Home Blog Page 366

Success Tips : तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नेहमी यशस्वी आणि आनंदी असाल; फक्त ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Success Tips (7)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी असो की नोकरी….कोणत्याही (Success Tips) व्यक्तीला नेहमीच सर्वोच्च पदावर पोहोचायचे असते. करिअरमध्ये पुढे जाताना प्रत्येक व्यक्तीने काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत माणसाने काम करताना नेहमी शिकत राहिले पाहिजे. कारण आजकाल स्किल बेस्ड जॉब्सचा ट्रेंड आहे. यामध्ये लोकांना त्यांच्या कौशल्यानुसार नोकरी मिळू शकते. याशिवाय करिअरमध्ये पुढे जात राहण्यासाठी जॉब स्किल्स तसेच वर्तणूक कौशल्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. या कौशल्याशिवाय कोणतीही व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही. पाहूया कोणती आहेत ही कौशल्ये…

1. शांत राहा आणि इतरांचे ऐका (Keep calm and listen to others)

एखाद्याने त्याच्या शब्दांवर आणि आवाजावर नियंत्रण ठेवले पाहिजे. कारण अनेकवेळा असे घडते की आपल्यासोबत काम करणाऱ्यांना आपण काही कारणाने ओरडतो. अशा परिस्थितीत रागावर नियंत्रण कसे ठेवायचे आणि गंभीर परिस्थितीतही शांत कसे राहायचे हे जाणून घेतले पाहिजे.

2. भावनिक होऊ नका (Don’t be emotional) (Success Tips)
माणूस कोणत्याही क्षेत्रात काम करत असला तरी त्याने भावनिक बुद्धिमत्तेची काळजी घेतली पाहिजे. तुमची अभिव्यक्ती योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने कशी वापरायची हे तुम्हाला माहित असले पाहिजे. अनावश्यक ठिकाणी तुमच्या भावना वाया घालवू नका.

3. वेळेची बचत करा (Save time)
लहानपणापासूनच आपल्याला टाईम मॅनेजमेंटचा धडा शिकवला जातो. पण असे असूनही, वेळेचे योग्य व्यवस्थापन कसे करावे हे अनेकांना शिकता येत (Success Tips) नाही. करिअरमध्ये प्रगती साधण्यासाठी टाइम मॅनेजमेंटची कला जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.

४. ‘नाही’ म्हणण्याची कला शिका (Learn to say no)
वरिष्ठ असो वा कनिष्ठ, प्रत्येक वेळी प्रत्येकाला हो म्हणण्याची चूक करू नका. कधी कधी आवश्यक असेल तेव्हा नाही म्हणायला शिका. तुम्ही नेहमी तुमच्या (Success Tips) मर्यादेच्या बाहेर जाऊन प्रत्येक गोष्टीला हो म्हणत राहिलात तर लोक तुमचा गैरफायदा घेण्यास सुरुवात करतील.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HPCL Recruitment 2023 : पदवीधरांसाठी कोणतीही परीक्षा नाही!! हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये ‘या’ पदावर थेट भरती सुरु

HPCL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । पदवीधर आणि नोकरीच्या शोधात असलेल्या (HPCL Recruitment 2023) उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी  आहे. हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ग्रॅज्युएट आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदाच्या एकूण 116 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – हिंदुस्थान पेट्रोलियम

भरली जाणारी पदे –

  1. पदवीधर शिकाऊ उमेदवार – 86 पदे
  2. तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार – 30 पदे

पद संख्या – 116 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (HPCL Recruitment 2023)

  • पदवीधर शिकाऊ उमेदवार –

उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील इंजिनीअरिंग पदवी असणे आवश्यक.

  • तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार –

उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा असणे आवश्यक.

वय मर्यादा –

18 ते 25 वर्षे

(आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे.)

मिळणारे वेतन (Stipend) –

  1. पदवीधर शिकाऊ उमेदवार – Rs. 25,000/- दरमहा
  2. तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार – Rs. 15,000/- दरमहा (HPCL Recruitment 2023)

आवश्यक कागदपत्रे –

  1. रेझ्युमे
  2. दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

निवड प्रक्रिया – मुलाखत

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.hindustanpetroleum.com/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

JEE Main Result : JEE मेनचा निकाल पाहण्यासाठी ‘या’ स्टेप्स करा फॉलो; इथे आहेत महत्वाच्या लिंक्स

JEE Main Result

करिअरनामा ऑनलाईन । JEE परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक (JEE Main Result) महत्वाची अपडेट समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने JEE मेन परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत सहभागी असलेले सर्व विद्यार्थी jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांची उत्तरतालिका (JEE मुख्य 2023 उत्तर की) तपासू शकतात.

यावर्षी जेईई मेन परीक्षेला बसण्यासाठी साधारण 9 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. NTAकडून या विद्यार्थ्यांसाठी मुख्य परीक्षेचा निकाल कधीही (JEE Main Result) जाहीर केला जाऊ शकतो. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. उत्तरतालिका तपासण्याची थेट लिंक पुढे देण्यात आली आहे.

असा चेक करा निकाल – (JEE Main Result)

  1. JEE मुख्य निकाल पाहण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्या.
  2. वेबसाइटच्या होमपेजवरील JEE मेन रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
  3. लिंकवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
  4. लॉगिन केल्यानंतर तुमचे स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल.
  5. शेवटी ते तपासा आणि भविष्यातील वापरासाठी हार्ड कॉपी देखील ठेवा.

यावर्षी पहिल्या सत्रासाठी जेईई मेन २०२३ पेपर १ परीक्षेत बसण्यासाठी साधारण ९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांमध्ये २.६ लाखांहून अधिक मुली आणि ६ लाखांहून अधिक मुलांचा समावेश आहे.

एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, नोंदणीकृत (JEE Main Result) विद्यार्थ्यांपैकी ९५.७९% विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंगचा पेपर लिहिला तर ०.४६ लाख विद्यार्थ्यांनी पेपर १ मध्ये परीक्षा दिली. जेईई मेन सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी मुख्य परीक्षेला बसले आहेत.

अंतिम उत्तरतालिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा – CLICK

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा – CLICK

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BPCL Recruitment 2023 : डिप्लोमा/ग्रॅज्युएटसाठी भारत पेट्रोलियममध्ये ‘या’ पदावर भरती सुरु; इथे करा अर्ज

BPCL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत मुंबई येथे (BPCL Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून डिप्लोमा शिकाऊ उमेदवार, पदवीधर शिकाऊ उमेदवार पदाच्या 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई

भरले जाणारे पद –

  1. पदवीधर शिकाऊ उमेदवार – 06 पदे
  2. डिप्लोमा शिकाऊ उमेदवार – 14 पदे

पद संख्या – 20 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 फेब्रुवारी 2023

काही महत्वाच्या तारखा – (BPCL Recruitment 2023)

Bharat Petroleum Bharti 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • पदवीधर शिकाऊ उमेदवार –

First-class Engineering Degree (full-time course) in the respective discipline with 6.3 ccPA from a recognized Indian University/institute (relaxed to 5.3 cGpA for SC/ST/PWD candidates and relaxation applicable for reserved posts only).

  • डिप्लोमा शिकाऊ उमेदवार –

First class Diploma in Engineering (full-time course) in the respective discipline with 60% marks from State Board of Technical Education/recognized Indian University (BPCL Recruitment 2023) (relaxed to 50% marks for SC/ST/PwD candidates and relaxation applicable for reserved posts only).
Salary Details For Bharat Petroleum Corporation Limited Mumbai Bharti 2023

मिळणारे वेतन –

  1. पदवीधर शिकाऊ उमेदवार Rs. 25,000/- दरमहा
  2. डिप्लोमा शिकाऊ उमेदवार Rs. 18,000/- दरमहा

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. (BPCL Recruitment 2023)
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
  3. देय तारखेला प्राप्त झालेले अपूर्ण/चुकीचे ऑनलाइन अर्ज नाकारले जातील.
  4. उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in वर त्यांची नावे नोंदवली पाहिजेत; नोंदणीकृत नसलेले उमेदवार नाकारले जाण्याची शक्यता आहे.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.bharatpetroleum.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AOC Bharti 2023 : 10 वी पाससाठी आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्समध्ये ‘या’ पदावर भरती सुरु; तब्बल 1793 जागा भरणार

AOC Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये रिक्त पदांच्या (AOC Bharti 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रेड्समन मेट, फायरमन पदांच्या एकूण 1793 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स

भरली जाणारी पदे – (AOC Bharti 2023)

1. ट्रेड्समन मेट – १२४९ पदे
2. फायरमन – ५४४ पदे

पद संख्या – 1793 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2023

नोकरीचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. ट्रेड्समन मेट – उमेदवार १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक
  2. फायरमन – उमेदवार १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक (AOC Bharti 2023)

मिळणारे वेतन –

  1. ट्रेड्समन मेट: ₹१८०००/- ते ₹५६९००/- दरमहा
  2. फायरमन: ₹१९९००/- ते ₹६३२००/- दरमहा

वय मर्यादा –

कमीत कमी – १८ वर्ष
जास्तीत जास्त – २५ वर्ष

अर्ज/ परीक्षा फी – फी नाही

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स च्या अधिकृत वेबसाईट www.aocrecruitment.gov.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ आहे.
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. (AOC Bharti 2023)
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.aocrecruitment.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी कधी जाहीर केली?

GK Updates 6 Feb

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सामान्य ज्ञान तुम्हाला सरकारी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देताना मदत करते.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण अचानक समोर आलेल्या प्रश्नामुळे (GK Updates) उमेदवारांचा गोंधळ उडतो. ऐनवेळी तुमचा गोंधळ उडू नये यासाठी आज आपण सामान्य ज्ञान वाढवणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत.

1. तिरुपती बालाजी (देवता- श्री व्यंकटेश्वर) हे मंदिर कोणत्या राज्यात आहे?
उत्तरः आंध्रप्रदेश

2. सोमनाथ मंदिर (भगवान शिव) कुठे स्थित आहे?
उत्तरः गुजरात

3. काशी विश्वनाथ मंदिर (शिव) कुठे आहे?
उत्तरः वाराणसी

4. (GK Updates) कामाख्या मंदिर (कामाख्या देवी) भारतातील कोणत्या आधुनिक राज्यामध्ये आहे?
उत्तरः आसाम

5. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?
उत्तर: मोर

6. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?
उत्तर: सिंह

7. सार्कची स्थापना कधी झाली?
उत्तर: १९८५ (GK Updates)

8. भारतात किती सण आहेत?
उत्तरः 36 प्रमुख सण आहेत.

9. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
उत्तर : राजेंद्र प्रसाद

10. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा कधी केली?
उत्तर: 8 नोव्हेंबर 2016

11. भारताचा लोहपुरुष कोणाला म्हणतात?
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल (GK Updates)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CDAC Recruitment 2023 : CDAC मध्ये होणार 570 पदांवर बंपर भरती!! ‘या’ पदांसाठी ऑनलाईन करा APPLY

CDAC Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । प्रगत संगणक विकास केंद्र येथे रिक्त पदांच्या (CDAC Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता/विपणन कार्यकारी, प्रकल्प व्यवस्थापक/कार्यक्रम व्यवस्थापक/प्रोग्राम वितरण व्यवस्थापक/नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड / उत्पादन. सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी पदांच्या एकूण 570 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – प्रगत संगणक विकास केंद्र

भरले जाणारे पद –

प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता/विपणन कार्यकारी, प्रकल्प व्यवस्थापक/कार्यक्रम व्यवस्थापक/प्रोग्राम वितरण व्यवस्थापक/नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड / उत्पादन. सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी

पद संख्या – 570 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2023

वय मर्यादा – (CDAC Recruitment 2023)

  1. प्रकल्प सहयोगी – 30 वर्षे
  2. प्रकल्प अभियंता/विपणन कार्यकारी – 35 वर्षे
  3. प्रकल्प व्यवस्थापक/कार्यक्रम व्यवस्थापक/प्रोग्राम वितरण व्यवस्थापक/नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक – 40 वर्षे
  4. वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड / उत्पादन. सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी – 40 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत

भरतीचा तपशील –

  1. प्रकल्प सहयोगी – 30 पदे
  2. प्रकल्प अभियंता/विपणन कार्यकारी – 300 पदे
  3. प्रकल्प व्यवस्थापक/कार्यक्रम व्यवस्थापक/प्रोग्राम वितरण व्यवस्थापक/नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक – 40 पदे
  4. वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड / उत्पादन. सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी – 200 पदे (CDAC Recruitment 2023)

मिळणारे वेतन –

  1. प्रकल्प सहयोगी Initial CTC ranges from Rs. 3.6 LPA – Rs. 5.04 LPA
  2. प्रकल्प अभियंता/विपणन कार्यकारी Initial CTC (with min. exp required) – Rs. 4.49 LPA to Rs. 7.11 LPA (Candidates with higher experience within the given bracket will be offered higher salary as per policy)
  3. प्रकल्प व्यवस्थापक/कार्यक्रम व्यवस्थापक/प्रोग्राम वितरण व्यवस्थापक/नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक Initial CTC (with min. exp required) Rs. 12.63 LPA – Rs. 22.9 LPA (Candidates with higher experience within the given bracket will be offered higher salary as per policy)
  4. वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड / उत्पादन. सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी Initial CTC (with min. exp. required) Rs. 8.49 LPA to Rs. 14 LPA (Candidates with higher experience within the given bracket will be offered higher salary as per policy (CDAC Recruitment 2023)

असा करा अर्ज –

  1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी ‘सामान्य नियम आणि अटी’ काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  3. उमेदवाराने सर्व पात्रता मापदंड वाचले पाहिजेत आणि ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
  4. उमेदवाराकडे वैध ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर असावा जो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रिय राहील.
  5. अर्जातील सर्व तपशील योग्य ठिकाणी भरा. (CDAC Recruitment 2023)
  6. ऑनलाइन अर्जातील सर्व तपशील भरल्यानंतर ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
  7. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  8. C-DAC कडे हार्ड कॉपी/प्रिंट केलेले अर्ज पाठवू नयेत. अपूर्ण आणि सदोष भरलेले ऑनलाइन फॉर्म ताबडतोब नाकारले जातील आणि त्यानंतरचा कोणताही पत्रव्यवहार या संदर्भात विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (CDAC Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.cdac.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Mantra : Robotics मध्ये करिअरच्या संधी; ‘या’ 5 प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस येणं आहे आवश्यक

Career Mantra (4)

करिअरनामा ऑनलाईन । तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात माणसाचं काम सोपं आणि (Career Mantra) वेगवान करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यावर सतत अभ्यास सुरू आहे. रोबोटिक्स हे त्यातलं अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. रोबोचा वापर करून कामातलं सातत्य जपण्याचा, जटिल कामात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑटोमोबाईल उद्योगात याचा खूप मोठा उपयोग होतो. त्याशिवायही अनेक क्षेत्रांमध्ये आता त्याचा वापर केला जातोय. त्यामुळेच रोबोटिक्स तंत्रज्ञानाला सध्या वाढती मागणी आहे. हे तंत्रज्ञान बहुतांशी प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसवर अवलंबून असतं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला रोबोटिक्स तंत्रज्ञानात करिअर करायचं असेल, तर प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस शिकाव्याच लागतात. आज आम्ही तुम्हाला अशा 5 प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसबाबत माहिती देणार आहोत…

1. Java (Career Mantra)

कम्प्युटर डेव्हलपर्समध्ये ‘जावा’ ही लोकप्रिय प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. रोबोटिक्सचीसुद्धा ही खूप आवडती लँग्वेज आहे. डेव्हलपर्सना या लँग्वेजमध्ये पोर्टेबिलिटी आणि स्वातंत्र्य मिळतं. ही लँग्वेज बहुतेकवेळा जावा व्हर्च्युअल मशीन्समध्ये वापरली जाते. त्यामुळेच वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर ती रन (Career Mantra) होऊ शकते. अँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यासाठीही या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा वापर केला जातो. त्यामुळेच रोबोटिक्स प्रकल्प तयार करण्यासाठी ही लँग्वेज अधिक वापरली जाते.
2. C++

पायथॉन आणि जावा या लँग्वेजेसप्रमाणेच C++ हीसुद्धा एक लोकप्रिय प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. जटिल अल्गोरिदम्स हाताळणं, हाय परफॉर्मन्स आणि लो लेव्हल ऑपरेशन्स यामुळे रोबोटिक्ससाठी C++ ही लँग्वेज खूप लोकप्रिय आहे.

3. Python

जावा या लँग्वेजखालोखाल पायथॉन या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा क्रमांक लागतो. रोबोटिक्स डेव्हलपर्समध्ये ही सुद्धा एक लोकप्रिय लँग्वेज आहे कारण या लँग्वेजमुळे सहजता, साधेपणा, रिडेबिलिटी आणि व्हर्सटॅलिटी मिळते. ही लँग्वेज मशीन लर्निंग, कम्प्युटर व्हिजन आणि कंट्रोल सिस्टिम्स (Career Mantra) अशा विविध गोष्टींत वापरता येते. त्याशिवाय त्यात रोबोटिक्स तयार करण्याकरता अनेक ओपन सोर्स लायब्ररीज व फ्रेमवर्क उपलब्ध असतात.

4. Lua

ही लँग्वेज लाईटवेट असून ही हाय परफॉर्मिंग लँग्वेज आहे. त्यामुळे रोबोटिक्सच्या क्षेत्रात खूपच जास्त लोकप्रिय आहे. साध्या आणि शिकण्यासाठी अतिशय सोप्या (Career Mantra) असणाऱ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजपैकी ही एक लँग्वेज आहे. या लँग्वेजेस छोट्या छोट्या रोबोटिक्स अ‍ॅप्लिकेशन्ससाठी व काही प्रकल्पांसाठी उत्तम असतात.

. MATLAB

MATLAB मध्ये मिळणारी न्युमरिकल कम्प्युटिंग एनव्हायर्नमेंट प्रोग्रॅमिंग लँग्वेज हीदेखील रोबोटिक्समधली आणखी एक लोकप्रिय भाषा आहे. ती रिसर्च व डेव्हलपमेंट, मॉडेलिंग आणि रोबोटिक्स सिस्टिमच्या सिम्युलेशनसाठी वापरली जाते. ही लँग्वेज खूप जणांकडून वापरली जाते. यातही अनेक टूलबॉक्सेस आणि लायब्ररीज आहेत.

कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग यांचा (Career Mantra) वापर करून रोबोटिक्सचं तंत्रज्ञान विकसित होतं. सध्या त्याला भरपूर मागणी आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यानं या 5 प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसची माहिती घेतली पाहिजे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : पतीच्या निधनानंतर लग्न समारंभात केले आचारी काम; 10 वर्षांच्या अथक प्रयत्नाने मुलीला बनवलं CID अधिकारी

Success Story of Simarjit Kaur

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांच्या पांखात बळ आहे तीच लोकं गगन (Success Story) भरारी घेतात.  नुसतं पंख लावून काहीच होत नाही, गरुड झेप घेण्यासाठी हिंमत असावी लागते. हनुमानगड जिल्ह्यातील टिब्बी तहसीलमधील सिलवाला कलान या गावातील एका विधवेच्या मुलीने हे करून दाखवलं आहे.  सिमरजीत कौरची CID IB आणि जयपूर आयुक्तालयात निवड झाली आहे, मात्र ती CID IBमध्ये रुजू होणार आहे. दहा वर्षांपूर्वी पती शार्दुल सिंगच्या अकाली निधनानंतर तीन मुलांची आई मनजीत कौर यांच्यावर उपजीविकेचे संकट आले. मनजीत कौर यांना दोन मुली आणि एका लहान मुलाच्या संगोपनाची जबाबदारी उचलावी लागली. त्यांनी आपल्या मुलांना यश मिळवून देण्यासाठी कठोर परिश्रम केले.

पतीच्या निधनानंतर आईने मुलांना शिकवले (Success Story)

मुलीच्या यशाने आईची दहा वर्षांची तपश्चर्या यशस्वी झाली. तीन मुलांची आई असलेल्या मनजीत कौरने आपला  पती गमावल्यानंतर आपल्या मुलांचे भविष्य हे आपल्या जीवनाचे ध्येय बनविण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची कमतरता भासू नये (Success Story) म्हणून लग्नसमारंभात जेवण बनवण्याचे काम केले. मनजीत कौर यांनी सांगितले की, दहा वर्षांपूर्वी पतीच्या निधनानंतर लोकांच्या घरी रोट्या बनवण्याचे काम, मुलांचे संगोपन करण्याचे काम त्या करत असत. त्यांनी मोठ्या कष्टाने मुलांचे संगोपन केल्याचे सांगितले.

मनजीत कौर लग्नसमारंभात जेवण बनवायच्या

सिमरजीत कौर यांनी सांगितले की, वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आईचे आयुष्य खूप कष्टात गेले.  दरम्यान, सिमरजीत कौरची धाकटी बहीण राजपाल कौर हिनेही तिच्या बहिणीच्या (Success Story) भविष्यासाठी तिचे शिक्षण अर्धवट सोडले. घरातील गायीचे दूध विकून धाकट्या बहिणीने मोठ्या बहिणीच्या शिक्षणाचा खर्च उचलला. आता राजपाल  कौर पुन्हा अभ्यास सुरू करणार आहे. सिमरजीत कौर आपल्या यशाचे श्रेय आई मनजीत कौर आणि धाकटी बहीण राजपाल कौर यांना देतात.

लोकांचे टोमणे ऐकले पण मन खचले नाही

सुरतगडच्या शहीद भगतसिंग अकादमीच्या सलीम सरांनी सिमरजीत यांना मोफत शारीरिक चचणीची तयारी करून दिली, ज्यासाठी सिमरजीत नेहमी त्यांचे आभारी असल्याचे सांगतात. सिमरजीतचे प्राथमिक शिक्षण सिलवाला कलान येथे झाले आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण तलवाडा तलावाच्या सरकारी शाळेत झाले. सिमरजीतने टिब्बीच्या कासवान गर्ल्स (Success Story) पीजी कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतले. सिमरजीत कौर यांनी सांगितले की; “मुलींच्या शिक्षणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन सकारात्मक नाही. त्यामुळे आम्हाला सतत लोकांचे टोमणे ऐकावे लागत. मात्र आईने आपल्या मुलीला अधिकारी बनवण्याची जिद्द मनाशी बाळगल्याने आम्ही मुले लोकांच्या बोलण्याने खचलो नाही.”

सिमरजीत कौर म्हणतात…

सिमरजीत कौर म्हणाल्या की; “लोकांनी मुलींबद्दलचा विचार बदलला पाहिजे. मुली अभ्यास करू शकतात, पुढे जाऊ शकतात. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता पालकांनी मुलींना संधी दिली पाहिजे. मुलींवर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांना शिकवले पाहिजे, जेणेकरून (Success Story) सर्व मुलींनी माझ्यासारखे आयुष्यात पुढे जावे. मुलींना विशेष वेळ द्या. आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करणे हेच जीवनाचे ध्येय होते आणि ते मी पूर्ण केले आहे.”

आई आणि बहिणीच्या त्यागाचे फळ मिळाले

आता आपल्या मुलीची दोन सरकारी नोकऱ्यांमध्ये निवड झाल्याने एका आईच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्या गेली 10 वर्षे अथक परिश्रम करून पूर्ण मुलीचे स्वप्न पूर्ण करण्याचा (Success Story) प्रयत्न करत होत्या. तसेच सिमरजीतच्या या यशासाठी गायीचे दूध विकून आपले शिक्षण आणि वेळ दोन्हींचा त्याग करणाऱ्या बहिणीचे योगदान नाकारता येणार नाही.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

7th Pay Commission : मोठी अपडेट!! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार

7th Pay Commission

करिअरनामा ऑनलाईन । 2023 मधील होळी सण लवकरच येत आहे. मात्र (7th Pay Commission) त्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. कारण केंद्र सरकारकडून होळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वर्षातील DA (Dearness Allowance) वाढ अजूनही झालेली नाही. या कर्मचाऱ्यांना आशा होती की अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर DA वाढ होऊ शकते मात्र अद्याप तसे काही झालेले नाही. कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत मोठे अपडेट समोर आले आहे.

दि. 8 मार्च रोजी होळी साजरी होत आहे. यानंतर केंद्रीय कर्मचार्‍यांचे किमान वेतन नक्कीच वाढू शकते. या वाढीमुळे, किमान वेतन रु. 18,000 च्या अलीकडील स्तरावरून रु. 26,000 पर्यंत वाढेल; अशी अपेक्षा आहे.

अशी होईल DA (Dearness Allowance) वाढ

केंद्र साकरकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातील पहिली वाढ केली जाऊ शकते. तसेच सरकारकडून फिटमेंट फॅक्टरवर देखील निर्णय घेतला जाऊ शकतो. सामान्य फिटमेंट फॅक्टर सध्या 2.57 टक्के आहे. 4200-ग्रेड वेतनामध्ये 15,500 रुपये मूळ वेतन असलेल्या व्यक्तीसाठी पूर्ण वेतन 15,500 X 2.57 रुपये किंवा 39,835 रुपये आहे. 6व्या CPC ने 1.86 चा फिटमेंट रेशो प्रस्तावित केला आहे.

महागाई भत्ता (7th Pay Commission)

वर्षातून दोन वेळा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाते. मात्र या वर्षी अजून एकदाही महागाई भत्ता वाढवण्यात आलेला नाही. होळीच्या सणानंतर मार्च 2023 मध्ये त्याची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली जाऊ शकते. कर्मचारी आता सरकारकडे फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवण्याची मागणी करत आहेत. या वाढीमुळे किमान वेतन सध्याच्या 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये होईल.

कधी वाढवला जाणार DA?

कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वर्षातील पहिली वाढ देखील झाली नाही. मात्र होळीपूर्वी सरकार कर्मचाऱ्यांना गोड बातमी देऊ शकते. DA वाढीमुळे देशातील 68 लाख ज्येष्ठ (7th Pay Commission) नागरिकांना आणि सुमारे 47 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांचा 28 टक्के इतका DA आहे. मात्र जर कर्मचाऱ्यांचा DA 3 टक्क्यांनी वाढवला गेला तर त्यांचा DA 41 टक्के होईल. मागील वेळेस कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 3 टक्के वाढ करण्यात आली होती. DA वाढ झाली तर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com