Home Blog Page 323

SSC HSC Results 2023 : सर्वात मोठी अपडेट!! कधी जाहीर होणार 10वी/12वीचा निकाल?

SSC HSC Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि (SSC HSC Results 2023) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच इयत्ता 10 वी आणि  12 वीचा निकाल प्रसिद्ध करू शकते. एका अहवालानुसार इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल जून महिन्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, या परीक्षेला बसलेले विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड mahahsscboard.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल तपासू शकतात.
मागील ट्रेंडनुसार, वर्ष 2018 ते वर्ष 2022 पर्यंत जारी केलेले SSC निकाल बहुतेक जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यात घोषित केले जात होते. वर्ष 2021 वगळता, महाराष्ट्र बोर्ड निकाल जुलैमध्ये घोषित करण्यात आला आणि कोणतीही परीक्षा घेण्यात आली नाही. मागील वर्षाचा ट्रेंड पाहता, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र किंवा इयत्ता 12वीचा निकाल जून 2023 मध्ये देखील जाहीर होण्याची अपेक्षा आहे. मात्र, बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही तारीख किंवा वेळ निश्चित करण्यात आलेली नाही.

या वेबसाईटवरुन पाहू शकता निकाल – (SSC HSC Results 2023)
mahahsscboard.in
mahresult.nic.in
हाती आलेल्या माहितीनुसार इयत्ता 12वी आणि 10वीच्या प्रश्नपत्रिकांचे मूल्यांकन सुरू आहे आणि 50 टक्क्यांहून अधिक मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. 10वी किंवा 12वीच्या निकालाच्या तारखांसाठी ताज्या अपडेटसाठी विद्यार्थी MSBSHSE ची अधिकृत वेबसाइट पाहत (SSC HSC Results 2023) राहतात. महाराष्ट्र SSC परीक्षा 2023 ही 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत आणि HSC परीक्षा 2023 ही 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेला लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career in Modeling : तुम्हाला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचंय?? जाणून घ्या शिक्षण, अभ्यासक्रम, फिटनेस आणि सर्वकाही

Career in Modeling

करिअरनामा ऑनलाईन । जगातील प्रसिद्ध सुपर मॉडेल (Career in Modeling) नाओमी कॅम्पबेलचा जन्म 70 च्या दशकात झाला होता. तिने वयाच्या 15 व्या वर्षी मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला. नाओमीला फॅशन इंडस्ट्रीतील तिच्या पिढीतील 6 सुपरमॉडेल्सपैकी एक म्हटले जाते. तिने 90 च्या दशकात मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला. नाओमीचे उदाहरण देवून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तेव्हापासून फॅशन इंडस्ट्रीत किती मोठा फरक पडला आहे. आता मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी अनेक मॉडेलिंग आणि फॅशन इन्स्टिट्यूट उपलब्ध आहेत. आजही मॉडेलिंगमध्ये करिअर करणे आव्हानात्मक असले तरी महिला आणि पुरुष दोघांसाठी इथे समान संधी आहेत. आजच्या युगात मॉडेल बनण्यासाठी तुमचे किती शिक्षण झाले पाहिजे, तसेच मॉडेलिंगसाठी आणखी कोणते गुण तुमच्याकडे असावेत, कोणत्या इन्स्टिटयूट मधून तुम्ही मॉडेलिंगचे प्रशिक्षण घेवून तुमचे करिअर करु शकता; हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

Career in Modeling

मॉडेलिंगसाठी आवश्यक कौशल्ये (Career in Modeling)
मॉडेलिंग हे असेच एक करिअर आहे जिथे तुम्हाला ग्लॅमर, चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत नाव आणि ओळख निर्माण करण्याची संधी मिळते. तसेच तुम्हाला चांगली कमाई देखील करता येते. मॉडेलिंग क्षेत्रात शरीरयष्टी, लूक आणि स्मार्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. ही कौशल्ये कंपनीच्या जाहिराती, टीव्ही, चित्रपट आणि फॅशन डिझायनिंगच्या जगात उपयुक्त आहेत.

Career in Modeling

या प्रकारे फॅशन मॉडेलिंगमध्ये करिअर करता येते
1. टेलिव्हिजन मॉडेलिंग – यामध्ये तुम्हाला मूव्ही कॅमेऱ्यांसमोर मॉडेलिंग करावे लागेल. जे टीव्ही जाहिराती, चित्रपट, व्हिडिओ, इंटरनेटमध्ये वापरले जाते.
2. प्रिंट मॉडेलिंग – यामध्ये स्टिल फोटोग्राफर मॉडेल्सची छायाचित्रे घेतात, जी वर्तमानपत्रे, ब्रोशर, मासिके, कॅटलॉग, कॅलेंडर इत्यादींमध्ये वापरली जातात. (Career in Modeling)
3. शोरूम मॉडेलिंग – शोरूम मॉडेल सहसा निर्यातदार, वस्त्र उत्पादक आणि मोठ्या किरकोळ विक्रेत्यांसाठी काम करताना फॅशन प्रदर्शित करतात.

Career in Modeling

मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? (Career in Modeling)
तुम्हाला प्रोफेशनल मॉडेल व्हायचे असेल तर तुम्ही कोणत्याही स्ट्रीममध्ये किमान 12वी पास असले पाहिजे. तुम्ही सर्टिफिकेट, डिप्लोमा किंवा बॅचलर डिग्री कोर्स देखील करू शकता. तुम्ही मॉडेलिंग स्कूलमध्ये प्रवेश घेऊ शकता, जेथे 3 महिने ते 4 वर्षांपर्यंतचे मॉडेलिंग अभ्यासक्रम चालवले जातात.
12वी नंतर करता येणारे मॉडेलिंगचे कोर्सेस
1. क्रिएटिव्ह आर्ट्स आणि डिझाइनमध्ये BA (3 ते 4 वर्षे)
2. डिप्लोमा इन क्रिएटिव्ह आर्ट्स अँड डिझाईन (1 वर्ष)
3. फॅशन स्टाइलिंगमध्ये डिप्लोमा (1 वर्ष) व्यतिरिक्त अनेक प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील करता येतात.

 

Career in Modeling

कुठे करू शकता मॉडेलिंग कोर्स
1. जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईन, मुंबई
2. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईन, चंदीगड (Career in Modeling)
3. आरके फिल्म्स अँड मीडिया अकादमी, नवी दिल्ली
मॉडेलिंगसाठी शारीरिक पात्रता
1. फॅशन शोसाठी, पुरुष मॉडेल्सची उंची सहसा 5’10” (178 सेमी) असते.
2. महिला मॉडेलची उंची 5’7″ (171 सेमी) असावी. (Career in Modeling)
3. मिस्टर इंडिया सारख्या स्पर्धांमध्ये अनेकदा पुरुष मॉडेल 5’7″ (171cm) पेक्षा जास्त उंच असावे लागतात.
4. प्रिंट जाहिराती आणि व्यावसायिक मॉडेलिंगसाठी, कास्टिंग एजन्सी किमान 5’3″ (162cms) उंची असलेल्या महिलांना आणि किमान 5’7″ (171cms) उंची असलेल्या पुरुषांना प्राधान्य देतात.

Career in Modeling

सुपर मॉडेल बनण्यासाठी हे 5 गुण आवश्यक
1. लूक (Look)
मॉडेल्सना त्यांच्या व्हिज्युअल दिसण्याच्या सशक्त पैलूंबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. त्यांना स्वतःमधील हे पैलू कॅमेऱ्यासमोर आणता  यायला हवेत. मॉडेलिंग करिअरसाठी तंदुरुस्त, टोन्ड बॉडी राखणे आवश्यक असते.
2. आवड
कॅमेऱ्याला सामोरे जाण्यात तुमची आवड आणि व्यावसायिक स्वारस्य असणे महत्त्वाचे आहे. मॉडेलिंग म्हणजे केवळ सुंदर दिसणे नव्हे; तर ही देखील एक कला आहे जी सतत सरावाने विकसित करावी लागते.

 

Career in Modeling

3. तांत्रिक ज्ञान
तुम्हाला मॉडेलिंग करताना तांत्रिक ज्ञान असणे गरजेचे नसले तरी फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफी, प्रकाशयोजना, सेट डिझाईन, वेशभूषा आणि (Career in Modeling) मेक-अप यासारखे मूलभूत ज्ञान तुम्हाला प्रशिक्षित तंत्रज्ञांसह सुरळीतपणे काम करण्यास मदत करेल. एक चांगले मॉडेल फोटोग्राफर, कॉस्च्युम डिझायनर आणि मेक-अप कलाकारांचे काम सोपे करू शकते.
4. आत्मविश्वास
कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्यामागे आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व असणं खूप गरजेचं आहे. हे तुम्हाला तुमच्या मॉडेलिंग करिअरमध्ये यशस्वी होण्यास मदत करू शकते. सर्व प्रकारचे कपडे घालण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम आत्मविश्वास बाळगला पाहिजे. जेणेकरुन सादरीकरणादरम्यान (Career in Modeling) तुम्ही रंगमंचावर सहजतेने आणि सुंदरतेने जाऊ शकता.
5. निर्धार (Career in Modeling)
मॉडेलिंग हे एक क्षेत्र आहे जिथे स्पर्धा खूप जास्त आहे. त्यामुळे या क्षेत्रात पाऊल ठेवल्यावर नियमित काम मिळणे कठीण होऊन बसते. त्यावेळी तुमचा संयम आणि सर्वांत जास्त दृढनिश्चय म्हणजेच उत्कटतेचा दृढनिश्चय उपयोगी पडेल. तुम्हाला तुमचा कामाचा अनुभव आणि चांगला पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील. तसेच तुम्हाला आहार आणि व्यायाम याकडे काटेकोरपणे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.

Career in Modeling

देशातील टॉप फॅशन शो कोणते?
1. लॅक्मे फॅशन वीक (Career in Modeling)
2. विल्स लाइफस्टाइल इंडिया फॅशन वीक
3. इंडियन ब्राइडल फॅशन वीक
4. राजस्थान फॅशन वीक
5. व्हॅन ह्यूसेन इंडिया मेन्स वीक

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC News : MPSCच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट Telegramवर लीक; विद्यार्थ्यांमधून संताप; डेटा सेक्युरिटीबाबत प्रश्नचिन्ह

MPSC News (2)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC News) वतीने घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 30 एप्रिलला होणार आहे. परीक्षेला अगदी एक आठवडा राहिलेला असताना आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या परीक्षेचे प्रवेश पत्र अर्थात हॉल तिकीट टेलिग्रामवर लीक झाल्याचं आढळून आलं आहे. यामुळे MPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. आता सोशल मीडियावर परीक्षार्थी तसंच नेटकरी व्यक्त होऊ लागले आहेत. दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन दिवसांपूर्वीच या परीक्षांचे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आले. मात्र हॉल तिकीट दिल्यानंतर सुद्धा एकाच लिंकवर सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट पाहायला मिळत असल्याने डेटा सेक्युरिटीचा प्रश्न समोर आला आहे.

एमपीएससीच्या परीक्षेच्या हॉल तिकीटची टेलिग्राम लिंक वायरल होत असल्याची दखल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आली आहे. ही लिंक कशाप्रकारे जनरेट झाली? कोणी जनरेट केली? या संदर्भात एमपीएससी माहिती घेत आहे. शिवाय या लिंक संदर्भात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची एमपीएससी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

90 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची माहिती टेलिग्राम चॅनलवर (MPSC News) अपलोडही करण्यात आली आहे. त्यामुळे या चॅनलवरून कोणीही सहज हे हॉल तिकीट डाऊनलोड करून घेऊ शकत आहे. सोशल मीडियावर आता या गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MTDC Fellowship : तरुणांना पर्यटन महामंडळ देतंय दरमहा 40 हजाराची फेलोशिप; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

MTDC Fellowship

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची (MTDC Fellowship) बातमी आहे. राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची संधी उपलब्ध होणार असून या फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी 15 मे पर्यंत अर्ज पाठवायचे आहेत.
पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली या फेलोशिप उपक्रमाची आखणी करण्यात आली असून पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जाणार आहे.

या फेलोशिपमधून काय शिकता येणार (MTDC Fellowship)
एमटीडीसीच्या फेलोशिप उपक्रम 2023 मध्ये पर्यटन क्षेत्रातील अभ्यास आणि सेवा, संशोधन, पर्यटन आधारित संस्था आणि पुढाकार विकसित करणे, प्रशिक्षण आणि फेलोची वाढ करणे या गोष्टींचा समावेश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय विकास, विपणन, रेस्टॉरंट ऑपरेशन्स, जलपर्यटन, विधी, विशिष्ट आणि अनुभवात्मक पर्यटन, टूर पॅकेजेस, प्रशिक्षण, पर्यटन पायाभूत सुविधा, कॉर्पोरेट अकाउंटिंग, पर्यटन नावीन्यपूर्णप्रकल्प, बैठका, परिषद, प्रोत्साहन आणि प्रदर्शन (MICE) यासारख्या एमटीडीसीच्या विविध विभागांमधील तज्ज्ञांच्या आवश्यकतेमधील अंतर कमी करण्यास सहाय्य होणार आहे.
समाज माध्यम, निर्मिती-ब्रॅंडींग-डिझाइन, डिजिटल मार्केटिंग-प्रसिद्धी- आंतरराष्ट्रीय संबंध, सामान्य व्यवस्थापन, जबाबदार पर्यटन, महसुली यंत्रणेत सुधारणा आणि उत्पन्न (MTDC Fellowship) व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील तरुणांकडून, त्यांची तंत्रज्ञानाची आवड आणि नवीन दृष्टीकोन मिळवणे इत्यादी बाबी या उपक्रमात समाविष्ठ करण्यात आल्या आहे.

आवश्यक वय मर्यादा
या फेलोशिप उपक्रमासाठी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून 21 ते 26 वर्ष वय असलेल्या आणि कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी प्राप्त (MTDC Fellowship) पदवीधारक तरुणांना फेलोशिपसाठी अर्ज करता येणार आहे.
आवश्यक पात्रता
या फेलोशिप उपक्रमातील विषयात पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. फेलोशिपसाठी उमेदवारांना किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
फेलोशिपची रक्कम (MTDC Fellowship)
निवड झालेल्या फेलो उमेदवारांना दरमहा 35 हजार रुपये छात्रवृत्ती आणि 5 हजार रुपये प्रवास भत्ता व इतर खर्च असे एकूण 40 हजार रुपये दरमहा देण्यात येणार आहेत.

असा करा अर्ज
तुमचं संपूर्ण नाव, जन्म तारीख, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्राच्या सॉफ्ट कॉपी, पासपोर्ट फोटो सॉफ्ट कॉपी ईमेलद्वारे (MTDC Fellowship) पाठवायचे आहेत.
फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक यांच्या [email protected] आणि [email protected] या ईमेल पत्त्यावर सर्व आवश्यक कागदपत्रांसह 15 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज पाठविण्याचे आवाहन पर्यटन महामंडळाद्वारे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – महाव्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन (MTDC Fellowship) विकास महामंडळ मफतलाल हाऊस, १ ला मजला, एस. टी. पारीख मार्ग, १६९ बॅकबे रिक्लेमेशन्स, चर्चगेट, मुंबई ४००२० यांना करावे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SFIO Recruitment 2023 : केंद्र सरकारच्या गंभीर फसवणूक तपासणी कार्यालयात ‘या’ पदांवर भरती; ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी

SFIO Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । गंभीर फसवणूक तपासणी कार्यालय (SFIO Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 40 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2023 आहे.

संस्था – गंभीर फसवणूक तपासणी कार्यालय (Serious Fraud Investigation Office)
पद संख्या – 40 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 मे 2023

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SFIO Recruitment 2023)
1. अतिरिक्त संचालक (आर्थिक व्यवहार) – 12 पदे
चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट किंवा मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन किंवा मास्टर इन बिझनेस इकॉनॉमिक्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (फायनान्स). 10 वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतलेली असावी.
2. सहसंचालक (कॅपिटल मार्केट) – 01 पद
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा चार्टर्ड फायनान्शिअल विश्लेषक किंवा खर्च आणि व्यवस्थापन खाते (SFIO Recruitment 2023) किंवा व्यवसायातील मास्टर अॅडमिनिस्ट्रेशन (फायनान्स) किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (वित्त). 08 वर्षे अनुभव. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी.

3. सहसंचालक (फॉरेन्सिक ऑडिट)- 01 पद
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा चार्टर्ड फायनान्शिअल विश्लेषक किंवा खर्च आणि व्यवस्थापन खाते किंवा व्यवसायातील मास्टर अॅडमिनिस्ट्रेशन (फायनान्स) किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (वित्त). 08 वर्षे अनुभव. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी.
4. उप. संचालक (तपास) – 01 पद
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थांमधून पदवी. 05 वर्षे अनुभव.
5. उप. संचालक (कॉर्पोरेट कायदा) – 12 पदे
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी आणि कायद्यातील पदवी (LLB). कॉर्पोरेट कायद्यातील 02 वर्षांचा अनुभव. (SFIO Recruitment 2023)
6. वरिष्ठ सहाय्यक संचालक (तपास) – 02 पदे
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थांमधून पदवी. 03 वर्षे अनुभव.

7. वरिष्ठ सहाय्यक संचालक (कॅपिटल मार्केट) – 01 पद
चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट किंवा चार्टर्ड फायनान्शिअल अॅनालिस्ट किंवा मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (फायनान्स) किंवा पोस्ट (ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (फायनान्स) किंवा कंपनी सेक्रेटरी भांडवली बाजार क्षेत्रात 02 वर्षांचा अनुभव.
8. सहाय्यक संचालक (कायदा) – 01 पद (SFIO Recruitment 2023)
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थामधून कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच कायद्यातील पदवीधर व 01 वर्षाचा अनुभव
9. सहाय्यक संचालक (तपास) – 20 पदे
मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी. 03 वर्षे अनुभव

वय मर्यादा – 02 मे 2023 रोजी 56 वर्षापर्यंत
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – (SFIO Recruitment 2023)
1. अतिरिक्त संचालक (आर्थिक व्यवहार)-1,23,100 ते 2,15,900 दरमहा
2. सहसंचालक (कॅपिटल मार्केट) -78,800 ते 209200 दरमहा
3. सहसंचालक (फॉरेन्सिक ऑडिट) -78,800 ते 209200 दरमहा
4. उप. संचालक (तपास)- 67,700 ते 208700 दरमहा
5. उप. संचालक (कॉर्पोरेट कायदा) -67,700 ते 208700 दरमहा (SFIO Recruitment 2023)
6. वरिष्ठ सहाय्यक संचालक (तपास) -56,100 ते 1,77,500 दरमहा
7. वरिष्ठ सहाय्यक संचालक (कॅपिटल मार्केट) – -56,100 ते 1,77,500 दरमहा
8. सहाय्यक संचालक (कायदा) – 47,600 ते 1,51,000 दरमहा
9. सहाय्यक संचालक (तपास)- 47,600 ते 1,51,000 दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – दिल्ली/मुंबई/ कोलकाता / चेन्नई / हैदराबाद.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Director, Serious Fraud Investigation Office, Pt. Deendayal Antyodaya Bhawan, CGO Complex, Lodhi Road, New Delhi-110003.
काही महत्वाच्या लिंक्स – (SFIO Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – sfio.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : विना परीक्षा थेट होईल मुलाखत; सिंधुदुर्गात NHM अंतर्गत भरती सुरु 

Job Notification (42)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग अंतर्गत (Job Notification) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित रहायचं आहे. मुलाखतीची तारीख 27 एप्रिल 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Notification)
1. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – 60,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (Job Notification)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 27 एप्रिल 2023
मुलाखतीचा पत्ता –
राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, जिल्हा वैद्यकीय अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Tips : सचिन तेंडुलकरने सांगितले यशस्वी होण्यासाठी 10 नियम

Success Tips Sachin Tendulkar

करिअरनामा ऑनलाईन । 100 आंतरराष्ट्रीय शतके, 30,000 धावा (Success Tips) आणि सर्वाधिक 664 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेला भारताचा एकमेव खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. मेहनत करुन आयुष्यात यशाची एक ना अनेक शिखरं चढणाऱ्या सचिनने करिअरसाठी संघर्ष करणाऱ्या आजच्या तरुणाईला काही खास टिप्स दिल्या. पाहूया सचिनने काय संदेश दिला आहे…
1. आत्मविश्वास ठेवा
प्रथम जीवनातील हे वास्तव मान्य करा की अपयश आणि यश हे पॅकेजमध्ये येते. म्हणून, आपण सर्व परिणामांमधून जाण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे, जे तुम्हाला जाड आणि पातळ सर्व गोष्टींमध्ये नेऊ शकते. जर ते यश (Success Tips) असेल तर त्याला तुमची कमजोरी बनवू नका आणि जर ते अपयशी असेल तर ते विसरून जा आणि फक्त तुमच्यावर विश्वास ठेवून वाटचाल करा.
2. प्रथम एक चांगली व्यक्ती व्हा
आधी चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा, कारण जीवनातील सर्व गोष्टी तात्पुरत्या असतात. तुमची कारकीर्द, तुमची प्रसिद्धी, तुमचे वय, तुमचे सौंदर्य हे सर्व कालांतराने नाहीसे होईल, पण फक्त (Success Tips) एक गोष्ट उरते ती म्हणजे तुमचे चारित्र्य. लक्षात ठेवा, फक्त शेवटची गोष्ट म्हणजे तुमचे चारित्र्य आणि तुमचे कार्य. म्हणून स्वतःची चांगली चिरस्थायी छाप मागे सोडा.

3. नेहमी तयार आणि शिस्तबद्ध रहा (Success Tips)
आपल्या क्षमतेनुसार नेहमी तयार रहा. नियंत्रण करण्यायोग्य नियंत्रित करण्याचा विचार करा आणि आपण नियंत्रित करू शकत नसलेल्या गोष्टी विसरून जा. नेहमी आपले 100% योगदान देण्याचा प्रयत्न करा, कारण ही एकमेव गोष्ट आहे जी पूर्णपणे आपल्या हातात आहे.
4. कधीही हार मानू नका
लक्षात ठेवा, कठीण काळात फक्त कठोर व्यक्तीच टिकतात. वेळ, दाब आणि पॉलिश या जटिल प्रक्रियेतून हिरा बनवला जातो. तुमची सामर्थ्ये ओळखा आणि सर्व प्रकारच्या वेळेस (Success Tips) सामोरे जा. तेंडुलकर आपल्या देशासाठी विश्वचषक जिंकण्याचे एक उद्दिष्ट घेऊन, 2011 पर्यंत 5 विश्वचषक मोहिमांमध्ये हे स्वप्न कधीही पूर्ण करू शकला नाही. पराभवाच्या कारणास्तव त्याने अतुलनीय कामगिरी करूनही, त्याने आपले स्वप्न कधीही सोडले नाही.
5. तुमच्या योजना अंमलात आणा
तुम्हाला जे करायचे आहे ते करा. तुमची प्रतिभा आणि क्षमता उत्तम प्रकारे कार्यान्वित करा. कधीतरी आपल्याला परिपूर्णतेच्या ध्यासामुळे जीवनात अडकल्यासारखे वाटते. केवळ हेच तुम्हाला या वेडसर विचारसरणीतून बाहेर काढू शकते.

6. आपल्या स्वप्नांच्या पाठलाग करा (Success Tips)
तुमच्या स्वप्नांशी तडजोड करू नका, ती पूर्ण होतील. तुम्हाला ते उशीरा सापडतील, पण ती स्वप्ने तुमच्यासाठी आहेत, फक्त आणखी एक पाऊल पुढे टाका. तुम्हाला मोठे यश मिळवायचे असेल तर सबब शोधू नका. लक्षात ठेवा, मोठ्या स्वप्नांसाठी मोठा त्याग आवश्यक आहे. म्हणून, तुमच्याकडे मजबूत धैर्य आणि सातत्य असणे आवश्यक आहे.
7. योग्य मार्गाचा अवलंब करा
प्रथम तुमची आवड ओळखा आणि मग तुमची क्षमता (Success Tips) कशासाठी आहे याचे अनुसरण करा. शॉर्टकट शोधू नका, तुमच्या मार्गात कठीण टप्पे असतील. आपण योग्य मार्गावर अयशस्वी झाल्यास फरक पडत नाही. जोपर्यंत तुमचे हृदय तुम्हाला होय म्हणत आहे तोपर्यंत तुम्ही जिंकत आहात.
8. संघ खेळाडू व्हा
आपले सर्व अहंकार बाजूला ठेवा आणि एक खरा संघ खेळाडू म्हणून आपल्या संघाचा भाग व्हा. लक्षात घ्या की सांघिक यश हे सर्व खेळाडूंचे सामूहिक प्रयत्न आहेत. संघाच्या (Success Tips) ध्येयांचा आदर करा, इतर कामगिरीचे कौतुक करा आणि संघ म्हणून मोठी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांच्या फॉर्मला समर्थन द्या. मोठ्या सांघिक उद्दिष्टांसाठी तुमचे वैयक्तिक हेतू कमी होऊ द्या. संघ खेळण्याचे खरे सार जगा.

9. आदर ठेवून स्पर्धा करा
विश्वास ठेवा की तुम्ही आयुष्यातील सर्व खेळ जिंकू शकत नाही. जेव्हा अपयश येते आणि तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागते, तेव्हा खेळ आपल्याला आपल्या पायावर परत कसे जायचे आणि योग्य आत्म्याने कठोर स्पर्धा कशी करायची हे शिकवते. हे सर्व पुन्हा प्रयत्न करण्याबद्दल (Success Tips) आहे. शिवाय, तुमच्या निर्मितीमध्ये भाग घेतलेल्या प्रत्येकाचा आदर करा. सचिन नेहमी त्याच्या शाळेचे आणि प्रथम श्रेणीतील प्रशिक्षकांचे कौतुक करतो, ज्यांनी त्याच्यासोबत भक्कम पाया तयार करण्यासाठी निस्वार्थपणे काम केले.
10. महान बनण्याचे ध्येय ठेवा
नेहमी मोठ्या कारणासाठी संघर्ष करा. मोठे स्वप्न (Success Tips) पाहण्याचे धाडस करा आणि एखाद्या महापुरुषाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Educational Scholarship : तुमचं परदेशात शिकण्याचं स्वप्न होणार पूर्ण!! ‘ही’ युनिव्हर्सिटी देतेय तब्बल 60 लाखांची स्कॉलरशिप

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । पैशाची कमतरता आहे पण (Educational Scholarship) परदेशात जाऊन शिक्षणही घ्यायचं आहे; तर आता काळजी करण्याची गरज नाही. ऑस्ट्रेलियातील डीकिन विद्यापीठ भारतीय विद्यार्थ्यांना लाखोंची शिष्यवृत्ती देत ​​आहे. यामध्ये शिक्षणाची संपूर्ण फी कव्हर केली जाणार आहे. जाणून घेऊया या स्कॉलरशिपविषयी सविस्तर…
ऑस्ट्रेलियाचे डीकिन युनिव्हर्सिटीने ‘व्हाईस-चॅन्सेलर्स मेरिटोरियस स्कॉलरशिप प्रोग्राम’ जाहीर केला आहे.  या शिष्यवृत्तीद्वारे, प्रतिभावान भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक नागरिक बनण्यास मदत केली जाते. यामुळे ते त्यांचे शिक्षण पूर्ण करुन भारतात परत येऊन त्यांच्या वर्गातील लोकांना मदत करू शकतात.
10 विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती
या उपक्रमांतर्गत 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. प्रत्येक शिष्यवृत्तीची किंमत 60 लाख रुपये आहे. सध्या, जुलै 2023 मध्ये प्रवेशासाठी अर्जाची विंडो खुली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइट www.deakin.edu.au ला भेट द्यावी लागेल. डेकिन युनिव्हर्सिटीचे कॅम्पस व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया येथे आहे. ही शिष्यवृत्ती पदव्युत्तर आणि पदवीपूर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल.

‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती
1.  उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे आणि त्याच्याकडे वैध भारतीय पासपोर्ट असणे आवश्यक आहे.
2. अर्ज करताना उमेदवार भारतात रहात असावा. (Educational Scholarship)
3. अर्जदाराने भारतातील कोणत्याही Deakin अधिकृत एजंटमार्फत अर्ज करावा.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
1. CBSE/ICSE/राज्य बोर्ड मधील 12वी बोर्ड परीक्षेत 85% गुण, किंवा
2. माध्यमिक शिक्षणाचे सामान्य प्रमाणपत्र (GCSE) मध्ये स्कोअर 10 / A स्तर, किंवा
3. आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिप्लोमा प्रोग्राम (IBDP) मध्ये एकूण 32 स्कोअर किंवा पदवीपूर्व पदवीमध्ये 80% गुण.

ही आहेत आवश्यक कागदपत्रे
डीकिन युनिव्हर्सिटीच्या या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना, विद्यार्थ्यांना काही सहाय्यक कागदपत्रे देखील जोडावी लागतील.
1. एक वैयक्तिक विधान (300 शब्दांमध्ये)
2. दोन संदर्भ जे तुमच्या समुदाय प्रतिबद्धता (Educational Scholarship) किंवा नेतृत्व क्षमतेवर टिप्पणी करू शकतात
3. डीकिनमध्ये शिकण्यासाठी भरलेला अर्ज आणि आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BARC Recruitment 2023 : भाभा अणू संशोधन केंद्रात तब्बल 4374 जागांवर भरती; जाणून घ्या पात्रता

BARC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत (BARC Recruitment 2023) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून तांत्रिक अधिकारी/सी, वैज्ञानिक सहाय्यक/बी, तंत्रज्ञ/बी, स्टायपेंडरी ट्रेनी पदांच्या तब्बल 4374 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2023 आहे.

संस्था – भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई
भरली जाणारी पदे – (BARC Recruitment 2023)
1. तांत्रिक अधिकारी
2. सी, वैज्ञानिक सहाय्यक
3. बी, तंत्रज्ञ
4. बी, स्टायपेंडरी ट्रेनी
पद संख्या – 4374 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
1. तांत्रिक अधिकारी/C – संबंधित क्षेत्रात M.Sc/ BE/B.Tech.
2. वैज्ञानिक सहाय्यक/B – B.Sc. फूड टेक्नॉलॉजी/ गृह विज्ञान/ पोषण.
3. तंत्रज्ञ/B – एसएससी + द्वितीय श्रेणी बॉयलर अटेंडंटचे प्रमाणपत्र.
4. स्टायपेंडरी ट्रेनी – कॅट I – B.Sc./ डिप्लोमा/ संबंधित क्षेत्रात. (BARC Recruitment 2023)
5. स्टायपेंडरी ट्रेनी II – SSC (विज्ञान आणि गणितासह) संबंधित ट्रेडमध्ये एकूण प्लस ट्रेड प्रमाणपत्र* किमान 60% गुणांसह किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह HSC किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रासह HSC किंवा एकूण 60% गुणांसह HSC आणि बायोलॉजीमध्ये किमान 60% गुणांसह एकूण किंवा HSC (विज्ञान) मध्ये किमान 60% गुणांसह एकूण 2 वर्षांचा डिप्लोमा डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त असणे आवश्यक.

अर्ज फी –
1. तांत्रिक अधिकारी/सी- Rs. 500/-
2. वैज्ञानिक सहाय्यक/बी- Rs. 150/-
3. तंत्रज्ञ/बी- Rs. 100/- (BARC Recruitment 2023)
4. स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I)– Rs.150/-
5. स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II)- Rs. 100/-
6. SC/ST, PwBD, माजी सैनिक आणि महिलांसाठी कोणतेही अर्ज शुल्क आवश्यक नाही.

आवश्यक कागदपत्रे –
1. Resume
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला (BARC Recruitment 2023)
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Doordarshan Recruitment 2023 : दूरदर्शनसोबत काम करण्याची संधी सोडू नका!! लवकरच ‘या’ पदांवर होणार नवीन भरती; पात्रता फक्त 10+2

Doordarshan Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । व्हिडिओग्राफीची आवड (Doordarshan Recruitment 2023) असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रसार भारती दूरदर्शन न्यूजने पूर्णवेळ कराराच्या आधारावर व्हिडिओग्राफर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्हिडिओग्राफर पदाच्या 41 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मे 2023 आहे.
संस्था – दूरदर्शन
भरले जाणारे पद – व्हिडिओग्राफर
पद संख्या – 41 पदे (Doordarshan Recruitment 2023)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख –2 मे 2023
वय मर्यादा – जास्तीत जास्त 40 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Doordarshan Recruitment 2023)
1. उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10+2 उत्तीर्ण असावा.
2. उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिनेमॅटोग्राफी/ व्हिडिओग्राफीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा केलेला असणं आवश्यक आहे.
3. तसेच MOJO मधील अनुभव असलेल्या आणि शॉर्ट फिल्म मेकिंग कोर्स केलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल.
4. इच्छुक उमेदवाराला (Doordarshan Recruitment 2023) व्हिडिओग्राफी, सिनेमॅटोग्राफी किंवा अन्य समकक्ष क्षेत्रातील कामाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – 40,000/- रु. दरमहा
कालावधी –
दूरदर्शन भरती 2023 अंतर्गत निवडलेल्या उमेदवाराची भरती पूर्ण-वेळ कराराच्या आधारावर करण्यात येणार असून त्यांचा कामाचा कालावधी 2 वर्षांचा असणार आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण – नवी दिल्ली. (Doordarshan Recruitment 2023)

निवड प्रक्रिया –
1. व्हिडिओग्राफर पदासाठी उमेदवारांची निवड चाचणी/मुलाखतीद्वारे केली जाईल.
2. तसेच केवळ निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी किंवा चाचणीसाठी बोलावले जाईल.
3. चाचणी/मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

असा करा अर्ज –
1. Visit the official website of Prasar Bharti @prasarbharti.gov.in.
2. On the homepage search for “New Registration” and click on that link.
3. Now, create your Registration ID and password that will be required for filling up the application form. (Doordarshan Recruitment 2023)
4. Once your login credentials are made, then log in using those credentials.
5. After login, you can see the application form. Fill out the form carefully. Try not to make any mistakes in order to avoid future problems.
6. After correctly filling in all the details, upload your documents. (Upload everything as per specifications) and click on the “Continue” option. (Doordarshan Recruitment 2023)
7. Preview the form again and click the “Submit” button.
8. Your application will be submitted. Download it and take a printout for future reference.

काही महत्वाच्या लिंक्स – (Doordarshan Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://prasarbharati.gov.in/doordarshan/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
(सूचना : इच्छुक आणि पात्र उमेदवार अंतिम तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करताना काही अडचण आल्यास, त्रुटीच्या स्क्रीनशॉटसह [email protected] वर उमेदवार ईमेल करू शकतात.)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com