Home Blog Page 24

Indian Navy Apprentice Recruitment 2024 | भारतीय नौदल अंतर्गत 275 पदांसाठी भरती सुरु; ITI उमेदवार करू शकतात अर्ज

Indian Navy Apprentice Recruitment 2024

Indian Navy Apprentice Recruitment 2024 | जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी आम्ही करिअरनामाच्या माध्यमातून नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. जेणेकरून खेड्यापाड्यातील उमेदवारांनाही या नोकरीच्या संधी सहजपणे उपलब्ध होतील. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. नेव्हीमध्ये काम करण्याचे अनेक लोकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण त्यांच्यासाठी नोकरीची एक मोठी संधी आलेली आहे. ती म्हणजे नेवल डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल (Indian Navy Apprentice Recruitment 2024) यांच्या अंतर्गत 2025 26 साठी शिकाऊ प्रशिक्षणासाठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती जवळपास 275 रिक्त पदांसाठी असणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे. तसेच 2 जानेवारी 2025 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच तुम्ही अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Indian Navy Apprentice Recruitment 2024

भारतीय नौदला अंतर्गत नेव्ही अप्रेंटिस शिकाऊ प्रशिक्षणासाठी भरती जाहीर झालेली आहे.

रिक्त पद संख्या

या भरती अंतर्गत 275 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार हा आयटीआय पास असणे गरजेचे.

वयोमर्यादा | Indian Navy Apprentice Recruitment 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 14 ते 18 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

2 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 2 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Central Railway Pune Bharti 2024 | मध्य रेल्वे अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरु, महिना मिळणार 36 हजार रुपये पगार

Central Railway Pune Bharti 2024

Central Railway Pune Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. अगदी खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत नोकरीच्या संधी पोहोचाव्यात आणि त्यांना चांगली नोकरी मिळावी. यासाठी आम्ही वेगवेगळ्या नोकरीची माहिती सांगत असतो. अनेक लोकांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण मध्य रेल्वे पुणे (Central Railway Pune Bharti 2024) विभाग अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती अर्धवेळ लेडी डॉक्टर्स या पदाची आहे. या पदाच्या एकूण 3 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. 3 डिसेंबर 2024 ही मुलाखतीची तारीख आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Central Railway Pune Bharti 2024

या भरती अंतर्गत अर्धवेळ लेडी डॉक्टर या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत अर्धवेळ लेडी डॉक्टर या पदाच्या 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला पुणे या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 53 वर्षपर्यंत असणे गरजेचे आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीची निवड मुलाखती द्वारे घेतली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

या मुलाखतीसाठी तुम्हाला वरिष्ठ डीपीओ कार्यालय पहिला मजला डीआरएम कार्यालय इमारत आर बी एम रोड पुणे 411001

मुलाखतीची तारीख | Central Railway Pune Bharti 2024

3 डिसेंबर 2024 ही मुलाखतीची तारीख असणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे MBBS शिक्षण पूर्ण झाले असणे गरजेचे आहे.

वेतनश्रेणी

अंतर्गत निवड झाल्यावर उमेदवाराला दर महिन्याला 36 हजार 900 रुपये पगार मिळेल.

निवड प्रक्रिया

  • या भरती अंतर्गत मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
  • त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • 3 डिसेंबर 2024 मुलाखतीची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

PDF जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

JNV Wardha Bharti 2024 | जवाहर नवोदय विद्यालय अंतर्गत नोकरीची संधी ; मुलाखतीद्वारे होणार भरती

JNV Wardha Bharti 2024

JNV Wardha Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक वेळा नोकरीच्या संधीबद्दल माहिती होत नाही. आणि त्यांना चांगल्या प्रकारे नोकरी करता येत नाही. परंतु आम्ही नेहमीच तुमच्यासाठी नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशी संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता जवाहर नवोदय विद्यालय वर्धा (JNV Wardha Bharti 2024) यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती पिजिटी फिजिक्स या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाची 1 रिक्त जागा आहेत. आणि ती भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेले आहे. ही मुलाखत 10 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.

पदाचे नाव | JNV Wardha Bharti 2024

या भरती अंतर्गत पीजीटी फिजिक्स या पदाचा रिक्त जागा आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 1 रिक्त जागा भरली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाली तर तुम्हाला वर्धा या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा | JNV Wardha Bharti 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमचे वय 50 वर्षेपर्यंत असणे गरजेचे आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीची निवड मुलाखती द्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

जवाहर नवोदय विद्यालय सेलू कटे जिल्हा वर्धा

मुलाखतीची तारीख

10 डिसेंबर 2024 ही मुलाखतीची तारीख आहे.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत निवड झाली तर तुम्हाला महिन्याला 35 हजार 750 रुपये एवढे वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया

  • या भरती अंतर्गत मुलाखतीद्वारे तुमची निवड होणार आहे.
  • 10 डिसेंबर 2024 रोजी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • आवश्यक सगळी कागदपत्र मुलाखतीसाठी जाताना बरोबर ठेवावी.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | अनेक लोकांना पुण्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. तसेच पुण्यात नोकरीच्या विविध संधी असतात. परंतु त्या संधी सगळ्या उमेदवारांपर्यंत योग्य वेळी पोहोचत नाही. आज आम्ही पुण्यात नोकरी करून इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अशीच नोकरीची छान संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता समाज कल्याण विभाग पुणे 9Samaj Kalyan Vibhag Bharti 2024) यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण 219 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 10 ऑक्टोबर 2024 पासूनच अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तसेच 30 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.

पदाचे नाव | Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 219 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज शुल्क

खुला प्रवर्ग – 1000 रुपये
राखीव प्रवर्ग – 900 रुपये

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला पुणे या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करायचा आहे.

अर्ज कसा करावा? | Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 30 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

PDF जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Nagpur Police Bharti 2024 | नागपूर पोलीस विभागात मोठी भरती सुरु; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

Nagpur Police Bharti 2024

Nagpur Police Bharti 2024 | नागपूरमध्ये जे लोक नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी आम्ही नोकरीची एक भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. पोलीस विभागात नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. आणि आता नागपूर शहर पोलीस विभागांतर्गत (Nagpur Police Bharti 2024) एक मोठी भरती निघालेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसाठी एक खूप मोठी संधी आहे. या भरती अंतर्गत विधी अधिकारी विधी गट अ, अधिकारी गट ब, आणि विधी अधिकारी या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण आठ रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच पोस्टाने भरायचे आहेत. तसेच 9 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच तुम्हाला अर्ज पाठवायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Nagpur Police Bharti 2024

या भरती अंतर्गत विधी अधिकारी गट-अ, विधी अधिकारी गट ब, विधी अधिकारी या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 8 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला नागपूर या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयो मर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 62 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती | Nagpur Police Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे

अर्ज पाठवण्याचा पत्ता

या भरतीचा अर्ज पोलीस आयुक्त कार्यालय पोलीस भवन वेस्ट हायकोर्ट रोड सिव्हिल लाईन्स नागपूर या ठिकाणी अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

9 डिसेंबर 2024 या अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा

रिक्त पदसंख्या

  • विधी अधिकारी गट अ – 1 जागा
  • विधी अधिकारी गट ब – 3 जागा
  • विधी अधिकारी – 4 जागा

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
  • तसेच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.
  • 9 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

PDF जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

GK Updates : तारुण्यात हिरवी आणि म्हातारपणात लाल रंगाची गोष्ट कोणती? ट्रिकी प्रश्न आणि उत्तरे

GK Updates 3 Sep.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1: (GK Updates) तारुण्यात हिरवी आणि म्हातारपणात लाल रंगाची गोष्ट कोणती आहे?
उत्तर: मिरची
प्रश्न 2: नवजात मुलाच्या शरीरात किती रक्त असते?
उत्तर: 270 M.L.
प्रश्न 3: कोणता प्राणी माणसासारखा विचार करतो?
उत्तर: डॉल्फिन

प्रश्न 4: कोणाचे नेटवर्किंग तंत्रज्ञान WiFi पेक्षा वेगवान आहे?
उत्तर: Li-Fi (GK Updates)
प्रश्न 5: भारतात ईडन गार्डन स्टेडियम कोठे आहे?
उत्तर: कोलकाता
प्रश्न 6: कोणत्या देशात मध्यरात्री सूर्यप्रकाश पडतो?
उत्तर: नॉर्वे
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी येथे विविध पदांच्या 105 जागांसाठी भरती सुरु

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Job Alert) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 105 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी
पद संख्या – 105 पदे
भरली जाणारी पदे –
1. मेकॅनिकल
2. केमिकल
3. इलेक्ट्रिकल
4. IT (Job Alert)
5. सिव्हिल
6. जनरल स्ट्रीम पदवीधर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Alert)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune- 412101

आवश्यक शैक्षणिक पात्रता (Job Alert) –
1. पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी पदवी/जनरल स्ट्रीम पदवीधर
2. डिप्लोमा अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य शिक्षण

मिळणारे वेतन – 8000/- ते 9000/-
नोकरी करण्याचे ठिकाण – देहू रोड, पुणे

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://ddpdoo.gov.in/units/OFDR
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MahaPareshan Recruitment 2024 : 10 वी/ITI पास विद्यार्थ्यांसाठी महापारेषण, कराड अंतर्गत नोकरीची मोठी संधी

MahaPareshan Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या (MahaPareshan Recruitment 2024) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कराड (जिल्हा – सातारा) अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कराड (जिल्हा – सातारा)
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
पद संख्या – 39 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख –17 सप्टेंबर 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – कराड, (जिल्हा – सातारा)
वय मर्यादा – १८ ते ३० वय वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम)

भरतीचा तपशील (MahaPareshan Recruitment 2024) –

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक – आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतुन वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी (MahaPareshan Recruitment 2024) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2024 : 10 वी, 12 वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत तब्बल 3317 पदांवर मेगाभरती सुरु

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेत नोकरी करण्याची अनेक तरुणांची (Railway Recruitment 2024) इच्छा असते. अशा तरुण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम-मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 3317 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे.

ही भरती म्हणजे सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या (Railway Recruitment 2024) उमेदवारांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल. रेल्वेची नोकरी ही सुरक्षीत नोकरी समजली जाते. देशभरातील उमेदवार रेल्वे भरतीच्या जाहिरातीच्या प्रतीक्षेत असतात. अशा उमेदवारांसाठी ही अपडेट महत्वाची ठरणार आहे. पश्चिम-मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल 3317 पदे भरली जाणार आहेत. 10वी, 12 वी उत्तीर्ण तसेच ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती…

संस्था – पश्चिम-मध्य रेल्वे, भारत सरकार
भरले जाणारे पद – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
पद संख्या – 3317 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 सप्टेंबर 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता (Railway Recruitment 2024) –
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) –
1. मेडिकल लॅब टेक्निशियन – 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry & Biology), NCVT/SCVT
2. उर्वरित ट्रेड – 10वी उत्तीर्ण, ITI उत्तीर्ण
अशी होणार निवड –
उमेदवारांची निवड गुणवत्ता (Railway Recruitment 2024) यादीच्या आधारे केली जाईल. 10वी परीक्षेत मिळालेल्या सरासरी गुणांवर किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) तसेच ITI/ट्रेड गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

वय मर्यादा – (Railway Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 05 ऑगस्ट 2024 रोजी 15 ते 24 वर्षे
2. SC/ST: 05 वर्षे सूट
3. OBC: 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
1. जनरल/ओबीसी/ – ₹ 141/-
2. SC/ST/PWD/महिला – ₹41/-

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – nitplrrc.com

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Online Interview Tips : ऑनलाइन मुलाखतीची तयारी करताना ‘या’ टिप्स करा फॉलो 

Online Interview Tips

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना काळापासून कंपन्यांकडून (Online Interview Tips) ऑनलाइन मुलाखती घेण्याचा ट्रेंड वाढला आहे. HR अधिकारी किंवा नियोक्त्यासमोर प्रेझेंटेबल दिसण्यासाठी ऑनलाइन मुलाखतीदरम्यान उमेदवारांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ऑनलाइन मुलाखतीसाठी पारंपारिक मुलाखतीपेक्षा काही विशेष तयारीही करावी लागते. अशावेळी ऑनलाइन मुलाखत ही उमेदवारांसाठी आव्हानात्मक ठरु शकते. यामुळे मुलाखतीपुर्वी तयारी करणे आवश्यक असते. ऑनलाइन मुलाखतीची तयारी कशी करायची, मुलाखत देताना कोणती काळजी घ्यायची; याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत…

1. मुलाखत देण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची खात्री करा (Online Interview Tips)
ऑनलाइन मुलाखत देण्यापूर्वी मुलाखतकाराकडून ऑनलाइन मुलाखत ऑडिओ-व्हिडिओ की चॅटद्वारे होणार आहे? याची संपूर्ण माहिती घ्या. ऑनलाइन मुलाखतीचे स्वरूप विचारा. तसेच प्रश्न पूर्व-रेकॉर्ड केले आहेत का ते तपासा. मुलाखतीदरम्यान तांत्रिक त्रास टाळण्यासाठी (Online Interview Tips) आधीच बॅकअप तयार ठेवा.

2. उपकरणे तपासा
ऑनलाइन मुलाखतीदरम्यान तांत्रिक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे तांत्रिक उपकरणे नीट तपासा. Wi Fi किंवा मोबाइल नेटवर्क तपासून घ्या. लॅपटॉप (Online Interview Tips) आणि मोबाईल फोन पूर्णपणे चार्ज करा. मुलाखत सुरु असताना तुमचा मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा.

3. कंपनीविषयी माहिती घ्या
तुम्ही ज्या कंपनीत ऑनलाइन मुलाखत देणार आहात त्या कंपनीच्या कार्याविषयी माहिती गोळा करा. यासाठी कंपनीच्या वेबसाइटची मदत घ्या. तेथे काम करणाऱ्या (Online Interview Tips) कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळवा आणि मीडिया कव्हरेज पाहा. अशा प्रकारे तुम्हाला कंपनीबद्दल प्राथमिक माहिती मिळू शकते. कंपनी किंवा संस्थेचा वार्षिक अहवाल पाहा, तिथे कंपनीच्या जोखीमेबद्दल माहिती मिळेल.

4. मुलाखतीसाठी योग्य जागा निवडा
ऑनलाइन मुलाखत देताना प्रकाश योजना, कॅमेरा अँगल आणि तुम्ही बसणार आहात त्या जागेची मागील पार्श्वभूमी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे मुलाखतीसाठी योग्य जागा निवडा. व्यावसायिक (Online Interview Tips) दिसणारा पोषाख परिधान करा. जेणेकरून मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला तुमच्यातला आत्मविश्वास दिसेल.

5. संभाव्य प्रश्नांसाठी आधीच तयारी करा
ऑनलाइन मुलाखतीसाठी काही प्रश्नांची उत्तरे आधीच तयार करा. तुम्हाला किती अनुभव आहे? आधीची नोकरी सोडण्याचे कारण काय? तुम्हाला किती पगाराची (Online Interview Tips) अपेक्षा आहे? ऑनलाइन मुलाखतीदरम्यान आवश्यक असेल तिथे ‘होय’ आणि ‘ठीक आहे’; असं म्हणायला विसरू नका.

7. वेब कॅमेऱ्याकडे पाहा
मुलाखत देताना स्क्रीनवरील व्यक्तीकडे पाहण्याऐवजी, वेब (Online Interview Tips) कॅमेऱ्याकडे पाहा. प्रशांची उत्तरे देत असताना तुम्ही जर आजूबाजूला बघितले तर तुम्ही मुलाखत गांभीर्याने घेत नाही असे मुलाखत घेणाऱ्याला वाटू शकते.

6. नेहमी प्रेझेंटेबल राहा
ऑनलाइन मुलाखती दरम्यान चेहरा हसरा ठेवा. पारंपारिक मुलाखतीप्रमाणेच आत्मविश्वासाने मुलाखत द्या.  खुर्चीच्या काठावर बसा जेणेकरून समोरच्या व्यक्तीला तुमचे शरीर सरळ दिसेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com