Home Blog Page 262

Mumbai Police Recruitment 2023 : मुंबई पोलिसमध्ये ‘या’ पदांवर थेट मुलाखतीने होणार निवड

Mumbai Police Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई पोलीस विभाग अंतर्गत (Mumbai Police Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सेवानिवृत्त सहायक लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, कार्यालय अधीक्षक, प्रमुख लिपिक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरीता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे.

विभाग – मुंबई पोलीस विभाग
भरले जाणारे पद –
1. सेवानिवृत्त सहायक लेखा अधिकारी
2. लेखा अधिकारी
3. कार्यालय अधीक्षक
4. प्रमुख लिपिक
पद संख्या – 10 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा मुंबई – १

मुलाखतीची तारीख – 23 ऑगस्ट 2023
अशी होणार निवड – (Mumbai Police Recruitment 2023)
1. या भरतीकरिता मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
2. उमेदवारांनी वरील दिलेल्या  संबंधित पत्त्यावर मुलाखतीला हजर रहायचे आहे.
वरील नमूद पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे.
3. मुलाखतीची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.mahapolice.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : ग्रॅज्युएट्ससाठी राज्याच्या ‘या’ बँकेत विविध पदांवर भरती; त्वरा करा

Job Alert (47)

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी (Job Alert) एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर येथे सहाय्यक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी, विपणन अधिकारी पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर
भरली जाणारी पदे –
1. सहाय्यक महाव्यवस्थापक
2. शाखा व्यवस्थापक
3. वसुली अधिकारी
4. मार्केटिंग ऑफिसर
पद संख्या – 04 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – लातूर
अर्ज पाठवण्याचा पत्ता – मा. अध्यक्ष/ कार्यकारी संचालक, महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि. मुख्य कार्यालय, कव्हा रोड, मार्केट यार्ड, लातूर – 413512
E-Mail ID – [email protected]

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
सहाय्यक महाव्यवस्थापक १) कोणत्याही शाखेचा पदवीधर. २) बँकिंग व विविध पदावर किमान १० वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक. ३) RBI, व इतर म्हणजेच Income Tax व इतर कायद्याचे ज्ञान आवश्यक. ४) बँकिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर (CBS) प्रणाली हाताळण्याचे ज्ञान आवश्यक.
शाखा व्यवस्थापक १) बँकिंग क्षेत्रातील किमान ५ ते ७ वर्षांचा कामाचा अनुभव. २) कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच GDC & A, सहकारी बँकिंग (DCM) क्षेत्रातील परीक्षा पास आवश्यक. ४) बँकिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर (CBS) प्रणाली हाताळण्याचे ज्ञान आवश्यक.
वसुली अधिकारी १) कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक. २) बॅकेतील वसुली कामाचा पाच वर्षे अनुभव. ३) बॅकिंग कायदे व सहकारी कायदे याचे ज्ञान आवश्यक. ४) संगणकाचे ज्ञान आवश्यक.
मार्केटिंग ऑफिसर (१) MBA मार्केटिंग किंवा पदवीधर असणे आवश्यक. २) संगणकाचे ज्ञान आवश्यक. ३) इंशुरन्स कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक, ४) मार्केटिंग कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक


असा करा अर्ज –

1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.

भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : IAS होता होता अभिनेत्री बनली; पॉकेटमनीसाठी हॉटेलमध्ये काम करणारी आज एका एपिसोडसाठी घेते 1.25 लाख

Success Story of Sakshi Tanwar

करिअरनामा ऑनलाईन । प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या (Success Story) क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असते. यानुसार काहीजण आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करतात तर काही जणांच्या आयुष्याला अशी कलाटणी मिळते की ते कल्पनाही करू शकत नाहीत अशा क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवतात. टी. व्ही. सिरियल्स, सिनेमा, वेब सीरिज अशा सर्वच माध्यमातून आपल्या भूमिकेची छाप सोडणाऱ्या अभिनेत्रीलाही IAS बनायचं होतं. त्यासाठी तिने अभ्यासही सुरु केला होता. पण आयुष्यात एक क्षण असा आला आणि कलाक्षेत्रात तिने मोठं यश मिळवलं. ही अभिनेत्री टेलिव्हिजन स्टार साक्षी तन्वर आहे.

Success Story of Sakshi Tanwar

बनायचं होतं IAS 
सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराला इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. कलाकाराला  एका सिनेमा किंवा मालिकेतून मिळालेलं स्टारडम (Success Story) शेवटपर्यंत टिकवावं लागतं. पण एक अशी अभिनेत्री आहे, जी अभिनय क्षेत्रात चुकून आली. या अभिनेत्रीला IAS (Success Story) बनायचं होतं, पण नशिबाने तिला सिनेसृष्टीत आणलं आणि ती स्टार अभिनेत्री बनली.

Success Story of Sakshi Tanwar

टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये साकारली भूमिका
टीव्ही क्षेत्रात या अभिनेत्रीचं मोठं नाव आहे. तिच्या अतिशय सहज, साध्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. अभिनेत्रीने टीव्ही विश्वात प्रवेश करुन जादू केली पण ती टीव्हीपर्यंतच मर्यादित न राहता बॉलिवूडमध्येही तिने मोठं नाव कमावलं आहे.

Success Story of Sakshi Tanwar

वडील CBI ऑफिसर
साक्षी राजस्थानची राहणारी आहे. ती एका अतिशय सुशिक्षित कुटुंबातील आहे. साक्षीचे वडील CBIऑफिसर होते. तिच्या घराला सुरुवातीपासूनच शैक्षणिक वारसा होता. साक्षी शिक्षणात अतिशय हुशार होती. वडील CBI ऑफिसर असल्याने  तिलाही IAS बनायचं होतं.

Success Story of Sakshi Tanwar

अशी झाली कलाविश्वात सुरुवात (Success Story)
दिल्लीत ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर साक्षी अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेजची तयारी करत होती. त्याचवेळी तिने पॉकेटमनीसाठी एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये सेल्स ट्रेनी म्हणून नोकरी केली. अचानक एक दिवस एका मित्राच्या सांगण्यावरुन ती दूरदर्शनवरील ‘अलबेला सुर मेला’ या शोसाठी ऑडिशन देण्यासाठी गेली होती.

Success Story of Sakshi Tanwar

एकता कपूरच्या शोमधून मिळाली लोकप्रियता
१९९८ मध्ये याच शोसाठी साक्षीची प्रेजेंटर म्हणून निवड झाली आणि इथूनच तिच्या करिअरची सुरुवात झाली. या शोमधून मिळालेल्या प्रसिद्धीतून एकता कपूरची नजर साक्षीवर पडली आणि ‘कहानी घर घर की’ या मालिकेसाठी तिची निवड झाली.
‘कहानी घर घर की’ शोमधून घराघरात पोहोचली
कहानी घर घर की या शोमधून साक्षी घराघरात पोहोचली. त्यानंतर 2011 ते 2014 मध्ये साक्षीने राम कपूर या अभिनेत्यासह ‘बडे अच्छे लगते है’ ही मालिका केली. या (Success Story) मालिकेने तिच्या करिअरला मोठी उंची मिळवून दिली.

Success Story of Sakshi Tanwar

एका एपिसोडसाठी घेते लाखो रुपये
टीव्हीसह साक्षीने सिनेमा आणि वेब सीरिजमधूनही तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. साक्षीने ब्लॉकबस्टर सिनेमा ‘दंगल’मध्ये आमिर खानच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्याशिवाय साक्षी वेब सीरिज ‘माई’मध्येही भूमिका साकारताना दिसली. साक्षी टीव्हीच्या एका एपिसोडसाठी सव्वा लाख रुपये घेते.

Success Story of Sakshi Tanwar

9 महिन्यांच्या मुलीला दत्तक घेवून करते सांभाळ 
50 वर्षीय साक्षीने अद्यापही लग्न केलेलं नाही. तिने 2018 मध्ये नऊ महिन्यांच्या एका मुलीला दत्तक घेतलं. त्या मुलीचं नाव दिव्या तन्वर ठेवण्यात आलं. साक्षी आता सिंगल मदर म्हणून मुलीचा सांभाळ करत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Ministry of Ayush Vacancy : राज्यात आयुष मंत्रालयात होणार विविध पदांवर भरती

Ministry of Ayush Vacancy

करिअरनामा ऑनलाईन । केंद्राप्रमाणे राज्यातही स्वतंत्र आयुष (Ministry of Ayush Vacancy) मंत्रालय स्थापन करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. अनेक वर्षांपासून रिक्त असलेली पदे भरण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. राज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापकांची सहा आणि अनुदानित 16 महाविद्यालये अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. तथापि, सरकारी महाविद्यालयांमधील जवळपास 90 टक्के पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात आली आहेत.

शासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील रिक्त पदांचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण जग आयुर्वेदाचे अनुसरण करत आहे. ज्याचा शोध भारतात लागला आहे, परंतु तरीही त्याचे पेटंट मिळविण्यात अनेक समस्या येत आहेत. शिवाय कोविड – 19 महामारीच्या काळात आयुर्वेदाचे महत्त्व जगाने ओळखले आहे. “आयुर्वेदाचा प्रचार होण्यासाठी आणि त्याची माहिती विविध माध्यमातून पसरवण्यासाठी मी गेल्या अनेक वर्षांपासून विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात आयुर्वेदाशी संबंधित मुद्दे मांडत आलो आहे;” असं मंत्री मुश्रीफ म्हणाले.

आयुर्वेद शिक्षक संघ आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचव्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनासाठी पुण्यात मुश्रीफ यांनी आयुष मंत्रालय स्थापन करण्यासाठी केलेल्या विविध प्रयत्नांची चर्चा केली.
“हे आयुष मंत्रालय संपूर्ण महाराष्ट्रातील आयुर्वेद आणि त्याच्या (Ministry of Ayush Vacancy) अभ्यासकांच्या क्षेत्रासाठी संभाव्यता समजून घेण्यास आणि त्याचे महत्त्व लक्षात घेण्यास मदत करेल. तसेच आयुर्वेदाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आयुष मंत्रालयाची स्थापना करण्याची गरज आहे,” असं मंत्री मुश्रीफ म्हणाले. दरम्यान, आरोग्य कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. भारत हा अनेक पारंपारिक औषधांचा शोधकर्ता आहे. भारतातील अनेक औषधांचा वापर अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जात आहे. मात्र आयुष मंत्रालयामुळे आयुर्वेदाचे महत्त्व आणि फायदा निर्माण होण्यास मदत होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : ‘OK’ शब्दाचा फुल फॉर्म माहितेय का? जाणून घ्या…

GK Updates 20 Aug

करिअरनामा ऑनलाईन । ‘ओके’ (OK) हा शब्द लहानांपासून (GK Updates) मोठ्यांपर्यंत सर्वांना परिचयाचा आहे. दिवसातून कित्येकदा ओके हा शब्द आपल्या तोंडी येतो. कधी समोरासमोर बोलताना, तर कधी फोनवर बोलताना, तर कधी चॅट करताना ‘ओके’ हा शब्द आपण नेहमी वापरतो. पण तुम्हाला ओके शब्दाचा फुल फॉर्म माहितेय का?

हा आहे OK शब्दाचा फुल फॉर्म (GK Updates)
OK शब्द आपण एखाद्या गोष्टीला सहमती दर्शवताना वापरतो, पण खूप कमी लोकांना OKचा फुल फॉर्मही असतो हे माहिती नसणार. मुळात OK हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे.
Oll Korrect किंवा Olla Kalla हे दोन ग्रीक शब्द आहेत, ज्याचा अर्थ ‘सर्व ठीक आहे’ असा होतो. इंग्रजीमध्ये यासाठी All Correct हा मूळ शब्द आहे. ज्याचा शॉर्ट फॉर्म AC होतो. पण आपण मात्र OK (Oll Korrect) हा शब्द वापरतो.

अनेक जण OK हा चुकीचा शब्द असल्याचे मानतात. त्यांना Okay हा शब्द योग्य वाटतो. विशेषत: चॅटच्या दुनियेत सहसा लोक OK या शब्दाचाच जास्त वापर करताना दिसतात.
मुळात OK हा शब्द इतका परिचयाचा असतानासुद्धा अनेक लोकांना कदाचित याचा फुल फॉर्म माहिती नसावा. असे अनेक शब्द आहेत जे आपण आपल्या दैनंदिन जीवनात नियमित वापरतो, पण त्या शब्दांचा फुल फॉर्म आपल्याला माहिती नसतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Guest Teachers Recruitment : राज्यात 10 हजार शिक्षकांची मेगाभरती होणार!! सरकारचा मोठा निर्णय

Guest Teachers Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक बदली प्रक्रिया राबविल्यानंतर (Guest Teachers Recruitment) अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्यामुळे  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्यभरात पुन्हा 10 हजार अतिथी शिक्षकांच्या जागा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याला देखील अधिक प्रमाणात अतिथी शिक्षक मिळण्याची शक्यता आहे. 31 मे पासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात एक हजारहून अधिक अतिथी शिक्षकांची भरती करण्यात आली आहे.

मात्र, बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सूचना करण्यात आल्यानंतर शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले होते. तसेच, शिक्षकांनी (Guest Teachers Recruitment) तालुकानिहाय व जिल्हानिहाय बदली करून घेतली आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर पुन्हा अतिथी शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात 200 हून अधिक जागा भरती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अतिथी शिक्षकांची भरती करताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची सूचना करण्यात आली होती. त्यामुळे विविध भागातील D.Ed व B.Ed. धारकांना तात्पुरता रोजगार उपलब्ध होणार आहे. मात्र, अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यापेक्षा शाळांमध्ये कायमस्वरूपी शिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी होवू लागली आहे.

राज्यात पंधरा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. काही उमेदवारांनी याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, नवीन शिक्षक भरतीला विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राज्यात नव्याने दहा हजार अतिथी शिक्षकांची (Guest Teachers Recruitment) नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा होऊ लागली आहे.
बदली प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर ज्या तालुक्यात रिक्त जागा आहेत. तेथील शाळांची माहिती घेऊन दुसऱ्या टप्प्यात अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात खानापूर, बैलहोंगल व सौंदत्ती परिसरात अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यास प्राधान्य दिले जाईल; असे जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांनी सांगितले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CME Recruitment 2023 : 12 वी पाससाठी खुषखबर!! पुण्याच्या ‘या’ कॉलेजमध्ये तुमच्यासाठी नवीन जॉब ओपनिंग

CME Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे (CME Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून निम्न विभाग लिपिक पदाच्या 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे
भरले जाणारे पद – निम्न विभाग लिपिक (Lower Department Clerk)
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
निम्न विभाग लिपिक – (CME Recruitment 2023)
1. 12th Class or equivalent qualification from a recognized Board / University.
2. Typing in Computer @ speed of 35 w.p.m in English or Hindi Typing @ 30 w.p.m on Computer
(35 words per minute and 30 words per minute corresponding to 10500/9000 KDPH on an average of 5 Key depressions for each word.
मिळणारे वेतन – Level 2 (19900-63200)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 आहे.
पात्रतेचे निकष –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – cmepune.edu.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHIDCL Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ अंतर्गत ‘या’ पदांवर भरती

NHIDCL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा (NHIDCL Recruitment 2023) विकास महामंडळ लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक, कंपनी सचिव, महाप्रबंधक, उप महाप्रबंधक, कनिष्ठ प्रबंधक, उप प्रबंधक पदांच्या एकूण 107 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2023
पद संख्या – 107 पदे
भरले जाणारे पद – (NHIDCL Recruitment 2023)

पदाचे नाव पद संख्या 
General Manager (T/P) 3 पदे
General Manager (Land Acquisition & Coord.) 8 पदे
General Manager (Legal) 1 पदे
Deputy General Manager (T/P) 10 पदे
Deputy General Manager (Land Acquisition & Coord.) 12 पदे
Deputy General Manager (Finance) 1 पद
Deputy General Manager (HR) 1 पद
Manager (T/P) 20 पदे
Manager (Land Acquisition & Coord.) 18 पदे
Manager (Legal) 1 पद
Deputy Manager (T/P) 20 पदे
Company Secretary 1 पद
Junior Manager (HR) 11 पदे

 

वय मर्यादा – 56 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव  आवश्यक शैक्षणिक पात्रता
General Manager (T/P) Degree in Civil Engineering
General Manager (Land Acquisition & Coord.) Degree
General Manager (Legal) Degree in Law, LLB
Deputy General Manager (T/P) Degree in Civil Engineering
Deputy General Manager (Land Acquisition & Coord.) Degree
Deputy General Manager (Finance) ICAI/ ICWAI/ MBA in Finance
Deputy General Manager (HR) Degree
Manager (T/P) Degree in Civil Engineering
Manager (Land Acquisition & Coord.) Degree
Manager (Legal) Degree in Law, LLB
Deputy Manager (T/P) Diploma/ Degree in Civil Engineering
Company Secretary Company Secretary, Degree
Junior Manager (HR) Degree

 

मिळणारे वेतन –

पदाचे नाव  मिळणारे वेतन
General Manager (T/P) Rs. 1,23,100 – 2,15,900/-
General Manager (Land Acquisition & Coord.) Rs. 1,23,100 – 2,15,900/-
General Manager (Legal) Rs. 1,23,100 – 2,15,900/-
Deputy General Manager (T/P) Rs. 78,800 – 2,09,200/-
Deputy General Manager (Land Acquisition & Coord.) Rs. 78,800 – 2,09,200/-
Deputy General Manager (Finance) Rs. 78,800 – 2,09,200/-
Deputy General Manager (HR) Rs. 78,800 – 2,09,200/-
Manager (T/P) Rs. 67,700 – 2,08,700/-
Manager (Land Acquisition & Coord.) Rs. 67,700 – 2,08,700/-
Manager (Legal) Rs. 67,700 – 2,08,700/-
Deputy Manager (T/P) Rs. 56,100 – 1,77,500/-
Company Secretary Rs. 56,100 – 1,77,500/-
Junior Manager (HR) Rs. 44,900 – 1,42,400/-

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा अवलंब करायचा आहे.
3. अर्ज करण्यापूर्वी (NHIDCL Recruitment 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 आहे.
भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.nhidcl.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : गुढग्याच्या दुखापतीने दिला टर्निंग पॉईंट; गगनदीपने अवघ्या 23 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC

Success Story Gagandeep Bharati

करिअरनामा ऑनलाईन । युपीएससीची परीक्षा देशातील सर्वात (Success Story) कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी हजारो विद्यार्थी याची मन‌ लावून तयारी करत असतात. काहीजण उत्तीर्ण होतात तर काहींना अपयशाला सामोरं जावं लागतं. बहुतेक वेळा ही मुलं परिस्थिती समोर हार न‌ मानता चिकाटीने प्रयत्न करत राहतात. या विद्यार्थ्यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देत असतो. ही परीक्षा उत्तीर्ण करणारे विद्यार्थी देशासाठी कार्य करतात, त्यांच्या या पेशाला अनेकांकडून सन्मान दिला जातो.आजची गोष्ट देखील अशाच एका तरुणाची आहे ज्याने परिस्थिती समोर हार न‌ मानता आपले स्वप्न पूर्ण केले आहे.

वडील नोकरदार तर आई गृहिणी
गगनदीप भारती यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील नंदनग्रामचा आहे. त्यांचे वडील बांधकाम विभागात काम करायचे तर आई गृहिणी आहे.आपले शिक्षण सेंट जोसेफ अकादमी मधून घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली‌ विद्यापीठातून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 10वी, 12वीत त्यांनी अव्वल कामगिरी करत 94 टक्के गुण मिळवले आहेत.

गुढग्याला झालेल्या दुखापतीमुळे बदलला निर्णय (Success Story)
शिक्षणाबरोबरच गगनदीप यांना खेळाची आवड आहे. त्यांनी लांब उडी क्रीडा प्रकारात भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविले‌ आहे. यावेळीच घडलेल्या एका घटनेमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.‌ जुनीअर ऑलिंपिक्समध्ये भाग घेणं हे त्यांचं स्वप्न होतं, मात्र तो काळ कोव्हीडचा असल्याने ते स्वप्न काही पूर्ण झालं नाही. परिस्थितीवर मात करत त्यांनी‌ सीनियर ऑलिंपिक्समध्ये भाग घेण्याचं निश्चित केलं मात्र नशिबाची साथ नसल्याने सरावाच्या वेळी त्यांच्या गुढग्याला दुखापत झाली व हे स्वप्न देखील पूर्ण होण्याचे सगळेच दरवाजे बंद झाले. परिस्थिती समोर न झुकता जो सकारात्मक विचार करतो‌ त्याच माणसाच्या दारात कधी ना कधीतरी यश‌ येतं. गगनदीप‌ यांनी खचून न जाता नवीन आव्हान स्वीकारलं व संरक्षण सेवेत रुजू होण्याचा विचार केला.

पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
UPSC सारखी कठीण परीक्षा पास करण्यासाठी लागणारी सगळी मेहनत घेण्याची गगनदीप यांची तयारी होती. यासाठी त्यांनी वेळोवेळी स्वतःच नोट्स तयार केल्या. कोचिंग क्लासचा (Success Story) आधार घेत त्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. अथक परिश्रमातून त्यांनी UPSC च्यावतीने घेण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) परीक्षेत 85वा क्रमांक पटकावला आहे. विशेष बाब म्हणजे ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करणाऱ्या गगनदीप यांचं वय केवळ 23 वर्ष आहे. आता ते असिस्टंट कमाडेंट बनले आहेत व सध्या Combined Defence Services (CDS) परीक्षेच्या निकालाचीही वाट पाहत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Swadhar Yojana : आता शिक्षणाला लागणार नाही  ब्रेक; सरकार ‘या’ विद्यार्थ्यांना देणार 51 हजार रुपये; पहा अर्ज कसा करायचा?

Swadhar Yojana

करिअरनामा ऑनलाईन । गरीब परिवारातील विद्यार्थ्यांना (Swadhar Yojana) दहावी नंतरचे शिक्षण मिळावे, त्यांना राहण्यासाठी खाण्यापिण्यासाठी योग्य सोयी सुविधा मिळाव्या यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून एक योजना आखण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असं या योजनेचे नाव असून या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून प्रतीवर्षी 51,000/- रुपये अनुदान म्हणून आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे दहावीनंतर तुम्ही शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी जात असाल, आणि त्या ठिकाणी तुम्हाला राहण्यासाठी वसतीगृह मिळाले नाही तर तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही. अशावेळी तुम्ही स्वाधार योजनेचा लाभ घेऊ शकता.

दरवर्षी मिळते 51 हजारांची मदत (Swadhar Yojana)
कोणताच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हा स्वाधार योजनेचा उद्देश आहे. याशिवाय स्वतःचं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना देखील याचा लाभ होऊ शकतो. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना राहण्यासाठी असलेले वसतीगृह पूर्णपणे भरले जाते. त्यामुळे काही होतकरू मुलांना वस्तीगृहाचा लाभ घेता येत नाही. अशा वेळेस स्वाधार योजना उपयोगी येऊ शकते. या योजनेअंतर्गत दहावी, बारावी, पदविका व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारकडून 51 हजारांची रक्कम दरवर्षी देण्यात येते.

या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, नव बौद्ध धर्मातील विद्यार्थी यांना या योजनेचा लाभ मिळतो. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपये पेक्षा कमी (Swadhar Yojana) आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे . तसेच स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. याशिवाय मागच्या वर्गामध्ये या विद्यार्थ्यांना 60% मार्क्स आणि दिव्यांग असाल तर तुम्हाला 40 टक्के मार्क असणे गरजेचे आहे.
अशी होते आर्थिक मदत
स्वाधार योजने मध्ये (Swadhar Yojana) बोर्डिंग सुविधेसाठी 28 हजार रुपये, रहिवासी सुविधेसाठी 15 हजार रुपये, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी 5 हजार रुपये, आणखीन वेगळा खर्च 8 हजार रुपये, दुसऱ्या शाखेमध्ये प्रवेश घेण्यासाठी 2 हजार रुपये या पद्धतीने 51 हजार रुपये स्वाधार योजनेतून मिळतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा लागेल.

कोणकोणती कागदपत्रे आहेत आवश्यक
1. विद्यार्थ्यांचे बँक अकाउंट
2. आधार कार्ड
3. मोबाईल नंबर
4. पासपोर्ट फोटो
5. ओळखपत्र
6. उत्पन्न प्रमाणपत्र
7. जात प्रमाणपत्र
8. सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत
9. विद्यार्थी दिव्यांग असल्यास त्या बाबतचे प्रमाणपत्र

असा भरा अर्ज (Swadhar Yojana)
स्वाधार योजनेचा (Swadhar Yojana) लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील फॉर्म भरू शकतात.
1) सर्वात आधी महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या वेबसाईटवर जा. https://sjsa.maharashtra.gov.in/
2) त्यानंतर होम पेज उघडेल.
3) होम पेजवर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना फॉर्म pdf ची लिंक दिसेल.
4) त्या लिंक वर क्लिक करा. यानंतर पीडीएफ फॉर्म उघडेल.
5) हा फॉर्म डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढा.
6) प्रिंट घेतल्यानंतर त्या ठिकाणी दिलेली सर्व माहिती भरा.
7) या अर्जासोबत लागणारी सर्व कागदपत्रे जोडा.
8) तुमच्या जवळच्या समाज कल्याण विभागाकडे जाऊन यानंतर हा फॉर्म सबमिट करा.
9) तुमच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर सरकारकडून तुमच्या बँक खात्यावर स्वाधार योजनेच्या माध्यमातून पैसे जमा करण्यात येतील.
अधिकृत वेबसाईट – https://sjsa.maharashtra.gov.in/
स्वाधार योजना PDF – swadhar yojana PDF
स्वाधार योजना फॉर्म – Swadhar yojana Form
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com