Success Story : पतीच्या निधनानंतर लग्न समारंभात केले आचारी काम; 10 वर्षांच्या अथक प्रयत्नाने मुलीला बनवलं CID अधिकारी

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांच्या पांखात बळ आहे तीच लोकं गगन (Success Story) भरारी घेतात.  नुसतं पंख लावून काहीच होत नाही, गरुड झेप घेण्यासाठी हिंमत असावी लागते. हनुमानगड जिल्ह्यातील टिब्बी तहसीलमधील सिलवाला कलान या गावातील एका विधवेच्या मुलीने हे करून दाखवलं आहे.  सिमरजीत कौरची CID IB आणि जयपूर आयुक्तालयात निवड झाली आहे, मात्र ती CID IBमध्ये रुजू होणार आहे. दहा वर्षांपूर्वी पती शार्दुल सिंगच्या अकाली निधनानंतर तीन मुलांची आई मनजीत कौर यांच्यावर उपजीविकेचे संकट आले. मनजीत कौर यांना दोन मुली आणि एका लहान मुलाच्या संगोपनाची जबाबदारी उचलावी लागली. त्यांनी आपल्या मुलांना यश मिळवून देण्यासाठी कठोर परिश्रम केले.

पतीच्या निधनानंतर आईने मुलांना शिकवले (Success Story)

मुलीच्या यशाने आईची दहा वर्षांची तपश्चर्या यशस्वी झाली. तीन मुलांची आई असलेल्या मनजीत कौरने आपला  पती गमावल्यानंतर आपल्या मुलांचे भविष्य हे आपल्या जीवनाचे ध्येय बनविण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची कमतरता भासू नये (Success Story) म्हणून लग्नसमारंभात जेवण बनवण्याचे काम केले. मनजीत कौर यांनी सांगितले की, दहा वर्षांपूर्वी पतीच्या निधनानंतर लोकांच्या घरी रोट्या बनवण्याचे काम, मुलांचे संगोपन करण्याचे काम त्या करत असत. त्यांनी मोठ्या कष्टाने मुलांचे संगोपन केल्याचे सांगितले.

मनजीत कौर लग्नसमारंभात जेवण बनवायच्या

सिमरजीत कौर यांनी सांगितले की, वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आईचे आयुष्य खूप कष्टात गेले.  दरम्यान, सिमरजीत कौरची धाकटी बहीण राजपाल कौर हिनेही तिच्या बहिणीच्या (Success Story) भविष्यासाठी तिचे शिक्षण अर्धवट सोडले. घरातील गायीचे दूध विकून धाकट्या बहिणीने मोठ्या बहिणीच्या शिक्षणाचा खर्च उचलला. आता राजपाल  कौर पुन्हा अभ्यास सुरू करणार आहे. सिमरजीत कौर आपल्या यशाचे श्रेय आई मनजीत कौर आणि धाकटी बहीण राजपाल कौर यांना देतात.

लोकांचे टोमणे ऐकले पण मन खचले नाही

सुरतगडच्या शहीद भगतसिंग अकादमीच्या सलीम सरांनी सिमरजीत यांना मोफत शारीरिक चचणीची तयारी करून दिली, ज्यासाठी सिमरजीत नेहमी त्यांचे आभारी असल्याचे सांगतात. सिमरजीतचे प्राथमिक शिक्षण सिलवाला कलान येथे झाले आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण तलवाडा तलावाच्या सरकारी शाळेत झाले. सिमरजीतने टिब्बीच्या कासवान गर्ल्स (Success Story) पीजी कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतले. सिमरजीत कौर यांनी सांगितले की; “मुलींच्या शिक्षणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन सकारात्मक नाही. त्यामुळे आम्हाला सतत लोकांचे टोमणे ऐकावे लागत. मात्र आईने आपल्या मुलीला अधिकारी बनवण्याची जिद्द मनाशी बाळगल्याने आम्ही मुले लोकांच्या बोलण्याने खचलो नाही.”

सिमरजीत कौर म्हणतात…

सिमरजीत कौर म्हणाल्या की; “लोकांनी मुलींबद्दलचा विचार बदलला पाहिजे. मुली अभ्यास करू शकतात, पुढे जाऊ शकतात. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता पालकांनी मुलींना संधी दिली पाहिजे. मुलींवर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांना शिकवले पाहिजे, जेणेकरून (Success Story) सर्व मुलींनी माझ्यासारखे आयुष्यात पुढे जावे. मुलींना विशेष वेळ द्या. आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करणे हेच जीवनाचे ध्येय होते आणि ते मी पूर्ण केले आहे.”

आई आणि बहिणीच्या त्यागाचे फळ मिळाले

आता आपल्या मुलीची दोन सरकारी नोकऱ्यांमध्ये निवड झाल्याने एका आईच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्या गेली 10 वर्षे अथक परिश्रम करून पूर्ण मुलीचे स्वप्न पूर्ण करण्याचा (Success Story) प्रयत्न करत होत्या. तसेच सिमरजीतच्या या यशासाठी गायीचे दूध विकून आपले शिक्षण आणि वेळ दोन्हींचा त्याग करणाऱ्या बहिणीचे योगदान नाकारता येणार नाही.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com