Mumbai Police Recruitment 2023 : मुंबई पोलिसमध्ये ‘या’ पदांवर थेट मुलाखतीने होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई पोलीस विभाग अंतर्गत (Mumbai Police Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सेवानिवृत्त सहायक लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, कार्यालय अधीक्षक, प्रमुख लिपिक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरीता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे.

विभाग – मुंबई पोलीस विभाग
भरले जाणारे पद –
1. सेवानिवृत्त सहायक लेखा अधिकारी
2. लेखा अधिकारी
3. कार्यालय अधीक्षक
4. प्रमुख लिपिक
पद संख्या – 10 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा मुंबई – १

मुलाखतीची तारीख – 23 ऑगस्ट 2023
अशी होणार निवड – (Mumbai Police Recruitment 2023)
1. या भरतीकरिता मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
2. उमेदवारांनी वरील दिलेल्या  संबंधित पत्त्यावर मुलाखतीला हजर रहायचे आहे.
वरील नमूद पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे.
3. मुलाखतीची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.mahapolice.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com