केला नाही. त्यामुळे परीक्षेतील कामगिरीवरही परिणाम झाला. या दरम्यानच्या काळात समाजाच्या दबावालाही सामोरे जावे लागले असले तरी आरुषी यांना घरच्यांचा खूप पाठिंबा मिळाला.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com