Home Blog Page 258

Talathi Bharti 2023 : मुंबईत तलाठी भरती परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वीच प्रवेशद्वार बंद; प्रवेश नकारल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप 

Talathi Bharti 2023 (21)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या (Talathi Bharti 2023) महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत तलाठी पदभरतीची घोषणा केली आहे त्यानुसार राज्यभर या पदभरतीसाठी दि. १७ ऑगस्टपासून परीक्षेला सुरुवात झाली आहे. या परीक्षेला सुरुवात झाल्यापासूनच या ना त्या कारणावरून परीक्षेदरम्यान गोंधळ निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

तलाठी भरती परीक्षेमधील विविध गोंधळामुळे ही परीक्षा चर्चेत आहे. परीक्षेतील सततच्या गैरप्रकारांमुळे परीक्षा स्थगितीची मागणी केली जात असतानाच मुंबईतील एका परीक्षा केंद्रावर गोंधळाचा नवा प्रकार पाहायला मिळाला. आज दि. २८ ऑगस्ट २०२३ ला मुंबईतील, पवई आयटी पार्कच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी उमेदवार केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.

मुंबईतील, पवई आयटी पार्क परीक्षा केंद्रावर उमेदवारांना सकाळी ८ वाजता हजर राहण्यास सांगण्यात आले होते. ९.०० वाजता या परीक्षेच्या सत्र १ मधील पेपरला सुरुवात होणार होती. त्यामुळे, परीक्षेपूर्वी आणि दिलेल्या वेळेनुसार उमेदवार परीक्षा केंद्रावर पोहोचले. मात्र दिलेल्या वेळेपूर्वीच परीक्षा (Talathi Bharti 2023) केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून, या परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांना प्रवेश नाकरण्यात आल्याने या उमेदवारांची परीक्षा केंद्राबाहेर गर्दी पाहाला मिळाली. त्याचबरोबर परीक्षा केंद्रावर उमेदवारांशी संवाद साधायला एकही परीक्षा केंद्र अधिकारी उपस्थित नसल्यामुळे येथे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये  संताप पहायला मिळाला.

“आम्हाला दिलेल्या माहितीनुसार आणि नियमांप्रमाणे आम्ही वेळेपूर्वीच परीक्षा केंद्रावर पोहोचलो होतो. मात्र, दिलेल्या वेळेपूर्वीच या परीक्षा केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. शिवाय, घडल्या प्रकाराबद्दल आम्हाला कोणतीही माहिती किंवा कारण देण्यासाठी परीक्षा केंद्रावर कोणताही केंद्र अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे, याप्रकरणाचा जाब कोणाला विचारणार…?”, असा संतप्त सवाल परिक्षार्थी उमेदवारांनी केला आहे.

दरम्यान परीक्षा केंद्रावर उमेदवारांशी संवाद साधण्यासाठी कोणीही हजर नसल्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करत संतप्त विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मात्र, परीक्षेदरम्यान (Talathi Bharti 2023) घडणार्‍या गोंधळाचा त्रास आम्ही किती काळ सहन करायचा आणि आमच्या होणार्‍या नुकसनाची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्नही या उमेदवारांकडून केला जात आहे.

जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तलाठी भरती परीक्षेसाठी TCS कंपनीच्यावतीने तारखा निश्चित करण्यात आल्या. परीक्षेच्या नियोजित वेळापत्रकानुसार दिवसाला तीन सत्रामध्ये ही परीक्षा पार पडते. मात्र, आज पहिल्या सत्रामध्येच हा प्रकार घडल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Full Stack Developer : IT क्षेत्रात कसं होता येईल Full Stack Developer? पहा जॉब प्रोफाईल आणि कशी मिळते संधी

Full Stack Developer

करिअरनामा ऑनलाईन । आजकाल कॅरिअरच्या संधी (Full Stack Developer) बदलत चालल्या आहेत त्यामुळे तुम्हाला एकाच ठराविक गोष्टीशी निगडीत काम करण्याची गरज नाही. आवडी प्रमाणे आणि तुमच्या जवळ असलेल्या Skills नुसार तुम्ही करिअर निवडू शकता. जगात खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे, Age-Old कामांचा जमाना सोडून आपण आत्ता नवीन गोष्टींकडे वळत आहोत. आज आपण अशाच एका क्षेत्राविषयी जाणून घेणार आहोत. जाणून घेऊया Full Stack Developer कोण असतात? त्याचं काम कसं चालतं? या क्षेत्रात करिअरची संधी कशी आहे याविषयी…

Full Stack Developer म्हणजे कोण?
एखाद्या Website च्या दोन्ही बाजू जबाबदारीने सांभाळणारा इंजिनीअर म्हणजे Full Stack Developer. Technical भाषेत सांगायचं झाल्यास Website चा Front End आणि Back End सांभाळणारा माणूस म्हणजे Full Stock Developer आहे.
Full Stack Developer चं काम काय आहे?
सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास Full Stack Developer हा Websites सांभाळतो आणि Applications तयार करतो.
ज्यात Front आणि Back end ची जबाबदारी सांभाळणे हा महत्वाचा भाग आहे. या शिवाय APIs वर काम करणं किंवा येणारे अडथळे दूर करणं हा त्याच्या कामाचा भाग असतो .कंपनीच्या बाकी विभागांसोबत तो विविध प्रोजेक्ट्स वर काम करत असतो.
दिवसेंदिवस technology मध्ये बदल पाहायला मिळतात, त्यामुळे Full Stock Developer ला नेहमीच नवनवीन कल्पनांचा शोध घेत राहावं लागतं.

Full Stock Developer साठी करिअरच्या संधी खालील क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहेत –
1. Computer Software
2. Information Technology
3. Internet (Full Stack Developer)
4. Financial Services
5. Higher education

Full-Stack Developer जवळ या गोष्टी असाव्यात –
1. Front-End Development : इथे काम करणाऱ्या माणसाला font, colors, page,layout या गोष्टी कशा चालतात याची किमान जाणीव असावी. या सोबतच HTML, CSS, JavaScript ची इत्यंभूत माहिती असली पाहिजे.
2. Back-End Development : इथे एखाद्या website च्या मागे चालणाऱ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. जिथे विशेषकरून programming language जमली पाहिजे. इथे Paython, PHP, Ruby on Rails इत्यादींचा समावेश आहे.
3. Web Design : हा Full-Stack Development चा महत्वाचा भाग आहे. इथे तुम्हाला software हाताळता आले पाहिजेत जसे कि PhotoShop. या सोबतच backgrounds, audio, Video वर काम करता आलं पाहिजे.
4. Database Management : यामध्ये तुम्हाला website च्या संबंधित असलेले प्रश्न सोडवता आले पाहिजेत. सोबतच जी काही storage आहे ती योग्यपणे हाताळता आली पाहिजे.
जर का तुम्हाला Full-Stack Developer होण्याची इच्छा असेल तर खालील प्रमाणे programming language माहिती असणं भाग आहे:
1.Angular JS
2. AWS
3.CSS
4.PHP
5. MySQL

कसे बनाल Full Stack Developer?
Full Stack Developer जवळ computer science, computer engineering किंवा या संबंधित विषयांमध्ये पदवी असावी. पदवी सोबतच तुम्हाला या क्षेत्राची आवड असावी व‌ आवश्यक कौशल्ये जोपासता यावीत ज्यामुळे ह्या क्षेत्रात प्रगती करणं सोपं जातं.
ही काही कॉलेजेस तुम्हाला पदवी मिळवून देतील – (Full Stack Developer)
1. Fergusson College, Pune
2. Ramnarain Ruia College, Mumbai
3. Mangalayatan University, Uttar Pradesh
4. C.V. Raman Global University, Orrisa
या कॉलेजेसची फीस साधारणपणे 60 हजार ते 70 हजारच्या आसपास असतात. प्रत्येक कॉलेज प्रमाणे मात्र ह्यात बदल होऊ शकतो. पगार विचारात घेतल्यास या कॉलेजेसकडून 9.50 लाख ते 15 लाखांपर्यंतच्या Placements मिळवल्या जाऊ शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Mantra : तुमच्याकडे डिग्री नाही?? घाबरु नका…’या’ मार्गातून तुम्ही करू शकता मोठी कमाई 

career mantra (12)

करिअरनामा ऑनलाईन । उत्तम करिअरसाठी चांगले शिक्षण (Career Mantra) आणि अनुभव असणे अत्यंत आवश्यक आहे. पण असे काही लोक आहेत ज्यांना कॉलेजमध्ये जाऊन शिकता येत नाही, ज्यांच्याकडे कोणतीही पदवी नाही त्यांच्यासाठी असे अनेक करिअरचे (Career) पर्याय आहेत ज्यात तुम्ही पदवी नसतानाही चांगली कमाई करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा करिअर पर्यायांबद्दल सांगत आहोत.

Career Mantra

1. वेबसाइट विकसक (Website Developer) –
जर तुम्ही महाविद्यालयात असाल आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पुढील करिअर घडवायचे असेल तर तुम्ही छोट्या बजेटमध्ये स्टार्टअपसाठी वेबसाइट सुरु करू शकता. यासाठी पदवी घेण्याची गरज नाही.
पगार – जे विद्यार्थी त्यांच्या स्टार्टअपसाठी वेबसाइट बनवत आहेत त्यापैकी बहुतेकांनी याबद्दल यूट्यूबवर शिक्षण घेतले आहे आणि प्रत्येक वेबसाइट तयार करण्यासाठी त्यांना 30,000 रुपये पगार मिळतो.

Career Mantra

2. अनुवादक (Translators)
तुम्हाला अनेक भाषा येत असतील आणि नवीन भाषा शिकण्याची आवड असेल, तर तुम्ही भाषांतरकाराच्या पदांवर काम करू शकता.
पगार (Salary) – या माध्यमातून तुम्हाला मिळणारे पैसे असाइनमेंटवर अवलंबून असतात. अनुवादक प्रति भाषांतर किमान 25,000 रुपये कमवू शकतात.

Career Mantra

3. कार्यक्रम नियोजक (Event Planner) –
भारतात विवाहसोहळे जितके भव्य होतात त्या प्रमाणात इव्हेंट प्लॅनरची मागणी वाढत आहे. इव्हेंट प्लॅनरला कोणत्याही औपचारिक पदवीची आवश्यकता नसते, परंतु चांगले संभाषण कौशल्य, सर्जनशील कल्पना आणि नाविन्यपूर्ण डिझाइन तयार करणे ही कौशल्ये त्याच्याकडे असणे आवश्यक आहे.
पगार – इव्हेंट प्लॅनिंगमध्ये काम करत असताना तुम्हाला (Career Mantra) मिळालेल्या कामावर तुमची कमाई अवलंबून असते. तुम्हाला साधारण प्रति इव्हेंट 10,000 ते 80,000 रुपये मिळू शकतात. तसेच या क्षेत्रात कमाईला मर्यादा नाही; हे देखील ध्यानात घ्यायला हवं.

 

Career Mantra

4. सोशल मिडिया मॅनेजर (Social Media Manager)
गेल्या काही वर्षांत सोशल मीडिया मार्केटिंगमधील नोकऱ्या, एजन्सी आणि फ्रीलांसरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. छोट्या स्टार्ट-अपपासून ते मोठ्या ब्रँडपर्यंत, प्रत्येकाला वेगळ्या दृष्टिकोनाची आवश्यकता असते. त्यांचे प्रेक्षक त्यांच्या फेसबुक पेजवर काय पाहतात हे त्यांना कळले पाहिजे. हे काम सोशल मीडिया मॅनेजर करतात.
पगार – सोशल मीडिया मॅनेजरला दरमहा 60,000 रुपयांपर्यंत पगार मिळतो.

career mantra

5. कलाकार / पेंटर (Artist / Painter)
आज सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक कलाकार आपल्यातील कला जगभर दाखवत आहेत. त्यामुळे काही वेळा या कलाकारांना प्रसिद्ध ब्रँडच्या सहकार्याने चांगले काम मिळते. ज्यामुळे ते लोकांमध्ये आपले काम दाखवू शकतात. आणि हे एक क्रिएटिव्ह क्षेत्र आहे; त्यामुळे तुम्हाला (Career Mantra) या क्षेत्रात काम करण्यासाठी कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्यातील अंगभूत कलेच्या माध्यमातून या क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकता.
पगार – येथे तुम्ही तुमच्या कामानुसार तुमच्या कलेसाठी पैसे मिळवू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Bank Recruitment 2023 : 12 वी पास उमेदवारांसाठी इंडियन बँकमध्ये नोकरीची संधी; मिळवा आकर्षक पगार 

Indian Bank Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन बँक अंतर्गत विविध रिक्त (Indian Bank Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिपिक, JMG अधिकारी स्केल I पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023 आहे.

बँक – इंडियन बँक
भरले जाणारे पद –
1. लिपिक
2. JMG अधिकारी स्केल I
पद संख्या – 11 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 सप्टेंबर 2023

वय मर्यादा – 18 ते 26 वर्षे
अर्ज फी – (Indian Bank Recruitment 2023)
1. Rs. 100/- + GST for SC/ST/PWBD candidates (Only intimation charges)
2. Rs. 700 /- + GST for all others
निवड प्रक्रिया – मुलाखत

भरतीचा तपशील –

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
लिपिक Pass in XII Standard examination or equivalent as the case may be
JMG अधिकारी स्केल I Pass in XII Standard examination or equivalent as the case may be

मिळणारे वेतन –

पद  मिळणे वेतन
लिपिक Rs. 17900-1000/3-20900-1230/3-24590-1490/4-30550-1730/7-42660-3270/1-45930-1990/1- 47920 (20 years)
JMG अधिकारी स्केल I Rs.36000 -1490/7 – 46430 – 1740/2 – 49910 – 1990/7 – 63840

असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
3. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी ‘सामान्य नियम आणि अटी’ काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
4. अर्जातील सर्व तपशील योग्य ठिकाणी भरा.
5. पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता केल्याची खात्री करावी.
निवड प्रक्रिया –
1. या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीने करण्यात येईल.
2. उमेदवारांच्या अर्जांची तपासणी केली जाईल आणि आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांना बोलावले जाईल.
3. अधिकारी संवर्गातील निवड ही (Indian Bank Recruitment 2023) अर्जाची तपासणी, संबंधित चाचण्या आयोजित करून केली जाईल.
4. लिपिक संवर्गातील निवड अर्जांची तपासणी आणि चाचण्या आयोजित करून केली जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.indianbank.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NSC Recruitment 2023 : राष्ट्रीय बियाणे महामंडळात नवीन उमेदवारांना नोकरीची संधी; लगेच करा APPLY

NSC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय बियाणे महामंडळ येथे रिक्त (NSC Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 89 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय बियाणे महामंडळ
भरले जाणारे पद – 
1. कनिष्ठ अधिकारी – 06 पदे
2. प्रशिक्षणार्थी – 17 पदे
3. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – 66 पदे
पद संख्या – 89 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2023

असा करा अर्ज – (NSC Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंकवर सादर करायचे आहेत.
4. अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

भरतीचा तपशील –
nsc posts

काही महत्वाच्या लिंक्स – (NSC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.indiaseeds.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2023 : रेल्वे जमीन विकास प्राधिकरण अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु; त्वरीत करा APPLY

Railway Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे जमीन विकास प्राधिकरण (Railway Recruitment 2023) अंतर्गत सह महाव्यवस्थापक/उपमहाव्यवस्थापक पदांच्या 05 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – रेल्वे जमीन विकास प्राधिकरण
भरले जाणारे पद –
1. सह महाव्यवस्थापक
2. उपमहाव्यवस्थापक
पद संख्या – 05 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (E-Mail)/ ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. महाव्यवस्थापक (एचआर) रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी युनिट क्र. ७०२ -बी ७वा मजला कॉन्मनेक्टस टॉवर -II DMRC बिल्डिंग, अजमेरी गेट दिल्ली -११००२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा – 67 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – As per RLDA official notification.
असा करा अर्ज – (Railway Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे.
3. अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – rlda.indianrailways.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : 10 वी पाससाठी शिपाई भरती!! नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 125 पदे रिक्त 

Government Job (5)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि (Government Job) मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागातील ‘शिपाई’ (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 125 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग
भरले जाणारे पद –
शिपाई
पद संख्या – 125 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 20 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग

वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे
अर्ज फी – (Government Job)
अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
राखीव प्रवर्ग – रु. 900/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Job)
उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –  Rs. 15,000/- ते 47,600/- दरमहा

वय मर्यादा –
1. किमान 18 वर्षे
2. कमाल 40 वर्षे
(मागासवर्गीयांसाठी खेळाडूंसाठी / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी / अनाथांसाठी वयोमर्यादा ०५ वर्ष शिथिलक्षम राहील.)
3. तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहील. त्याचबरोबर अगोदरच शासनाच्या सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा १० वर्षांनी शिथिल राहील.
4. मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली क्योमयदितील शिथिलतेची सवलत यांपैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन (Government Job) अर्ज सादर करावे.
3. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – dtp.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC HSC Supplementary Exam Result : उद्या जाहीर होणार 10वी-12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल; इथे पहा निकाल

SSC HSC Supplementary Exam Result

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांना प्रतिक्षा लागून (SSC HSC Supplementary Exam Result) राहिलेल्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या निकालाची तारीख जवळ आली आहे. या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी दुपारी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.

इथे पहा निकाल – (SSC HSC Supplementary Exam Result)
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या ‌www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. या माध्यमातून  विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
दहावीची परिक्षा 10 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती. तर बारावीची परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आली होती. याचाच निकाल (Result) उद्या जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकन या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी दि. 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतील.

उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी काय कराल?
विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करता येणार आहे. जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथमतः ऑनलाईन (SSC HSC Supplementary Exam Result) पद्धतीने अर्ज करुन उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असणार आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पुढील पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यापद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Recruitment 2023 : ZP भरतीसाठी तब्बल 14.51 लाख अर्ज जमा; एका जागेसाठी 75 उमेदवार रिंगणात

ZP Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील 34 जिल्हा (ZP Recruitment 2023) परिषदांमध्ये 19 हजार 460 पदांची नोकर भरती होणार आहे. त्यासाठी तब्बल 41 लाख 51 हजार उमेदवारांनी अर्ज केला असून एका जागेसाठी सरासरी 75 उमेदवार स्पर्धेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिंदे-फडणवीस सरकारने शासकीय विभागांमधील 75 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू असून आता जिल्हा परिषदांमधील रिक्तपदांसाठी अर्ज मागविले आहेत. दि. 5 ते 25 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. आता अर्जाची छानणी होऊन परीक्षा पार पडतील. उमेदवारांची संख्या पाहता एक-दोन दिवसात परीक्षा पार पाडणे अशक्य असल्याने किमान आठ दिवसांत वेगवेगळ्या टप्प्यांवर जिल्हा परिषदांसाठी अर्ज केलेल्या उमदेवारांची परीक्षा घेतली जाणार आहे.

राज्यात सुशिक्षितबेरोजगरांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याची वस्तुस्थिती तलाठी भरतीनंतर आता जिल्हा परिषदांच्या भरतीत देखील समोर आली आहे. एका ठिकाणी अपयश आल्यानंतर तोच उमेदवार पुन्हा दुसऱ्या पदासाठी अर्ज करतोय, असे चित्र आहे. त्यामुळे एका उमेदवाराला आठ ते दहा हजार रुपये अर्ज फीपोटी भरावे लागणार आहेत.
पदवी, पदव्युत्तर पदवी व अभियांत्रिकी उमेदवारांचे मोठ्या प्रमाणावर अर्ज (ZP Recruitment 2023)
खासगी क्षेत्रातील नोकरीपेक्षा शासकीय नोकरीत सुरक्षिततेची हमी आहे. त्यामुळे त्याठिकाणी पगाराची व नोकरीची शाश्वती असल्याने जिल्हा परिषदांमधील गट-क व गट-ड संवर्गातील पदांसाठी बारावी उत्तीर्णची अट असतानाही पदवी, पदव्युत्तर पदवी व अभियांत्रिकीचे शिक्षण (ZP Recruitment 2023) घेतलेल्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले आहेत. तलाठी, पोलिस भरती, अंगणवाडी मदतनीस भरतीवेळी देखील अशी वस्तुस्थिती समोर आली होती. विशेष बाब म्हणजे जिल्हा परिषदांमधील पदभरतीसाठी अवघ्या 20 दिवसांत तब्बल साडेचौदा लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

जिल्हा परिषद भरतीचा तपशील –
एकूण रिक्त पदे : १९,४६०
प्राप्त झालेले उमेदवारांचे अर्ज : १४.५१ लाख
अर्जातून जमा झालेले शुल्क : १४५ कोटी
एका जागेसाठी अर्ज : ७५
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : चहाच्या गाडीवर भांडी धुणारा तरुण ISRO मध्ये बनला सायंटिस्ट; अवघ्या 23 व्या वर्षी चांद्रयान मोहिमेत केली किमया

Success Story Bharat Kumar ISRO

करिअरनामा ऑनलाईन । छत्तीसगडमधील चारौदा हे (Success Story) एक कमी प्रसिद्ध शहर भरत कुमार नावाच्या एका तरुण मुलाच्या उल्लेखनीय प्रवासाचा साक्षीदार आहे, ज्याची कथा त्याच्यामधील दृढनिश्चय आणि धैर्याचा पुरावा देत आहे. भरत हा एका सामान्य कुटुंबातील मुलगा आहे, त्याचे वडील बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात तर त्याची आई चहाचा स्टॉल सांभाळते.

शिक्षणासाठी शाळेने दिला पाठिंबा
भरतने त्याचे शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालय चारौदा येथे पूर्ण केले. या हुशार विद्यार्थ्याला 9वी मध्ये शिकत असताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता तेव्हा शाळेने त्याला शिक्षणासाठी पाठिंबा दिला आणि त्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी  प्रोत्साहन दिले. 12वीच्या परीक्षेत त्याची कामगिरी उत्कृष्ट होती ज्यामुळे त्याला देशातील प्रतिष्ठित IIT धनबादमध्ये स्थान मिळाले.

आई चालवायची चहाची गाडी (Success Story)
भरतच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्याच्या आईने चहा विकायला सुरुवात केली. भरतही आईला हातगाडीवर भांडी धुण्यापासून सर्व कामात मदत करायचा. बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याच्या आई -वडिलांना शाळेची फी भरण्यात खूप अडचणी येत होत्या. पण हार न मानता कसेबसे त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले.

अवघ्या 23 व्या वर्षी चांद्रयान 3 मोहिमेवर काम करण्याची संधी
भरत अभियांत्रिकीचा अभ्यास करत असताना 7 व्या सत्रात त्याच्या प्रवासाला एक विलक्षण वळण मिळाले आणि  त्याची प्रतिष्ठित भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) नियुक्ती झाली. त्याच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याला वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी चांद्रयान 3 मोहिमेवर काम करण्याची संधी मिळाली.
भरतची कथा ही एका नम्र सुरुवातीपासून जगातील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या प्रकल्पाचा भाग होण्याचे एक उदाहरण आहे. लहान शहरांतून आलेल्या, संकटांवर मात करुन (Success Story) आणि भारताला उज्वल भविष्याकडे नेत मोठे बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य तरुणांसाठी भरत चे उदाहरण प्रेरणादायी ठरले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com