Home Blog Page 261

Career as Data Scientist : हे स्किल तुमच्यात असतील तर तुम्ही बनू शकता ‘डेटा सायंटिस्ट’

Career as Data Scientist

करिअरनामा ऑनलाईन । दिवसेंदिवस माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात (Career as Data Scientist) प्रगती होत आहे. इंटरनेटमुळे सर्वच क्षेत्रात क्रांती घडली आहे. प्रत्येक जण माहितीचा स्रोत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डेटा तयार होत आहे. परिणामी सध्याच्या काळात ‘डेटा सायंटिस्ट’ होणे चांगले करिअर समजले जात आहे. डेटा सायंटिस्टला चांगला पगार मिळतो. त्यामुळे प्रत्येक जण डेटा सायंटिस्ट कसे बनावे ह्याचा विचार करत आहेत. पाहूया डेटा सायंटिस्ट बनण्यासाठी कोणते स्किल आवश्यक आहेत याविषयी…

1. Programing Skill
डेटा हाताळणी, विश्लेषण आणि मॉडेल डेव्हलपमेंटसाठी Python किंवा R language सारख्या प्रोग्रामिंग भाषांमध्ये प्रवीणता असणं आवश्यक आहे.
2. Machine Learning (Career as Data Scientist)
प्रेडिक्टिव आणि प्रिस्क्रिप्टिव्ह मॉडेल्स तयार करण्यासाठी, तुम्हाला पर्यवेक्षी आणि पर्यवेक्षित नसलेल्या मशीन लर्निंग पद्धती, तसेच त्यांचे उपयोग आणि मर्यादा या दोन्हींबद्दल बरेच काही माहित असणे आवश्यक आहे.
3.Communication Skills
प्रभावी संप्रेषण, लिखित आणि मौखिक दोन्ही स्वरूपात, जटिल तांत्रिक संकल्पना आणि निष्कर्ष तांत्रिक नसलेल्यांसह विविध भागधारक आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक आहे.

4. Problem Solving
डेटासह कठीण समस्यांचे निराकरण करण्यासाठी वेगळ्या संकल्पना आणि क्रिएटिव्हिटी वापरून समस्या सोडवण्यासाठी तुम्ही सक्षम असणे आवश्यक आहे.
5. Stastitics and Mathematics
सांख्यिकीय तत्त्वे, संभाव्यता सिद्धांत आणि रेखीय बीजगणित यांच्या ठोस आधाराशिवाय चाचण्या आयोजित करणे, निष्कर्ष काढणे किंवा अंदाज मॉडेल तयार करणे अशक्य आहे.
6.Domain knowledge
डेटा अंतर्दृष्टी संदर्भित करण्यासाठी आणि संबंधित उपाय विकसित करण्यासाठी तुम्ही ज्या विशिष्ट उद्योगात किंवा डोमेनमध्ये काम करत आहात ते समजून घेणे महत्त्वाचे आहे.

7.Statistics and Mathematics
सांख्यिकीय तत्त्वे, संभाव्यता सिद्धांत आणि रेखीय बीजगणित यांच्या ठोस आधाराशिवाय चाचण्या आयोजित करणे, निष्कर्ष काढणे किंवा अंदाज मॉडेल तयार करणे अशक्य आहे.
8. Data Visualization
अंतर्दृष्टी आणि महत्त्वपूर्ण व्हिज्युअलायझेशन तयार करण्यासाठी Matplotlib, Seaborn, ggplot2 किंवा Tableau सारखी साधने वापरण्याची क्षमता (Career as Data Scientist) जे गैर-तांत्रिक भागधारकांना अंतर्दृष्टी आणि निष्कर्ष पोचवण्यासाठी वापरले जाऊ शकते.
9. Data wrangling
डेटाची गुणवत्ता आणि अचूकता सुनिश्चित करून, Pandas, dplyr, किंवा SQL सारख्या लायब्ररींचा वापर करून कच्चा डेटा वापरण्यायोग्य फॉरमॅटमध्ये प्रीप्रोसेस, स्वच्छ आणि रूपांतरित करण्याची क्षमता.
10. Professional perspective
व्यवसायाच्या संकल्पनांची मजबूत समज आणि डेटा अंतर्दृष्टी व्यवसाय मूल्य वाढविणाऱ्या शिफारसींमध्ये रूपांतरित करण्याची क्षमता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Cochin Shipyard Recruitment 2023 : इंजिनियर्सना नोकरीचा गोल्डन चान्स!! कोचीन शिपयार्ड अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

Cochin Shipyard Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत (Cochin Shipyard Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प अधिकारी पदांच्या एकूण 22 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – कोचीन शिपयार्ड लिमिटेड
भरले जाणारे पद –
1. प्रकल्प अधिकारी (यांत्रिक) – 13 पदे
2. प्रकल्प अधिकारी (इलेक्ट्रिकल) – 04 पदे
3. प्रकल्प अधिकारी (सिव्हिल) – 01 पद
4. प्रकल्प अधिकारी (इंस्ट्रुमेंटेशन) – 01 पद
5. प्रकल्प अधिकारी (माहिती तंत्रज्ञान) – 02 पदे
6. प्रकल्प अधिकारी (इलेक्ट्रॉनिक्स) – 01 पद
पद संख्या – 22 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 सप्टेंबर 2023
वय मर्यादा – 30 वर्षे
अर्ज फी – रुपये 700 /-

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Cochin Shipyard Recruitment 2023)

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रकल्प अधिकारी (यांत्रिक)  Degree in Mechanical Engineering
प्रकल्प अधिकारी (इलेक्ट्रिकल) Degree in Electrical Engineering
प्रकल्प अधिकारी (सिव्हिल) Degree in Civil Engineering
प्रकल्प अधिकारी (इंस्ट्रुमेंटेशन) Degree in Instrumentation Engineering
प्रकल्प अधिकारी (माहिती तंत्रज्ञान) Degree in Computer Science/ Information Technology, Masters Degree in Computer Science/ Computer Application/ Information Technology
प्रकल्प अधिकारी (इलेक्ट्रॉनिक्स) Degree in Electronics/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation Engineering

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
3. अर्ज करण्यापुर्वी (Cochin Shipyard Recruitment 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – cochinshipyard.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ESIC Recruitment 2023 : सरकारी नोकरी!! ESIC अंतर्गत विविध पदांकरीता मुलाखतींचे आयोजन; दरमहा 1 लाखापर्यंत पगार

ESIC Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी राज्य विमा निगम, मुंबई (ESIC Recruitment 2023) अंतर्गत ज्येष्ठ निवासी पदाच्या 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दर बुधवारी दि. 13 सप्टेंबर 2023 पर्यंत (सुट्टी वगळता) मुलाखती करिता हजर रहायचे आहे.

संस्था – कर्मचारी राज्य विमा निगम, मुंबई
भरले जाणारे पद  – ज्येष्ठ निवासी
पद संख्या – 22 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 40 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – संबंधित विभाग/H.O.D, M.S. कार्यालय, ESIS हॉस्पिटल कांदिवली, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई – 400101.
मुलाखतीची तारीख – दर बुधवारी (दि. 13.09.2023 पर्यंत, सुट्टीचे दिवस वगळता)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ESIC Recruitment 2023)
MBBS with PG, MD, DNB, or Diploma in the concerned specialty from a recognized university or MBBS with 2 Years working experience in the same, is applicable only Non-availability of PG qualified candidate.
मिळणारे वेतन –
ज्येष्ठ निवासी – Rs.1,27,141/- per month. It would be reduced by Rs.1350/- per month for diploma holders and Rs.2250/- for Non- Diploma/degree. No other allowances in any form shall be admissible.

निवड प्रक्रिया – मुलाखत 
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्यावर उपस्थित रहावे.
3. उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.

आवश्यक कागदपत्रे –
1. वयाच्या पुराव्यासाठी मॅट्रिकचे प्रमाणपत्र
2. शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
3. MMC/MCI नोंदणी प्रमाणपत्रे
4. इंटर्नशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र (ESIC Recruitment 2023)
5. नवीनतम जात प्रमाणपत्र/नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र/ EWS प्रमाणपत्र
6. अनुभव प्रमाणपत्रे, NOC पत्र, नियोक्त्याचे रिलिव्हिंग लेटर जर आधीच नोकरीला असेल तर
दोन छायाचित्रे (PP आकार)
7. “अ‍ॅनेक्‍चर-अ” नुसार रीतसर भरलेला बायो डेटा फॉर्म (उमेदवाराने फक्त कॅपिटल अक्षरात भरावा).

भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स – (ESIC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : ITI पास उमेदवारांसाठी मुंबईत नोकरी; टाटा मेमोरियल सेंटरमध्ये मिळवा 40 हजार पगाराची नोकरी

Job Notification (77)

करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर ACTREC अंतर्गत (Job Notification) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिफ्ट तंत्रज्ञ पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी 25 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – टाटा मेमोरियल सेंटर ACTREC
भरले जाणारे पद – लिफ्ट तंत्रज्ञ
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – तिसर्‍या मजल्यावर, खानोलकर शोधिका, TMC-ACTREC, Sec-22, खारघर, नवी मुंबई- 410210
मुलाखतीची तारीख – 25 ऑगस्ट 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
लिफ्ट तंत्रज्ञ Candidate should have passed ITI from Govt. recognized Institute / NCVT certification and should have minimum on job work experience of five years with reputed lift manufacturer.


मिळणारे वेतन –
रु. 30,000 /- ते 40,000/- दरमहा
अशी होणार निवड –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या (Job Notification) संबंधित पत्त्यावर मुलाखतीला उपस्थित रहायचे आहे.
3. मुलाखतीची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://actrec.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Aarogya Vibhag Bharti 2023 : राज्याच्या आरोग्य विभागात होणार 12 हजार पदांवर भरती; पहा कोणती पदे भरली जाणार

Aarogya Vibhag Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वीच ठाण्याच्या (Aarogya Vibhag Bharti 2023) सरकारी रुग्णालयात अत्यंत धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर विरोधकांनी आरोग्य यंत्रणेवर आणि आरोग्य विभागात करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेविषयी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. त्यामुळे आता सरकारने याबाबत ठोस पावले उचलत आरोग्य विभागात 12 हजार पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडयात 11,903 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. ही जाहिरात आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या पदांसाठी असणार आहे.

‘ही’ पदे भरली जाणार? (Aarogya Vibhag Bharti 2023)
हाती आलेल्या माहितीनुसार, पुढील आठवडयात ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 11,903 जागांसाठी जाहिरात निघेल. मुख्य म्हणजे, ही भरती प्रक्रिया MPSC, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे. तसेच 11,903 जागांमध्ये गट ‘क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या रिक्त जागांचा (Aarogya Vibhag Bharti 2023) समावेश असेल. तर गट ‘ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्ष सेवक या पदांसाठी भरती करण्यात येईल. पुढील आठवड्यात या जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर इतर अधिक माहिती समजेल.

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेचा प्रश्न खोळंबलेला होता. त्यामुळे इतर उमेदवार देखील या भरती प्रक्रियेची आतुरतेने वाट पाहत होते. अशातच ठाण्यातील रुग्णालयात एकाच वेळी 18 जणांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली. त्यानंतरच सरकारने तातडीने आरोग्य विभागात रिक्त जागा भरण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयात कर्मचारी नसल्यामुळे सर्व भार अधिकाऱ्यांवर पडत आहेत. यामुळे रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. या कारणानेच आरोग्य विभागात 11,903 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : स्ट्रीट लाईटखाली बसून अभ्यास केला अन् थेट बनली पायलट; कोण आहे कॅप्टन झोया अग्रवाल?

Success Story of Captain Zoya Agarwal

करिअरनामा ऑनलाईन । जगातील सर्वात लांब हवाई मार्गांपैकी (Success Story) एका मार्गावर विमान उडवणारी झोया अग्रवाल ही पहिली महिला वैमानिक आहे. सॅन फ्रान्सिस्को ते बंगळुरू अशा उत्तर ध्रुवावर जगातील सर्वात लांब हवाई मार्गावर झोयाने यशस्वी उड्डाण केले आहे.

Success Story of Captain Zoya Agarwal

 

कोण आहे कॅप्टन झोया?
झोया अग्रवालने भारताचे नाव जगात उंचावले आहे. तिच्या नेतृत्वाखाली, महिला फ्लाइट इंडिया पायलट टीमने 2021 मध्ये प्रथमच जगातील सर्वात लांब उड्डाण मार्गावर उड्डाण केले आहे. सॅन फ्रान्सिस्कोहून बेंगळुरूला ही टीम गेली होती. अशाप्रकारे त्यांनी बोईंग 777 उड्डाण करत उत्तर ध्रुव ओलांडला. 2013 च्या सुरुवातीला, ती बोईंग 777 उडवणारी भारतातील सर्वात तरुण महिला पायलट बनली होती. जोया एअर इंडियामध्ये कॅप्टन आहे.

Success Story of Captain Zoya Agarwal

असा होता अडचणींनी भरलेला प्रवास
झोया अग्रवालचा (Zoya Agarwal) पायलट होण्याचा प्रवास अनेक अडचणींनी भरलेला होता. तिचा जन्म अशा कुटुंबात झाला जिथे मुली पायलट होण्याचे स्वप्नही पाहू शकत नाहीत. झोयाने पहिल्यांदा पायलट बनण्याची इच्छा तिच्या आईकडे व्यक्त केली तेव्हा ती ढसाढसा रडू लागली. एवढी वेडी मुलगी का जन्माला आली, असा प्रश्न त्यांना पडला. त्यांना झोयाचे लग्न लावून द्यायचे होते.

Success Story of Captain Zoya Agarwal

‘पायलट होण्याचा विचार स्वप्नातही केला नव्हता’
जोया अग्रवाल ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. जेव्हा ती पायलट बनण्याचे स्वप्न पाहू लागली तेव्हा तिच्यासमोर कोणाचाच आदर्श नव्हता. फ्लाइट डेकमध्ये मुलींच्या प्रवेशाचा विचारही तेव्हा केला जात नव्हता. पण झोयाने हार मानली नाही. तिने अशक्य गोष्ट शक्य करून (Success Story) दाखवली. एकदा ती म्हणाला होती, “पायलट (Pilot) होण्याचा विचार स्वप्नातही मी केला नव्हता. माझा जन्म अशा काळात झाला जेव्हा भारतात मुलींना शिक्षण देण्याऐवजी मुलींचे लग्न लवकर करुन देणे एवढीच विचारसरणी प्रचलित होती. लग्नानंतर माझे आयुष्य मुले आणि कुटुंब सांभाळण्यात जात होते.”

Success Story of Captain Zoya Agarwal

 

रस्त्यावरील दिव्याखाली बसून केला अभ्यास
जोया अग्रवालचे बालपण संघर्षमय होते. घरातील वीज वारंवार खंडित होत होती. त्यामुळे कधी-कधी तिला रस्त्याच्या कडेला असलेल्या लाईटखाली बसून अभ्यास करावा लागे. लहानपणापासूनच (Success Story) ती तिच्या शिक्षणासाठी पिगी बँकेत पैसे जमा करत होती. सणासुदीला जे काही पैसे मिळायचे ते ती पिगी बँकेत साठवायची. आपल्या बचतीतून तिने विद्यापीठाचे शिक्षण पूर्ण केले. जोया नेहमी अभ्यासात टॉपर होती त्यामुळे तिच्यातील जिद्द पाहून तिच्या पालकांनी तिला पायलट बनण्याची परवानगी दिली.

Success Story of Captain Zoya Agarwal


लहानपणीचं स्वप्न केलं पूर्ण
(Success Story)
जोया वयाच्या 8 व्या वर्षीपासूनच आकाशात उंच भरारी घेण्याचे स्वप्न पाहू लागली. आता ती ‘बोईंग 777’ विमाने जगभर उडवत आहे. 2004 मध्ये तिने एअर इंडियासोबत स्वप्नवत उड्डाण सुरू केले. युनायटेड नेशन्समध्ये जनरेशन इक्वॅलिटी अंतर्गत महिला प्रवक्ता म्हणून कॅप्टन जोया अग्रवालची निवड झाली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : रेल्वेविषयी 10 महत्वाचे प्रश्न; स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना याची उत्तरे माहित असायलाच हवीत 

GK Updates 21 Aug

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या (GK Updates) रेल्वे नेटवर्कच्या यादीत चौथ्या स्थानी येते. देशातील लाखो प्रवाशांना परवडणाऱ्या दरात हजारो किलोमीटरचा प्रवास करण्याची संधी भारतीय रेल्वेने दिली आहे. या रेल्वे नेटवर्कचा इतिहास सुद्धा तितकाच रंजक आहे. बहुतांश वेळा स्पर्धा परीक्षांमध्ये या इतिहासाविषयी व रेल्वेच्या विविध महत्त्वाच्या पैलूंविषयी प्रश्न विचारले जातात. जर तुम्ही अशा परीक्षांसाठी तयारी करत असाल तर आज आम्ही भारतीय रेल्वे व जगभरातील विविध रेल्वे नेटवर्कविषयी काही खास गोष्टी सांगणार आहोत. सामान्य ज्ञान म्हणूनही या गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात.

1. भारतातील सर्वात पहिल्या रेल्वेचा शुभारंभ कोणी केला होता?
उत्तर – भारतात रेल्वे सेवा सुरु करण्याचे श्रेय हे लॉर्ड डलहौसी यांना जाते, त्यांनी १८५३ मध्ये पहिल्यांदा भारतात रेल्वेचा शुभारंभ केला होता.
2. भारतातील पहिल्या ट्रेनने मुंबई ते ठाणे प्रवासात किती कि. मी. अंतर पार केले होते?
उत्तर – १६ एप्रिल १८५३ ला मुंबई ते ठाणे (GK Updates) दरम्यान धावलेल्या ट्रेनने तब्ब्ल ३४ किमी अंतर पार केले होते.
3. भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे मार्गाची लांबी किती आहे?
उत्तर – आसामच्या डिब्रूगढ़ पासून ते कन्याकुमारी पर्यंत भारतातील सर्वात मोठा रेल्वे मार्ग आहे. या रेल्वेमार्गाची लांबी ४,१८९ कि. मी. इतकी आहे.

4. जगात पहिल्यांदा ट्रेनची (Train) सुरुवात कधी झाली?
उत्तर – २७ सप्टेंबर १८२५ ला वाफेच्या इंजिनाच्या मदतीने ३८ डब्ब्यांची ट्रेन धावली होती. या ट्रेनमध्ये ६०० प्रवासी होते व त्यांनी लंडनच्या डार्लिंगटन पासून ते स्टॉकटोन पर्यंत ३७ मैलांचा प्रवास केला होता.
5. मैत्री एक्सप्रेस कोणत्या दोन देशातून जाते?
उत्तर – मैत्री एक्सप्रेस भारत व बांग्लादेश या दोन देशातून प्रवास करते. या एक्सप्रेसची सुरुवात १४ एप्रिल २००८ ला झाली होती.
6. (GK Updates) भारतात सर्वात लांब पल्ल्याची ट्रेन कोणती? तिचा प्रवास किती तासांचा असतो?
उत्तर – देशात सर्वात लांब पल्ल्याचा प्रवास करणारी ट्रेन विवेक एक्सप्रेस आहे. जी डिब्रूगढ़ ते कन्याकुमारीअसा प्रवास ७६ तासात करते. या प्रवासात ४,१८९ कि. मी. इतके अंतर पार केले जाते.

7. देशात पहिली बुलेट ट्रेन (Bullet Train) कुठे सुरु होणार आहे?
उत्तर – देशातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई असा प्रवास करणार आहे.
8. जगातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन कोणते?
उत्तर – लिवरपूल स्ट्रीट स्टेशन, इंग्लंड हे जगातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन आहे. ज्याची स्थापना १५ सप्टेंबर १८३० ला झाली होती.

9. भारतीय रेल्वेचे (Indian Railway) ब्रीदवाक्य काय आहे?
उत्तर – भारतीय रेल्वेचे ब्रीदवाक्य आहे ‘राष्ट्र की जीवन रेखा म्हणजेच देशाची लाईफलाईन.
10. भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे मार्ग आहेत?
उत्तर – उत्तर प्रदेशात भारतातील सर्वाधिक रेल्वे मार्ग आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती पेपरच्या वेळापत्रकात मोठा बदल; पहा बदललेली वेळ

Talathi Bharti 2023 (20)

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीसाठी राज्यभरात (Talathi Bharti 2023) सुरु असलेल्या परीक्षेच्या वेळी विद्यार्थांचा खोळंबा झाल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तलाठी भरतीची परीक्षा पार पडत आहे. मात्र राज्यातील संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यात परीक्षेआधीच सर्व्हर डाऊन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर तलाठी पेपरच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे.

तलाठी पेपरची वेळ (Talathi Bharti 2023) बदलण्यात आली असून आज (दि. 21 ऑगस्ट) दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत होणाऱ्या पेपरची वेळ बदलण्यात आली आहे. हा पेपर आता दुपारी 2 ते 4 या वेळेत होणार होणार आहे. पुण्यातील तलाठी परिक्षेच्या सेंटर्सवर हे बोर्ड लावण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती परीक्षेत सर्व्हरचा खेळ खंडोबा!! लाखो परीक्षार्थी खोळंबले

Talathi Bharti 2023 (19)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सर्वत्र तलाठी भरतीसाठी (Talathi Bharti 2023) परीक्षा सुरु आहेत. या परीक्षेत आज सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील नागपूरसह अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर अशा अनेक परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळे लाखो उमेदवारांची सकाळपासून घालमेल सुरू होती. परीक्षा केंद्रांवर मोठ्या संख्येने उमेदवार प्रवेश पत्र हातात घेऊन उभे होते पण त्यांना वर्गात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे उमेदवार संतप्त झाले आहेत. या आधी नाशिकमध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे य़ापुढे तरी तलाठी परीक्षा निर्विघ्नपणे पार पडतील का? असा प्रश्न तलाठी पदाचे परीक्षार्थी विचारत आहेत. दरम्यान, आता सर्व्हर पूर्ववत झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

महसूल विभागाकडून तलाठी पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी संपूर्ण राज्यभरात भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठी राज्यातून 10 लाख 41 हजार उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. दरम्यान तलाठी पदाच्या परीक्षा फीवरुन  मोठा वादंग निर्माण झाला होता. आता ऐन परीक्षेच्या वेळी सर्व्हरच डाऊन झाल्यानं विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला आहे.
राज्यातील या केंद्रांवर परीक्षा खोळंबली (Talathi Bharti 2023)
अकोला जिल्ह्यातील दोन्ही परिक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. जिल्ह्यात बाभूळगाव आणि कापशी येथे दोन परिक्षा केंद्रांवर हजारो विद्यार्थ्यांची परीक्षा होती. सकाळी 9 ते 11 ही परीक्षेचे वेळ होती. सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांची नांव नोंदणी खोळंबल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेर ताटकळत थांबावे लागले.
नागपूर येथील परीक्षा केंद्रावर मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षेचे प्रवेश पत्र हातात घेऊन उभे आहेत. मात्र त्यांना वर्ग खोल्यांमध्ये प्रवेश दिला जात नसल्याने विद्यार्थी संतप्त झाले. अनेक ठिकाणी परीक्षार्थ्यांनी परीक्षेची व्यवस्था आणि सर्वर डाऊन झाल्याबद्दल रोष व्यक्त केला.

विविध ठिकाणाहून आलेले विद्यार्थी सकाळी सात वाजल्यापासून लातूरच्या परीक्षा केंद्राबाहेर हजर होते. काही तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा पुढील सत्रात घेतली जाईल; असं इथल्या कर्मचाऱ्यांनी (Talathi Bharti 2023) सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त झाला. यवतमाळ, हिंगोली नांदेडसारख्या भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची यामुळे गैरसोय झाली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GHRDC Goa Bharti 2023 : 10 वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी मेगाभरती!! गोवा मानव संसाधन विकास महामंडळात ‘ही’ पदे भरण्यासाठी थेट होणार मुलाखत 

GHRDC Goa Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । गोवा मानव संसाधन (GHRDC Goa Bharti 2023) विकास महामंडळ, पर्वरी, गोवा अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मल्टी टास्किंग स्टाफ, ड्रायव्हर, पर्सनल असिस्टंट/ स्टेनो सेक्रेटरी पदाच्या एकूण 370 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 28 व 29 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – गोवा मानव संसाधन विकास महामंडळ, पर्वरी, गोवा
भरले जाणारे पद –
1. मल्टी टास्किंग स्टाफ – 300 पदे
2. ड्रायव्हर – 50 पदे
3. पर्सनल असिस्टंट/ स्टेनो सेक्रेटरी – 20 पदे
पद संख्या – 370 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – गोवा मानव संसाधन विकास महामंडळ, अल्टो – पोर्वोरिम बर्डेझ गोवा
मुलाखतीची तारीख – 28 व 29 ऑगस्ट 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (GHRDC Goa Bharti 2023)

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
मल्टी टास्किंग स्टाफ 10th pass
ड्रायव्हर 10th pass
पर्सनल असिस्टंट/ स्टेनो सेक्रेटरी Graduation

 

मिळणारे वेतन –

पदाचे नाव मिळणारे वेतन 
मल्टी टास्किंग स्टाफ Rs. 14,000/- per month
ड्रायव्हर Rs. 16,000/- per month
पर्सनल असिस्टंट/ स्टेनो सेक्रेटरी Rs. 20,000/- per month


निवड प्रक्रिया – मुलाखत 

1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी दिलेली तारीख आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर रहावे.
3. उमेदवारांनी आपला अर्ज व (GHRDC Goa Bharti 2023) आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
4. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स – (GHRDC Goa Bharti 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – ghrdc.goa.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com